शिष्याने पोकळ आणि रिते असायला हवे !
१२ डिसेंबर २०११

प्रश्न: मी जेव्हा ध्यान करतो तेव्हा मन विरघळून जात होते. मी खात्रीशीर सांगू शकत नाही कि मन कोठून येते?
श्रीश्री: मन हे माझे शत्रू आणि हेच मन माझे मित्र ही आहे. जर मनाने माझे ऐकले तर माझा मित्र आणि जेंव्हा ते इतरत्र भरकटते तेव्हा माझा शत्रू.
म्हणून संपूर्ण जगात मनासारखा मोठा शत्रू नाही.

प्रश्न: असे म्हणतात की महाभारताच्या युद्धा नंतर भारताचा ऱ्हास सुरु झाला, यात बरेच प्रतिभावान व हुशार व्यक्ती युद्धात मारले गेले,यावर तुमचे मत काय आहे?
श्रीश्री : शंकाच नाही ! प्रत्येक युद्धात कौशल्य, साधन, मनुष्य व मूल्य गमावले जाते. पण म्हणून युद्धा नंतर भारता मध्ये प्रतिभावंत व्यक्ती झाले नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल,
बरेच व्यक्ती आहेत जसे चाणक्य ,शंकराचार्य,
गौडपदाचार्या, शुक महर्षी. म्हणून हे पूर्ण सत्य नसले तरी , अर्ध सत्य आहे.

प्रश्न: भगवतगीते मध्ये कृष्णाने म्हटले आहे की त्याला कोणी आवडते असे नाही किवां आवडत नाही असेही नाही आणि दुसरीकडे असेही म्हटले की काही व्यक्ती मला प्रिय आहेत. कृपया ही दोन परस्परविरोधी विधाने समजावून
सांगाल का?
श्री श्री: दुहेरी अर्थाचे विधाने करणे व गोंधळात टाकणे, हे तर कृष्णाचे वैशिष्ठ्य आहे. अस्तित्वाच्या वेगवेगळया पातळ्यांवर आणि वेगवेगळया घटनांसंदर्भात त्याने हि वक्तव्ये केली आहेत आणि दोन्ही विधाने सत्य आहेत.
एका ठिकाणी ते म्हणतात स्थिर, दयाळू, आनंदी व प्रेमळ माणसे मला जास्त प्रिय आहेत म्हणून तुम्ही मला जास्त आवडता हे खरेच आहे. दुसरीकडे ते म्हणतात मला गृहीत धरू नका मला आवड-निवड नाही. प्रत्येकच मला प्रिय आहे, सर्वान मध्ये मी स्वता:ला बघतो.भगवद गीता हे सर्वात जास्त विरोधाभास असलेला ग्रंथ आहे आणि तो पूर्णसत्य आहे कारण त्यामध्ये एवढा विरोधाभास आहे.

प्रश्न: विविध प्रकारच्या ध्यानाचे काय महत्व आहे?
श्री श्री: प्रत्येक ध्यानाचे लक्ष्य म्हणजे तुम्हाला स्थिर करून आतल्या शांतचित्त व आनंदाचा अनुभव करविणे .तुमचे मन सर्वत्र भरकटते आणि त्याला जागेवर आणण्यासाठी माझ्याकडे सर्व प्रकारच्या योजना किवां क्लुप्त्या आहेत.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही नेहमी म्हणता,कि तुमच्याकडे द्यायला भरपूर आहे, घेणाऱ्याच्या पात्रतेवर अवलंबून आहे किती घ्यायचे. म्हणून तुमच्या म्हणण्याप्रमाणे आदर्श शिष्याचे ओळख/गुण काय?
श्रीश्री: शिष्य हा पोकळ व रिकामा हवा. तसेच जे काही तुम्ही ऐकले किवां समजले त्यला गृहीत धरू नका. वाचा ,अभ्यास करा आणि पुन्हा पुन्हा वाचा. माहीत करून घ्या जसे तुम्हाला काहीच माहीती नाही. माहीत असल्यामुळे तुमच्यात अहंकार/उद्धटपणा येऊ देऊ नका फक्त निर्मळ, नैर्सार्गिक व साधेपणाने राहा.

