सर्व काही सोडून द्या आणि तुमच्या हृदयाच्या त्या शांत कोपऱ्यामध्ये आश्रय
घ्या.
३ जानेवारी २०११
प्रश्न: असुरक्षिततेची भावना कशी नाहीशी करता येईल?
श्री श्री : असुरक्षितता आहे कारण तुम्हाला वाटते कि तुमच्यासाठी कोणी
नाहीये.जागे व्हा आणि पहा, कि जगात केवढी माणुसकी, केवढे प्रेम आहे आणि तुम्हाला
असुरक्षित वाटायचे कारण नाही. तुम्ही रस्त्याने जात आहात आणि कोणालातरी मदत हवी
आहे.त्यांना त्यांची पिशवी उचलता येत नाहीये. तुम्ही जाऊन त्यांना मदत कराल कि
नाही? बरोबर?
तुम्हाला माहितीये आपल्याला असुरक्षित कधी वाटते ते? जेंव्हा आपल्याला वाटते
कि माणुसकी नाहीये, करुणा, दया नाहीये, आणि कोणामध्ये मित्रत्वाचा भाव
नाहीये.तेंव्हाच तुम्हाला असुरक्षित वाटते. जर तुम्ही जागे होऊन पाहिलेत तर दिसेल
कि या जगात खूप प्रेम, करुणा, आपलेपणा आहे आणि असुरक्षित वाटायचे कारण नाही.
प्राणायाम, क्रिया आणि ध्यान तुम्हाला त्या असुरक्षित भावनेपासून दूर नेईल. ते
आधीच झाले आहे. तुमच्यापैकी कितीजणांना आता असुरक्षित वाटणे बंद झाले आहे. (खूप
हात वर उचलले गेले)
प्रश्न : गुरुजी, नातेसंबंध माझ्यासाठी चांगला आहे का नाही हे मला कसे कळेल? तो फक्त मला डिवचतो आहे आणि मला त्यामधून शिकायला पाहिजे का त्याच्याबरोबरचे नाते माझ्यासाठी चांगले नाहीये.
श्री श्री : खर तर मला याचा अनुभव नाही, त्यामूळे मी तुम्हाला सांगू शकत नाही.
तुम्ही कोणाहीबद्दल मत बनवण्याआधी पहिल्यांना तुमचे त्यांच्याशी कशा प्रकारचे नाते
आहे हे नीट तपासून घ्या. तुमचे मन किती मोठे आहे, तुम्ही एखाद्याला कुठवर समजून
घेऊ शकता आणि तुमच्या त्या व्यक्तीवर किती प्रभाव आहे, जेणेकरून तिच्यामध्ये बदल
करू शकता, हे सर्व नीट जाणून घ्या.
तुम्हाला जेंव्हा शंका येते, ते खुपदा कोणत्यातरी चांगल्या गोष्टीची असते. हे
तुम्हाला जाणवले आहे का? आपण माणसाच्या प्रामाणीकपणावर संशय घेतो, त्याच्या
अप्रामाणिकपणावर नाही. कोणी तुम्हला विचारले कि, ‘तुम्ही खुश आहात का? आपल्याला
शंका येते,’अं, मी खात्रीने नाही सांगू शकत.’ पण आपण आपल्या नैराश्यावर कधी संशय
घेत नाही.हो कि नाही?
आपला संशय नेहमी सकारात्मक गोष्टींबद्दल असतो, हेहि लक्षात घ्या.
प्रश्न: गुरुजी, इतरांशी शुद्ध, निर्हेतुक नाते कसे जोडावे?
श्री श्री : कुठलेही नाते मुद्दामून न जोडणे चांगले. तुम्ही नैसर्गिक आणि
साधेपणाने राहा. नाती आपोआप बनतील.
जेंव्हा तुम्ही मुद्दामून नाते बनवण्याचा प्रयत्न करता, तेंव्हा तुमच्यामध्ये
थोडी कृत्रिमता येते आणि तुमची वागणूकही कृत्रिम होते. तिच्यामध्ये सहजपणा नसतो.
