योग हा
हृदय आणि मस्तिष्क यातला नेमका समतोल आहे .
२५
डिसेंबर २०११
तुम्हा
सर्वांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०१२ फक्त एक आठवड्यावर आले आहे.
दर वर्षांप्रमाणेच हेही एक चांगले वर्ष आहे. जगबुडीची काळजी करू नका तसं काही
होणार नाहीये. लोक सत्याची कास धरतील आणि खोटे लोक मागे पार्श्वभूमीवर जातील. ज्या
लोकांनी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत ते मागे जातील.आणि जे योग्य मार्गावर आहेत ते
पुढे जातील.मार्च नंतर मोठा बदल घडेल.
तुम्ही
जर तुमच्या अंतःकरणा पासून जगाकडे बघीतले
तर ते खूप वेगळे आहे. तुम्ही तुमच्या अंतःकरणातून
जगाकडे बघा, तुम्हाला कळेल की केवढे सौदर्य आहे केवढे प्रेम आहे केवढ
निष्पापपणा आहे आणि चांगला विचार असलेले किती लोक आहेत. त्याच जगाकडे आपणा जर फक्त
बुद्धीने बघीतले तर आपल्याला खूप लबाडी , खूप अविश्वास आणि शंका दिसतील. जर तुम्ही
जगाकडे डोक्याने बघितले तर हे सगळे होते. जर तुम्ही अंतःकरणातून जगाकडे पाहिले तर
ते खूप लहान आहे.
पण
दोन्हीची गरज आहे. तुम्ही भोळे भाबडे राहून केवळ हृदयाच्या चष्म्यातून जगाकडे पाहू
शकत नाही. कधी कधी कधी डोक्यानेही बघावे लागते, दोन्हीचा नेमका समतोल राखावा
लागतो. काही जण डोक्यातच अडकून रहातात. तर काही जण कायम भावनेच्या गोंधळात असतात.
दोन्ही अपूर्ण आहेत. योग हा योग हा हृदय
आणि मस्तिष्क यातला नेमका समतोल आहे.
आपण
सर्वांनी हा विचार केला पाहिजे की आपण युरोप मध्ये अध्यात्म कसे आणू शकतो. मेक्सिकोच्या
लोकसभेतील १३० सभासदांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे. सगळीकडे खूप काम
चालू आहे
.
प्रश्न : लोक कोर्स करतात आणि मग फॉलोअप ला येत नाहीत अशा वेळी काय करावे
?
श्री श्री : ते कधी न कधी परत येतात.बघ, जेव्हा तुम्ही पोटभर
जेवण केलेले असते तेव्हा तुम्ही पुन्हा
जेवणाचा विचार करत नाही कारण तुम्ही समाधानी असता. मग जेव्हा तुम्हाला पुन्हा भूक
लागते तेव्हा तुम्ही खाण्यासाठी अन्न शोधता. बेसिक कोर्स इतका पूर्ण आहे आणि इतका
संपन्न करणारा आहे की तो कुणाला अधे मधे
सोडत नाही तर पूर्ण समाधान देतो. म्हणूनच लोक जेव्हा कोर्स करतात तेव्हा ते
खूप खुश असतात. हे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना ठासून
सांगता की त्यांनी रोज प्राणायाम आणि क्रिया करायला हवी आणि जर कुणी तसे केले नसेल
तर मग त्यांना, ते करू शकले नाहीत म्हणून अपराधी वाटू लागते. त्यांना वाटते की आता
मी कुठल्या तोंडाने तिथे जाऊ ; परत जाऊन पून्हा कसे करू? असा अपराधीपणा येतो. मग
ते स्वतःला सांगतात, “ मी उद्या पासून करायला लागतो आणि मग जातो.”
कोर्स
केल्याबद्दल कुणालाही पश्चाताप होत नसतो. त्यांना पश्चाताप होत असतो की त्यांनी
कोर्स आधी का केला नाही.असे असताना ते परत परत कां येत नाहीत तर त्याचे कारण
म्हणजे त्यांना खूप समाधानी वाटत असते.पण काही काळानंतर ते फॉलोअपला येतात, नक्की
येतात. अगदी दहा वर्षांनी येतात आणि सांगतात की,” मी दहा वर्षांपूर्वी कोर्स केला होता.”
