विचारण्याआधी तुम्हाला उत्तर मिळेल !१४ डिसेंबर २०११

प्रश्न: गुरुजी, गुरु आणि शिष्य यांच्याबद्दल काहीतरी सांगा.
श्री श्री: गुरु आणि शिष्याचं नात हे प्रेमाचं एक विलक्षण रूप आहे. प्रेम नसेल तर गुरु आणि शिष्य असू शकत नाहीत. या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही आणि तिथे ईर्ष्या किंवा रागाला जागा नाही. शिष्य गुरूसमोर बसला की उपनिषद घडतं.
जिथे गुरु शिष्य नसतील तिथे जग नाही आणि जगाला गुरु आणि शिष्यांची गरज आहे. जेव्हा गुरु शिष्य एकत्र बसतात तेव्हा ज्ञान निर्माण होते.

प्रश्न: गुरुजी, अनेक उपनिषदे आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे कोणते?
श्री श्री: १०८ उपनिषदांपैकी पहिली ११ अतिशय महत्त्वाची समजली जातात. आणि त्या ११ मध्ये 'ईशावास्य' उपनिषद - त्यात 'सर्व काही देव आहे' असे सांगितले आहे. प्रत्येक गोष्ट दैवत्वात विलीन आहे.
या दैवी शक्तीचा अनुभव घ्या, तिरस्कार, चीड किंवा हाव यांना थारा देऊ नका, आणि सेवेत शंभर वर्षे आनंदाने जगा.
उपनिषदांत म्हटले आहे, 'म गृध कस्यास्वीद धनम'
आपल्यामध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात, एक म्हणजे घेण्याची आणि दुसरी देण्याची. आपण कोणते संस्कार आपल्या मुलांमध्ये मुरवतो हे पाहण्याजोगे आहे. जर ती (मुले) घ्यायला किंवा मागायला संकोचत असतील तर ते चांगले लक्षण आहे. पण जर ती द्यायला संकोचत असतील तर काहीतरी चुकतंय.
लोकाना जेव्हा काही घेण्यासाठी हात पुढे करायची लाज वाटते, तेव्हा ते चांगल लक्षण असत. परंतु, जर लोक मदत करताना संकोच करत असतील तर समाजाची दिशा बदलायला हावी.
प्रत्येक माणसाला इतरांकडून काही घेताना संकोच वाटतो. खासकरून जेव्हा नातेवाईकांकडून घेण्याची वेळ येते तेव्हा. नात्यामधे घेण्यापेक्षा देण्याची इच्छा जास्त असली पाहिजे अणि ही प्रवृत्ती मुलांमधे अगदी सहज असते.
सात्विक मूल आपल्या मालकीच्या वास्तु प्रत्येकाशी वाटायचा प्रयत्न करते. पण राजसी मूल हे इतरांच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करत.
आम्ही या देण्याच्या आणि वाटण्याच्या संस्कारांमध्ये वाढलो आहोत. जेव्हा काही मागायची वेळ यायची, तेव्हा खूप संकोच वाटायचा. वडिलांकडे देखील काही मागताना भीड पडायची. मी कधी त्यांच्याकडे काही मागितले नाही. हं.. हे अगदीच टोक होत.
आपण आपल्या मुलांमध्ये देण्याचे आणि वाटण्याचे संस्कार बिंबवायला हवेत; देण्यात - वाटण्यात आनंद आणि घेण्यात संकोच. त्यांना हात पुढे करून मागायला लाज वाटली पाहिजे. काही लोकांकडे पुरेसे असूनसुद्धा ते अजून मागत राहतात. खूप विचित्र वाटते.
स्वतःचे दन्तमहाविद्यालय असलेले एक स्वामी एकदा आमच्या आश्रमात आले. ते म्हणाले, कि त्यांना १५ लाख रुपयांची अत्यंत गरज आहे आणि ते २ आठवड्यात हे पैसे परत करतील.
मला वाटले कि काही अतिशय महत्त्वाच्या कामासाठी त्यांना खूप गरज पडली असेल, कदाचित एखाद्या देवळासाठी वगैरे, आपण त्यांना दिले पाहिजेत आणि आम्ही त्यांना (पैसे) दिले. ६ वर्ष गेली तरी त्यांनी पैसे दिले नाहीत.
मी म्हटलं, 'अच्छा, असं आहे तर. आता आपण त्याला सोडायचं नाही.'
मी त्यांना म्हटलं, 'स्वामीजी, तुम्ही जर दान म्हणून मागितलं असतं तर आम्ही दान दिलं असतं. पण तुम्ही कर्ज मागितलं. आता ते तुम्हाला परत कराव लागेल.'