तुम्हाला कोणीतरी प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते तुमच्या लक्षात
येते कि नाही? जर कोणी तुम्हाला प्रभावित करायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही काय
करता? तुम्ही त्यापासून दूर जाता. तुम्हाला काय आवडते याचा विचार करा. इतरांनाही
तेच आवडते. तुम्हाला प्रामाणिक, मोकळ्या स्वभावाचे, स्वाभाविक, निर्हेतुक लोक
आवडतात ना ? ह्याचीच अपेक्षा लोक तुमच्याकडून करतात.
जर तुम्ही अधिकारी असाल, तर तुम्हाला कशा प्रकारचे सहकारी आवडतील? जे मोकळ्या
स्वभावाचे आहेत, बरोबर? आणि हेच तुमच्या अधिकाऱ्यांनाही हवे आहे.
तुमच्या अधिकाऱ्यांना, प्रियकराला किंवा प्रेयसीला प्रभावित करण्याचा प्रयत्न
करू नका.मग सगळेच बिनसून जाते. तुम्ही जसे आहात तसे वागा, स्वाभाविक राहा,
कारुण्याने वागा आणि आत्ताच्या या क्षणात जागा. त्यामूळे खूप फरक पडतो.
प्रश्न: जेंव्हा सगळे काही बेरंग, कोरडे आणि उद्देश्यहीन वाटते, तेंव्हा काय
करावे? कधीकधी मला सगळे निष्प्रेम वाटू लागते.
श्री श्री: तेंव्हा तुम्ही ज्ञान वाचा. मी भरपूर ज्ञानाची पुस्तके आणि सीडी
बनवल्या आहेत. अष्टावक्र गीता ज्ञान हे
अमूल्य आहे आणि ध्यान करा. या दोन्ही गोष्टींनी मदत होईल. आणि जर कुठे मौनाचा
कोर्स (advanced course) असेल, तर जाऊन तो करा. जेंव्हा सर्व काही शुष्क
वाटते, तेंव्हा ह्यांच्यामुळे आयुष्यात रस परत येईल.
प्रश्न: मोठी माणसे मोठी कशी बनतात आणि आम्हालाही तसे कसे बनता येईल?
श्री श्री : तुम्हाला मोठ्ठे बनण्यासाठी काही
मोठ्ठे करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही छोट्या गोष्टी बिनचूक करा. साधे आणि
स्वाभाविक राहा आणि मग, तुमच्याकडून आपोआप मोठ्या गोष्टी होत जातील, कळले ?
आणि तुम्हाला मोठे होण्यासाठी प्रसिद्ध होण्याची
गरज नाही. मोठेपण तुमच्यामध्ये स्वभावात:च आहे.ते तुमच्यामध्ये बीज स्वरूपात आहे.
प्रश्न: अध्यात्मिक गुरु, धर्मगुरू किंवा प्रसिद्ध शिष्य यांच्यामध्ये कोणीही स्त्री का नाही? मी फक्त पुरुष गुरुंबद्दल ऐकले आहे, पण खूप कमी स्त्री गुरु आहेत.
प्रश्न: अध्यात्मिक गुरु, धर्मगुरू किंवा प्रसिद्ध शिष्य यांच्यामध्ये कोणीही स्त्री का नाही? मी फक्त पुरुष गुरुंबद्दल ऐकले आहे, पण खूप कमी स्त्री गुरु आहेत.
श्री श्री : तिथे जागा रिकामी आहे. तुम्ही ती भरू
शकता.
प्रश्न: गुरुजी तुम्ही ‘रोगनिवारण (अध्यात्मिक मार्गाने)’ याबाद्ल काही सांगाल का?
श्री श्री : रोगनिवारण होऊन जाते! जेंव्हा उर्जेचा
स्तर उच्च असतो आणि जिथे प्रेम असते, तिथे आपोआप रोगनिवारण होऊन जाते.
प्रश्न: प्रिया गुरुजी, जेंव्हा माझ्या जोडीदाराला माझ्यावर
अधिकार गाजवायचा असतो आणि माझा पाठलाग करायचा असतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करते,
पण तो मला अस्वस्थ करतो.
श्री श्री : एक गृहस्थांना विचारले, ‘ घरात कोणाचे
वर्चस्व असते?’
