निरागसतेबरोबर बुद्धिमत्ता हे योग्य सूत्र आहे !
२४ डिसेंबर २०११

संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे आणि म्हणून नैसर्गिक आणि साधे राहणे हे गरजेचे आहे; तेंव्हाच आयुष्य बहरून येते.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण इतरांच्या आणि आपल्यामध्ये जी परकेपणाची भिंत बांधली आहे, ती मोडून टाकली पाहिजे. तुमच्या आणि इतरांच्या मधली सर्व आडकाठी दूर करा. तुमच्याकडून सर्व परकेपणा सोडून द्या, पुढे जा आणि हातमिळवणी करा.लहान मुले हेच करतात.आपण जसे मोठे होते तसे सगळे विसरून जातो.आपण आपल्यामध्ये एक भिंत निर्माण करतो.आपण आपल्यामध्ये रीतीभाती आणतो आणि आपल्यातली स्वाभाविकता घालवून बसतो.
पण, मुंबईमध्ये हे स्फूर्ती आहे, एकमेकांबद्दल आपलेपणा आहे!
ते सर्व जे शरीराने मोठे झाले आहेत, पण त्यांना पुन्हा लहान व्हायचे आहे, किंवा जे आधीच तसे आहेत, तसेच राहा. दुसरे काय विचार करतील याचा विचार करू नका. जर जागणी आपल्याला वेडे म्हंटले तर म्हणू देत, पण तुम्ही आनंदी रहा. आत्ताच्या क्षणात जागा आणि स्वाभाविक राहा.
जगात राहण्यासाठी काय महत्त्वाचे आहे तर बुद्धीमत्तेबरोबरच निरागस असणे! अज्ञानी माणसाच्या निरागसतेला काही किंमत नसते. त्याचप्रकारे, बुद्धिमान माणसाच्या दुष्टपणालाही काही किंमत नसते. निरागसत आणि बुद्धिमत्ता असणे हे अमूल्य आहे. ते दोन्ही एकत्र असले पाहिजेत.
आपल्याला समाजामध्ये या गोष्टी आणायच्या आहेत. लहान मुलांमध्ये निरागसता,  नैसर्गिकता आणि सहजपणा असतो.त्याचबरोबर बुद्धी तल्लख झाली पाहिजे. आपली शिक्षणक्रम असा असा असला पाहिजे.
यालाच मी अध्यात्म म्हणतो, ज्यामध्ये वृत्ती उन्नत राहते. ते ‘स्पिरीट’ नाही जे पिऊन तात्पुरते ‘उंच’ जाता. अंतरात्मा, त्याला उत्साह, निरागसता आणि स्वाभाविकता यामधून जिवंत ठेवणे, याला अध्यात्म म्हणतात.
उद्या नाताळ आहे.बायबल मध्ये येशूने म्हटले आहे, ‘ तुम्ही जोवर लहान मुलाप्रमाणे होते नाही, तोवर तुम्हाला स्वर्गाचे राज्य मिळणार नाही. हिंदी मध्ये म्हणतात, ‘भोळे भाव मिले रघुराई’-ज्यामध्ये निरागसता नाही, त्याला राम कधीच मिळणार नाही.म्हणून, तुमच्यातले भोळेपणा टिकवून ठेवा.
हि निरागसता कशी टिकवायची?
भगवान सर्वांसाठी एकच आहे हे जाणून घ्या आणि सर्वांशी स्वाभाविकपणे वागा.
प्रत्येकाच्या आतमध्ये एक शक्ती आहे.परमात्मा म्हणजे जो सर्वव्याप्त आहे असा.मग तो आपल्या आतमध्ये नसेल का? जर तो माझ्या आत नसेल, तर तो परमात्मा नाही आणि तो जर ‘कायम’ आहे तर तो आत्ताही आहे. असे नाही कि, तो आधीच्या काळी होता आणि पुन्हा भविष्यात होईल.
परमात्मा हा कायम असतो आणि म्हणून तो आत्ता  या क्षणीही येथे आहे.
या ज्ञानामध्ये विश्राम करणे म्हणजे ‘ध्यान’, परमात्मा इथे आहे, या क्षणी माझ्या आत आहे.या विचारात तुम्ही विश्राम केलात, तर चित्तातली अवस्थता नाहीशी होईल.एकदा का चित्त शांत झाले कि दिव्यता अनुभवास येईल.सर्वजण याच शोधात असतात. कित्येक जन्म आपण याच्या शोधात असतो आणि नंतर आपण अनुभव करतो, ‘मी तेच आहे’! अहं ब्रह्मासी! तत् त्वं असी ! – ‘तू तेच आहेस’ कि ज्याच्या तू शोधात आहेस.’
जर तुम्ही आपले डोळे बंद केलेत, आणि विश्राम आणि ‘तू तेच आहेस’ हे जाणून ध्यान केलेत, तर तुमचे ध्यान जेवढे गहिरे जाईल तेवढे तुमच्या लक्षात येईल कि,’ मी तेच आहे’. एकदा तुम्ही हे जाणून घेतलेत, तुमचे सर्व काम विना प्रयास होऊन जाईल.
म्हणून, ध्यान हि आपल्याला मिळालेली भेटवस्तू आहे.