मी असं वागलो कारण एका स्वामीला लोकांनी भोंदू म्हणावं हे मला आवडलं नसत. आधीच जगात प्रामाणिक स्वामी थोडे आहेत. आणि या स्वामीला धडा शिकवायला हवा होता.
मी माझ्या माणसाना सांगितलं कि हे प्रकरण सोडून देऊ नका. पैसे परत करीपर्यंत रोज त्याला विचारा. त्याला सूट का द्यायची? आम्ही लाखो- करोडो रुपये गरिबांना घरं बांधून देण्यासाठी खर्च करतो, परंतु दानधर्म ही वेगळी गोष्ट. जर कोणी तुम्हाला फसवत असेल तर तो माणूस कितीही मोठा असला तरी त्याला पकडलं पाहिजे. त्याच वेळी, एखादा माणूस कसाही असला तरी त्याचा अनादर होता कामा नये. एखाद्याचा अपमान करणं बरोबर नाही.
मी माझ्या माणसाना त्यांच्याशी आदराने बोलायला सांगितलं आणि विनंती करायला सांगितली की घेतलेले पैसे तेवढ्याच आदराने आणि प्रामाणिकपणे परत करावेत. पण त्यांनी नकार दिला. शेवटी मला त्यांच्याशी बोलावेच लागले. मी त्यांच्याशी अत्यंत स्पष्टपणे आणि रोख-ठोक बोललो. त्यांना अतिशय शरम वाटली आणि पैसे परत देण्याचे कबूल केले.
एखाद्याला चूक करू न देणे किंवा त्याला चुकीच्या गोष्टीकडे वळू न देणे हे देखील सात्विकतेचे लक्षण आहे. हा गुण आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवा.
राजसी माणूस शांतपणे बसेल, दुसऱ्याला चूक करताना पाहिल आणि नंतर म्हणेल, की "बघा, त्याने चूक केली."
एक संत होता; दुसऱ्या माणसांबद्दल तक्रार घेऊन येणाऱ्या सगळ्या माणसाना तो ओरडायचा. म्हणायचा, 'म्हणजे तो चूक करण्याची तू वाट बघत होतास जेणेकरून तू माझ्याकडे येऊन त्याची तक्रार करू शकशील.'
मी याला 'निरीक्षक मनोवृत्ती' म्हणतो. आपण एखाद्याने चूक करायची वाट बघतो, नंतर जाऊन बॉस कडे त्या माणसाची तक्रार करतो, जेणेकरून आपल्याबद्दल आपल्या बॉस च मत अनुकूल व्हावं. त्यामुळे बॉस आपल्याबद्दल चांगल मत बनवतो आणि चूक करणाऱ्याला शिक्षा करतो.
तर, एखाद्याच्या चुकीचा फायदा उठवणे ही देखील एक 'आसुरी' आणि 'तामसी' प्रवृत्ती आहे. एखाद्याला मार्गदर्शन करणे किंवा एखाद्याला चूक करण्यापासून परावृत्त करणे हा मुळात सात्त्विक गुणधर्म आहे. तुमची सून काहीतरी चूक करते आणि तुम्ही तुमच्या मुलाकडे तक्रार करता. त्या ऐवजी, तुमच्या सुनेने चूक करायच्या आधीच तिला योग्य सूचना द्या - हि झाली सात्त्विक सासू.
एखादी चूक झाली, तरीही तिला अपराधी वाटू न देणे हा सात्त्विक गुणधर्म आहे. बऱ्याच लोकांना इतरांना अपराधी वाटायला लावण्यात मजा वाटते. नवरा आणि बायको मध्ये देखील हे बरेच वेळा घडते. मी स्वतः हे ऐकलय आणि पाहिलंय सुद्धा. 'तू असा वागलास / वागलीस माझ्याशी. मी बरोबर होते / होतो आणि तू चूक.'
दुसऱ्याला अपराधीपणाची जाणीव करून दिल्याने नात्यातील दुरावा वाढतो.
कोणताही गुरु आपल्या शिष्याशी असा कधीच वागत नाही. 'तू चूक आहेस, मूर्ख आहेस. मी बरोबर आहे. माझ्याकडून शीक.' असं तो (गुरु) कधीच म्हणत नाही. गुरु नेहमी शिष्याला स्वतःचा एक भाग बनवतो आणि उदाहरणे देऊन शिकवतो. 'ये बाळा, तू माझाच एक भाग आहेस. माझे निरीक्षण कर, तूसुद्धा प्रगती करशील आणि माझ्यासारखा मोठा होशील.'