ते म्हणाले, ‘ माझे! पण हे सांगायला माझ्या बायकोची
परवानगी आहे’. म्हणजे त्याला ‘माझे वर्चस्व आहे’, असे सांगायला बायकोची परवानगी
घ्यावी लागते. तुम्ही वरचढ राहा, पण हळुवारपणे.
नवराबायकोच्या नात्याचे एक रहस्य आहे.
एक म्हणजे, तुम्ही कधीही तुमच्या नवऱ्याला कमी लेखू
नका.जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलेत, ‘ कि तू काही कामाचा नाहीस, तू आळशी
आहेस’, तर त्याचा स्वाभिमान ठेचला जातो आणि तो खरच कुचकामी होऊन जातो. म्हणून तो
कितीही कमकुवत, कुचकामी असला तरीही तुम्ही कायम त्याला सांगितले पाहिजे, कि तो
सगळ्यात चांगला आहे. त्याचा अहंकार (मान) वाढवला पाहिजे.सगळे जग जरी त्याला बिनडोक
म्हणाले, तरी तुम्ही तसे म्हणायचे नाही. जोडीदार म्हणून तुम्ही त्याला सांगायला
पाहिजे, ‘तू सगळ्यात हुशार आहेस. फक्त तू त्या हुशारीचा वापर उपयोग करत नाहीस.
तुझा मेंदू एकदम ताजा, न वापरलेला आहे’
त्याचप्रकारे स्त्री साठी, तिच्या भावनांवर कधी
पाणी नाही ओतले पाहिजे. स्त्री साठी भावनिक बंधन हे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही
कधीही तिचे आईवडील किंवा भाऊ बहिण यांबद्दल तक्रार केली नाही पाहिजे. जर ती तक्रार
करत असेल, तरीही तुम्ही शात रहा, काहीही बोलू नका. करा तुम्ही तिच्या बाजुने
बोललात तरी त्रासात पडाल आणि विरुद्ध
बोललात तरीही. तुम्ही तिच्या माहेरच्यांच्या विरुद्ध बोललात तर तुम्ही
त्रासात पडाल आणि त्यांच्या बाजूने बोललात, तर ती एकटी पडेल.ती आरडाओरडा करेल कि,
‘तुम्ही मला समजूनच घेत नाही’.काहीही झाले तरी तुम्ही त्रासात पडाल, म्हणून गप्प
राहा. तिथून निमुटपणे निघून जा किंवा विषय बदला. तिला जर खरेदीसाठी जायचे असेल, तर
तुमचे क्रेडीट कार्ड द्या. तिच्या चपलांचे १० जोड असले तरीही ती ११वे घेऊ शकते.
तुम्ही विचारा, ‘ तुला ११ पायांच्या जोड्या तर नाहीत, मग तू इतक्या चपला का खरेदी
करतेस?’, आणि मग ती नाराज होईल.म्हणून, खरेदीसाठी तुम्ही कधीही मनाई करू नका.
प्रश्न: माझ्या मनातली स्त्री माझ्यावर १००% प्रेम
करते, हे मला कसे कळेल?
श्री श्री : हे ना मला माहितीये ना तुला. तुम्ही
प्रयत्न करून बघा. ९०% जरी प्रेम असेल, तरीही पुरेसे आहे. जर तुम्हाला कोणी हाच
प्रश्न विचारला, तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही तुमच्या प्रेमाची १०० % खात्री
नाही देऊ शकणार.तुम्ही तुमच्या स्वताच्या मनाची १००% खात्री नाही देऊन
शकत.आपल्यालाच आपले मन माहीत नसते.माग तुम्ही दुसऱ्या कोणाला त्याचे मन माहीत
असावे, अशी अपेक्षा का करता?जेंव्हा तुमचा स्वत:च्या मनावर ताबा नाही, तेंव्हा
तुम्ही दुसऱ्या कोणाचे मन कसे काय ताब्यात ठेवू शकाल? अशक्य आहे.
फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा; जे तुमचे आहे ते कायम
तुमचेच राहील.जे तुमच्यापासून दूर जाते, ते कधी तुमचे नव्हतेच.
हे जर तुम्ही जाणून घेतलेत, तर तुम्ही शांत रहाल.