प्रश्न: गुरुजी, मी शाळकरी मुलगा आहे. मला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात कसा भाग घेता येईल?
श्री श्री : तुमच्या आई-वडिलांना सांगा. आणि तुम्हीहि प्रतिद्न्या करा, कि मी भ्रष्टाचाराला साथ देणार नाही. आपल्याला भ्रष्टाचाररहित दिव्य भारत निर्माण करायचा आहे. जिथे आपलेपणा असतो, तिथे भ्रष्टाचार आपोआप नाहीसा होतो. जेंव्हा प्रत्येकजण लहान मुलासारखे निरागस असते, तेंव्हा भारतातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल.

प्रश्न: गुरुजी, माध्यमांबद्दल गेलेला विश्वास लोकांच्या मनात पुन्हा कसा जागवता येईल?
श्री श्री : स्वत:ला त्यांच्या ठिकाणी ठेवून बघा. तुम्ही केलेल्या काही चुकीमुळे कोणाचा तुमच्यावरचा विश्वास उडाला आणि तुमच्या विरुद्ध त्यांनी ते कायम मनात धरून बसले, तर तुम्हाला ते आवडेल का?
मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचे आहे. १० पैकी ९ हिरे गुजरातेतील सुरत येथे बनतात. संपूर्ण उद्योग हा माध्यमिक शाळेपेक्षा जास्त न शिकलेल्या लोकांनी चालवली आहे, पण ते उत्कृष्ट उद्योगपती आहेत.याचा अर्थ असा नाही कि तुम्ही शिकायचे थांबवा. जेंव्हा तुम्हाला कमी गुण मिळतात, तेंव्हा तुम्ही इतर मार्गांचा विचार करा, तुम्ही उत्तम खेळाडू बनू शकता.
एकदा नाही चांगले गुण मिळाले तर काय झाले?पुढच्या वेळी मिळतील. मोठे खेळाडू बना, खूप मोठे बना, पण कधीही आत्महत्या करू नका. ते फार चुकीचे आहे. ईश्वराने तुम्हाला हे शरीर दिले आहे, हि अमूल्य भेट. आपण त्याचा नाश केला नाही पाहिजे.तुम्ही सगळ्यांनी मला हे वचन द्या. आपण सर्वांनी मिळून क्रिया, ध्यान, प्राणायाम करायला हवा, हयामुळे तुम्हाला आतली शक्ती मिळेल. ART excel, YES+ कोर्स आणि सर्व कोर्सेस हे तुम्हाला तणावमुक्त व्हायला मदत करण्यासाठी आहेत. तुमाच्या समवयीनांच्या ,शाळेच्या ,तुमच्या पालकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात आणि तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल विचार करून असुरक्षित वाटते. म्हणूनच या सर्व कोर्सेस ची निर्मिती केली आहे. त्यामूळे तुम्हाला हसतमुखाने पुढे जाण्याची आतून शक्ती मिळते.  

