जे काही कारण नसतांना सहजपणे प्राप्त होते  ते अंतर्ज्ञान !
९ जानेवारी २०१२

प्रश्न: प्रिय गुरुजी, सर्वांशी नैसर्गिक सहजपणाने  वागणे मला जमत नाही. तुम्ही म्हणाला होतात कि जेंव्हा तुम्ही सहज स्वाभाविक असता तेंव्हा तुम्ही देवत्वाच्या जवळ असता. तर मला ते कसे जमेल?
श्री श्री : तुम्हाला कोणी तुमच्या सहज स्वाभाविकते वर टीका करेल अशी भीती  वाटल्यामुळे तुम्ही अस्वाभाविक होवू शकता.फार तर काय कोणाला वाटेल कि तुम्ही मूर्ख आहात किंवा वेडे आहात.  मग  तुम्ही एखादा अर्धा दिवस मूर्खपणाचे/ वेडेपणाचे  नाटक का नाही करत? यामुळे तुमची भीती निघून जाईल.तुमच्या हातून काही चुका होतील अशी भीती  वाटून तुम्ही अस्वाभाविक होवू शकता.असे पहा कि चुका करणे हे साहजिक आहे.तुम्ही जो पर्यंत काही मोठा घोटाळा करीत नाही तो पर्यंत चुका करणे ठीक असते.तुम्हाला गडबड घोटाळ्याची भीती वाटायला पाहिजे, चुकांची नव्हे.

प्रश्न: आदरणीय गुरुजी, बऱ्याचवेळा मी तुम्हाला असे वचन दिले आहे कि मी परत परत त्याच चुका करणार नाही.परंतु परत तश्याच चुका झाल्या मूळे नंतर मला कमी पणा वाटून खूप वाईट पण वाटते.
श्री श्री : तुम्हाला त्या चुकांची जाणीव होऊन त्या बोचतात हि खरेतर एक चांगली गोष्ट आहे. एक,दोन,तीन , चार ....अगदी दहावेळा चूका झाल्यानंतर त्यांची जाणीव होऊन तुम्ही त्या परत  करता  त्यांपासून लांब राहायचा प्रयत्न कराल. काही काळजी करू नका, कारण त्या चुकांची बोच राहून त्या परत  करण्याचे मला वचन देता  हि तर एक चांगली गोष्ट आहे. 

प्रश्न:प्रिय गुरुजी, लोकांकडून आत्यंतिक मनापासून ध्यान आणि साधना करून घेण्याने  आजच्या जगातील भ्रष्टाचार आणि लाचखोरी यासारखे प्रश्न सुटतील का? का या साठी भौतिक  पातळीवरती प्रयत्न  करण्याची गरज आहे?
श्री श्री:  यासाठी तर खरे तर या दोन्हींची गरज आहे.आंतरिक आणि आध्यात्मिक शक्ती तसेच शारीरिक प्रयत्न या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला दूरदर्शन बघतांना डोळे आणि कान या दोन्हींची गरज असते कारण तुम्हाला बघणे आणि ऐकणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी करायच्या असतात.  

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्ही असे सांगता कि सर्वांचा स्वीकार करा आणि त्यांना सोडू नका कारण ते तुमच्या सारखे नाहीत. पण तुम्ही असे पण सांगितले आहे कि तुम्हाला कोठली संगत योग्य वाटत नसेल तर तुम्ही तिच्यापासून दूर जा.हे जरा विस्ताराने सांगा कारण कि ते परस्पर विरोधी वाटते.
श्री श्री : होय आपले आयुष्य तर परस्पर विरोधी गोष्टींनी भरलेले आहे आणि सर्व सूचना या परस्पर विरोधी असतील.आणि म्हणूनच ते सत्य आहे.त्यासाठी तुम्हाला विवेकाची गरज आहे.या विवेकाचा वापर करून तुम्ही ते काय, कुठे व केंव्हा  याचा समतोल ठरवू शकता.