तुम्ही जर तुमच्या अंतरंगात स्वतंत्रता अनुभव करत
असाल, आणि शांत असाल, तर सगळे जग तुमचे आपले आहे.सगळेजण तुमचेच आहेत.पण जर हे
नसेल, तर तुम्ही कोणाला कितीही धरून ठेवायचा प्रयत्न केलात तरी ते निसटून
जातील.म्हणूनच हे अध्यात्मिक ज्ञान खूप आवश्यक आहे. हे तुम्हाला फक्त आतून
शक्तिशाली करते असे नाही तर तुम्हाला सर्व विश्वाचा केंद्रबिंदू बनवते.तुम्ही एवढे
समतोल असाल कि नसर्गिक रीत्याच सर्व काही तुमच्याकडे येईल.
भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायात एक सुंदर सुभाषित आहे.’जो परमात्म्यामध्ये स्थित झाला आहे, त्याच्या सर्व इच्छा आणि त्यांची पूर्ती त्याकडे अशी येईल जशी नदी समुद्राकडे वाहत जाते.’
भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायात एक सुंदर सुभाषित आहे.’जो परमात्म्यामध्ये स्थित झाला आहे, त्याच्या सर्व इच्छा आणि त्यांची पूर्ती त्याकडे अशी येईल जशी नदी समुद्राकडे वाहत जाते.’
किती नैसर्गिक आहे हे? सर्व नद्या समुद्राकडे वाहत जातात.त्याचप्रमाणे एका योगीच्या
सर्व इच्छा पूर्ण होतात.
म्हणून योग, ध्यान करा आणि अध्यात्मिक ज्ञान आत्मसात करा. मग सर्व काही
तुम्हाला मिळेल. त्याला नाही जो आपल्या तीव्र इच्छांच्या मागे धावतो आहे. त्या
माणसाच्या हाती काहीच लागत नाही.
म्हणून सर्व काही सोडून द्या आणि तुमच्या हृदयाच्या शांत कोपऱ्यामध्ये आश्रय
घ्या. माग सर्व काही तुमचेच आहे. हे सत्य आहे.
प्रश्न: गुरुजी, माझ्या कामाच्या ठिकाणी मी मुल्यांना धरून राहू शकत नाही. मी माझी नोकरी बदलू का?
श्री श्री : नाही! तुम्ही हि मूल्य तुमच्या कामाच्या ठिकाणी रुजवू शकता. काळजी
करू नका, पुढाकार घेऊन लोकांशी बोलत रहा. दोनचार दिवस लोक तुम्हाला वेड लागलं
म्हणतील, पण त्याकडे लक्ष देऊ नका.तुम्ही बोलत राहा.माग त्यांच्या लक्षात येईल आणि
ते स्वीकार करू लागतील.
मी जेंव्हा पहिल्यांदा पाश्चिमात्य देशात आलो, तेंव्हा लोकांना वाटले कि मी
वेडा आहे.मी काय बोलत होतो, ते कोणाला समजायचे नाही, पण ते यायचे आणि सगळ्यांनी
त्याचा आनंद घेतला. तुमच्या कामाच्या ठिकाणीही असेच होईल. तुम्ही ज्ञान आणि
त्यापासून होणारा बदल, याबद्दल बोलत रहा.
मला आठवतेय, २० वर्षापूर्वी जर कोणी शाकाहारी भोजन किंवा अधिक झाडे
लावण्याबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल कोणी काही बोलले, तर लोक त्यांची चेष्टा
करायचे. आठवतेय का कोणाला? जेंव्हा कोणी स्वच्छ पर्यावरण किंवा प्लास्टिकच्या
विरोधात कोणी काही बोलले, तर लोक म्हणायचे, ‘ हा मूर्खपणा आहे. त्यांना काही काळात
नाही. हे अशक्य आहे’.
३० वर्षांपूर्वी, कोणी म्हणाले तुम्ही सिगारेट ओढू नका, तर लोक म्हणायचे, ‘ हे
विचित्र आहे’. जर तुम्ही सिगारेट ओढत नसाल, तुम्हाला समाजापासून वेगळे समजले
जायचे.
