कृष्ण म्हणजे ‘जो सगळ्यात मनमोहक’ आहे तो !
९ डिसेंबर २०११
प्रश्न: प्रिय गुरुजी, कृपया मला सांगाल का कि मोक्ष का मिळवायला हवा?
श्री श्री: मुक्त होणे हि प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती आहे. मुक्ती म्हणजे ऐषाराम नव्हे तर एक गरज आहे. मनुष्यालाच नव्हे तर प्राण्यांना पण मुक्ती हवी असते. लहान मुलांना स्वतंत्रता हवी असते. एका लहान बाळाच्या गळ्याभवती एक स्कार्फ बांधला तर त्याला तो काढावासा वाटतो. त्या बाळाच्या गळ्याभवती चेन बांधली तर त्याला ती ओढावीशी वाटते. मोठ्यांना बाळांच्या गळयाभवती दागिने घालावेसे वाटतात पण लहान मुलांना कोणतीही बंधनं नको असतात, म्हणूनच ते हात पाय हलवून स्वतंत्र होऊ इच्छितात.
मुक्ती हि मनुष्यांना आणि प्राण्यांना उपजत असते. प्रत्येक जीवाला मुक्ती हवी असती आणि मुक्ती म्हणजेच स्वतंत्रता. एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखणं कठीण जाते, आणि तुम्हाला श्वास सोडावासा वाटतो. श्वास सोडल्यावर जे वाटते तेच स्वातंत्र्य किंवा मुक्ती.जरी सगळ्या मनुष्यांना उपजतच स्वतंत्र्य
असले तरी दैनंदिन गोष्टींमध्ये मन भरकटल्याने, मनाला मुक्ती चा विसर पडतो. जशी एखाद्यला झोप हवी असते, पण तो झोपणे विसरला असतो.
प्रत्येक जीवाला मुक्ती हवी आहे. असं शक्यच नाही कि कोणाला मुक्ती नकोय. मुक्ती म्हणजे प्रसंग आणि परिस्थिती पासून पळून जाणे नव्हे. कधी कधी कठीण प्रसंग आल्यावर आपण पळून जातो आणि त्या पासून मुक्त झालो असं वाटून घेतो, पण असं नसतं. मुक्ती म्हणजे विविध प्रसंग, लोक आणि परिस्थिती मध्ये सुद्धा मनाचा तोल न ढळू देणे. मुक्ती म्हणजे भावनांच्या जाळ्यातून सुटका; मुक्ती म्हणजे विचारांच्या जंगलातून सुटका; मुक्ती म्हणजे डोक्यात असलेल्या सगळ्या गुंतागुती पासून सुटका आणि भीती व चिंते पासून स्वतंत्रता.
जे काही तुम्हाला संकुचित बनवते त्या पासून स्वतंत्रता म्हणजेच मुक्ती. मुक्ती हि भक्ती च्या आधी येते. तुम्ही स्वतंत्र असल्या शिवाय तुमच्यातून प्रेमाचा झरा वाहूच शकत नाही आणि मगच भक्ती जागृत होते. जर तुम्ही स्वत:ला बंधनात समजाल तर मग तुम्ही कृतज्ञ होऊ शकणार नाही. जर कोणी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही कृतज्ञ व्हाल. "मी मुक्त आहे, मी आनंदी आहे!" जो आनंदी आणि समतोल आहे तोच कृतज्ञतेचा अनुभव
करू शकतो किंवा प्रेमामध्ये ओथंबून भिजू शकतो.
मग प्रेम हे बंधनकारक नाही का? हा पुढचा प्रश्न.
होय. पण हे बंधन एका वेगळ्या प्रकारचं आहे. प्रेम हे बंधन आहे पण ते तुम्हाला
अनंताशी बांधून टाकते. प्रेमाच बंधन हे सर्वात शेवटचे आहे आणि ते ज्ञानाच्या
अनुभवाने सुसह्य होत जाते. कुठे तरी बांधील होणे हि आपली प्रवृत्ती आहे. भावना कुठे तरी गुंतावाव्यात हि पण प्रवृत्ती असते. म्हणून हे बंधन
लहानसहान वस्तूं पासून सुटून मोठ्या गोष्टी कडे जाते आणि मग ते नाहीसे होऊन
जाते.