प्रश्न: गुरुजी, तुमच्या लहानपणी तुम्ही खूप खोड्याळ होता का?
श्री श्री : हो खुपच !  मी खूप खोड्याळ होतो. मी जेंव्हा लहान होतो, तेंव्हा मी माझ्या बाबांची बॅग रिकामी करून त्यामधून सर्व खेळणी भरून ठेवली होती. जेंव्हा ते ऑफिसमध्ये गेले तेंव्हा त्यांनी मीटिंग मध्ये बॅग उघडली आणि त्यातून सर्व खेळणी बाहेर पडली. त्यांना खूप ओशाळवाणे वाटले होते. पण मी हे फक्त एकदाच केले होते.

प्रश्न: गुरुजी, माझा जवळचा मित्र माझ्या प्रेयसीच्या प्रेमात पडला आणि आता ते एकत्र आहेत मला हारल्यासारखे वाटते आहे. तुम्ही मला मदत कराल का?
श्री श्री: एक लक्षात ठेव., अशी म्हण आहे,’ जे तुझे आहे ते नेहमी तुझ्यापाशी परत येते.’ आणि जर ते तुझे नाहीच आहे, तर पुढे चला आणि असे काहीतरी शोध, जे तुमचे असेल.

प्रश्न: गुरुजी, मला अभ्यास करण्याचा खूप कंटाळा येतो. मी या आळशीपणा मधून लवकर कसा बाहेर येऊ?
श्री श्री: तुम्हाला खेळताना आळस येतो का? नाही ना !
जेंव्हा तुम्हाला आळस येतो, तेंव्हा थोडेसे खेळा आणि परत येऊन अभ्यासाला बस.

प्रश्न: गुरुजी मला आर्ट ऑफ लीवींग चे प्रशिक्षक बनायचे आहे, पण माझे पालक मला ते करायला परवानगी देत नाहीयेत.
श्री श्री : ते असे करताहेत कारण त्यांना वाटतेय कि तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करणार नाही किंवा इतर काही . तुम्ही चांगले शिका आणि मग आर्ट ऑफ लीवींग चे प्रशिक्षक बना.

प्रश्न: गुरुजी, जेंव्हा मला कोणी दोष देते, तेंव्हा ते माझी नकारात्मक उर्जा नाहीशी करतात. जर हे खरे असेल, तर मला खूप संकुचित आणि वाईट का वाटते?
श्री श्री: तुम्हाला माहितीये का, जेंव्हा कोणीतरी तुमाच्याबद्दल नकारात्मक बोलते तेंव्हा ते त्यांच्यातील कचरा (वाईट गोष्टी) बाहेर टाकत असतात. तुम्ही तुमची झोळी पसरून त्या गोळा करू नका. जेंव्हा ते वैत गोष्टी बाहेर टाकत असतील, तेंव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर जा. तो तुमच्या आता घेऊ नका.ते तुमच्याबद्दल नकारात्मक बोलत आहेत याची २ कारणे आहेत, एकत्र ते मत्सरापायी असे करत आहेत किंवा ते तुमच्यावरच्या प्रेमापोटी करत आहेत. ते तुमचे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना तुमच्यातील चांगले गुण जागृत करायचे आहेत आणि म्हणून ते तुमच्यातील अयोग्य गोष्टी, तुमच्यातील कमकुवतपणा तुम्हाला दाखवून देत आहेत. जर कोणी असे काही बोलले तर तुम्ही त्यांचे आभारी रहा, कारण त्यांनी हिम्मत करून ते सांगितले आहे जे बाकीचे कोणी तुम्हाला सांगत नव्हते.
जर कोणी तुमच्यावर टीका करत असेल, तर त्यांनी एवढी हिम्मत केली आहे आणि त्यांनी आपली मैत्री त्यासाठी पणास लावली आहे.आणि जर ते असूयेपायी बोलत असतील, तर विसरून जा आणि हसतमुखाने पुढे चला.

