आपण नेहमी ईश्र्वरप्राप्ती हे लक्ष्य ठेवले पाहिजे !
२१ डिसेंबर २०११

मणिपूर हून दोन शिक्षक येथे आले आहेत. त्यांनी खूप काम केलं आहे आणि ५००
अतिरेक्यांच जीवन बदलले आहे. बंगलोर इतके वाढले आहे कि शहराच्या एका
टोकापासून दुसरया टोकापर्यंत जायला काही तास लागतात. खूप लोकांचा वेळ हा
शहराच्या दूर ठिकाणापासून आश्रममध्ये येण्यापर्यंत प्रवास करण्यामध्ये
जातो. मला असे वाटते कि, आपण शहराच्या इतर भागामध्ये सत्संग केले तर खूप
लोकांना ते उपयोगी होईल. आमच्या सत्संगमध्ये एक नियम आहे. तुम्ही तुमच्या
सर्व चिंता इथे घेऊन या, पण येथून जाताना त्या परत घेउन जाऊ नका.
तुमच्या वैयक्तिक चिंता येथे ठेऊन जा. त्या ऐवजी देशाची काळजी करा.
निसर्गाचा असा नियम आहे. तुम्ही जर मोठी जबाबदारी घेतलीत तर तुमच्या
सर्व गरजा आपोआपच पूर्ण होतील. तुम्ही जर स्वत्तःचाच विचार करीत
बसलात तर, तुम्ही प्रगती करू शकणार नाही.

संस्कृत मध्ये एक म्हण आहे, जे लहान असते त्यामध्ये आनंद नसतो. आनंद हा
नेहमी जे मोठे आणि व्याप्त असते त्यामध्ये असतो. जीवन हे आनंदाच्या शोधात
नेहमी वाहत असते आणि सर्वात सर्वोच्च आनंद म्हणजे ईश्र्वरप्राप्ती. आपण
नेहमी ईश्र्वरप्राप्ती करून घेणे हे ध्येय ठेवले पाहिजे. तुम्ही
तूमचे ध्येय सर्वोच्च प्राप्प्तीकरता ठरविले असेल, तर लहानसहान इच्छा किवा
कामना अश्याच पूर्ण होऊन जातात. जर तहान लागली असेल तर तुम्हाला
नक्की पाणी मिळेल.जर तहानच लागली नसेल तर पाण्यासाठी खटाटोप करणार
नाही. त्याचप्रमाणे ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्येकामध्ये अशी जर तहान असायला हवी,
परमसत्य जाणून घेण्याकरता, जीवन म्हणजे काय हे जाणून घेण्याकरता, आपण कोण
आहोत हे जाणून घेण्यासाठी. तुम्ही जेव्हा गुरूंकडे येता, तेव्हा तुम्हाला
काहीतरी द्यावे लागते. तुम्ही माझ्यासाठी फुले, माळा, हार, आणि शाल घेऊन
येऊ नका. तुम्ही तुमच्या सर्व चिंता मला द्या. तुम्ही जेव्हा परत सुखाने
आणि समाधानाने जाल तीच माझ्यासाठी गुरु दक्षिणा आहे.

मी प्रसाद म्हणून गोड, फळे आणि फुले देत नाही. मी प्रसाद म्हणून मन शांत
आणि प्रसन्न कसे राखायचे याचे ज्ञान देतो. जर लोक आपल्याच विवंचनेमध्ये,
काळजीत अडकून राहिले असतील तर ते समाजासाठी काही करू शकणार नाहीत.
कन्नड मध्ये एक म्हण आहे,’'लोणी आपल्या हातात घेऊन, आपल्याकडे तूप नाही म्हणून खंत करायची.’ हेच आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत.
आपल्या मनामध्ये प्रचंड संकल्प शक्ती (चांगल्या हेतून काम करण्याच
बळ) आहे. पण, आपण त्याकडे कधीच पहिले नाही. आपण ध्यानामध्ये थोडा वेळ
घालवावा, असा विचार कधीच करत नाही. आपण सतत जीवनामध्ये रडत असतो. मी दहा
वर्षाचा असताना, राज्यपालांनी माझ्या वडिलांना एका समारंभाकरिता
त्यांच्या घरी बोलाविले होते. माझे वडील मला म्हणाले कि तू माझ्यासोबत ये
म्हणून. पण मी त्यांना म्हणालो, कि ‘त्यांनी आमंत्रण दिले तरच मी येईन.’
मला तिथे जायचे टाळायचे होते. माझे वडील एकटे गेले.
चार वर्षानंतर, त्याच राज्यपालांनी मला आमंत्रण दिले. त्यांना कोणीतरी
सांगितले कि ’एक तरुण मुलगा आहे तो ध्यान खूप छान शिकवतो म्हणून’. हे पाहून
माझे वडील आश्चर्यचकीत झाले.
मी हे उदाहरण का देतो आहे कारण कि मला सर्व तरुणांना सांगायचे आहे कि
मोठे स्वप्न पहा आणि जीवनाकडे व्यापक दृष्टीकोनातून पहा. मी लायन क्लब
आणि रोटरी क्लब याकडे पाहून, मी म्हणायाचो कि, ‘सर्व लोकांना घेवून
बंगलोर  मध्ये एक समूह बनवीन आणि सर्व जगामध्ये जाईन’. जे लोक हे ऐकायचे
त्यांना हे पोर काय निरर्थक बडबड करतो असे वाटायचे आणि दुर्लक्ष करायचे.

