तुम्ही जितके जास्त आनंदी असाल तेवढे तुम्ही देवत्वाच्या जास्त जवळ जाल !
३ डिसेंबर २०११
प्रश्न:प्रिय गुरुजी,माझा भूतकाळ हा सतत माझ्या मनाला आणि आत्म्याला भंडावतो आणि काहीवेळा ते फारच त्रासदायक होते.
श्री श्री : जेंव्हा तुम्ही घटनांना अवाजवी महत्व देता, तेंव्हा असे होते.असे समजा कि घटना या पाण्यावरच्या बुडबुड्या सारख्या असतात.सुखद घटना, दुख्ख:द घटना या लाटांप्रमाणे येतात आणि जातात पण तुम्ही शुद्ध असता. या घटना तुम्हाला स्पर्श करू शकत नाहीत. हे लक्षात ठेवणे फार जरुरी आहे.जेंव्हा तुम्ही अस्वस्थ असता, तेंव्हा तुमच्या पोटाच्या आत काही संवेदना निर्माण होते.तर या घटनेकडे फारसे लक्ष देता त्या संवेदनेकडे लक्ष दिले, तर त्या भावनेमध्ये बदल घडून येतो.
प्रश्न:आदरणीय गुरुजी, परमेश्वराला तर सर्व काही माहित आहे, मग त्याच्यासाठी हे आयुष्य रोमांचक व उत्कंठावर्धक कसे?
श्री श्री : देवाला माहित आहेहि आणि नाहीहि.जसे कि तुमच्या डोक्यावरील केस ओढले तर तुम्हाला त्याची जाणीव होते पण तुम्हाला तुमच्या डोक्यावर किती केस आहेत ते माहित नाही. एका बाजूला तुम्हाला डोक्यावरील प्रत्येक केस माहित आहे कारण तो ओढल्यावर तुम्हाला दुखते, पण त्याच वेळी तुम्हाला डोक्यावर किती केस आहेत ते माहित नाही. म्हणजेच ज्ञान आणि अज्ञान हे नेहमी बरोबर असते. ज्याप्रमाणे एखाद्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके तेथील ग्रंथपालाला माहित असतात पण तुम्ही जर त्याला विचारलेत कि कोणत्या पुस्तकात काय लिहिले आहे तर तो सांगू शकणार नाही.त्याला ते पुस्तक माहित असते, ते कोठे ठेवले आहे ते पण माहित असते,पण त्यात काय लिहिले आहे हे मात्र माहित नसते. त्याच प्रमाणे एखाद्या खेळाचा निकाल खेळ सुरु होण्या अगोदर माहित असेल तर त्यातली मजाच निघून जाईल.आणि अशा परिस्थितीत कोणाकडून प्रामाणिक खेळाची अपेक्षा कशी काय करणार.
प्रश्न:प्रिय गुरुजी, आत्मज्ञान हे मला नेहमीच आकर्षित करते पण ते असते पण ते कायम दुरापास्त वाटत आले आहे.संसारिक आकर्षणात गुंतून न राहता मला ते कसे प्राप्त करता येईल?
श्री श्री :काळजी करू नका, तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी आला आहात.
प्रश्न :आदरणीय गुरुजी,आध्यात्म म्हणजे काय? ते धर्मसापेक्ष आहे कि व्यक्ती सापेक्ष?