विमानमधील प्रत्येक खुर्चीला अॅश ट्रे असायचा. आणि जिथे
खुर्चीचा पट्टा बांधायचे चिन्ह असते, तिथे प्रवाशांनी विमान उडण्याच्या आणि
उतरण्याच्या वेळी धुम्रपान करू नये यासाठी धुम्रापानाचेही चिन्ह असायचे. फक्त
पुढच्या २ किंवा ३ रांगाच धुम्रपानविरहीत असत. बाकी सर्व ठिकाणी धुम्रपान चालत
असे. तसा त्याचा काहीच उपयोग नसायचा कारण मागून आणि पुढून, दोन्हीकडून धूर यायचाच.
त्या काळात जर तुम्ही धुम्रपान करत नसाल, तर तुम्हाला
कालबाह्य समजले जात असे. हे मी ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय.पण आज
जगभरातल्या सर्व विमानांमध्ये धुम्रपानाला मनाई आहे. आज कोणत्याही विमानात अॅश
ट्रे नाही.
अश्याच प्रकारे तुम्ही या मुल्यान्बद्दल, ध्यानाबद्दल सांगत
रहा. त्या काळात तुम्ही मांडी घालून बसून ध्यान करता आहात म्हणजे तुम्हाला वेगळे
विचित्र समजले जायचे. कोणताही सर्वसाधारण माणूस हे करणार नाही.
पण आज तुम्ही बघाल, मोठमोठ्या कंपन्या जेंव्हा विश्रान्तीबद्दल
बोलतात, ते कोणीतरी ध्यानस्थ बसले आहे असे दाखवतात. सर्व कंपन्या योगाची आणि
ध्यानाची जाहिरात करतात. गोष्टी बदलत आहेत.
तुमच्यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणायची ताकद आहे. दूर पळू नका.त्याच ठिकाणी राहून आस्ते आस्ते या मुल्यांबद्दल सांगत राहा. त्यामूळे बदल घडून येईल.
तुमच्यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणायची ताकद आहे. दूर पळू नका.त्याच ठिकाणी राहून आस्ते आस्ते या मुल्यांबद्दल सांगत राहा. त्यामूळे बदल घडून येईल.
आपल्याकडे उद्योग क्षेत्रासाठी वेगळा कोर्स आहे. लोक जाऊन
शिकू शकतात किंवा प्रशिक्षक येऊन शिकवतात. आज बरेच उद्योगसमूह तो कोर्स करीत
आहेत.आत्ता आपण बोलत असतात, ‘BOSCH’ नावाच्या
कंपनी मध्ये २ कोर्स होत आहेत. सर्व वरिष्ठ अधिकारी २ वर्गांमध्ये या कोर्स करीत
आहेत. आताच मला SMS आला आहे. ते
बंगलोर ला अश्रमात आले आहेत. खूप कंपन्या हे कोर्स करत आहेत आणि त्यामूळे तेथील
वातावरण बदलत आहे.
मला आठवते आहे, २५ वर्षांपूर्वी लुफ्तांझा विमानसेवेतील
लोकांनी येऊन कोर्स केला होता.ब्रिटीश विमानसेवेतील काही लोकांनीहि केला होता.आज
त्यांनी विमानामध्ये सुचनेसहित असलेले ध्यान सुरु केले आहे. लुफ्तांझा मधील चॅनल
१३ वर इंग्रजी आणि जर्मन भाषेत ध्यान आहे.तिथे सांगितलेल्या सर्व गोष्टींशी मी
सहमत नाहीये. ते बिनचूक नाहीत पण काही प्रमाणात तरी तणाव कमी होतो. काहीच
नसण्यापेक्षा थोडेफार असले तरी चांगले.खूप कल्पनाशक्ती आणि प्रयत्नांनी त्यांनी हे
केले आहे.
जग बदलते आहे. तुम्हीही तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणू शकता. त्यापासून दूर जाऊ नका.
जग बदलते आहे. तुम्हीही तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणू शकता. त्यापासून दूर जाऊ नका.
दुसऱ्या कोणत्या कारणासाठी तुम्हाला तुमची नोकरी बदलायची
असेल तर मात्र बदलू शकता. तुम्हाला दुसरीकडे जास्त पगार मिळत असेल तर नक्की बदला,
पण फक्त आजूबाजूचे लोक बरोबर नाहीत म्हणून नाही.