प्रश्न: गुरुजी, मी नववीमध्ये आहे. माझे बरेच मित्र सिगारेट ओढतात आणि दारूही पितात आणि ते मलाही तसे करण्यासाठी आग्रह करतात, पण मला माहिती आहे कि हे बरोबर नाही. पण मी हे केले नाही, तर मला एकटे पडल्यासारखे वाटते.
श्री श्री: ज्या गोष्टींच्या करण्याने त्यांना नंतर पश्चाताप होईल, अशा गोष्टींच्या न करण्याने एकटे पडल्याची खंत करू नका.तुम्ही आपल्या तत्व सोडू नका.
मी कॉलेज मध्ये मला माझ्यापुढेही हेच आव्हान होते. माझ्या आजूबाजूचे सगळे सिगारेट ओढायचे आणि एक दिवशी त्यांनी मला घेराव घातला आणि त्यातला एक धष्टपुष्ट मुलगा मला म्हणाला,’ तुलाही सिगारेट ओढलीच पाहिजे. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहिले आणि म्हणालो ‘ नाही’. मी वर्गात सगळ्यात छोटा होतो. बाकीचे सर्वजण माझ्याहून मोठे होते. मी म्हणालो, ‘ मी ते करणार नाही.’. त्यांनी गोंधळून फक्त माझ्याकडे पहिले आणि तेथून निघून गेले. तुम्ही, जर त्यांच्यापुढे म्हणालात कि, ‘ शक्यच नाही. मी ते करणार नाही.’, तर तुम्ही ‘ हिरो’ बनाल. त्यांना नंतर माझी संगत फार आवडू लागली. ‘ हो, ह्याचा निश्चय अटळ आहे’ .
तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता, त्याबद्दल तुमचा अटळ निश्चय दाखवा. या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या स्वीकार केल्या पाहिजेत. ‘ मी जे माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी वाईट आहे असे काहीही करणार नाही. आज तुम्ही सगळे हि शपथ घ्याल? ‘ आम्ही कोणतेही ड्रग्ज, मद्य किंवा सिगारेट ला हातही लावणार नाही.’ असे मला वाचन द्याल?

प्रश्न: गुरुजी, मानवी जीवनाचे ध्येय काय आहे?  मोक्ष मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
श्री श्री: तुम्हाला मोक्ष मिळेल, काळजी करू नका. एकदा मोक्षाची इच्छा मनात निर्माण झाली कि मोक्षही मिळेल.

प्रश्न: गुरुजी, आम्ही तुमच्याबद्दल खूप कहाण्या ऐकल्या आहेत. तुम्ही आम्हाला काही चमत्कार करून दाखवाल का?
श्री श्री : तुमच्या आयुष्यात किती जणांनी चमत्काराचा अनुभव केला आहे? आपले हात वर करा. प्रत्येकाने अनुभव केला आहे.जीवन हाच एक चमत्कार आहे. त्याचा आदर करा.
प्रेम हा सर्वोच्च चमत्कार आहे. तुम्ही जेवढे जास्त प्रेम द्याल तेवढे जास्त चमत्कार तुमच्या आयुष्यात होतील.

प्रश्न: मी आयुष्यात ढोल वादक , गायक किंवा शास्त्रज्ञ यापैकी काय होऊ?
श्री श्री : तुम्ही तीनही होऊ शकता. तुम्ही अभ्यासक्रमापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून ढोल वाजवू शकता, चंद म्हणून गाणे गाऊ शकता आणि तुम्ही शास्त्रज्ञ हि होऊ शकता. तीनही बरोबर होऊ शकते. या वयात तुम्हाला निवड करायची गरज नाही.लहानपणी तुम्हाला निवडायची गरज नाही. जेवढे शक्य आहे तेवढ्या कला आत्मसात करा.