श्री श्री : मनुष्य हा जड आणि तरल अशा दोन्ही पासून बनला आहे. विविध प्रकारची प्रथिने, कर्बोदके,अशांनी हे शरीर बनले आहे हे झाले जडत्व.प्रेम शांती करुणा, उदारता, वचनबद्धता , देखभाल,जबाबदारी, आणि आनंद हे आत्म्याचे गुणधर्म किंवा स्थायीभाव होत.आध्यात्मिकता ती, जी जीवाला विश्वाकडे घेऊन जाते आणि विश्वाशी पक्के नाते निर्माण करते.धर्म मग तो कोणताही आसो तुम्ही जर त्याच्या मुळाशी गेलात तर तुम्हाला हेच सापडेल. इसाई धर्म संस्थापक येशूने म्हटले आहे, कि प्रेम म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे प्रेम. हिंदू धर्म म्हणतो कि अस्ति, भक्ती प्रीती. प्रीती हा परमेश्वराचा स्थायी भाव आहे.इस्लाम मध्ये शांती,वचन बद्धता, करुणा व दान हीच शिकवण दिली आहे.जरी या सर्वांचे रूप भिन्न दिसत असले तरीपण गाभा एकच आहे आणि हा गाभा धरून ठेवणे म्हणजेच आध्यात्म. या साठी ध्यान धारणा करणे फार आवश्यक आहे. कोणत्याही प्रार्थनेमध्ये भाव हा सर्वात महत्वाचा असतो तर शब्दांना फार महत्त्व नसते. तुमच्या प्रार्थनेमध्ये जर भाव असेल तर तुम्ही अध्यात्मिक आहात.मनात भाव नसतान तुम्ही देवासमोर कितीही वेळा नतमस्तक झालात तरी काही उपयोग नाही.आणि हाच करुणा भाव चालताना तुमच्या चेहऱ्यावर स्मित उमटवू शकतो. जेवढे मोठे स्मित तेवढे तुम्ही जास्त देवत्वाच्या जवळ जाता.
प्रश्न:प्रिय गुरुजी,मला एकटेपणा सतत जाणवत असतो अगदी चार चौघात असलो तरी.मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा.
श्री श्री : हि एक चांगली गोष्ट आहे.हे एक दैवी देणगी समजा.यात वाईट काहीच नाही.तुम्हाला एकटेपण जाणवेल तेंव्हा समजा कि तुम्ही देवाजवळ आहात आणि चार चौघात असाल तेंव्हाहि समझा कि तुम्ही देवाजवळ आहात.एकटेपणा म्हणजे स्वातंत्र्य.असे समझा कि या जगात तुम्ही एकटे आलात आणि एकटेच जाणार आहात.अशा जाणीवेने तुमच्या अंतर्मनात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होईल.
प्रश्न:प्रिय गुरुजी, प्रेम या सुंदर कल्पनेबरोबर बांधिलकी पण येते जिच्यामुळे वेदना होतात.बांधिलकी शिवाय प्रेम कसे करता येईल?
श्री श्री : जर तुम्हाला बांधिलकी वाटत असेल तर तिच्यापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करू नका.आता या बांधीलकीपासून सुटका नाही. तुम्ही जर स्वतःला सेवेमध्ये गुंतविलेत तर तुमची बांधिलकी विस्तृत (विशाल) होऊ लागेल. तुम्ही जर याकडे फारसे लक्ष दिले नाहीत तर असे लक्षात येईल कि त्यातून तुमची आपसूक सुटका होते आहे.जसे जसे वय, काळ आणि प्रगल्भता वाढेल तशी तुम्हाला त्यातून सुटका होताना दिसेल.
प्रश्न:प्रिय गुरुजी,काल बोलताना आपण असे म्हणालात कि सर्व उद्योगपतींनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराशी सामना करता येईल.पण ते फार अवघड आहे.एवढे कायदे आणि नियम आहेत कि तुमच्या हातून कोणत्या न कोणत्या कायद्याचे उल्लंघन होतेच!आम्ही काय करावे?