युरोपियन
कमिशनने जवळ जवळ पंधरा वर्षांपूर्वी कोर्स केला होता. आणि जेव्हा त्यांना त्यांचे
प्रशिक्षक भेटले तेव्हा ते म्हणाले की ते रोज क्रिया करतात. मी एकही दिवस चुकवत
नाही. ते कधीही अडव्हान्सड कोर्सला गेले नाही पण ते दररोज क्रिया करतात.तर, लोक
त्यांच्या व्यस्त दिनाक्रमतही क्रिया करत रहातात.
प्रश्न : तुम्ही मला भेटायला कां येता ?
श्री श्री: तुम्हाला हे सांगायला की अंतरंगात खोलवर जा. तुम्ही आत्ता कोर्सला कां आलात ? तुम्ही आणिक कधीतरी यायला होते जेव्हा मी नसेन. तुम्हाला कळतंय तुम्हाला इथे काय ओढून आणते ! जेव्हा तुमचे मन तुम्हाला सांगते तेव्हा मला आत्ता जायला हवे तेव्हा तुम्ही येता. नाहीतर मग जेव्हा मी नसेन तेव्हा करा. खरं तर मी जेव्हा नसतो तेव्हा मौन चांगले होते. पण सुरवातीला खोलवर जाण्यासाठी ते एक निमित्त असते. खूप लोक येउन बसतात ध्यान करतात आणि स्वतःमध्ये खोलवर आत जातात.

हे
बघा की आंत आणि बाहेर असे काही नाहीये. जर तुम्हाला वाटले की आंत काही आहे तर
बाहेरही आहे. जर तुम्हाला वाटले की बाहेर काही आहे तर ते आंत ही आहे. तर खरे फुलणे
म्हणजे जेव्हा आंतही नसते आणि बाहेरही नसते.सगळे काही सारखेच असते, आंत आणि बाहेर
सारखेच असते.
प्रश्न : प्रेक्षकांपैकी एकाने प्रश्न विचरला पण तो ऐकू आला नाही.
श्री श्री : जसे गाढ झोपेत दोन नसते. “ ‘मी झोपलोय’ असे काही नसते. तसेच गहिऱ्या ध्यानाच्या स्थितीमध्ये तों नसते. शरीर म्हणजे अगदी एखद्या कोचावर ठेपलेल्या उशी सारखे असते. जर तुम्हाला असे वाटत असेल की दोन गोष्टींमध्ये काही फरक नाही तर ते शरीरापासून चेतना पूर्णपणे अलग होणे आहे. मग तुम्हाला दुसरे असे काही दिसतच नाही.

बर्फ,
पाणी आणि वाफेसारखे. बर्फ घनरूपात असतो. पाणी द्रवरूपात आणि वाफ तर आणखीनच
सूक्ष्म.पण ते सर्व एकाच पदार्थापासून बनले आहेत. म्हणजे तिथे दोन नाहिये. मी नाही
आणि तू नाही. तुमचे छोटे मन बांध घालत असते , हा मी आहे आणि हा तू आहेस. छोटे मन
स्वतःच ठरवते आणि फरक करते. सोडून दे आणि निवांत रहा मग तुला कळेल की फक्त एकच
आहे. एकच लहर.
प्रश्न : मला बालवाडी कशी सुरु करता येईल ?
श्री श्री : फक्त काही मुलं गोळा करा.मला वाटतं मी कायमच बालवाडीत आहे. अगदी इथे येणारी मोठी माणसं सुद्धा मुलं होतात. पुराणात एक सुंदर गोष्ट आहे. तिबेटच्या वर ‘कुमार वनम’ नावाचे एक विशिष्ठ उद्यान आहे आणि तिथे देव रहातो.जो कोणी त्या उद्यानात जातो तो एक लहान मूल होतो. आणखी एका पुराणात अशीच एक गोष्ट आहे. एक उद्यान आहे पण माणसं तिथे जाऊ शकत नाहीत. जो कुणी तिथे जाईल त्याचे स्त्री मध्ये रूपांतर होते. पुरुषांना तेथे प्रवेश नाही. तिथेच देव रहातो. या साऱ्या गोष्टी तुम्हाला एक संदेश देण्यासाठी आहेत की तुम्ही तुमच्या डोक्याकडून हृदयाकडे यावे. लहान मुले निरागस असतात आणि ते त्यांच्या हृदयात असतात. ते कुठल्याही गोष्टीचा निवाडा करत नाहीत.त्याच प्रमाणे स्त्रिया जास्त भावनाप्रधान असतात आणि डोक्यापेक्षा हृदयात जास्त रहातात. पण मी म्हणेन की दोन्हीचा समतोल हवा, मस्तिष्क आणि हृद्य .