इतरांसाठी आदर्श निर्माण करणं आणि त्यांच्यात अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ न देणे - हे एक कौशल्य आहे, एक कला आहे.
दुसऱ्या माणसाला कौशल्याने विकसित करणं हे गुरूच काम आहे. गुरु आणि शिष्य दोघेही सात्त्विक स्वभावाचे असल्यावर हे शक्य होते.
काही शिष्य इतके निर्बुद्ध असतात कि त्यांना गर्भित सूचना कळत नाहीत आणि सरळ सोप्या सूचना देखील ते समजू शकत नाहीत. अशा वेळी काही गुरु करुणेपोटी रागावतात. पण त्याचा काही उपयोग होईल याची शाश्वती नसते.
मी असे अनेकदा पाहिलंय की आरडा-ओरडा करून झाल्यावर शेवटी गुरु आपला स्वभाव बदलतो - शिष्य बदलो वा न बदलो. उलट शिष्याचा गुरुवर प्रभाव पडतो आणि त्यामुळे गुरु कायम चिंतेत राहतो.
तेलगु मध्ये एक म्हण आहे - एक संगीत शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना सांगतो, 'तुम्हाला शिकवल्यामुळे मी माझी पत गमावली आहे. तुम्ही काहीही शिकला नाहीत आणि मी काहीही विसरलो नाही.
नियमाप्रमाणे, शिक्षक आपल्याजवळचे ज्ञान शिष्यांना देऊन झाल्यावर सगळ विसरून गेला पाहिजे. कारण विसरल्या न गेलेल्या गोष्टी पुढच्या आयुष्यभरासाठी बंधन बनून राहतात. सगळ्यात चांगल म्हणजे शिकायचं आणि सर्व विसरून जायचं.
केव्हा विसरायचं? जेव्हा तुम्ही शिकलेलं सगळ दुसऱ्या एखाद्याला शिकवाल, तेव्हा तुम्हाला ते विसरायचा हक्क मिळेल.
ज्ञान हे साबणा सारखे आहे.
ज्ञानापेक्षा शुद्धी करणार काहीही नाही. पण जर तुम्ही ते स्वतः जवळच ठेवलं, तर त्याचे रुपांतर अज्ञान आणि अहंकारात होईल. त्यामुळेच 'शिका आणि विसरून जा' असं म्हटलं जात.
म्हणून जर आपण शिकलेलं संगीत आपल्या मनावर कोरलेलं राहिलं, तर त्याचा येणाऱ्या आयुष्यात त्रास होतो. रिकाम आणि पोकळ होण म्हणजेच मुक्ती मिळण.
पण कधी? शिष्य सगळ शिकल्या नंतरच. नाहीतर ते ज्ञान हरवून जाईल. ज्ञान मिळवल्यानंतर ते दुसऱ्याला देण हा नियम आहे. विद्यार्थ्याला गुरूंशी संलग्न असतानाच मान मिळतो. लोक म्हणतात, की 'हा अमुक - अमुक गुरूंचा शिष्य आहे.' आणि त्यामुळेच जेव्हा विद्यार्थी व्यवस्थित शिकत नाहीत, तेव्हा गुरूची प्रतिष्ठा धुळीला मिळते.
त्यामुळे, जेव्हा देण्याचा स्वभाव वाढतो आणि घेताना किंवा मागताना संकोच वाटतो, तेव्हा जीवन एका उच्च पातळीला पोचत. जेव्हा देताना संकोच वाटतो आणि घेताना लाज वाटेनाशी होते तेव्हा ती अस्तित्त्वाची खालची पातळी ठरते. काही लोकांची मजल तर झडप घालणे, लुबाडणे, हिसकावून घेणे इथपर्यंत पोहचते, ती तर अस्तित्त्वाची नीचतम पातळी ठरते.
आता, जगात सगळ्या प्रकारची लोकं असतात आणि इथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात. त्यामुळे कोण एकाला आपण दोषी ठरवू शकत नाही.
आजचा महत्त्वाचा सल्ला म्हणजे आपण इतरांना आदर्श घालून दिला पाहिजे आणि कोणालाही अपराधी वाटू देता कामा नये.
तेव्हा, सर्व गुरुजन हो, जेव्हा तुम्ही काही शिकवाल, तेव्हा लोकांचा जास्तीत जास्त विकास साधा. काही लोकांना थोड्याशा रागावण्याची पण गरज असेल.
आज आशीर्वादासाठी आलेली एक महिला उदास दिसत होती. मी तिला ओरडलो आणि ती हसायला लागली. तेव्हा, कधीकधी लोकांना रागवावं..
