समर्पित वृत्तीशिवाय जीवनात स्थैर्य, आनंद आणि उत्कर्ष होऊ शकत नाही !
७ डिसेंबर २०११
प्रश्न: गुरुजी, शिव सूत्रामध्ये तुम्ही सांगितले आहे कि ज्ञानं बंधनं'.मी गोंधळून गेलो आहे कि ज्ञान आपल्याला मुक्ती देते का बंधनात अडकवते?
श्री श्री : ध्यानात असताना जेंव्हा तुम्हाला  तुमचे शरीर आणि आजूबाजूच्या वातावरणाची ज जाणीव होऊ लागते, तेंव्हा तुमचे सीमित चित्त मर्यादित अशा गोष्टी समजू लागते. एका वेळेस तुम्ही फक्त इतिहास किंवा गणित किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रच जाणून घेऊ शकता.एका वेळेस फक्त एकाच गोष्ट तुम्हाला समजू शकते. एका विशिष्ट गोष्टीचे ज्ञान तुम्हाला विशालतेपासून  दूर करून मर्यादित कक्षेमध्ये बांधून टाकते. असे सीमित करणारे ज्ञान हे बंधन आहे.

प्रश्न: तुमचे हेतू आणि कृती शुद्ध असूनही जेंव्हा तुम्हाला विरुद्ध समजले जाते आणि दोषारोप केले जातात, तेंवा आम्ही काय करावे?
श्री श्री : स्मितहास्य करून सोडून द्या. दुसऱ्यांच्या आरोपाची चिंता करू नका. पण म्हणून गप्पहि  राहू नका. त्यांना योग्य ती शिकवण देऊन नंतर दुर्लक्ष करा.

प्रश्न: गुरुजी, पार्ट- २ कोर्स हा मस्तकाकडून हृदयापर्यंतचा प्रवास आहे. तर अध्यात्मामध्ये तर्काचे काय स्थान आहे ?
श्री श्री : तर्काचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तर्कच तुम्हाला अध्यात्मापर्यंत घेऊन येतो. तर्कामुळेच तुम्ही समजू शकता कि जीवन काय आहे, हे जग काय आहे आणि तुम्ही कसे वेळ वाया घालवत आहात. हे सर्वकाही तर्कामुळेच शक्य होते. आणि तार्किक बुद्धीच तुम्हाला सांगते कि " नाही, मी वेळ वाया घालवायला नको. आयुष्य छोटे आहे आणि सर्व काही क्षणभंगुर आहे '. भूतकाळाबद्दल चिंता करून किंवा भविष्यकाळाचे मनसुबे रचून काहीच उपयोग नाही... हा तर्क आहे. तर्क हि अध्यात्माची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच तो महत्त्वाचा आहे. पण ही फक्त पायरीच आहे. तुम्ही पायरीवरच झोपू शकत नाही. तुम्हाला घरात जायचे आहे. म्हणूनच ही घरात जाण्याची पहिली पायरी आहे.

प्रश्न: गरुजी, तुम्ही सांगितले आहे कि सवयी सोडून द्यायच्या असतील तर प्रतिज्ञा करावी लागेल. ही प्रतिज्ञा काय आहे?
श्री श्री : तुम्हाला  जर काही वाईट सवयी असतील, तर तुम्ही प्रतिज्ञा करू शकता. तुम्हाला जर नकारात्मक बोलायची सवय असेल, तर तर  ठरवा कि ' आज मी अजिबात नकारात्मक बोलणार नाही आणि मी कोणाचीही तक्रार करणार नाही' . अशा दिशेने पाउल उचलल्याने खूप फरक पडतो. तुम्हाला जर जास्त खाण्याची सवय असेल, तर तुम्ही निश्चय करा कि ' ठीक आहे, मी एक आठवडा गरजेपेक्षा जास्त खाणार नाही. मी फक्त थोडेच खाईन.' हिलाच प्रतिज्ञा म्हणतात.
प्रश्न: जेंव्हा गोष्टी ' मला करायचे आहे' पासून ' मला करावे लागणार आहे' पर्यंत बदलतात, तेंव्हा काम करणे अवघड होऊन जाते. अशा परिस्थितीत काय करावे? जेंव्हा मी सेवा करतो तेंव्हा मला अशा स्थितीचा सामना करावा लागतो.
श्री श्री : समर्पित वृत्तीची गरज आहे. त्याशिवाय जीवनात स्थैर्यआनंद आणि उत्कर्ष होणार नाही. तुम्ही जर एखादा करार केला असेल, जबाबदारी घेतली असेल तर ती पूर्ण केली पाहिजे.


  
 The Art of living

© The Art of Living Foundation