परत, हे उदाहरण द्यायचे कारण असे कि, आपले मन निर्मळ आणि स्व:छ असेल, तर
आपले हेतू लवकर साधतात. आपल्या देशामध्ये एक प्रथा आहे, जेव्हा एखादा
मंगलदायक सोहळा असतो, तेव्हा आपण सर्व थोरांचे आशीर्वाद घेतो. आमंत्रण
पत्रिके मध्ये आपण घरातील थोरांचे नाव घालतो.
तुम्हाला माहित आहे असे का करतो ते ?

आपण जसे मोठे आणि परिपक्व होत जातो, आपण समाधानी आणि संतुष्ट असतो.
जेव्हा समाधानी आणि संतुष्ट व्यक्ती आशीर्वाद देतात, तेव्हा ते खरे होतात.

पण, आताच्या दिवसात लोक जसजसे मोठे होत आहेत ते खूप तणावग्रस्त बनत आहेत.
तुम्हाला जेव्हा असे वाटेल कि आता आपल्याला काहीही नको, तेव्हा तुमच्या
अंगी, दुसर्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याची पात्रता  प्राप्त
होते. तुम्ही उत्तर ध्रुवावर गेलात, तर तेथे २ महिने सतत काळोख असतो.
सूर्य २ महिने तेथे उगवत नाही. मी तेथे एकदा २० नोव्हेंबर दरम्यान
गेलो होतो, आणि मी त्यांना विचारले कि ‘सूर्य कधी उगवतो‘ म्हणून, त्यांनी
उत्तर दिले कि २० जानेवारी ला म्हणून.

तसेच सूर्य २ महिने अस्त सुद्धा होत नाही. अशा ठिकाणीसुद्धा, लोक
सुदर्शन क्रिया करीत आहेत. मी जेव्हा विमानतळावर उतरलो, तेव्हा १० माणसे
मला घ्यायला आली होती. मी तेथे एका विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी गेलो
होतो.ते ध्यान करत असलेले पाहून आणि ओम नमः शिवाय चा
जप करीत असलेले पाहून मी स्तिमित झालो. त्याचप्रमाणे, मी जेव्हा दक्षिण ध्रुवाच्या
शेवटच्या गावी गेलो, तेव्हा तेथे १००० लोक सत्संग मध्ये आले होते!


