ध्यान
म्हणजे आवाजाकडूनन शांततेकडे जाणे
१
जानेवारी २०१२
बर्लिनमध्ये परत येऊन छान
वाटतय.
तर आज आपणा ध्यानाबद्दल बोलणार आहोत, बरोबर ?
ध्यान म्हणजे काय ? आपल्याला
ध्यान कशासाठी हवे ?
आपल्यातच खोलवर जाण्यासाठी, स्वत:ला समजून घेण्यासाठी किंवा स्वत:बद्दल
काहीही शिकण्यासाठी आपल्याला प्रेमभाव असलेले आणि घरच्यासारखे वातावरण लागते. औपचारिक
वातावरण अनुकूल नाही.
तुम्हाला सर्वांना घरच्यासारखे
वाटतेय कां ? एक क्षण तुमच्या आजू बाजूला
बसलेल्यांना, आणि तुमच्या मागे बसलेल्यांना नमस्कार करा बरं . आता मला सांगा
तुमच्या की किती जणांना ध्यान म्हणजे लक्ष एकाग्र करणे आहे असे वाटते ? नाही,
तुमची निराशा होईल पण ध्यान म्हणजे लक्ष एकाग्र करणे नव्हे. उलट लक्ष काढून घेणे. काही
काम करायला लक्ष एकाग्र करावे लागते . पण आराम करायला आणि विस्तार व्हायला
एकाग्रता लागत नाही. आराम करणे ही एकाग्रतेची माता आहे. म्हणूनच तुम्ही नीट आराम
केलात तर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे लक्ष एकाग्र करू शकाल. हो की नाही ?
मग आता आराम कसा करायचा ?
आजच्या संध्याकाळी आपण तेच बघुया. मी बोलत
असताना तुमच्या मनात काय चालले आहे ? लक्ष द्या , तुमचे मन म्हणतंय, ‘ हो’ किंवा
‘नाही’. तुम्ही बघताय नं ? तुमच्या आंत एक संवाद चाललाय. ह्या संवादाकडे लक्ष
देणं गरजेच आहे.
तर, ध्यान करण्याच्या अगोदर,
ध्यानाबद्दलची काही साधी तत्व आपल्याला समजणे गरजेचे आहे.
ध्यानाचे फायदे काय आहेत ते आपण
पाहुया. तुमच्यापैकी किती जणांना ध्यानाचे फायदे समजून घ्यायचे आहेत.
ध्यानाचा पहिला फायदा म्हणजे
आपल्या शरीरातील, शरीर संस्थेतील जैविक उर्जा सुधारते.
तुमच्या लक्षात आले आहे कां ,
कधी कधी तुम्ही काही लोकांना भेटता आणि काही कारण नसताना तुम्हाला त्यांच्याशी
बोलावेसे वाटत आही. त्याउलट काही लोकांना तुम्ही फारसे कधी भेटलेले नसता, तरीपण
त्यांच्याशी एक प्रकारची जवळीक वाटते आणि तुम्हाला सहज, आरामशीर वाटते. हे
सकारात्मक शक्तीमुळे होते. ध्यानाने आपल्याभोवती सकारात्मक आणि सुसंगत अशी उर्जा
तयार होते.
दुसरा फायदा म्हणजे आपले आरोग्य
सुधारते. ध्यानाने अति रक्तदाब, डायबेटीस, ह्र्दयरोग, कातडीचे आजार, मज्जासंस्थेचे
आजार आणि इतर अनेक आजार कमी होण्यासाठी ध्यानाची कशी मदत होते यावर अनेक संशोधने
झाली आहेत.
तिसरा म्हणजे, ध्यानाने
प्रसन्नचित्त रहायला मदत होते. बऱ्याच मानसिक आणि शारीरिक आजाराच्या बाबतीत
प्रतिबंधक उपाय म्हणून ध्यानाची मदत होते.