जर तिथले लोक खराब असतील तर माग तर तुम्हाला तिथे नक्कीच
थांबले पाहिजे, कारण तुम्हीच एक आशा आहात. तुम्ही बदल घडवून आणू शकता.
प्रश्न: माझे काम, कुटुंब इत्यादी आयुष्यात बरे चालले आहे.
मी समाजासाठीही शिक्षणक्षेत्रात थोडेफार काम करतो आहे. पण मला असे वाटते आहे कि मी
समाजामध्ये यापेक्षा अधिक करू शकतो.कसे काय करावे याबद्दल काही मार्गदर्शन कराल
का?
श्री श्री : तुम्ही ‘आर्ट ऑफ लीवींग’ बरोबर काम करा.
आपल्याला खूप काही काम करायचे आहे. आम्हाला नक्कीच तुमची गरज आहे.आम्ही भारतातील
पहिले महाविद्यालयाची स्थापना करत आहोत, जिथे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य
देशांकडच्या चांगल्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत. कारण पूर्वेकडे
खूप चांगल्या आणि खूपशा चांगल्या नसलेल्याही गोष्टी आहेत.तसेच पश्चिमेकडे सुद्धा.
म्हणून आम्हाला पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडील जे खरोखर चांगले
आहे त घेऊन मानवी चैतन्यामध्ये फरक घडवून आणायचा आहे. म्हणून आम्हाला तुम्हा
सर्वांची खूप मदत लागणार आहे.
आम्हाला पैसे उभे करण्यासाठी, मुलांची आर्थिक जबाबदारी
घेण्यासाठी लोकांची गरज आहे. जे इमारती बांधू शकतील असे लोक आम्हाला हवे आहेत. इथे
खूप काही होऊ शकते. म्हणून या प्रकल्पमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहेत.
प्रश्न: मला वाटते कि मी खूप प्रेमळ माणूस आहे आणि
माझ्याकडे देण्यासाठी खूप प्रेम आहे. मला फक्त लग्न करून माझे स्वत:चे कुटुंब,
मुलेबाळे हवे होते. पण इतक्या वर्षांमध्ये ते झालेले नाहीये.मी काय केल्याने
माझ्या आयुष्यात प्रेम आणि लग्न होईल.
श्री श्री : जगात प्रेमळ लोक नाहीत असे नाही आणि लग्न न
झालेले स्त्री, पुरुष नाहीत असेही नाही. ते आहेत, कदाचित तुम्ही खूप चोखंदळ
असाल.जर तुम्हाला तुम्ही खूप प्रेमळ वाटत असाल, तर कदाचित समोरची व्यक्ती तुम्हाला
तेवढी प्रेमळ वाटत नसेल. तुम्ही दुसऱ्यामध्ये दोष पहात असाल. म्हणून तुम्ही ज्या
व्यक्तीला भेटता, ‘ तुम्हाला वाटते,’ हे बरोबर नाही, तो चांगला दिसत नाही, किंवा
तो खूप उंच आहे किंवा तो खूप बुटका आहे किंवा तो टकलू आहे किंवा त्याला खूप केस
आहेत. तुम्ही प्रत्येकाबद्दल मत बनवू लागता, काही वैगुण्य शोधता, मला माहीत नाही
तुम्हाला पती कसा मिळेल. मला परवा कोणीतरी म्हणाले, ‘ मला आदर्श पुरुष हवा आहे’.
मी म्हणालो, ‘ ठीक आहे, तुला आदर्श पुरुष सापडला, तर त्याला
आदर्श स्त्री हवी असेल, जी तू नाही आहेस. मग तू काय करशील?’
आदर्श माणसाला आदर्श स्त्री हवीं असेल. तुम्ही आदर्श आहात
का? जर तुम्ही आदर्श नाही आहात, तर मग दुसऱ्यांनी तसे असावे अशी अपेक्षा का?