श्री श्री :मी याआधीच सांगितले आहे कि कोणत्याही कृती मध्ये १००% एकवाक्यता नसते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
आमच्याकडे आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि नियमाप्रमाणे इस्पितळ कॉलेजपासून १.५ किलोमीटर अंतरावर पाहिजे.गाव तर २.९ किलोमीटर अंतरावर आहे.मी त्यांना सुचवले कि नियमभंग करून इस्पितळ कॉलेजपासून २.९ किलोमीटरवर बांधा.नाहीतर गावातल्या लोकांना इस्पितळात येण्यासाठी २ किलोमीटर चालत यावे लागेल. त्यांना इस्पितळ गावाजवळ असण्याची गरज आहे.विशेषकरून, जेंव्हा आयुर्वेद फारसा लोकप्रिय नाहीये तेंव्हा.प्रथमतः आपल्याला ते जर लोकप्रिय करावयाचे असेल तर ते गावाजवळ असणे जरुरी आहे.मग आम्ही एक इमारत भाड्याने घेतली आणि इस्पितळ सुरु केले , कारण कि हा एकच मार्ग होता.नाहीतर काय, तर गावापासून १.५ किलोमीटरवर इस्पितळ आणि रोगी एकपण नाही.
या प्रमाणे जर काही कायदे जर कालबाह्य झाले असतील तुम्हाला ते योग्यपणे हाताळावे लागतील.जेंव्हा अधिकारी आले, तेंव्हा आम्ही त्यांना सांगितले कि जेथे गाव तेथे इस्पितळ.
त्याचप्रमाणे नियमाला अपवाद असतात.जेंव्हा नियम पाळणे शक्य नसते तेंव्हा त्याला अपवाद शोधणे जरुरी असते.म्हणूनच जगात यशस्वी होण्यासाठी युक्ती व शक्ती बरोबरच मुक्ती व भक्ती पण जरुरी असते. मनामध्ये जर काही ठाम कल्पना असतील, तर त्या अनुभव मिळण्यामध्ये बाधा ठरू शकतात. सौभाग्यवाश भारतात अशा प्रकारचे अडथळे कमी दिसतील पण इतर ठिकाणी असे अडथळे लोकांच्यात फार दिसतात. भारतात जातीभेद हा एक फार मोठा अडथळा आहे जेणेकरून मी या बरोबर बसणार नाही, मी याच्या बरोबर जेवणार नाही असे लोक म्हणतात. हे काही बरोबर नाही. कोणतीही जात असली तरी एकत्र बसून भजन म्हटली पाहिजेत.
प्रश्न:ध्यान करताना आज्ञा चक्रातून काही लहरींची जाणीव होते.अशा वेळी गप्प बसावे कि काय करावे?
श्री श्री :आज्ञा चक्रातून काही लहरी येत असतील तर येऊ देत.त्यांना उत्तेजना देऊ नका अथवा त्या कमी करण्याचा प्रयत्न करू नका.मन शांत ठेऊन जे होत आहे ते होऊ द्यात.
प्रश्न:शहरी गजबजाटात ध्यान कसे करावे?
श्री श्री : ध्यान करण्याकरिता शांतता हि नेहमीच पूरक असते या बद्धल शंकाच नाही. शांत आणि स्वस्थ जागी ध्यान हे नेहमी चांगलेच होते पण गजबजाटात पण ध्यान होऊ शकते. गजबजाटात झोप येते ना? होय.
एखादा जर शांत ठिकाणाहून न्यूयॉर्क मधील हमरस्त्यावर राहायला गेला तर त्याला झोप कशी येणार? तो म्हणेल कि सारी रात्र डोक्यावरून गाडी गेल्यासारखा आवाज येत होते.पण तिथे राहणाऱ्या इतर लोकांना त्या आवाजाची सवय झालेली असते म्हणून ते तेथे झोपू शकतात.
जेंव्हा तुम्हाला अंतर्मुखी व्हायचे असते, तेंव्हा तुम्हाला बाह्य गोष्टी स्वीकाराव्या लागतात. तर या गोंगाटाचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
प्रश्न:प्रिय गुरुजी,भारत हा नेहमीच गुरूंनी घडविलेला देश आहे.परंतु भारतीय शिक्षण पद्धती मात्र धर्म आणि देवाला जेवढे महत्व देते तेवढे गुरूंना देत नाही, असे का?