प्रश्न: आदरणीय गुरुजी, गुणांचा आदर करून त्यांची आसक्ती कशी टाळावी? काही वेळेला या आसक्तीमधून बाहेर पडणे फार अवघड होते.यातून कसे बाहेर पडावे?
श्री श्री: चूका करायच्या नाहीत असे उद्देश्य असलेले मन म्हणजे गाडीच्या ब्रेक सारखे आहे.तुम्ही जेंव्हा गाडीतून बाहेर चालला असाल आणि जर तुमच्या गाडीला चांगला ब्रेक असेल, तर तुम्ही तो कोठेही लावू शकता.आणि जर तुमच्या गाडीला ब्रेक नसेल, तर केंव्हाही अपघात होऊ शकतो.त्याचप्रमाणे जेंव्हा तुमचे मन असे म्हणते, कि एखादी गोष्ट मला करायची नाहीये किंवा ती गोष्ट मी करू नये कारण त्यातून आनंद मिळण्याची फक्त आशा असते, पण खरा आनंद न मिळता फक्त दुखच देते.
एखादी गोष्ट वाईट केंव्हा  होते? तर जेंव्हा ती गोष्ट आपल्याला आणि दुसऱ्या कोणालातरी वेदना देते. म्हणून आपण त्याला वाईट म्हणतो.त्यामुळे तात्पुरते सुख मिळते. पण तुम्हाला व दुसऱ्यांना कायमच्या वेदना देते.  

प्रश्न: प्रिय गुरुजी,कृष्णाच्या काळात कृष्णा बरोबर गोप आणि गोपिसुद्धा होत्या. मला मनापासून माहित आहे कि आजच्या काळातील कृष्ण कोण आहे पण आम्ही त्या काळातील गोप, गोपी आहोत काय?
श्री श्री रविशंकर: तुम्ही जर कोणी नवीन असाल तर काय फरक पडतो?तुम्ही तेच असण्याची काय आवश्यकता आहे? असू शकता ! कदाचित तुम्ही त्या काळातील पण असू शकता!
असे पहा कि ज्ञान हे कालातीत आहे, भावना पण कालातीत आहेत.
आता असे म्हणू नका कि "गुरुजी तुम्हीच सांगितले कि भावना या क्षणिक  असतात, त्या येतात आणि जातात". त्या क्षणिक असतात पण आणि त्या कालातीत पण असतात.
तुम्ही जर यावर गोंधळले असाल तर माझे काम झाले.
लोकांना समजून सांगणे हे माझे काम आहे असे कोणी सांगितले? नाही ! तुम्हाला गोंधळात टाकणे हे माझे काम आहे.आणि प्रत्येकवेळी जेंव्हा तुम्ही गोंधळून जाता तेंव्हा एक पायरी वरती जाता.

प्रश्न:गुरुजी , अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संभ्रम आणि अ-निर्णय क्षमता दिसून येते.तुम्ही याआधी सांगितल्या प्रमाणे चांगल्या गोष्टींविषयी संभ्रम आहे पण मी चांगल्या मधून निवड कशी करू?
श्री श्री : या बद्धल मी जर तुम्हाला अजून काही सांगितले तर तुम्ही अजून संभ्रमात पडाल.आताचा तुमचा संभ्रम तुम्हाला कमी वाटतोय काय? मी त्यात अजून भर घालू इच्छित नाही.संभ्रम जर जास्त वाढला तर तो अजून एक प्रश्न होऊ शकतो.पहा तुम्हाला तुमचा संभ्रम कोठे घेऊन जातोय ते.तुमच्यातील आसक्ती पण तपासून पहा.तुम्ही जर आसक्त असाल तर आसक्ती तपासून पहा आणि योग्य गोष्ट तुमच्या पदरात पडेल.