प्रश्न: गुरुजी, मला जेंव्हा तहान लागते तेंव्हा मी पाणी पितो आणि तहान भागते.जेंव्हा मला भूक लागते, मी अण्णा खातो आणि भूकही भागते. पण तुम्हाला भेटण्याची आस वाढतच राहते.
श्री श्री : तुम्हाला माहितीये, मीसुद्धा या प्रश्नावर विचार करून थकलो आहे, पण उत्तर काही सापडत नाही.

प्रश्न: गुरुजी, ध्यान करण्याने अभ्यासात फायदा होईल का?
श्री श्री : ध्यानाचा अभ्यासात नक्कीच फायदा होईल, कारण ध्यानाने चित्त शांत होते, रक्ताभिसरण सुधारते, आणि संपूर्ण माज्जासंस्थेला उर्जा मिळते. त्याचाच अजून एक फायदा म्हणजे एकाग्रता होऊ लागते. तुम्हाला तसेच एकाग्र होता येत नाही, पण काही मिनिटांच्या ध्यानाने तुम्ही एकाग्रचित्त व्हाल.

प्रश्न: गुरुजी, मी जेंव्हा वर्गात अभ्यास करतो, तेंव्हा मुले मला चिडवतात. मी काय करू?
श्री श्री : एक गोष्ट करा, त्यांना अजून उपद्रव द्या आणि जेंव्हा ते त्रासून जातील, तेंव्हा तुम्ही शांत बसून अभ्यास करा.

प्रश्न: गुरुजी, नैसर्गिक आणि सेंद्रिय पिकांबद्दल आणि ती मुलांसाठी कशी महत्त्वाची आहेत याबद्दल काही सांगाल का?
श्री श्री : कोणीतरी आत्ताच एका फांदीवर आलेले २ सेंद्रिय मक्याची कणसे घेऊन आले होते. साधारणपणे एका फांदीवर एकाच कणीस येते. हा मका सेंद्रिय, नैसर्गिक पद्धतीने वाढवलेला आहे. पिकेही चांगली आहेत आणि अन्न तुमच्यासाठी खूप चांगले आहे.
नाहीतर, पिकांमध्ये खूप सारी रसायने वापरतात आणि नंतर आपण पोटदुखी, डोकेदुखीच्या तक्रारी करतो. किती लोकांना पाठीच्या वरच्या किंवा खालच्या भागात किंवा गुडघ्या मध्ये वेदना आहेत ?हे असे का माहितीये? पिकांमध्ये खूप जास्त युरिया वापरल्याचे परिणाम आहेत हे. रसायने वापरून केलेल्या शेतीमुळे, सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, डोक्यापासून पायापर्यंत वेदना, होते.

प्रश्न: गुरुजी, कधीकधी माझे आईवडील जे बरोबर आहे त्याला मान्यता देत नाहीत.त्यांना मी कसे पटवून देऊ?
श्री श्री : तुम्ही सर्व प्रकारच्या युक्त्या वापरा. तुम्हाला जेंव्हा शाळेच्या सहलीला जायचे आहे आणि तुमचे आई-बाबा नाही म्हणत असतील, तेंव्हा बाबांचा मूड पाहून त्यांना सांगा, ‘मला तसे जायचे नाहीये, पण मी गेलो नाही तर माझे बाकीचे मित्रही जाणार नाहीत.’असे बोलून तुम्ही त्यांना पटवून द्या. तुम्ही त्यांचा मूड बघून आपले काम साध्या करून घेता कि नाही? तुम्हाला खूप युक्त्या माहित आहेत.