भारतामधील अध्यात्मिक ज्ञान हे सर्व जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले
आहे. हे सर्व एका जागृत संकल्पाद्वारे शक्य झाले आहे. हे तरुणांनासाठी एक
उदाहरण आहे. मोठं स्वप्न बघा! तुमच्यातल्या किती तरी लोकांना हे माहित
नाही कि पहिले विमान हे भारतामध्ये तयार केले गेले?
तुम्हाला माहिती आहे पहिले विमान कोणी तयार केले?
राईट बंधूनी नव्हे, तर सुब्राया शर्मा शास्त्री यांनी, ते अनेकल जिल्हा,
बंगलोर येथे होते.
एका पारशी गृहस्थांनी, त्यांचे नाव श्री नवरोजी, यांनी त्यांना पहिले
विमान करण्यामध्ये मदत केली. त्या दोघांनी मुंबईच्या चौपाटीवर १५
मिनिटांसाठी विमान उडविले, आणि ब्रिटीश लोकांनी त्यांना जेल मध्ये
डांबले. १५ वर्षानंतर, राईट बंधूनी त्यांचे विमान उडविले,
हे इंग्लंडच्या वर्तमान पत्रामध्ये छापून आले होते कि दोन भारतीयांनी
विमान उडविले म्हणून. आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे याची आपल्याला
कल्पना नाही.
तुम्ही संकल्प घ्या. जेव्हा  तुम्हाला  असे वाटेल कि आता आपल्याला काहीही
नको, तेव्हा तुमच्या अंगी, दुसर्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण होण्यासाठी,
त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सर्मथता प्राप्त होते. मोठ्या आव्हानांचा
विचार करा.
मला सर्व तरुणांना आणि मोठ्या लोकांना एकत्र येउन आपल्या देशासाठी,
आपल्या समाजासाठी काही चांगले काम केलेले पाहायचे आहे. तुमच्यामधील किती
तरुण या कामासाठी तयार आहेत, एक वर्ष तरी तुमच्या आयुष्यातील या
कामानिमित्त द्या. एका वर्षासाठी, तुमच्याविषयी विचार करू नका, देशासाठी,
राज्यासाठी, आणि शहरांसाठी विचार करा.
सत्संग मुळे उत्साह आणि आनंद वाढतो, साधनेमुळे आंतरिक शक्ती वाढते आणि
सेवेमुळे तृप्ती मिळते. दर रविवारी २ तासासाठी तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी
काम करा. आपल्या समाजातील दोष दूर करण्यासाठी आपल्याला सर्वाना एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपण सर्वजण ईश्र्वरी सत्तेशी जोडलेले आहोत आणि ईश्र्वरी सत्ता प्रत्येकामध्ये वास करते.
आपल्याला अहिंसा आणि तणावमुक्त समाजासाठी महत्त्वकांक्षा बाळगली
पाहीजे. सर्व युवकानो, मोठे स्वप्न पहा, आणि ईश्र्वरी सत्तेपुढे अर्पण करा
आणि तुमची सर्व शक्ती पणाला लावून काम करा. दररोज ध्यान करा. ते तुम्हाला
मोठे आंतरिक बळ देईल. ते तुम्हाला चांगले शरीर, निर्मळ मन, सुधारित
सहजस्फुर्त बळ, तीव्र बुद्धी देईल आणि तुम्ही हातात जे काही काम घ्याल
त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल.

आणि सर्वात महत्त्वाचे, ते तुम्हाला तृप्ती देते. २८ डिसेंबर ला रशिया मध्ये
कोर्टाचा निकाल लागणार आहे भगवद गीतेवर निर्बंध घालण्यासाठी. रशियन
फेडरेशनने मला दोन  सन्मान दिले आहेत. मी म्हणालो, कि ‘जर तुम्ही
भारतीयांच्या ग्रंथांचा मान राखणार नसाल तर ते दोन्ही  सन्मान परत करून
टाकीन’, हे ग्रंन्थ भारतामध्ये ५००० वर्षांपासून आहेत, आणि तेव्हापासून ते
इथे सन्मानिले आहेत.  मी हे रशिया कडून मिळालेले सन्मान घेऊन काय करू.
मी त्यांना लगेच कळवून टाकले कि भगवद गीता कधीच अतिरेकी कारवायांना
प्रोत्साहन देत नाही म्हणून. ते फक्त शांतीच आणते.  हि असहिष्णुतेची
कल्पना कधीच खपवून घेतली जाणार नाही.

प्रश्न: .मी माझ्या जीवनामध्ये खूप भोगलं आहे, यावर उपाय काय आहे.?
श्री श्री: जीवन हे नदीसारखे आहे. इथे सुख आणि दु:ख दोन्ही
आहेत. जसजसा वेळ जाईल, मित्र हे शत्रू बनतील आणि शत्रू हे मित्र बनतील.
हे सर्व घडत राहील. दु:खी होऊ नका, कि तुम्हाला एवढ भोगायला लागल म्हणून,
जीवनात पुढे चालत राहा. तुमचे पाठीमागचे सर्व विसरून जा आणि पुढे चालत
राहा. ईश्वर सदैव तुमच्याबरोबर आहे.