शारीरक फायद्यांशिवाय ध्यानाने
एकाग्रता वाढते.वर्तमान क्षणात रहायला मदत होते. मन भूतकाळ आणि भविष्यकाळ यांत
दोलायमान होत असते. आपण सतत भूतकाळाबद्दल रागात तरी असतो किंवा भविष्याच्या काळजीत
तरी असतो. ध्यानाने मनाचे भूत आणि भविष्यात झुलत रहाणे कमी करण्यास मदत होऊन मन
जास्त वेळ वर्तमानात रहाते.
ध्यान ही आवाजा कडून शांततेकडे
जाणारा प्रवास आहे, हालचालीकडून स्थिरतेकडे जाणारा प्रवास आहे. मी म्हणेन की ध्यान
हे आत्म्याचे अन्न आहे. संगीत हे भावनांसाठी अन्न आहे, ज्ञान हे बुद्धीसाठी अन्न
आहे. मनोरंजन हे मनासाठी अन्न आहे आणि ध्यान हे आत्म्यासाठी अन्न आहे.
तर आपण एक छोटेसे ध्यान करुया.
( एक छोटेसे ध्यान झाले )
मी घेतलेल्या ध्यानाच्या बऱ्याच
सीडी आहेत. सुरवातीला तुम्ही सीडी लावून ध्यान करू शकता. नंतर तुम्ही स्वत:च करू
शकाल. आणि काही प्राणायाम आणि सुदर्शन क्रियेने तुम्हाला ध्यानात खोलवर जायला मदत
होईल.
तुम्हाला काही प्रश्न आहेत कां ?
प्रश्न : २०१२ बद्दलचे बरेच
प्रश्न आहेत. आपण जिवंत तरी राहू कां ?
श्री श्री : नक्की ! फक्त
सिनेमातच सर्व पाण्याखाली वाहून जाते. सगळे काही चालू राहिल, काळजी करू नका.
प्रश्न : मला इतकी लाज कां वाटते
?
श्री श्री : मला वाटतं
तुम्ही जर अर्धा दिवस वेड्यासारखं वागायला तयार असाल तर तुमची लाज निघून जाईल. जर
तरीही लाज गेली नसेल तर कार्निव्हल जत्रेत जा. वेगळे कपडे घाला आणि मग तुम्हाला
फरक दिसेल.तसेच सुदर्शन क्रियेने तुम्हाला फरक जाणवेल. त्यासाठी बेसिक कोर्स आणि
क्रिया करा.
प्रश्न : अहंकार घालवण्याचा
सगळ्यात सोपा मार्ग कोणता ?
श्री श्री : तो तुम्हाला का घालवायचाय ? असू दे. फक्त स्वाभाविक व्हा.लहान मुलासारखे होण्याने मदत होईल.
श्री श्री : तो तुम्हाला का घालवायचाय ? असू दे. फक्त स्वाभाविक व्हा.लहान मुलासारखे होण्याने मदत होईल.
प्रश्न : प्रिय गुरुजी, खूप
आजारी असलेल्या लोकांना किंवा नातेवाईकांना मदत कशी करावी ?
श्री श्री : तुम्ही
ध्यान करण्याने मदत होईल.ध्यानानंतर तुमच्या लहरी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्याने
त्याना मदत होईल.
श्री
श्री : आम्ही जितके करू शकतो तितके, आम्ही जिथे जिथे शक्य होईल तिथे लक्ष
देतो आणि आमचा हात पुढे करतो.
प्रश्न
: माझ्यातले माझे ध्येय मी कसे शोधू ? जगातले माझे ध्येय मी कसे शोधू ?
श्री
श्री : निवांत रहा ! ते आपोआप तुमच्याकडे येईल.
प्रश्न
: अमली पदार्थांचे व्यसन लागलेल्यांना मी ते सोडण्यासाठी कसे समजावू ?
श्री श्री : त्यांना सुदर्शन क्रियांच्या वर्गात आणा. जेव्हा ते श्वास घेतील आणि जेव्हा त्याना आतून छान वाटेल तेव्हा ते व्यसन सोडतील. बऱ्याच लोकांनी, हजारोनी सोडले आहे.
श्री श्री : त्यांना सुदर्शन क्रियांच्या वर्गात आणा. जेव्हा ते श्वास घेतील आणि जेव्हा त्याना आतून छान वाटेल तेव्हा ते व्यसन सोडतील. बऱ्याच लोकांनी, हजारोनी सोडले आहे.
