खोल ध्यानात तुम्ही
कोणीच नसता आणि काहीच नसता !!!
बंगलोर, ६ फेब्रुवारी २०१२
प्रश्न: एक आई म्हणून मी माझ्या मुलांना कशी काय जास्त कल्पक बनवू
शकते आणि त्यांच्या वर माहिती चा भार कसा काय कमी करू शकते?
श्री श्री: अधिक मानवीय
सुसंवादामुळे. मुलांना इतर मुलांबरोबर खेळू द्यावं. त्यांना काही काळ सेवा करू
द्यावी. त्यांना काही काम करू द्यावं आणि त्यांना समाजातील सर्व थरातील लोकांशी
मिळू-मिसळू द्यावं.
प्रश्न: गुरुजी, मी एक तरुण, (लहान) मुलगी आहे. जेव्हा मी माझ्या
आई-वडिलांना विचारते कि माझा धर्म काय आहे तेव्हा ते म्हणतात अभ्यास. पण खेळणे हा
सुद्धा माझा धर्म नाही का?
श्री श्री: हो!
अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि खेळण्याच्या वेळी खेळ.
प्रश्न: गुरुजी, जर मी तुमचं काम केलं तर माझ्या वाईट कर्मांसाठी
सहुलात आणि आणि चांगल्या कर्मांसाठी बोनस मिळू शकेल काय?
श्री श्री: नक्कीच !
प्रश्न: गुरुजी, तुम्ही नेहमी म्हणता कि जेव्हा तुम्ही देवाशी जवळीक
साधाल तेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हे अगदी बरोबर आहे. पण जे लोक
देवाशी जवळीक नाही साधून आहेत त्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण होत आहेत. मग फरक काय
आहे?
श्री श्री: तुम्ही
त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना कसं वाटतं. तुम्ही जेव्हा जागरूक असता,
अध्यात्मिक असता तेव्हा तुम्ही जास्त आनंद उपभोगु शकता. तुम्ही मागे वळून पहा,
ध्यान करण्या अगोदर तुमच्या इछा पूर्ण व्हायच्या, पण हे तसच नव्हतं. बरोबर कि
नाही? तुम्ही फिरायला गेलात, परिसर बघितलात. पण ध्यान केल्यानंतर, अध्यात्मिक
पथावर चालण्या नंतर खूप फरक पडला आहे.
प्रश्न: गुरुजी, शिवलोक, ब्रह्मलोक, आणि विष्णुलोक बदल माहित करून
घ्यायचं आहे. हे एक दुस्र्यांपासून कसे वेगळे आहेत?
श्री श्री: बरेच विश्व
आहेत आणि वेळेचे च्या अनेक बाजू आहेत. आणि म्हणून म्हणतात कि मनुष्य जीवनाचं एक
वर्ष म्हणजे पितृलोकांचा एक दिवस असतो. आपल्यासाठी एका वर्षाचे ६ महिने वेगळ्या
गणनेत, दिवस आणि रात्र होतात.
जर तुम्ही खगोलशास्त्राचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला
उमजेल कि वेळेचे वेगळे प्रमाण आहे. जुने आणि नवीन खगोलशास्त्राचे दोन्ही प्रकार अभ्यासाला
हवेत. मग तुम्हाला वेळेच्या वेग-वेगळ्या प्रमाणन बद्दल माहिती मिळेल.
बघा म्हणजे जसे, ह्या ताऱ्याचा
प्रकाश जो तुम्हाला आज मिळत आहे, तो प्रकाश तुम्हाला आज येत नसून चार
वर्षांपूर्वीचा येतोत. तो प्रकाश चार वर्षांपूर्वी सुरु झाला असून तुम्हाला तो आज
बघायला मिळतोय. आज हा तारा इथे दिसतोय पण आज तो इथे नसेल सुद्धा. ह्या बद्दल
तुम्ही ऐकले आहे का?
प्रश्न: गुरुजी, ह्या व्यावसाईक जीवन कसे जगावे? जेव्हा लोकांना
माझी गरज असते तेव्हाच ते माझ्या कडे येतात हे बघून मला फार एकटेपणा वाटतो. आज
धन्धेवाईक जीवनात प्रेम आणि आनंद नाहीये. काय करावे?
श्री श्री: त्यातल्यात्यात
तुम्ही तरी त्यांना आपलसं करा. जरी त्यांच्या कडे नसले तरी तुमच्या कडे तरी आहे,
बरोबर? मग तुम्ही चांदी सारखे तिथे चमकू शकता.