बघितलं? आपण कधी कधी हवेत
विचार करतो. आपण व्यवहारी नसतो आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत.आपण
वाजवीपेक्षा जास्त आदर्शवादापासून दूर गेले पाहिजे. जेंव्हा तुम्ही असे असता,
तेंव्हा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला चिडचिड्या बनवतात आणि छोट्या छोट्या
गोष्टींनी तुम्ही क्रोधित होता.तुम्ही शुल्लक कारणांनी उदास होता. खूप भावनिक
होता.आणि तुम्ही जर असा कांगावा करू लागलात तर कोणालाही तुमच्याबरोबर रहावेसे
वाटणार नाही.ते घाबरून जातात.
जेंव्हा तुम्ही समतोल
असता, जेंव्हा तुम्ही चोखंदळ नसता, तेंव्हा सर्व काही तुम्हाला हवे तसेच घडते.
प्रश्न: गुरुजी, आम्ही जेंव्हा तुम्हाला सत्संग किंवा
क्रियेमध्ये बघतो, तेंव्हा आम्हाला उच्च अनुभूती होते. तशी कायम कशी ठेवता येईल?
श्री श्री : ‘कायम’ विसरून जा.
जेंव्हा तुम्ही अंघोळ करता, तेंव्हा काही काळासाठी तुम्हाला
गरम किंवा थंडावा जाणवतो. आंघोळ थोडावेळच करतो, पण ती तुम्हाला दिवसभर स्वच्छ
ठेवते ना?
तुम्ही म्हणालात तुम्हाला कायम अंघोळ करायची आहे, तर
त्यासाठी तुम्हाला मासा व्हावे लागेल.तुम्ही कायम पाण्यात राहू शकाल.
काही सत्संग आणि क्रिया तुमची उर्जा चांगल्या प्रकारे
वाढवतील.हे जगात स्वाभाविक आहे. उर्जा तरंगांमध्ये येते, तुम्हाला खूप उच्च वाटते
आणि मग तुम्ही पुन्हा बाजारात जाता, आणि उर्जेची पातळी खाली जाते.मग तुम्ही सिनेमा
बघता, आणि ती अजून खाली जाते.
सिनेमागृहातून बाहेर येणारे लोकांचे चेहरे पाहिलेत का?
झोंबी सारखे दिसतात. ते चमकत्या नजरेने किंवा ताजेतवाने बाहेर येत नाहीत.कारण २
तास बसून सिनेमा बघण्याने ते मंद आणि थकलेल असतात.
उर्जेची पातळी कधीच सारखी रहात नाही. ती तरंगांमध्ये असते, कधी वर कधी खाली. साधनेने, सत्संग मध्ये येण्याने ती काही प्रमाणात वरती जाऊन स्थिर रहाते. कधी ती खाली गेली तरी हरकत नाही, नाहीतर अजून एक काळजी,’माझी उर्जा खाली गेली’ म्हणून.
उर्जेची पातळी कधीच सारखी रहात नाही. ती तरंगांमध्ये असते, कधी वर कधी खाली. साधनेने, सत्संग मध्ये येण्याने ती काही प्रमाणात वरती जाऊन स्थिर रहाते. कधी ती खाली गेली तरी हरकत नाही, नाहीतर अजून एक काळजी,’माझी उर्जा खाली गेली’ म्हणून.
मागे वळून आयुष्याकडे पहा, कसे होते ते? तुम्ही नेमाने
ध्यान, सत्संग करीत रहा आणि तुमची उर्जासुद्धा स्थिर होत जाईल.
प्रश्न: मी भावनिक खाणारा आहे. मी जेंव्हा दु:खी असतो,
निराश असतो, क्रोधित असतो मी आपोआप खात राहतो.ह्यावर मी कसा ताबा मिळवू? माझे वजन
खूप वाढते आहे.
श्री श्री : मी आत्ता तुम्हाला कोणताही सल्ला देणार
नाही.माहितीये का? कारण तुम्ही तो विसरून जाल आणि जेंव्हा तुम्हाला तो आठवेल,
तेंव्हा तुम्हाला अजून वाईट वाटेल.’मी तो सल्ला ऐकला नाही ‘ म्हणून. जेंव्हा
तुम्ही नाराज असाल, तेंव्हा काय चांगले आहे माहितीये? संगीताच्या तालावर मस्त
नृत्य करा.दु:ख्खी संगीत असेल तरी हरकत नाही.जेंव्हा तुम्ही नृत्य कराल तेंव्हा
तुमचे वजन कमी वाढेल आणि जे आहे तेही कमी होईल.आणि कमीत कमी त्या वेळेस तरी तुम्ही
कमी खाल.
