माझ्या मनात आणि माझ्या बुद्धीत दिव्यत्वाचा उदय होऊ दे.
१५ डिसेम्बर २०११

प्रश्न : गुरुजी पूर्वी एखाद्याला गायत्री मंत्राची दिक्षा देणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि आज तो अगदी सगळीकडे ऐकायला मिळतो.
श्री श्री : जेव्हा तुम्ही विधीपूर्वक एखाद्या मंत्राची दीक्षा घेता, जसा तुम्ही सहज समाधी मंत्र घेता तेव्हा तुम्ही तो गुप्त ठेवता. जसे, ‘ओम नमः शिवाय’ सत्संग मध्ये एखाद्या गाण्याप्रमाणे गायले जाते तेव्हा त्याचे मूल्य निराळे असते. पण जेव्हा त्या पवित्र अशा मंत्राची तुम्हाला दीक्षा दिली जाते तेव्हा तुम्ही ते गुप्त ठेवायाचे असते. आज त्याची अशी परीस्थिती आहे.
अगदी पूर्विपासून पावित्र्य आणि गुप्तता हे भारतात एकत्रच जातात. पश्चिमेच्या अगदी उलट. इकडे जे काही गुप्त असते ते पवित्र मानले जाते. पाश्चिमात्य देशात जे तुम्हाला लाजिरवाणे वाटेल ते तो गुप्त ठेवले जाते. भारतात, तुमच्यातले न्यून तुम्ही नेहमी उघड करता. ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला खंत वाटत असेल त्या गोष्टी तुम्ही तुमच्या पालकांसमोर, गुरुसमोर किंवा तुमच्या मित्रासमोर सांगून टाकता. असत्य कधीच गुप्त ठेवले जायचे नाही उलट उघड केले जायचे.
म्हणूनच गुप्त गोष्ट ही नेहमीच पवित्र असते आणि गुप्ततेचा आदर करणे हा खूप मोठा सद्गुण मानला जातो.
पाश्चिमेकडे पवित्र गोष्ट कधीच गुप्त ठेवली गेली नाही. ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला लाज वाटायला हवी, ती नेहमी गुप्त ठेवली गेली.तुम्ही गुप्तता पाळताय म्हणजे काहीतरी लपवाताय. म्हणजे तुम्ही सत्यापासून दूर आहात. पण इथे भारतात जेव्हा तुम्ही काहीतरी गुप्त ठेवता तेव्हा तुम्ही सत्याच्या अगदी जवळ असता. गुप्ततेकडे बघण्याचे हे दोन अगदी वेगळे दृष्टीकोन आहेत.
पश्चिमेकडे गुप्तता म्हणजे कपटी, विश्वासघातकी, असत्य, लबाड आणि अप्रामाणिक हे सर्व गुण गुप्ततेशी जोडले जातात. भारतात जे काही गुप्त आहे ते पूज्य आहे, पवित्र आहे, वैयक्तिक आहे, उत्कर्ष घडवणारे आहे,प्रेम आहे आणि अनंताशी जोडणारे , दिव्यत्वाशी जोडणारे आहे .इथे हे सर्व सद्गुण गुप्ततेशी जोडले जातात. त्यामुळेच मंत्र हे गुप्तपणे घेतले जातात.
जेव्हा गायत्री मंत्र दिला जातो तेव्हा एका चादरीने वडील, मुलगा आणि शिक्षक यांना झाकून टाकले जाते. आणि मग मुलाला त्याच्या उजव्या कानात गुप्तपणे मंत्र दिला जातो.
मंत्र असा आहे की , ‘ अनंतत्व, दिव्यत्व यांचा माझ्या मनात आणि बुद्धीत उदय होऊ दे.’ अशाप्रकारे अगदी गुप्तपणे हा मंत्र दिला जातो. त्याकाळी, विशेषत: गायत्री मंत्र लोकांना सहज दिला जायचा नाही कारण तो खूपच सामर्थ्यशाली आहे. तो सामर्थ्यशाली आहे त्यामुळे जर सगळेच जण सामर्थ्यवान झाले तर राज्य करणारे राजे कमजोर होतील.
तसेच त्यांनी तो स्त्रियांना द्यायचेही टाळले. करणा ती पुरुष प्रधान संस्कृती होती आणि पुरुषांना भीती होती की जर स्त्रियांनी गायत्री मंत्राची साधना केली तर त्यांना सिद्धी प्राप्त होईल.त्यांना वाटायचे की, “आधीच घरी त्रास आहे, त्यात तिने जर शाप दिला तर मी सगळेच घालवून बसेन.” स्त्रियांचा उपजतच लवकर प्राविण्य मिळते. नवरा बायकोला म्हणायचा,“ मी तुझ्यासाठीच पारायण करतोय, काळजी करू नको,तुला काही करायची गरज नाही.” हे चूक आहे . सुरवातीपासून असे नव्हते. पुरुषांनी भीतीपोटी स्त्रियांकडून मंत्रघोष करण्याचे तंत्र काढून घेतले. पण आता स्त्रिया जाग्या झाल्या आहेत आणि त्यांना जाणीव झाली आहे.
मंत्रघोष सर्वजण करू शकतात. काही हजार वर्षांपूर्वी ‘फक्त पुरुषांनी’ ची परंपरा भारतात सुरु झाली. त्याआधी असे नव्हते.पुरुष व स्त्रियांना समान हक्क होते. काळाच्या ओघात पुरोहित, राजे आणि मंत्री यांनी एकत्रपणे असा निर्णय घेतला की फक्त पुरुषच मंत्रघोष करतील. पण आता ती एक भूतकाळातील गोष्ट आहे.
तर, तुम्हाला जेव्हा ‘सहज’चा मंत्र मिळतो तेव्हा गुप्त ठेवा. पण बाकीचे मंत्र तुम्ही जोरात म्हणू शकता.

The Art of living
© The Art of Living Foundation