वेदां मध्ये एक उदाहरण आहे, तुरटीच. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीची गरज लागते. तुरटी पाणी स्वच्छ करते आणि मग पाण्यात विरघळते. म्हणूनच देवाला आपण मनमोहना असं म्हणतो. क्षुद्र आकर्षणा पासून देव आपले लक्ष्य त्याच्याकडे घेऊन जातो.
मनाची स्थिरता आणि ध्यानचं आकर्षण हे लहान गोष्टींच्या आकर्षणा पासून सुटका करतं. मद्या पेक्षा ध्यानचं आकर्षण जास्त असणं जरूरी आहे नाहीतर मद्याच्या आकर्षणा पासून बाहेर येणं कठीण आहे. जर अमली पदार्थ तुम्हाला आनंद देतात तर मनाची शांतता तुम्हाला त्या आनंदा पेक्षा जास्त आनंद देणारी हवी. तेव्हाच लोक अमली पदार्थांच्या जाळ्यातून साधने कडे येउ शकतात. म्हणूनच देव हा सगळ्यात आकर्षक आहे.
तुम्हाला कृष्ण म्हणजे काय माहिती आहे?
'कार्शियाती आकार्शियाती कृष्ण'
जो सगळ्यांना आणि सगळ्या वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करतो तोच कृष्ण.
कृष्ण म्हणजेच सगळ्यात मनमोहक. ज्याला विरोध करता येणा शक्य नाही असं आकर्षण ! संपूर्ण भागवत मध्ये कृष्ण कसा आणि किती मनमोहक आहे ह्याचं वर्णन आहे. कृष्ण जेव्हा रथातून निघायचे तेव्हा सगळे पुतळ्यांच्या सारखे त्यांना पाहत राहायचे. रथ गेल्यानंतर सुद्धा लोक त्यांचे डोळे उघडे ठेवायचे आणि मग कोणी तरी विचारायचे "कोणाकडे बघताय?"
गोपी म्हणायच्या कृष्ण तर गेला पण आमची दृष्टी आणि ध्यान सुद्धा घेवून गेला.
ह्यालाच दृश्य आणि दृष्टा एकरूप होणे म्हणतात. श्रीमद भागवत मध्ये अशा खूप कथा आहेत. एक गोपी एकदा साजशृंगार करीत होत. एका डोळ्याचा साज करून झाला
होता आणि तिने ऐकले कि कृष्ण येत आहे, ती सगळं काही सोडून कृष्णाची एक झलक पाहायला रस्त्या कडे पाळली.
देवाच्या मनमोहक स्वरूपाच्या अनेक कहाण्या आहेत. म्हणूनच लहान आकर्षणा पासून मन स्वतंत्रत होतं आणि म्हणूनच देवाला आपण मोहना म्हणतो. मोहना म्हणजे जो प्रत्येक हृदयाला आकर्षित, प्रफुल्लीत करतो.
म्हणून प्रेम आणि ज्ञानाचे बंधन हे सुखाच्या बंधन पेक्षा जास्त आहे. सुख मिळण्यासाठी बरेचदा दुख: पण वाट्याला येतात. पण प्रेम हे अनंत आहे आणि प्रेमामुळेच दैवी आनंदामध्ये धुंध होता येतं. त्याबरोबर ज्ञान आपल्या जीवनात एक स्थिरता आणतं.
जीवनात भावनांना महत्त्व आहे आणि त्या शिवाय जीवन रुक्ष होऊन जाईल. भावना हि क्षणिक किंवा सदैव असू शकते पण आनंद, सत्चिदानंद हा
सदैव असतो.
प्रश्न: गुरुजी, ज्ञानामध्ये उन्नती होते एक प्रयत्न आहे कि फक्त कृपा?
श्री श्री: ज्ञान नैसर्गिक आहे.
त्या साठी आपण काही करू शकत नाही. त्याला फक्त आपण ओळखणे गरजेचे आहे. आणि जेव्हा ते येईल तेव्हा त्याला दूर करू नका (त्याकडे दुर्लक्ष करू नका). फक्त इतकेच करण्याची गरज आहे. म्हणूनच 'प्रत्याभिज्ना ह्रीदायाम' असे म्हणतात म्हजेच हृदयाचे प्रतीबोधन.