प्रश्न: गुरुजी, मी परधर्मातल्या मुलावर प्रेम करते. त्याच्या आईवडिलांना मान्य आहे पण माझ्या आईवडीलांचा कडक विरोध आहे. मी काय करू?
श्री श्री : हे ठरवण्यासाठी थोडा वेळ दे. तुझ्या पालकांना क्रोधित करण्यात किंवा त्यांना नाराज करण्यात काहीच अर्थ नाही. धर्म कोणताही असो, सुसंवाद असणे महत्त्वाचे. पुढे जाऊन तुला पश्चाताप व्हायला नको,’ मी माझ्या आई वडिलांना खूप दुख्ख: आणि त्रास दिला आहे.’
असे दुख्ख: देऊन भले तू लग्न केलेस तरीही तुझे चित्त शांत राहणार नाही. सगळेच लोक नाखुश राहतील.सर्वांची मान्यता घेऊन लग्न करणे चांगले.

प्रश्न: गुरुजी, मी तुमच्यासारखा कधी बनू शकेन?
श्री श्री : तुम्ही मोठे व्हा आणि तरीही लहान मुलाप्रमाणे राहा आणि तुम्ही सर्वांना कायम तुमचाच एक भाग समजा, सगळ्यांना तुमचे मित्र समजा.जेवढे जमतील तेवढे मित्र बनवा आणि कोणाशीही शत्रुत्व करू नका. तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका किंवा कोणाला इजाही करू नका.

प्रश्न: गुरुजी, मे नेहमी विचार करतो कि ‘लोक माझ्याबद्दल काय विचार करतील’ आणि म्हणून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.मी काय करू?
श्री श्री : हे बघ, त्यांना जो काही विचार करायचा आहे तो करू देत, त्यांना जे बोलायचे आहे, ते बोलू दे.
हिम्मतीने उभे राहा आणि सांगा कि, ‘ तुम्हाला हवे ते विचार करा माझ्याबद्दल.’. बाळा, धैर्यवान हो! जरी ते तुला मुर्ख समजत असतील, तरी काही फरक पडत नाही.

प्रश्न: गुरुजी, ४ वर्षांपूर्वी माझ्या वडीलांचा देहांत झाला आणि तेंव्हापासून मी माझ्या अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाही. मी माझ्या अभ्यासात प्रगती करू जेणेकरून त्यांना माझ्याबद्दल अभिमान वाटेल.
श्री श्री : YES कोर्स karकर.काळजी करू नको.तुझ्या बाबांचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत.पुढे चाल.
येथील सर्व तरुणांनो, तुम्ही पुढे जाऊन भारतासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करा.पाश्चात्य देशात ते अभ्यासातून किंवा नोकरीमधून एक वर्षाची सुट्टी घेतात आपल्या देशासाठी किंवा दुसर्या एखाद्या प्रयोजनासाठी काम करतात.
मी तुम्हा सर्वांना एक वर्ष पुढे येऊन काम करण्याचे आवाहन करतो.आपण खेडोपाडी जायला हवे, मुंबईतल्या झोपडपट्टी मध्ये जायला हवे आणि जबाबदारी घ्यायला हवी. खूप काम आहे करायला. आपल्याला सर्व आत्महत्या थांबवायच्या आहेत.आपण समाजच्या उपयोगी पडले पाहिजे. तुमच्यापैकी ज्यांना सेवा करायची आहे, त्यांनी तुमचे नाव रजिस्टर करा. आपल्या देशाला अभिमान वाटेल असे करा. आपल्या देशाला बलवान बनवा. मला असा समाज बघायचा आहे, जिथे भ्रष्टाचार नसेल, अन्याय नसेल, हिंसा नसेल आणि ताणतणाव नसतील. असा समाज, जिथे मानवता बहरते आणि सर्वत्र प्रेमच दृष्टीस पडते.
मला तुम्ही सर्वजण स्वयंसेवक बनायला हवे आहात. मला भ्रष्टाचाररहित, हिंसारहित समाज बघायचा आहे. सर्वजण मिळून हे करूयात.



The Art of living
© The Art of Living Foundation