आपल्याला सगळ दिलेलं आहे तरीही आपण बसून राहतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून रडत बसतो - उदा. सून, मुलगा, नातवंड आणि अशा कितीतरी गोष्टी... तुम्ही असे किती दिवस रडत राहणार? जागे व्हा! जगात संपूर्ण आनंद मिळण अशक्य आहे. आनंद हा नेहमी कोणत्या न कोणत्या इकडच्या तिकडच्या समस्येबरोबर येतो. धैर्य धरा आणि उठा. कधीतरी लोकांना जागे करायला थोडसं रागवण गरजेचं असतं.
मुलं हि स्वभावाने लाजाळू असतात.
मी लहान असताना घरी कोणी पाहुणा आला की मी तिथून पळायचो.. मला इतरांसमोर पूजा करायला खूप लाज वाटायची, कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवतय या विचाराने अस्वस्थ असायचो. एकट्याने पूजा करताना मोकळ वाटायचं..
प्रत्येक मुलामध्ये थोड्या प्रमाणात संकोच हा मुळातच असतो. त्याला योग्य दिशा मिळण्याची गरज असते. त्याच प्रमाणे, खोट बोलताना पण संकोच वाटला पाहिजे. आपण हे आचरणात आणलं तर ते मुलांवर पण बिंबवल जाईल.
प्रश्न: असे म्हणतात कि आत्मा नेहमी आपल्याला सत्याचे मार्गदर्शन करतो. अंतरात्म्याचा आवाज कसा ऐकायचा?
श्री श्री रवी शंकर: खोल ध्यानात आत्म्याचा आवाज ऐकू येऊ शकतो. खोल विश्रामात जेव्हा तुम्ही असता आणि त्यावेळी येणाऱ्या आतील आवाजाने जर शांती आणि आराम वाटेल तो आत्म्याचा आवाज असतो.
आत्म्याचा स्वभाव शांती आहे. कोणताही आनंद हा जगापासून नाही तर आत्म्यापासून मिळतो.
आपल्याला वाटते एखाद्या वस्तूतून आनंद मिळतो, पण तो खरेतर आतून येतो.
जसे, हाड चघळताना एखाद्या कुत्र्याच्या तोंडात रक्त येते पण त्याला वाटते हाड खूप रसदार आहे. हाड खरेतर रसदार नसते.
भगवद गीतेत भगवान कृष्णाने खूप सुंदर सांगितले, “अनित्यं असुखम लोकम इमम प्राप्यं भजसाम”.
हे जग अनित्य आहे आणि त्यात काही सुख नाही, हे साध्य झाल्यावर मजकडे पहा. माझ्यात विरून जा, माझे नामस्मरण कर; फक्त त्यामुळे मनशांती प्राप्त होईल.
प्रश्न: गुरुजी, मानसिक विकारामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधीवर कोणते ध्यान चांगले?
श्री श्री रवी शंकर: सुदर्शन क्रिया आणि पंचकोश किंवा सहज समाधी ध्यान चांगले.
हा प्रश्न तुम्ही कितीवेळ दाबून ठेवलाय. ‘कसेतरी करून, मला हा प्रश्न विचारावा लागला’. प्रश्न विचारणे सुद्धा बळजबरी ठरते. विचारेपर्यंत तुम्ही अस्वस्थ असता.
जेव्हा तुम्ही गुरुकडे येत तेव्हा सर्व प्रश्न मांडा. विचारण्याआधीच अगदी सहजतेने तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. हा अगदी उच्च पातळीवरचा संवाद झाला.
तुमच्या मनात एक प्रश्न होता किंवा तो प्रश्न आला आणि गायब झाला, पण जे ज्ञान तुम्हाला मिळणार होते ते मिळाले.
याही पुढचे म्हणजे ज्ञानाची चिंता नसते. केवळ इथे बसून तुम्ही तृप्त होता आणि मन अगदी आनंदात असते.
गोपी अशाच होत्या. जेव्हा उद्धव गोपींना ज्ञान देण्यासाठी गेला, तेव्हा त्या म्हणाल्या, “काय ज्ञान देत आहात आम्हाला? द्वारकेत सर्व कुशल आहे ना? एवढे जाणून आम्ही सुखी आहोत. त्यापेक्षा जास्त ज्ञानाची आम्हास गरज नाही”.
पण ही एक पायरी वरची झाली. आता तुम्ही असा विचार करू नका, ‘मला ज्ञानाची गरज नाही’.
त्याने काम होणार नाही. ज्ञानाचे एक स्थान असते; त्याचीदेखील गरज असते.