प्रश्न : जीवनाचा हेतू काय ?
श्री श्री : ज्याला माहीत आहे तो तुम्हाला सांगणार नाही, जर कुणी सांगितले तर त्याला माहित नाही. हा प्रश्नच खूप उपयोगी आहे. त्या प्रश्नानेच तुमचा चेतनेचा उत्कर्ष होतो आणि तुमचा प्रवास सुरु होतो. म्हणून प्रश्न असू द्या तो खूप मोलाचा आहे. एक दिवस तुम्हाला कळेल. काही मिनिटे ध्यानात घालवत जा. आणि समाजात काही चांगले काम करा. गरजवंताना मदत करा मग सगळं काही खुलेल.
श्री श्री : ज्याला माहीत आहे तो तुम्हाला सांगणार नाही, जर कुणी सांगितले तर त्याला माहित नाही. हा प्रश्नच खूप उपयोगी आहे. त्या प्रश्नानेच तुमचा चेतनेचा उत्कर्ष होतो आणि तुमचा प्रवास सुरु होतो. म्हणून प्रश्न असू द्या तो खूप मोलाचा आहे. एक दिवस तुम्हाला कळेल. काही मिनिटे ध्यानात घालवत जा. आणि समाजात काही चांगले काम करा. गरजवंताना मदत करा मग सगळं काही खुलेल.
प्रश्न : एका खूप दु:खद
नातेसंबंधांला मी विसरू शकत नाही . मी सोडून देऊच शकत नाही.
श्री श्री : ठीक आहे, मग
तुम्ही काय करू शकता? धरून ठेवा. किती वेळ धरून ठेवाल ? आज ना उद्या सोडावेच लागेल
आणि जितकं लवकर सोडलं तितके चांगले आहे. आणि ते सोडायला कसली मदत होईल तर
हुशारीची. जागे व्हा आणि लक्षात घ्या की सगळे बदलते आहे. ध्यानाने नक्कीच मदत
होईल. मी तर म्हणतो की आम्ही इथे मोडलेली हृदये जोडतो. अगदी पहिल्यासारखेच होऊन
जाते. कुठे वण नाहीत की दु:ख नाही.
प्रश्न : प्रिय गुरुजी , तुम्ही
म्हणालात की जे बदलते ते सगळे खरे नसते. पण ही सृष्टी तर दर क्षणाला बदलते आहे. मग
ही खरी नाही.
श्री श्री : जर तुम्ही
क्वांटम भौतिकी शास्त्रज्ञाशी बोललात तर तो हेच म्हणेल. जर्मनीचे प्राध्यापक
डी’हुरे हे आमच्या काळचे एक श्रेष्ठ शस्त्रज्ञ होते आणि त्यांनी छान सांगितली
होती. ते म्हणाले,” मी भौतिक शास्त्राचा (जड वस्तूचा)चाळीस वर्षे अभ्यास केला आणि
ते फक्त येवढेच शिकण्यासाठी की असे काही अस्तित्वातच नाही.
मी म्हटले ‘वैदिक तत्वज्ञानात हेच म्हटले आहे . अगदी हेच.”
मी म्हटले ‘वैदिक तत्वज्ञानात हेच म्हटले आहे . अगदी हेच.”
प्रश्न : मला माझ्यात खरे प्रेम कसे सापडेल ? श्री श्री : तुम्ही जेंव्हा विश्राम करता तेव्हा तुम्हाला कळते की तुम्हीच प्रेम आहात. तुम्ही प्रेम नावाच्या पदार्थापासून बनले आहात. प्रेम फक्त एक भावना नाही ते तुमचे अस्तित्वच आहे. ते भावनांमधूनही व्यक्त होते पण प्रत्यक्षात आपली चेतना, आपले मन, आणि आपली चेतना आणि आपला आत्मा हे प्रेमाने बनले आहे.
प्रश्न : एक सामान्य माणूस
म्हणून निरपेक्ष प्रेम करणे शक्य आहे कां ?
श्री श्री : होय, एक लहान मूल
असताना तुम्ही हे करत होतात.