प्रश्न: गुरुजी, संध्याकाळी 'संध्या वंदन' करताना सूर्य पश्चिमेला असतो, मग जप करताना आपण उत्तरेकडे का पाहतो?
श्री श्री: सुर्यास्ता नंतर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्ये सगळ्यात जास्त शक्ती असते.जो पर्यंत सूर्य असतो तोपर्यंत शक्ती सुर्याच्या दिशेने असते. पण सूर्यास्तानंतर उत्तर आणि दक्षिण ध्रुवा मध्ये जास्त शक्ती असते. म्हणून 'संध्या वंदन' सूर्याकडे पूर्वेला बघून केले जाते, आणि सूर्य मावळल्या मुळे उत्तरे कडे बघितलं जातं. मागच्या पिढीतली लोकं सगळे काही शास्त्रशुद्ध पद्धतीने करायची.
ह्या गोष्टींच्याकडे
इतके लक्ष्य नका देऊ.
जर तुम्ही नॉर्वे मध्ये असाल जिथे २ महिने सूर्य मावळत नाही तिथे कोणत्या दिशेला तोंड कराल?
'दैवं सर्वतो मुखं', देव सगळीकडे आहे आणि तुम्ही कुठे हि बसू शकता आणि कोणत्याही दिशेला बसून प्रार्थना किंवा ध्यान करू शकता. हि शास्त्रीय उत्तरे उष्ण देशां साठी बरी आहेत. जर ऋषींनी धृवांचा विचार केला असता तर मग दक्षिणे बघून प्रार्थना आणि ध्यान करा असं म्हणाले असते.
तसेच 'वास्तुशास्त्र' भारतासाठी उपयुक्त असू शकतं पण रशिया साठी नाही. ह्या शास्त्रीय गोष्टीं मध्ये जागे नुसार सुधार करणे गरजेचे आहे. भारता मध्ये त्या काळी घरांचं मुख्य द्वार दक्षिणे कडे ठेवत नसत, कारण त्या काळी नगरांची रचना करत असताना स्मशानाची भूमी शहराच्या दक्षिणे कडे होती. आणि त्या दिशेने वायू घरात आल्याने वास्तू मध्ये बदल केले गेले.
पण रशिया आणि उत्तर ध्रुव कडील देशां मध्ये सूर्य दक्षिणे कडे जास्त प्रखर असल्यामुळे, उपयुक्त वायू दक्षिणे कडून वाहतो म्हणून घर दक्षिणे कडे उघडतात. जर दक्षिणे कडे घराचा मुख्य दरवाजा असेल तर संपूर्ण वर्ष चांगला उजेड घरात येईल. त्या मुळे 'वास्तुशास्त्र' मध्ये गरजेचे बदल नाही केले तर चालणार नाही. खूप लोकांना हे माहित नाहीये. ते खोलात शिरून विचार करत नाहीत. ते 'लकीर का फकीर' असे म्हणवले जातात. म्हणजेच जो विचार न करता पालन करतो .
प्रश्न: गुरुजी, जेव्हा मला 'हे करायचं' पासून 'हे करावं लागणार' असं होतं, तेव्हा कृती करणे कठीण होते अश्या ठिकाणी काय करावं?
श्री श्री: जर तुम्हाला त्या कामाची बांधिलकी असेल तर ते काम तुम्ही करायलाच हवं. मग तर तुम्ही कोणतेच काम करू शकणार नाही कारण मन हे मनुष्याचा सगळ्यात बेभारवश्याचा मित्र आहे. मन आता काही म्हणेल आणि थोड्या वेळाने काही वेगळं. मित्रावर विश्वास ठेवणे सोपे आहे पण मनावर नाही.
