ध्यान म्हणजे आवाजाकडून शांततेकडे जाणे
४ फेब्रुवारी २०१२

इन्ग्रीड यांचे पियानो वादन
ध्यान म्हणजे आवाजाकडून शांततेकडे जाणे. जेव्हा इन्ग्रीड पियानो वाजवत असतील तेव्हा आपण काय करू शकतो ? आपण डोळे बंद करून विश्राम करुया आणि संगीतात बुडून जाउया.
आपण संगीत आणि ध्यान एकत्र करुया. ध्यान म्हणजे काय ? गहिरी विश्रांती. तर मग आपण बसून विश्राम करुया, आपले डोळे बंद ठेऊया आणि संगीताला आपल्यातून वाहू देऊया. आपले संपूर्ण शरीर तसेही पोकळ आणि रिकामे आहे आणि त्यात संगीत भरून जाऊ शकते.
काही मिनिटे, प्रत्येकाने स्वस्थ बसा, विश्राम करा आणि ध्यान करा. जेव्हा तुम्ही संगीत ऐकता असता तेव्हा केवळ त्या संगीताबरोबर असणे चांगले. सहसा काय होते की आपण रेडिओ किंवा टीव्ही लावतो आणि गप्पा मारत बसतो. संगीत चालूच असते. किंवा आपण सादर होणारा एखादा संगीताचा कार्यक्रम बघायला बसलेलो असतो आणि डोळे उघडेच असतात. आपण फक्त इकडे तिकडे काय चाललयं ते बघत असतो. आपण त्या संगीताचा पूर्णपणे आस्वाद घेत नसतो किंवा शंभर टक्के त्या संगीताचा उपभोग घेत नसतो.
माझ्या मते तुम्ही जेव्हा संगीत ऐकत असता तेव्हा मस्त विश्राम करायला हवा. डोळे बंद करा आणि विश्राम करा. तुम्ही जेव्हा बासरीचे सूर ऐकत असाल तेव्हा ते सूर जणू काही तुमच्यातून वहाताहेत असे तुम्हाला जाणवायला हवे. आवाजातून तुम्ही विश्राम करू शकता. त्याच प्रमाणे तुम्ही जर पियानो वादन ऐकत असलात तर ते तुम्हाला ध्यानात नेऊन विश्राम देऊ शकते. ही संगीत ऐकण्याची कला आहे . आणि ती खूप छान आहे.
प्रश्न : मुलांसाठी तुमचा सर्वात चांगला सल्ला काय आसेल ?
श्री श्री रवी शंकर : तुमचे स्मित ही देवाने तुम्हाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. मोठ्यांच्या मुळे ती घालवू नका. तुम्ही मोठे झाल्यानंतरही ती टिकवून ठेवा. तुमची मुळे खोलवर जाऊ द्या आणि तुमची दृष्टी विशाल होऊ द्या. जीवन हे एखद्या वृक्षासारखे आहे. मुळे जुनी असतात पण कोंब नवीन असतात. जीवन म्हणजे जुन्या नव्याचा मिलाफ असला पाहिजे. फक्त जुने चांगले नाही आणि फक्त नवेही चांगले नाही. जीवन हे प्राचीन आणि आधुनिक यांचे मिश्रण आहे. तुम्हाला काय वाटतं ?



The Art of living
© The Art of Living Foundation