एक लहान मूल असताना तुम्ही असे प्रेम व्यक्त करत होतात. ते शक्य आहे.
एक लहान मूल असताना तुम्ही असे प्रेम व्यक्त करत होतात. ते शक्य आहे.
प्रश्न : संपूर्ण मुक्ती शक्य
आहे कां ?
श्री श्री : होय.
प्रश्न : प्रिय गुरुजी, अगदी
जवळच्या व्यक्तीचे जाणे कसे सहन करायचे ? ते खरचं धक्कादायक होते. गेले सहा दिवस
केलेल्या साधनेचा मला खूप फायदा झाला आहे. पण तरीही यातून बाहेर येणे मला जमत
नाहीये.
श्री श्री : फक्त त्याच्या बरोबर
रहा. त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करू नका. काळच काळजी घेईल
प्रश्न : गुरुजी भविष्याबद्दल
काळजी करणे पूर्णपणे चूक आहे कां ?
श्री श्री : नाही.
संपूर्ण पृथ्वीच्या भवितव्याची काळजी करा. आणि मानवतेच्या नशिबाची काळजी करा.
मानवी मुल्यांची काळजी करा. वाढत्या भ्रष्टाचाराची काळजी करा.या सर्व मोठ्या
गोष्टींची काळजी करा. मी पृथ्वीची सुद्धा काळजी करतो. पण काळजी करण्याणे
चेहऱ्यावरचे हसू, तुमचा उत्साह, आणि आत्ता काही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठीची
शक्ती जाता कामा नये.
प्रश्न : आपण आपल्या विधीलीखीता नुसार
जात आहोत आणि ते पूर्ण करत आहोत हे कसे ओळखायचे ?
श्री श्री : तुमच्या
पोटातली ती भावनाच नक्की सांगेल. तुम्ही पुरेसे खाल्ले आहे हे तुम्हाला कसे कळते ?
तुमची झोप पुरेशी झाली आहे हे तुम्हाला कसे कळते ? त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा
योग्य गोष्ट करत असाल तेव्हा तुमचे अंत:करण तुम्हाला सांगेल, “ हो, मी बरोबर करत
आहे. “
प्रश्न : दु:ख , नैराश्य,
नकारात्मक विचार यांच्यावर मात कशी करायची ?
श्री श्री : सुदर्शन
क्रिया, ध्यान आणि ज्ञान याने मदत होईल.
प्रश्न : तुम्ही दाढी कां ठेवता
?
श्री श्री : रोज दाढी करण्याच्या बाबतीत मी आळशी आहे. मला वाटलं की तोच वेळ मी आणखी काही करण्यात घालवू शकेन. भारतात आध्यात्मिक जगतात दाढी करून सगळे काढून तरी टाकतात किंवा सगळे ठेवतात तरी. हा एक गणवेश आहे. तर मी सगळे ठेवायचे ठरवले. पण त्यात काही मोठे नाही. उद्या मी सगळे काढूनही टाकू शकतो पण मी बदलणार नाही. मी तोच राहीन.वरवरच्या दिसण्याकडे किंवा कपड्यांकडे जाऊ नका. ते दुय्यम आहे. मुख्य काय आहे की आंतमध्ये काय आहे. हृदय किती शुद्ध आहे, बुद्धी किती स्वच्छ आहे; स्वच्छता आणि शुद्धता. आणि लक्षात ठेवा की आपण असे शुद्ध हृदय घेऊनच जन्माला आलो. मी ते टिकवले इतकेच. बऱ्याच जणांनी ते जसे जन्माला आले ते टिकवलं नाहिये. मी कसेही करून ते टिकवले इतकंच . मला मोठं व्हायचच नहिये.