प्रश्न: अंतीम ज्ञान म्हणजे "अहं ब्रम्हासी" , पण भक्तीत खूप आनंद आहे. परमात्मा व तुम्ही एकच आहे हि कल्पना फार कंटाळवाणी वाटते कारण आपल्याला मजा येण्यासाठी ‘दोन’ लागतात. भक्तीमध्ये असणे हेच परम धाम आहे की त्याही पुढे काही आहे?
श्री श्री: हो! एक संकल्पना म्हणून ‘अहं ब्राम्हासी’ खूप कंटाळवाणे वाटते, पण ते तसे नाही. एकदा का तुम्ही त्या स्थितीत पोचलात, कि तुम्ही फक्त ‘भक्तीच’ करू शकता.नाहीतर भक्ती तुम्हाला आपोआप तिथे घेऊन जाईल.

प्रश्न: गुरुजी, माझ्या मुलाने आर्ट एक्षेल चा कोर्स केला आहे आणि रोज क्रिया करतो पण घरात चोरी करतो , मी काय करू?
श्रीश्री: असे नाही की मुले क्रिया केल्यानंतर चोरी सोडून देतील . क्रिया करतो हे चांगले आहे पण तुम्ही शोधून काढायला पाहीजे की त्याला चोरी करावीशी का वाटते .
तुम्ही बसून त्याला समजावून त्याच्याशी बोलायला पाहीजे.’बाळा, तुला काय हवे मला सांग.मी तुला हवे असेन ते देईल’.आई वडीलच मुलांना असे वागायला शिकवतात .तुम्ही त्यांना ठराविक पैसे देतात आणि सांगता "हे तुझे पैसे आहेत तुझ्या जवळ ठेव कोणाला देऊ नकोस".शाळेत जाताना सागतो "खाण्याचा डब्बा तुझे जेवण आहे, तूच खा मित्रांना देऊ नकोस "असे सांगून आपण त्याची नि:स्वार्थी वृत्ती घालवतो ,जो की मुलांचा स्वभाव आहे.मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या घरात ऐका वाडग्यात पैसे ठेवायचे .आम्हाला जेव्हा खर्चायला पैसे लागायचे आम्ही त्यातून घेऊन खर्च करायचो व उरलेले परत ठेवायचो.
आम्हाला असे कधीच वाटले नाही हे माझे पैसे आहेत, ते माझ्या खिशात ठेवावे .घरात बरेच लोक राहतात पण कोणी आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे घेत नाही, उरले तर परत आणून वाडग्यात ठेवायचे. घर म्हणजे एक. अशा पद्धती घरात असल्यास मुलांवर संस्कार होतील. एक वाडगा ठेऊन त्यात पैसे ठेवा . अशाने मुलांमध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता वाढेल .