कदाचित नृत्य संपल्यावर तुम्हाला भूक लागेल आणि तुम्ही
जास्त खल.जोवर तुम्ही स्वत:च काही निश्चय करत नाही, तोवर दुसरे कोणी काही करू
शकणार नाही. म्हणून तुमचा तुम्हालाच यावरचा उपाय शोधावा लागेल.
प्रश्न: ध्यानात असताना शरीराला झटका बसणे ठीक आहे का?
श्री श्री : हो, ठीक आहे. चांगलेच आहे.
प्रश्न: गुरुजी, मला एक महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे.पुरेसे खाण्याची इच्छा
नसणे आणि फक्त जास्त आरोग्यकारक अन्न खाणे
आणि खूप शिस्त असणे याबद्दल काही सांगाल का? याचे कारण काय आणि याचा उपाय
काय?
श्री श्री : तुम्ही कायम जर फक्त पौष्टिक खाणेच खात असाल,
तर कधीकधी शरीराची इतर अन्न पचवायची क्षमता कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत
होते. म्हणून तुमचे शरीर हे लवचिक असले पाहिजे.कधीकधी तुम्ही कमी पौष्टिक अन्न खाऊ
शकता. मी अनारोग्यकारक खा असे सांगत नाहीये.पण कायम सेंद्रिय खाणेच खा असे नव्हे. प्रत्येक
परिस्थितीशी जुळवून घेण्याची तुंच्या शरीराची क्षमता असते. त्याला फार संवेदनशील
बनवू नका.येतं का लक्षात मी काय म्हणतोय ते ?
गरीब वस्तीन्मधील, खास करून झोपडपट्टी मधील लोक, मी
भारताबद्दल बोलतोय, ते खूप काटक असतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त असते
आणि त्यांचे शरीर लोहासारखे असते.हे आश्चर्यकारक आहे.
जे लोक शहरी भागात राहतात, त्यांचे शरीर थोडे कमजोर
असते.तुम्ही थोड्या प्रदूषण असलेल्या ठिकाणी गेलात, तर तुम्हाला सर्दी-खोकला होतो.
पण हे लोक, झोपडपट्टीत राहतात पण एकदम काटक असतात.त्यांची रोगाप्रतीकाराची क्षमता
खूप चांगली असते, कारण तिचा वापर सारखा होतो. हे विचित्र आहे पण खरे आहे.
अनारोग्यकारक ठिकाणी राहणारे लोक जास्त निरोगी असतात. सगळीकडे नाही, पण काही
ठिकाणी ते नक्कीच निरोगी असतात.
जर तुम्ही ब्राझील ला त्यांच्या झोपडपट्टीत पाहिलेत, तर ते एकदम
काटक आणि पैलवान असतात आणि ते रिओ डी जानेरो च्या झोपडीत राहतात, मी पाहिले आहे.
तिथे झोपडपट्टी सारखे वाटत नाही. हे खूप निरोगी आणि बलवान लोक असतात.
म्हणून तुमच्या शरीराला
कायम फक्त खूप पौष्टिक अन्न देण्याची गरज नाही. मध्यम मार्ग स्वीकारा.
बहुतेक वेळा सकस अन्न ख, पण कधीकधी इतरही अन्न खाण्याची सवय ठेवा.
प्रश्न: मला असे वाटते कि,
सर्वांशी आपलेपणा वाटण्येईवजी, साधनेमुळे मी जास्त एकलकोंडा झालो आहे.
श्री श्री : नाही, असे नाहीये.
जागे व्हा.
कदाचित थोड्या काळासाठी तुम्हाला
असे वाटेल, पण ते निघून जाईल. तुम्ही त्या एकटेपणा बरोबर रहा. त्यामध्ये खोल जा
आणि तुमच्या लक्षात येईल कि त्यामूळे तुम्हाला खूप शक्ती मिळते आहे.

© The Art of Living Foundation