प्रश्न: गुरुजी, तम्ही भारताच्या चांगल्या भवितव्यासाठी एक चांगला
राजकीय पक्ष काढणार का?
श्री श्री: एक धर्मप्रवर्तक कधीच राज्यकर्ता बनू शकत नाही आणि
राज्यकर्ता कधीच धर्मप्रवर्तक बनू शकत नाही.
पण मला राजकीय पक्षामध्ये चांगले लोक हवे आहेत. मी जर एखादा राजकीय
पक्ष काढला तर जगामधील सर्व चांगले लोक एका कोपऱ्यामध्ये येतील.ते
समाजाचे हित करणारे नाही. मला चांगले लोक सर्वत्र हवे आहेत. मला चांगले
आणि वाईट यामध्ये फरक करायचा नाहीये.
सर्व राजकीय पक्षामध्ये चांगले लोक आहेत आणि त्यांना संधी मिळाली पाहीजे.
चांगले लोक पुढे आले पाहिजेत आणि एकत्र येउन जोरानी काम केलं पाहीजे.

प्रश्न: गुरुजी, मी खूप लोकांना कोर्स करा म्हणून पाठीशी लागतो, पण, माझ्या
नवऱ्याला कोर्स करायचा नाहीये. मी काय करू
श्री श्री: तुझ्या नवऱ्याच्या मित्राला कोर्स करायला सांग आणि
मग तो तुझ्या नवरयाला कोर्स मध्ये घेऊन येईल. आंब्यावर दगड मारायचा
नसतो. त्याच्या देठावर मारला कि आंबा खाली पडतो. आडवळणाने डावपेच आखा.

प्रश्न: गुरुजी, तुमचे ध्येय काय आहे?
श्री  श्री: माझे ध्येय हे आहे कि तुझ्या चेहऱ्यावर मला सतत हास्य पाहायचं आहे. मला भक्तीने ओतप्रोत भरलेला, हिंसा नसलेला समाज बघायचा आहे..

प्रश्न: राष्ट्राची प्रगती हि अध्यात्मा बरोबर घडेल का?
श्री  श्री: जरूर, फक्त अध्यात्मामुळेच राष्ट्राची प्रगती होउ
शकते.  महात्मा गांधी हे खूप अध्यात्मिक व्यक्ती होते. ते दररोज
नियमितपणे भगवद गीता वाचत. माझ्या शिक्षकांनी महात्मा गांधीना भगवद गीता
शिकवली. ते अजूनही जिवंत आहेत आणि ते ११३ वर्षे वयाचे वृध्द आहेत.
गांधीजी दररोज नियमितपणे सत्संग करीत होते. त्यामुळेच ते चळवळ उभी करू
शकले. श्री अण्णा हजारे यांच्या उपवासाच्या दरम्यान आर्ट ऑफ लिविंग चे
लोक जावून तेथे भजने करीत होते. ते नियमितपणे भजने गात होते.

प्रश्न: गुरुजी, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये तुमची काय भूमिका आहे?
श्री श्री: मी एक मूळ सदस्य होतो. मला विचारण्यात आले कि मी का
उपवासाला बसलो नाही म्हणून. मी उत्तर दिले कि मी उपवास करणार नाही पण
माझा आंदोलनाला पाठींबा असेल. मी जर उपोषणाला बसलो तर, १५० देशांच्या
दूतावासासमोर आंदोलने होतील. आणि यामुळे  आपल्या देशाचे वाईट नाव होईल.
मी अण्णा हजारे यांना ३० वर्षांपासून ओळखतो. ते जेव्हा दिल्ली मध्ये आले
होते तेव्हा मला इथे कोणी ओळखत नाही म्हणाले होते. मी म्हणालो तुम्ही
बसा, आणि लोकांना याबद्दल माहिती होईल. ते खूप चांगले आहेत, खूप भक्तिवान
आहेत.

प्रश्न: गुरुजी, साधना, सेवा आणि सत्संग करताना मी खुश असतो. पण मी
जेव्हा कामावर जातो तेव्हा माझे मन भरकटते. मला जाणून घ्यायचं आहे कि
महत्वाच्या कामामध्ये  आणि अध्यात्मिक जीवनामध्ये कशी प्रगती साधता येते?
श्री  श्री: दोन्ही जरुरीचे आहेत. आपणाला शरीर व मन
यादोन्हीकडे लक्ष द्यायला हवे.


The Art of living
© The Art of Living Foundation