प्रश्न: गुरुजी, असे म्हणतात की ललिता सहस्त्रनाम विवाहित स्त्रियांनी वाचयचे नाही.हे खरे आहे का?
श्रीश्री: आपल्या देशात लोक अगदी काहीही म्हणतात,काही म्हणतात स्त्रियांनी ललीता सहस्त्रनाम नाही वाचायचे ,कोणी म्हणते घरात शिव लिंग नाही ठेवायचे ,काही म्हणतात स्त्रियांनी ‘ओम नमः शिवाय’ जप नाही करायचा. हे सर्व चुकीचे आहे. असे कुठेही ग्रंथात लिहिलेले नाही. चांगल्या गोष्टी सर्वांनी वाचायला व म्हणायला हव्या. कोणीही अशा धर्म भोळ्या कल्पना मध्ये अडकू नका. आज-काल योग्य पंडित किवां धर्म गुरु मिळणे कठीण आहे.बर्याच वेळा लग्न लावणारे ब्राम्हण किवां अंत वेळी ब्राम्हण काय मंत्र म्हणतात कोणालाही माहीत नसते.ब्राह्मण येऊन मंत्र म्हणतात व विधी संपन्न होतो. बर्याच वेळेला आपण इतक्या घाईत असतो की आपण पंडितजींना सांगतो लवकर संपवा . आपण मंत्रांवरील निष्ठा गमावली आहे . निवंत बसून ऐकण्याची आणि अर्थ समजून घेण्याची आपली क्षमता कमी झाली आहे .ख्रिस्ती गुरूंना आपण मान देतो तसा आपल्या ब्राम्हणांना मिळत नाही. भारता मध्ये धर्मपूजा विधी शिकण्याची व्यवस्था नाही. त्या करिता आम्ही शाळा सुरु केल्या "वेद विज्ञान महाविद्यापीठ" येथे सर्व पूजा विधी "वेदिक धर्म संस्थे प्रमाणे" शिकवतात. मग लोकांना लग्न विधी चा खरा अर्थ कळेल.लग्न म्हणजे फक्त मंगळसूत्र घालणे एवढाच नाही तर सात फेरे (सप्तपदी) म्हणजे लग्न, जोपर्यंत सात फेरे तुम्ही बरोबर चालत नाही तोपर्यंत लग्न पूर्ण होत नाही, पण याचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे.मी अशा सर्वांना आमंत्रण देतो कि जे दोन महिन्याच्या प्राशिक्षणासाठी इच्छुक आहे, मग तुम्हीही लग्न, मुंज, वास्तुशांती, बारसे व अन्तेष्टी विधी साठी पात्र व्हाल.अंत्यसंस्काराचे महत्व फार विस्मयकारक आहे.अन्तेष्टीत आपण पाण्याबरोबर तीळ अर्पण करतो, हेच प्रहातीत करण्यासाठी कि मृत माणसाच्या मृत्यूनंतरही बांधून ठेवणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या अत्यंत क्षुद्र आहेत. त्या सोडून देऊन मुक्त व्हा.आम्ही त्या पूर्ण करू. ह्याला तर्पण म्हणतात. मुलगा किंवा मुलगी हे विधी करू शकतात. अश रीतीने तर्पण विधी केला जातो, गेलेल्याला सांगायला की मुक्त हो आम्ही तुमच्या राहिलेल्या इच्छा आम्ही पूर्ण करू. हे सर्व विधी फार महत्वाचे आहेत पण आपण ते सर्व विसरलो पण. ‘आर्ट ऑफ लिविंग’ परत सर्व सुरु करून, लोकांना
प्रशिक्षित करत आहेत

प्रश्न: गुरुजी,जीवनात कोणाला फक्त अपयशच येत असेन, गुरु भेटूनही जास्त वाईट होत असेल, तर अशा वेळी कुठले ज्ञान कामाला येईल?
श्रीश्री: असेच घडत असेल तर प्रत्येक वेळी अपयशानंतर आनंदी व्हायचं. आज माझा हा प्रकल्प/योजना हि अपयशी झाली आणि समर्पण करावे . जर तुम्ही अपयश सोडू शकत नसाल तर यश कसे सोडाल जेव्हा कुठेही अपयश येते, तेव्हा अपयशावर अडून बसण्यापेक्षा सोडून द्या,मुक्त व्हा! तेव्हाच तुम्ही म्हणू शकाल, ‘मी मोकळा आहे’.
जर तुम्हाला यश आले, तर नवनवीन प्रकल्प एकानंतर एक येतील.जर अपयशी झाले तर तुम्हाला काळजी नसेल.एक काळजी घ्या, फेल होण्याच्या काळजीत हार्ट फेल नका होऊ देऊ.

प्रश्न: गुरुजी, जेव्हा जवळचा कोणी मरतो आणि पुनर्जन्म घेतो तरी आपण नेहमी तर्पण त्याच्या नावाने करतच असतो,त्यावेळी पूजा कोणाला जाते?
श्री श्री: पूर्वी लोकांना सहज ज्ञान होते. त्या द्वारे त्यांना कळायचे की पुनर्जन्म घेतला मग ते विधी बंद करायचे.पण आज काल आपल्याला कळत नाही की आत्म्याला पुनर्जन्म मिळाला किंवा नाही. म्हणून तर्पण सुरु ठेवतो .
आपल्या पूर्वजांची आठवण काढण्यात काहीच चुकीचे नाही उलट ते चांगलेच आहे.
कबीर दासांनी म्हटले आहे ,"नाम जपना क्यो छोड दिया.क्रोध न छोड झूठ न छोड सत्य बचन क्योछोड दिया".

The Art of living
© The Art of Living Foundation