प्रश्न:प्रिय गुरुजी,मी एका पुस्तकात असे वाचले आहे कि भीती हि प्रेमाची खाली डोके आणि वर पाय स्थिती आहे.तर प्रेम हि काय भीतीची खाली डोके वर पाय अशी स्थिती आहे काय?
श्री श्री: तुम्ही जर याकडे दुसऱ्या बाजूने पाहिले, तुम्ही जर खाली डोके वर पाय असे असाल तर तुम्हाला ते खाली डोके आणि वर पाय असे दिसेल . आले लक्षात?

प्रश्न: नेपाळमध्ये अनेक उत्सवांमध्ये प्राण्यांचा बळी दिले जातो.आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये अशीच  प्रथा सांगितली आहे काय? यामध्ये आपण कसे परिवर्तन करू शकतो?
श्री श्री रविशंकर: यासाठी लोक-शिक्षण आणि जागृती ची गरज आहे. नाही, आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये प्राणी  बळी देण्यामुळे देव-देवता प्रसन्ना होतात असे सांगितले नाहीये.
"अहिंसा परमो धर्मःकोणत्याही प्राण्याचा बळी देता कामा नये.
आज जगामध्ये सर्व धर्म आणि संस्कृतींमध्ये काय झाले  आहे, याची तुम्हाला काही कल्पना आहे काय? ते एक साखर आणि मीठ यांचे मिश्रण झाले आहे. त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्यात मूळ ग्रंथांमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कि नंतर प्रचलित पद्धतीन्प्रमाणे समाविष्ट करण्यात आल्या आहेत.आणि मग लोक असा विचार करतात कि हाच धर्म आहे नि हीच परंपरा आहे. हे फारच दुर्दैवी आहे. या प्रथा थांबवून बंद करण्याची गरज आहे. तुम्ही लोकांना समजावून, शिकवून  प्राणी बळी द्यायची पद्धत बंद केली पाहिजे.
पौराणिक ग्रंथ तर असे म्हणतात कि माणसातील पशुता घालविली पाहिजे. तुमच्यातील आळस घालविला पाहिजे. तुम्हाला असे माहित असेल कि अनेक संस्कृत शब्दांना दोन वेगळे अर्थ असतात. उदाहरणार्थ महिष या शब्दाचा अर्थ नुसता  म्हैस नसून दुसरा अर्थ आळस आहे. म्हशीला म्हैस म्हणतात, कारण ती आळशी आहे. तुम्ही जर गाडीचा हॉर्न वाजवला किंवा तिला काठीने  मारले  तरी ती जागची हालत नाही , खाली उतरून हातानी ढकलले तरच ती हलेल.
गाई या संवेदनशील  असतात तशा म्हशी नसतात.म्हणून म्हशीला महिष म्हणतात.तुम्ही तुमच्यातील महिषाचा  म्हणजेच आळसाचा नाश केला पाहिजे.
त्याचप्रमाणे "अज" म्हणजे नुसती शेळी नव्हे.त्याचा दुसरा अर्थ असा आहे कि जो काल किंवा उद्या जन्मलेला नाही."ज" म्हणजे जन्मलेला.तर या साऱ्यांचे  गर्भित असे अर्थ आहेत.
साधारणपणे गौ चा अर्थ गाय असा होतो.हा शब्द गौ या संस्कृत मुळापासून तयार होतो.आणि गौ चा अर्थ ज्ञान, प्रगती आणि प्राप्ती असा पण होतो. गौ चे चार अर्थ होतात ते असे ज्ञान, गमन, प्राप्ती, आणि मोक्ष. पण दुर्दैवाने या साऱ्या अर्थांचा  अनर्थ झाला आहे.