श्री श्री :मला पण नेहमी याचे आश्चर्य वाटत आले आहे. जे लोक पाठ्यक्रम ठरवतात त्यांना गुरु किंवा गुरुकुल यांची काहीच माहिती नाही. म्हणून त्यांनी जी पाठ्यपुस्तके तयार केली ती त्यांच्या पूर्व-ग्रहानुसार . मी नेहमी असे ऐकतो, कि आपल्या पाठ्यपुस्तकात फारच पूर्व-गृह मिश्रित माहिती आहे आणि हे फारच दुर्दैवी आहे.म्हणूनच आज तुमच्या सारख्या चांगल्या शिक्षकांची गरज आहे.
प्रश्न: प्रिय गुरुजी, लक्ष विचलित होणाऱ्या प्रौढ लोकांबाबत आपल्याला काय वाटते? त्यांना त्यातून कशी मुक्ती मिळेल?
श्री श्री : त्यांनी हे जाणले पाहिजे, कि त्यांचे मरण जवळ आले आहे. त्यांचे लक्ष विचलित झाले आहे, कारण त्यांना वाटते कि त्यांचे मरण फार लांब आहे.ते एकतर 'अजून आनंददायी काय असू शकते' यामध्ये गुंतले असावेत किंवा त्यांच्यामध्ये कल्पनेतल्या गोष्टी प्राप्त करण्याची अस्वस्थता आहे. या मध्ये प्राणायाम, सकस अन्न, आणि काळ या गोष्टी बदल घडवू शकतात. कारण कोणाचीही विचलित वृत्ती फार वेळ टिकू शकत नाही. केंव्हा तरी त्यात बदल हा व्हायलाच पाहिजे.वैराग्याची जाणीव यात बदल घडवू शकते.
प्रश्न: प्रिय गुरुजी, काही वेळा सामाजिक संबंधामुळे मला दारू पिणाऱ्या लोकांबरोबर बसावे लागते.हे योग्य आहे का?
श्री श्री :तुम्ही जो पर्यंत त्यांच्या बरोबर दारू प्यायला लागत नाही तो पर्यंत ते ठीक असू शकते.तुम्ही त्यांना सांगू शकता कि 'तुम्ही फक्त मद्य विरहीत पेय घेईन, दारू नाही'.
प्रश्न:प्रिय गुरुजी, आयुष्याचा उद्देश काय असू शकतो?
श्री श्री : आयुष्याचा काय उद्देश असू शकत नाही, याची यादी आधी करा. आयुष्याचा उद्देश तुम्ही स्वतः उदास न होणे आणि दुसऱ्यालाही उदास न करणे हा होय. आयुष्याचा उद्देश हा दिखावा करणे नाही, थोड्या काळासाठीच्या संकुचित आनंदाचा विचार करणे नाही. तुम्ही जेंव्हा याचा विचार कराल तेंव्हा तुम्हाला त्याचा शोध लागेल आणि तेंव्हा तुमची स्थिती ब्रम्हांड गवसल्यासारखी होईल.
प्रश्न: प्रिय गुरुजी, मी इतरांना माझ्या फार जवळ सहन करू शकत नाही, काय करावे?
श्री श्री :याचा फार कीस काढू नका. तसे पाहता कोण कुणाच्या जवळ आहे?
जर तुम्ही स्वतःच्या जवळ नसाल तर तुम्ही कोणाच्याच जवळ नसता.जेंव्हा तुम्ही तुमच्या जवळ असता तेंव्हा तुम्ही सर्वांच्या जवळ असता.
प्रश्न:प्रिय गुरुजी, जेंव्हा माझी मैत्रीण हि दुसऱ्या कोणा बरोबर जास्ती आनंदी दिसली तर मी दुखी: होतो.जरी मी तिच्यावर प्रेम करीत असलो, तरी यामुळे आमच्यातील दरी वाढत आहे.मी हे कसे हाताळावे?
श्री श्री : मला वाटते कि लग्नानंतर पण हि स्थिती बहुतेक सर्व लोकांची होते.