तुम्ही जर ठरवलंत 'मला हे काम पूर्ण करायचा आहे मी हे केलंच पाहिजे', तरच जीवन बरोबर दिशेने पुढे जाईल. जर तुम्ही मनाच्या भरवश्यावर राहाल तर कुठेच पोचू शकणार नाही. डॉक्टर होण्या साठी वैद्यकीय कॉलेज मध्ये भरती व्हाल आणि मग २ वर्षांनंतर पुढे अभ्यास करायचा नाही असे वाटू लागले तर निश्चय करा कि 'मी हे पूर्ण करणारच!'. तुम्ही ते पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर एक वर्ष वैद्यकीय, एक अभियांत्रिकी, एक वकिली, एक रसायनशास्त्र करता करता कुठेच पोचता येणार नाही. तुम्ही जर मनाला वाटेल तसं वागला तर एक इंजिनेर, डॉक्टर किंवा वकील काहीच बनू शकणार नाही.
एखद्या गोष्टीला बांधील असणे गरजेचे आहे.
अडवान्स कोर्स करताना पहिला दिवस आवडतो पण पुढील दिवशी तुम्ही म्हणता.
"देवा! हे किती कंटाळवाणं आहे. कोणाला माहित करून घ्यायचे आहे, कि काय आहे हे रिकामे आणि पोकळ. गतिमान ध्यानामुळे मी स्वताला कशाला त्रास करून घेवू? तिथून निघून जाण्याची तुमची इच्छा असते. पण तुम्ही जर बांधील असाल तर ती पूर्ण कराल.
पण जर तुम्हाला आपलं काम पूर्ण करायला अशक्य होत असेल तर मग १००% दिल्यावर सोडून द्यावं. जर तुमची बांधिलकी तुम्हाला कुठेही नेत नसेल आणि तुम्ही ती अनभिज्ञ पणे केली असेल आणि जर फार त्रास होत असेल तर तुम्ही १००% देऊन झाले कि पुढे चला. हि बांधिलकी ला सोडून नवीन बांधिलकी करा.
प्रश्न: गुरुजी, जर 'विरोधी वस्तू पूरक असतात', तर चांगल्या वेळी आनंदी कसं राहायचा जेव्हा माहिती आहे कि ह्या नंतर दुख: मिळणर आहे?
श्री श्री: हिंदी मध्ये २ ओळी आहेत.
'दुख मे सुमिरन सब करे सुख मे करे न कोई,
सुख मे जो सुमिरन करेय दुख काहे को होई'
जेव्हा दुख: असतं तेव्हा सगळेच प्रार्थना करतात. सगळे दरवाजे बंद झाल्यावर सगळे देवाकडे प्रार्थना करतात. पण जे आनंदात प्रार्थना करतात, त्यांच्या वर दुख: कशी काय येतील?
योगाचे ध्येय हे दुख: हरणे आहे. 'हेयं दुखं अनागतम'. महर्षी पतंजली योग सूत्रांमध्ये मध्ये म्हणतात कि योग चा ध्येय जीवनातून दुख: नाहीसे करणे आहे. योग म्हणजे फक्त आसनं नसून ध्यान पण आहे.
म्हणूनच जेव्हा तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ असाल तेव्हा सेवा करावी. आणि जेव्हा दुख: असेल तेव्हा समर्पण करा. पण नेमकं उलट होतं. जेव्हा दुख: असतं तेव्हा समर्पण होत नाही आणि आनंदी असतं तेव्हा सेवा करता येत नाही. म्हणूनच मनुष्य दुखी: होतात. दुखी: माणसाने समर्पण करणे फार महत्त्वाचे आहे. दुख: आहे कारण समर्पण झालं नाहीये.
म्हणून दुख: सोडून द्या आणि आनंदात सेवा करा. जेव्हा आनंदी असाल तेव्हा आनंदात हुरळून जाऊ नका, सेवा करा म्हणजेच प्रार्थना होईल.
प्रश्न: गुरुजी, मे मागच्या एकावर्षा पासून नियमित पणे क्रिया करतोय. किती टक्क्या पर्यंत माझे पूर्व कर्म मी भरून काढले आहेत?
श्री श्री: ह्याचे उत्तर मी तेव्हा देईन, जेव्हा तुम्ही मला तुमच्या डोक्यावर किती केस आहेत ह्याचं अचूक उत्तर द्याल. जोवर केस आहेत आणि कंगवा आहे तोवर काम झालं !