प्रश्न: जय गुरुदेवअसे म्हंटले जाते कि "जेंव्हा तुम्ही कोणताही उद्देश न ठेवता कोणतेही काम करता तेंव्हा ते उत्तम होते." मला याचा अर्थ समजला नाही.
श्री श्री:    होय यालाच अंतर्ज्ञान किंवा उत्स्फूर्त  विचार म्हणतात.अंतर्ज्ञानात तुम्ही बसून आणि ठरवून काही करीत नाही. जे काही कारण नसताना सहज प्राप्त होते ते अंतर्ज्ञान.
तुमच्या लक्षात आलेजेंव्हा अर्चीमिडीस खूप विचार करीत बसला होता, तेंव्हा त्याला फारसे काही सुचले नाही.पण जेंव्हा तो आराम करू लागला, तेंव्हा उस्फुर्तपणे त्याला ‘अर्चीमिडीस चा सिद्धांत’ सुचला. त्याच प्रमाणे अनेक शास्त्रज्ञांना त्यांच्या या सहाव्या ज्ञान चक्षुंनी शोध लावायला मदत केली आहे. त्यालाच अंतर्ज्ञान म्हणतात, पण ते फुलवायची, वाढवायची  गरज असते.म्हणून तुमच्या पंचेन्द्रीयांवर किंवा बुद्धीवर फार अवलंबून राहू नका. उस्फुर्त विचार क्षमता हि पण फार जरुरी आहे. अंतर्ज्ञान हे सत्य आणि वास्तवता या दोन्हीच्या खूप जवळ आणि खोलवर आहे. त्याशिवाय तुमचे अंदाज चुकू शकतात. तुमच्यापैकी किती लोकांचे अंदाज चुकतात? तुम्ही लोकांचा काही अंदाज बांधता आणि काही वेळानंतर असे वाटते, हे दिसते तसे नाहीये. मला जसे वाटले,  त्यापेक्षा प्रत्यक्षात काही वेगळेच आहे. होय कि नाही?
म्हणूनच उस्फूर्त पणे येणारे विचार हे आतून खूप खोलवरून येणारे असतात....जर ते अंतर्ज्ञान असेल आणि जर खरोखरच आले तर!

प्रश्न:प्रिय गुरुजी, एखाद्या माणसाने यश मिळविण्यासाठी किती काळ प्रयत्न करायला पाहिजे. जर दहा वर्ष प्रयत्न करून पण यश मिळाले नाही तर त्यांनी काय करावे?
श्री श्री: होय अशा वेळी तुम्ही तुमची पद्धत्ती बदलायला पाहिजे. जर तुमच्यात शक्ती असेल तर अजून काही काळ, जितके शक्य होईल तेवढे प्रयत्न करायला पाहिजेत. तुमची सर्व शक्ती एकवटून प्रयत्न करा आणि जर तरी तुम्हाला यश आले नाही तर "हारे को हरी नाम " या उक्ती प्रमाणे मिळणारे फळ मान्य करून पुढे चला आणि निवांत रहा.
एखादा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी प्रयत्न तर जरुरी असतात, पण त्याचबरोबर शक्ती वाढविण्याची गरज असते.
पण असे लक्षात घ्या कि ते काम झाल्यानंतर जे समाधान मिळते ते, ते काम करण्याच्या इच्छेआधी पण तेथे असते.समजा कि काही संकल्प हा तुम्ही दहा वर्षांपूर्वी सोडलात, त्याआधी तुम्ही समाधानी होतात आणि तो संकल्प पूर्ण झाल्यावर पण समाधानी आहात हे लक्षात असूद्यात.आपण आपले संकल्प किंवा मनातील इच्छा पूर्ण झाल्या तरच सुखी होतो असे नाही.
हे लक्षात आले, तर आपल्यातील  एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी असलेली अस्वस्थता निघून जाईल.आणि मग जे व्हायचे ते होईल. त्याचा अर्थ आपण काम किंवा परिश्रम करायचे नाहीत असा नाही. माणसाने आपापले काम आणि परिश्रम करून मगच  विश्रांती घ्यावी.


The Art of living
© The Art of Living Foundation