श्री श्री : रोज दाढी करण्याच्या बाबतीत मी आळशी आहे. मला वाटलं की तोच वेळ मी आणखी काही करण्यात घालवू शकेन. भारतात आध्यात्मिक जगतात दाढी करून सगळे काढून तरी टाकतात किंवा सगळे ठेवतात तरी. हा एक गणवेश आहे. तर मी सगळे ठेवायचे ठरवले. पण त्यात काही मोठे नाही. उद्या मी सगळे काढूनही टाकू शकतो पण मी बदलणार नाही. मी तोच राहीन.वरवरच्या दिसण्याकडे किंवा कपड्यांकडे जाऊ नका. ते दुय्यम आहे. मुख्य काय आहे की आंतमध्ये काय आहे. हृदय किती शुद्ध आहे, बुद्धी किती स्वच्छ आहे; स्वच्छता आणि शुद्धता. आणि लक्षात ठेवा की आपण असे शुद्ध हृदय घेऊनच जन्माला आलो. मी ते टिकवले इतकेच. बऱ्याच जणांनी ते जसे जन्माला आले ते टिकवलं नाहिये. मी कसेही करून ते टिकवले इतकंच . मला मोठं व्हायचच नहिये.
प्रश्न : प्रिय गुरुजी,
गर्भपाताबद्दल बोलाल कां ?
श्री श्री : माझे
त्याबद्दल काही मत नाही.
प्रश्न : ध्यान आणि झोप यांत काय
फरक आहे ?
श्री श्री : झोप म्हणजे मंदपणा . ध्यान म्हणजे सजगता. दोन्हीने विश्राम मिळतो पण वेगवेगळ्या प्रकारचा. ध्यानानंतर तुम्ही बाहेर येता. तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरात आणि मनात खूप मृदू आणि छान वाटते. झोपेनंतर तुम्हाला काहीसे जड आणि मंद वाटते. कदाचित, नक्की नाही.
श्री श्री : झोप म्हणजे मंदपणा . ध्यान म्हणजे सजगता. दोन्हीने विश्राम मिळतो पण वेगवेगळ्या प्रकारचा. ध्यानानंतर तुम्ही बाहेर येता. तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरात आणि मनात खूप मृदू आणि छान वाटते. झोपेनंतर तुम्हाला काहीसे जड आणि मंद वाटते. कदाचित, नक्की नाही.
प्रश्न : व्यक्तिगत कर्म म्हणजे काय
? प्राण्यांना कर्म असते कां?
श्री श्री : प्राण्यांना
कर्म नसते. मनावरचा एखादा ठळक असा संस्कार एखादी परिस्थिती निर्माण करते तेच कर्म
आहे. कर्म तीन प्रकारची असतात. कर्म म्हणजे मनावरचा संस्कार आहे. कर्म म्हणजे आज
जी क्रिया होत आहे ती आणि कर्म हा त्या क्रियेचा भविष्यातला संस्कार जो त्या
क्रियेने निर्माण होऊ शकतो.
प्रश्न : मी आत्म्याशी संपर्क कसा करू शकतो ?
श्री श्री : ध्यान. स्वस्थ
राहून तुम्ही तुमच्या आत्म्याशी संपर्क करता.
प्रश्न : प्रिय गुरुजी , तुम्ही बरे होण्याबद्दल (हिलिंग) बोलाल कां ?
श्री श्री : बरे होणे
नैसर्गिकरीत्या होते. जेव्हा तुमचा प्राणाचा, उर्जेचा स्तर उच्च असतो तेव्हा ती
पाठवली जाऊ शकते. आणि त्यामूळे बरे होते.
प्रश्न : समाजात प्रत्येक
व्यक्तीसकट जी जाळपोळ होत आहे त्याबद्दल बोलाल कां ? आणि पृथ्वी जळत आहे त्यामुळे
हवामानाच्या समस्या दिसत आहेत. मानवजातीसाठी काय उपाय आहे ?
श्री श्री : समाजात
जास्त मानवी मूल्ये नैतिकता, नितीतत्वे. जेव्हा मानवी मूल्ये वर जातात जेव्हा
माणसे एकमेकांशी माणूस म्हणून वागू लागतील आणि संपूर्ण जगाला प्रत्येकाशी आपलेपणा
असलेले आपले कुटुंब मानायला लागू तेव्हा पूर्ण वातावरण बदलू शकते. असेच आहे की
नाही ?
मी जगभर फिरलो आहे पण मला घरच्या
सारखे वाटले नाही असे कधीच झाले नाही. मला प्रत्येका बरोबर घरच्यासारखेच वाटते.