कर्माचे एक स्थान असते; त्याचीदेखील गरज असते आणि समाजात रस घेणे सुद्धा जरुरी आहे. त्याचे देखील एक स्थान आहे. प्रत्यका बद्दल काळजी असली पाहिजे; ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.
हीच जीवनकला; आर्ट ऑफ लिविंग आहे – सर्वकाही बरोबर घ्या; सामाजिक बांधिलकी, अखंडत्व, साधना, सत्संग, सर्व काही.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही सर्व ध्यान प्रकार आम्हास शिकविले? जर तुम्ही आम्हाला तो ‘पोकळ आणि रिकामे’ ध्यान प्रकार शिकविला तर ते केक वरचे आयसिंग होईल. जय गुरुदेव!
श्री श्री रवी शंकर: आयसिंग शिवाय देखील केक छान लागतो, तेव्हा आयसिंग शिवाय केक खा. अडवान्सकोर्स साठी बसा आणि ‘पोकळ आणि रिकामे’ ध्यान करा.
प्रश्न: गुरुजी, केरळमध्ये मुल्लापेरियार धरणाविषयी ४० लाख लोक चिंतेत आहेत. त्याचप्रमाणे, तामिळनाडू मध्ये देखील त्याच मुल्लापेरियार धरणामधून लोकांना पाणी हवं. भूकंप आणि मुसळधार पावसाच्या भीतीने लोक चिंतीत आहेत.
श्री श्री रवी शंकर: या विषयी अभ्यास करण्यास मला वेळ मिळाला नाही. मला खोलात जाऊन याचा अभ्यास करायचा आहे. मुल्लापेरियार धरण काही नवीन नाही; खूप पूर्वीपासून आहे. अचानक, यावेळी, ह्या मोसमात हा विषय का आलाय? कोणताही प्रतिसाद देण्याआधी मला त्याची माहिती घेतली पाहिजे. लोक कल्याणा खातर जर तामिळनाडू आणि केरळचे आणि केंद्रीय वैज्ञानिक एकत्र बसले आणि जर पहिले कि हा खरच गंभीर विषय आहे तर यावर कसा तोडगा काढायचा, मग नियामक मंडळाला हा प्रश्न सहज सोडवता येईल.
दोन्ही, तामिळनाडू आणि केरळच्या लोकांना मला आव्हान करावेसे वाटते कि त्यांनी कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा द्वेष लोकांमध्ये पसरवू नये.
वर्षाच्या या वेळेस खूप तीर्थ यात्रा असतात आणि तामिळनाडूतून केरळला खूप लोक चाललेत, तसेच केरळहून खूप लोक तामिळनाडूत देवळांना भेटी देण्यासाठी जातात. ह्या तीर्थयात्रा लोकांना एकत्र आणताहेत आणि राष्ट्रीय एकता देखील ह्या तीर्थ यात्रांमुळे घडते.
यावेळी तामिळनाडूतील मल्याळी दुकाने जाळणे आणि केरळमधील तामिळनाडूतल्या गाड्यावर दगड फेकणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
म्हणून मी दोन्ही राज्यातील जनतेला आवाहन करतो कि बिथरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, आणि अशा कुठल्याच कारवाया किंवा धरणे धरू नका ज्यामुळे हिंसा किंवा अशांतता व कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान होईल. मी सर्व बुद्धीवाद्यांना, भूगर्भ शास्त्रज्ञांना आणि इतर शास्त्रज्ञांना विनंती करतो कि त्यांनी एकत्र बसावे आणि तोडगा शोधावा. नवीन धरण बांधायचे असेल, जुने धरण मजबूत करायचे असेल किंवा काहीही करावे लागत असेल, करता येऊ शकते.
प्रश्न: गुरुजी, ज्ञान काय आहे? जे फक्त वाचले जाते, लिहिले जाते किंवा ऐकले जाते ते ज्ञान का त्यातील बुद्धी?
श्री श्री रवी शंकर: ज्ञानाचे मूर्त स्वरूप म्हणजे आपली चेतना. तुमच्या मनात उत्पन्न झालेले जाणून घेण्याची ही इच्छा – ज्याला ही इच्छा होते तेच ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे.
जाणणाराच जाणल्याचे मूर्त स्वरूप आहे.
प्रश्न: गुरुजी, कर्म काय आहे? पूर्वकर्मा पासून मुक्ती कशी मिळविता येईल?
श्री श्री रवी शंकर: ज्ञानापासून तुम्हाला मुक्ती मिळते, कर्मापासून नाही. कर्माचे स्वतःचे नियम असतात आणि ते चालत राहते. चांगले कर्म करा.


The Art of living
© The Art of Living Foundation