प्रश्न : बिग बेंग कशामुळे झाला ?
श्री श्री : काही भौतिक
जड वस्तू होती. जड वस्तू शिवाय(बेंग) मोठ तडाखा होऊ शकत नाही.कशावर काय आदळणार ?
एकमेकावर आदळण्यासाठी काहीतरी तर पाहिजे.एखादा गोळा , एक क्षेत्र , उर्जा . तर ते
उर्जेचे क्षेत्र कधी निर्माण झाले नव्हते आणि कधी नष्टही झाले नव्हते पण फक्त
परिवर्तन झले होते. बिग बेंग म्हणजे फक्त उर्जेचे परिवर्तन होते. वायू किंवा
क्वांटम उर्जेपासून भरीव उर्जा, जड उर्जा , इतकेच काय ते. पुरातन ऋषींनी हेच
सांगितले होते आणि ते त्याला अनादी अनंत म्हणत असत. सृष्टीच्या उत्पत्तीला अवकाशाप्रमाणेच सुरवात नाही आणि शेवटही नाही. अवकाशाची सुरवात कुठे आहे ? पृथ्वीची सुरवात
कुठे आहे ? सुरवात कुठेच नाहिये किंवा प्रत्येक बिंदू सुरवातच आहे. तुम्ही
म्हणालात की पृथ्वी गोलाची सुरवात इथे झाली तर त्याचा शेवटही त्याचं बिंदूवर
व्हायला हवस जिथे सुरवात झली. नाहीतर ते वर्तुळ असणार नाही. तर हे काही हजार
वर्षांपूर्वी समजलेले तेजस्वी विचार आहेत. एखादी गोष्ट जिथे सुरु होते तिथेच ती
संपली पाहिजे तेच वर्तुळ असते. तर कुठेही सुरवात नाही आणि कुठेही शेवट नाही. अनादी
, अनंत : सृष्टी ला सुरवात नाही आणि शेवट नाही.
प्रश्न : प्रेक्षकांपैकी एकाने प्रश्न विचरला पण तो ऐकू आला नाही.
श्री श्री : काट्यानेच काटा काढावा लागतो.हे म्हणजे असे विचारण्यासारखे झाले की साबण नाहीतरी धुवूनच टाकायचा असतो मग तो लावायचाच कशाला ? कपडे धुताना तुम्ही काय करता ? साबण लावता आणि मग धुवून टाकता. तसेच हे मला विचारण्यासारखे आहे की बसमधून उतरायचेच आहे तर मग चढायचेच कशाला ? पण तुम्ही कुठे बस मध्ये चढता आणि कुठे उतरता ती ठिकाणे वेगवेगळी आहेत.

प्रश्न : मन हे नकारात्मक भावनांनाच कां चिकटते,
सकारात्मक भावनांना कां नाही ?
श्री श्री : हो. तेच नैसर्गिक आहे. तुम्ही एखाद्याची दहा वेळा स्तुती करा आणि एकदा अपमान करा, मन अपमानालाच धरून ठेवते. हे जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुमच्यात काही तरी बदलते.आणि जेव्हा तुम्हला हे कळलेले नसते, तेव्हा तुम्ही त्यात वाहून जाता. पण चांगल्या वातावरणात उच्च प्राण आणि उर्जा असेल तर असे होत नाही.तुमच्या प्राणाचा स्तर उंचावण्यासाठी गुरु येतो. गुरूच्या प्रत्यक्ष सानीध्यात प्राण आणि उर्जेचा स्तर उंचावतो. जेव्हा प्राणाचा स्तर उच्च असतो तेव्हा नकारात्मकता खाली जाऊन नाहीशी होते. तसेच दीर्घ काळ केलेल्या साधनेमुळे नकारात्मकता तुम्हाला शिवत नाही. तुम्ही इतके बळकट बनता की तुम्ही जाल तिथे प्राण निर्माण करता. जर कंदिलाची ज्योत मोठी असेल तर कुठलाही वारा तिला विझवू शकणार नाही.पण जर ती लहान असेल तर लगेच विझून जाईल. ‘बुद्ध’, संघ’ आणि ‘धर्म’ यांची गरज आहे. प्रथम तुम्ही बुद्धाकडे जा. ( सिद्ध ) तुम्ही सिद्धाबरोबर बसा, ध्यान करा. हे संघासारखे आहे. गटाने एकत्र बसून ध्यान करणे. आणि मग प्राणाचा स्तर ही वर जातो. जेव्हा दोन्ही उपलब्ध नसतात तेव्हा धर्म ; पूर्णपणे वैराग्य , सगळं सोडून द्या आणि आणि स्वतः मध्ये रहा, स्वभावात रहा. त्यानेही प्राणाचा स्तर उंचावतो. तीन उपलब्धी आहेत पण तिन्ही सारख्याच आहेत.