कर्म हे अनाकलनीय आहे. किती कर्म आहे ह्याचे उत्तर कोणालाच माहित नाही आणि दररोज नवीन कर्म बनतात. वैयक्तिक कर्म, कौटुंबीक कर्म, सांघिक कर्म. डॉक्टर आजकाल 'फॅमिली हिस्टरी' असं म्हणतात मागच्या काळात त्यालाच ' कौटुंबीक कर्म' म्हणायचे.
अशी अनेक प्रकारचे कर्म आहेत आणि हि कर्म दररोज साधना केल्या मुळे कमी होतात. वाईट कर्म कमी होतात आणि चांगली कर्म वाढतात. जेव्हा तुम्ही चांगली कामे करता तेव्हा एक भाग तुमच्या जवळच्या लोकांना हि जातो. तुमचे मित्र, नातेवाईक, कुटुंब ह्यांना जातो. कर्मा बद्दल जाणणे हे खूपच उत्कंठावर्धक आहे कारण ते किती अनाकलनीय आहे. त्याच्या खोलीला सीमा नाहीये. जस कोणी महासागराची खोली मोजेल तशीच कर्माची सीमा नाहीये. जेव्हा तुम्ही आधीच बोटीत बसला आहात, तेंव्हा खोली मोजून काय उपयोग. ज्ञान आणि भक्ती ह्याच तुम्हाला कर्माच्या समुद्रात बोट बनून तारून नेतील . त्याची खोली जाणण्याची गरज नाहीये. तुम्ही पाण्यावर पोहणार किंवा चालणार नाही आहात.
प्रश्न: गुरुजी, सर्वत्र आठवड्यात ७ दिवस आणि वर्षात १२ महिनेच का असतात?
श्री श्री: हे वैदिक काळात सुरु झाला होतं.
'०', '७ दिवस', '१२ महिने' हे आधी भारतात सुरु झाला होता. इथून ते इजीप्त मध्ये गेले आणि तिथून सर्वत्र गेले. भारतात ७ महत्त्वाचे ग्रह आहेत. जरी ९ ग्रह असले तरी २ ग्रह चंद्राच्या सावलीतून आले आहेत आणि अस्तित्वात नाहीयेत.
म्हणून प्रत्येक ग्रहासाठी एक दिवस दिला गेला होता. सावट असलेल्य ग्रहासाठी दररोज दीड तास दिला गेला होता आणि ते गणित वैश्विक कॅलेंडर मध्ये बरोबर बसलं. म्हणूनच राहू काल आणि गुलिक काळ आले. लहान प्रवृत्ती पासून मोठ्या ब्रह्मांड यांच्या मध्ये एक अनुबंध जोडला गेला. आणि मग पृथ्वी सूर्या भवती जी एक प्रदक्षिणा पूर्ण करते , तिला मग १२ महिन्यान मध्ये विभागाल गेलं.
हे सगळे ३०-४० हजार वर्षां पूर्वी झाले किंवा जास्तच. कोणालाच माहित नाहीये.
प्रश्न: गुरुजी, रामाचे गुरु वशिष्ट आणि कृष्णा चे सांदिपनी तुमचे गुरु कोण आहेत?
श्री श्री: माझे गुरु ११३-११४ वर्षांचे आहेत. सांदिपनी आणि इतर गुरु आजहि सर्व व्यापी गुरु तत्वांमध्ये उपस्थित आहेत. आदी शंकराचार्य हे त्या गुरु परंपरेचे आहेत. माझ्या लहान पणी खूप संत लोकां बरोबर मी सत्संग करायचो. महर्षी महेश योगी, शंकराचार्य, स्वामी शरण आनंदजी, इतर संत होते. माझं लहान पण या मोठ्या आदरणीय लोकांच्या सानिध्यात गेले.
प्रश्न: प्रिय गुरुजी, मी नियमित पणे सेवा, सत्संग आणि साधना करतो. सकाळी उठल्यावर मी ठरवतो कि मी तुमच्या मागे नाही धावणार, पण प्रण मोडून मी तुमच्या मागे पळायला लागतो. हा एक प्रण तोडला तर चालेल का गुरुजी?
श्री श्री: तुम्ही माझ्या मागे पळायला काही हरकत नाही, पण तुम्ही मला पकडूच शकणार नाही.

© The Art of Living Foundation