जेंव्हा तुम्ही कुणावर प्रेम करता, तेंव्हा तुम्ही त्यांना गृहीत धरता के ते सर्वकाळ फक्त तुमचेच असतील.
जेंव्हा तुम्ही कोणा नवीन माणसाला भेटता तेंव्हा तुम्ही त्याचे हसून स्वागत करता, त्यांच्या बरोबर गप्पा मारता. अशावेळी तुमच्याकडे पाहणाऱ्याला तुम्ही खूप आनंदी दिसता. आता जर अशावेळी तुमच्या मैत्रिणीने तुमच्याकडे बघितले आणि तुमच्या मैत्रिणीच्या मनात असूया निर्माण झाली, तर तुम्हाला कसे वाटेल ?
तुम्ही स्वत: ला तिच्या जागी ठेवून बघा. खूप वेळेस हि तुमचीच कल्पना असू शकते. मालकीच्या भावनेमुळे तुमची बुद्धी असे विचार करते. जर तुमच्या मनात एखाद्याविषयी अशी भावना असेल, तर त्यामुळेच नकारात्मक विचार सुरु होतात.
प्रश्न:प्रिय गुरुजी, पैसा, सत्ता आणि कीर्ती नेहमी अयोग्य माणसांकडे का जातात?
श्री श्री : ते अयोग्य माणसांकडे जात नाहीत.ते योग्य माणसांकडेच जातात. पण पैसा, सत्ता आणि कीर्ती मिळाल्यानंतर माणूस अयोग्य होतो. आणि तो अयोग्य झाल्यावर सर्व निघून जायला सुरवात होते, अगदी लक्ष्मी सुद्धा.
प्रश्न: प्रिय गुरुजी, देव म्हणजे काय आणि देव हा देव कसा झाला?
श्री श्री : हा प्रश्न म्हणजे सूर्याला तू सूर्य कसा झालास आसे विचारण्यासारखे आहे.
हा सूर्य आहे म्हणून तर इतर सर्व काही आहे. सर्व विश्वाचा उगम देव आहे.
पाणी कोठून येते? नदीमधून
नदीला पाणी कोठून मिळते? ढगांमधून
ढग कोठून तयार होतात? समुद्राच्या पाण्यामधून
समुद्र कोठून बनतो? नदीपासून
हे सर्व असे एकमेकांशी जोडले आहे.एकच पाणी जे कि समुद्रात असते, तेच ढगात जाते, तेच नदीतून परत समुद्रात जाते.आणि हाच देव आहे.
प्रश्न:प्रिय गुरुजी, आध्यात्मिक गुरूंचे काम आहे कि त्यांनी समाजाला नैतिक मार्गावर घेऊन गेले पाहिजे.परंतु सध्या हेच आध्यात्मिक गुरु हे सार्वजनिक जीवनामध्ये ढवळा ढवळ करू लागले आहेत.अशा परिस्थितीत लोक भक्ती न दाखविता, त्यांच्यावर शंका घेऊ लागले आहेत. यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
श्री श्री : आध्यात्मिक गुरूंनी सार्वजनिक जीवनात लक्ष घालू नये, ही चुकीची धारणा आहे."जर एखादा चुकीचा कायदा केला जात असेल, तरी आध्यात्मिक गुरूंनी आश्रमात बसावे व त्यांचे मत मांडू नये" हे बरोबर नाही.
प्रत्येक अध्यात्मिक गुरु, प्रत्येक सह्रीदय माणूस काय बरोबर आणि काय चूक, याचा विचार करू शकतात. अगदी अनादिकालापासून आपल्याकडे आध्यात्मिक गुरु हे मार्गदर्शन करीत आले आहेत.ते राजांना कोणता कायदा योग्य आणि कोणता अयोग्य हे सांगत आसत.जर लोकांनी चुकीचा कायदा केला, तर शहाण्या माणसांनी हे सांगायला पाहिजे कि हा कायदा चूक आहे.आणि त्यांनी तसे करणे हे समाजासाठी फार आवश्यक आहे

© The Art of Living Foundation