प्रश्न : गुरुजी , कधी कधी माझी खूप श्रद्धा असते आणि कधी कधी खूप शंका . यावर मत
कशी करायची ?
श्री श्री : जेव्हा सकारात्मक उर्जा असेल तेव्हा श्रद्धा असते.
जेव्हा नकारात्मक उर्जा असते तेव्हा शंका असते. पण शंका आल्या तर काय झाले, काही
हरकत नाही. जीवन म्हणजे या सगळ्याचा खेळ आणि देखावा आहे.शंका येते आणि मग श्रद्धा
येते. तुम्ही शंकांना घाबरू नका. मी तर म्हणेन त्यांचे स्वागतच करा.
प्रश्न : प्रेक्षकांपैकी एकाने प्रश्न विचरला पण तो ऐकू आला नाही.
श्री श्री : हो ते सारखेच आहेत. बुद्ध म्हणाले, “ ‘सर्व काही
रिकामे आहे’.” आणि आदी शंकराचार्य म्हणाले, “सर्व भरलेले आहे.” बुद्ध म्हणाले, ‘जीवन
म्हणजे दुःख आहे’.” आदि शंकराचार्य म्हणाले ,’जीवन म्हणजे सुख आहे’.” पहिल्या
ठकाणी बुद्ध म्हणाले ते बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीत दुःख बघत
नाही तोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होत नाही.तर ही एक प्रक्रिया आहे. एकदा तुम्ही
अंतर्मुख झालात की मग तुम्हाला सगळा आनंदच दिसतो. हेच आदि शंकराचार्यांनी म्हटले
आहे.
प्रश्न : गुरुजी, तुमच्या आवाजातील भजन सी डी मिळेल कां ?
श्री श्री : मला सर्वातच वरचढपणा गाजवायचा नाहीये. उत्कृष्ट गायक
आहेत जे खूप चांगले गातात. मला त्यांचा आवाज ऐकायचा आहे. मी फक्त सोहम म्हणतो.
बाकी तुम्ही इतर गायकांना ऐका. अर्थात भाषणे आणि प्रवचने आहेतच. नाहीतर काय होईल,
गुरुजींची भजने, गुरुजींची भाषणे, सगळं काही गुरुजींचे , नको. म्हणूनच योग सुद्धा
दुसरे कुणीतरी घेते.आपण सगळे भागीदार आहोत, प्रत्येकाला एक भूमिका बजवायची आहे.
मला सगळ्या भूमिका नाही करायच्या. जरी मी कोणतीही भूमिका करू शकत असलो तरी. मला
सगळ्या भूमिका स्वतः नाही करायच्या. मग तुम्ही म्हणाल,“ ‘गुरुजी तुम्ही किती
चांगला स्वयंपाक करता. तुम्ही रोज स्वयंपाक कां करत नाही?”’ कधी कधी मी स्वयंपाक
करतो पण कधी ते तुम्हाला माहित नाही. तुम्हाला एक जेवण माझ्या हातचे मिळेल. भारतात
आजकाल स्वयंपाक करणं अशक्य झालं आहे. मला स्वयंपाकघरात जाताही येत नाही. तिथे इतकी गर्दी असते. पूर्वी
मी स्वयंपाकघरात जाऊन काही नवीन पदार्थ करून बघायचो. इथे अजूनतरी मला तसे करण्याची
मुभा आहे पण भारतात ते शक्य नाही.
तुम्हाला माहितीये भारतात आम्ही रोज किती मीठ वापरतो ? जेव्हा मी तिथे असतो
तेव्हा आम्ही एका जेवणाला १५० किलो मीठ वापरतो. जेव्हा मी तिथे नसतो तेव्हा एका
जेवणाला १०० किलो मीठ वापरतो. कधी कधी हे प्रमाण एका जेवणाला ३०० किलो पर्यंत
जाते. तर तुम्हाला अंदाज आला असेल किती जेवण बनत असेल आणि किती लोक येतात.

© The Art of Living Foundation