आणि मला वाटते की प्रत्येकाला तसे वाटू शकते. पृथ्वीची काळजी घ्या आणि लोकांची
काळजी घ्या . तुम्हा सर्वांना काय वाटते ? तुम्ही बातम्या बघता , जगात कितीतरी लोक
रोज मारले जात आहेत .सुदान मध्ये काय चालले आहे बघा. आत्ता व्यासपीठावर यायच्या आधी
मी बातमी बघितली ; मागच्या सात आठ महिन्यात सिरीया मध्ये पाच हजार आठशे लोक मारले
गेले आहेत . असे करणे हे किती अमानवी आहे . मला वाटतं त्यांना कसं जगायचं ते माहीत
नाही. त्यांना जगण्याची कला माहित नाही. त्यांना फक्त मारण्याची कला माहित
आहे. आपणा लोकांशी भांडणे आणि एकमेकाचा
नाश करणे आणि पृथ्वीचा नाश करणे
ह्यापेक्षा गुण्यागोविंदाने कसे रहायचे, प्रेम कसे करायचे ते शिकवले पाहिजे. हो की नाही ? ज्याला थोडे
तरी हृदय आहे, तो ह्या हिंसाचाराकडे बघून म्हणेल , “अरे देवा, एकमेकांबद्दल प्रेम
व्यक्त करायला वेळ नाही , मग विनाकारण
मारायला, भांडायला वेळ कुठून आणायचा ? प्रत्येक जण असाही मरणार आहेच.” आणि
कश्यासाठी ? फक्त काही डॉलर्स साठी एकमेकाचा जीव घ्यायचा ? दुर्दैव ! मला वाटतं आपण लोकांना गुण्या गोविंदाने कसे
जगायचे जगाची काळजी कशी घ्यायची ते शिकवले नाहिये. हे किती दुर्दैव आहे. जगातल्या
शिक्षण क्षेत्रातली ही सर्वात मोठी उणीव आहे.
प्रश्न : सांताक्लॉज मुलांसाठी भेट वस्तू आणतो असे खोटे सांगणे योग्य आहे कां ?
श्री श्री : हो मुळे
जेव्हा मोठी होतील तेव्हा त्याना समजेल.
प्रश्न : कोर्स खूप महाग आहेत आणि मला परवडत नाहीत तर मी काय करावे ?
श्री श्री : तुम्ही
नक्की करू शकता . प्रशिक्षकांशी किंवा स्वयंसेवकांशी बोला आणि ते तुम्हाला
शिष्यवृत्ती देतील. कुणाला परवडत नाही म्हणून आम्ही त्यांना थांबवत नाही.
प्रशिक्षकांशी बोला, ते काहीतरी करतील .
प्रश्न : गुरुजी, आपल्या आणि जगाच्या आर्थिक परिस्थितीचे काय होते
आहे ? केवढे कर्ज आहे आणि ते आता संकट झाले आहे. आणि अजूनही आपल्याला भांडवलशाही
पाहिजे ?
श्री श्री : तुम्हाला
माहिती आहे की जगात खूप पैसा आहे. हा फक्त काही लोकांचा हावरटपणा आहे. आणि तेच बाजार भाव बदलतात आणि आर्थिक परिस्थिती
कोसळते. हे असे होते आहे . जर भाग भांडवलात काही ठोस बदल झाले तर जागतिक अर्थ
व्यवस्थ कितीतरी सुधारेल आणि सर्वांनाच सुबत्ता येईल.
प्रश्न : हे तुमच्या कवितेशी संबंधित आहे. काही ओळी अशा आहेत , ‘ ढग इतके सुंदर होतात, आवाजाचे सुंदर गाणे होते , आणि सूर्य द्रवरूप सूर्य प्रकाश बनतो. ‘ आपला दृष्टीकोन कसा बदलायचा म्हणजे आपण तसे जगू शकू ?
श्री श्री : जेव्हा आतून
बदल होतो तेव्हा बाहेरचे सुंदर होते. सर्वच अप्रतिम आहे.

© The Art of Living Foundation