प्रश्न: जीवन समजण्यासाठी मृत्युला समाजाने आवश्यक आहे. गुरुजी,
जिवंतपणी मृत्यू चं अनुभव कसा करावा?
श्री श्री: ध्यान. खोल
ध्यानात तुम्ही कोणीच नसता आणि काहीच नसता.
प्रश्न: गुरुजी, आत्मा आणि समाजाच्या मध्ये मी अडकलो आहे. माझ्या
आत्म्याला ह्या पाखंडी समाजा बद्दल घृणा आहे, आणि ह्या समाजाला माझ्या सारख्या
उच्च आत्म्याची गरज नाहीये. मी माझ्या आत्म्याचा किंवा ह्या समाजाचा त्याग करावा?
श्री श्री: कशाचाही त्याग करण्याची गरज नाही. आत्म्याला जपून सुद्धा
तुम्ही ह्या समाजात यश मिळवू शकता, तीच तर खरी कला आहे. हे संपूर्ण जीवन असीमित
गोष्टीना सीमित करण्यामागे लागलं आहे. आपला शरीर सीमित आहे पण चेतना हि असीमित
आहे. दोघांचा समन्वय साधणे हिचं तर खरि कला आहे. म्हणजेच योग.
प्रश्न: गुरुजी, मला तुमचे २१/१२/२०१२ बद्दलचे मत ऐकायचे आहे. एका
जपानी राजकुमारी आणि आंतरजाल वरच्या माहितीती नुसार ३ दिवसांचा काळोख असेल. सत्य
काय आहे?
श्री श्री: डॉक्टर दि.के.हरी
ह्यांनी ह्यावर एक पुस्तक लिहिले आहे ज्याचं काल मी विमोचन केलं – २०१२. ते पुस्तक
वाचा ते आंतरजालावर सुद्धा उपलब्ध आहे. २०१२ बद्दल एक वैज्ञानिक विश्लेषण केलं आहे
आणि खरच सांगितलं कि मायन लोकांना त्याची
दर्शिका कशी मिळाली. मायन हे बऱ्याच काळापूर्वी भारताचा एक भाग असायचे, ते श्री लंकेचे होते. रावण हा त्याच
वंशावळीतला आहे. म्हणून डॉक्टर हरी आणि डॉक्टर हेमा चे उत्तम विश्लेषण आहे. मी
फक्त एक नजर फिरवली आणि मला फारच छान वाटलं. म्हणून तुम्ही वाचायला हवं. मी पूर्ण
वाचल नाहीये पण तरी फारच छान वाटलं. त्यांनी खूप लेख्चीत्र केली आहेत. मी तुम्हाला
सांगतोय काहीच होणार नाहीये. हे जग काही अदृश्य होणार नाहीये. ते तसेच सारखं पुढे
चालत राहिल.
प्रश्न: असं म्हटलं गेलं आहे, कि हे जग खर नसून आपल्या मनाची एक
माया आहे. ह्या दृष्टीकोनातून, आपण भगवान श्री कृष्णाच्या भगवत गीतेच्या च्या
शिकवणुकी कश्या घेऊ शकतो? ते सुद्धा एक मायाच होते का?
श्री श्री: ह्या प्रश्न
खरा आहे कि माया आहे? आधी ह्याच उत्तर द्या. जर प्रश्न खरा आहे तर मग उत्तर खर आहे
आणि जर हा प्रश्न एक माया आहे तर मग उत्तर पण माया आहे. तुमची चौकशी करणे सुद्धा
एक माया असेल तर मग उत्तर कशाला द्यावे? कळलं का?
दोन बाजू आहेत. मी नेहमी म्हणतो.
एक क्वांटम परिमाण आहे. एका आण्विक स्तरावर सगळ सारखं आहे. क्वांटम परिणामामध्ये
सगळ काही अणु आहे, तळ, खुर्ची, दार, खिडकी – सगळ काही एकाच वस्तू पासून बनल आहे.
आणि एका वेगळ्या स्तरावर हे सगळे वेगळे आहेत. खुर्ची दारापासून वेगळी आहे. तुम्ही
जाऊन दारावर बसू नाही शकत. म्हणून ते सगळे वेगळे आहेत. रसायान्शास्त्रामध्ये वेगळी
महाभूत वेगळी आहेत. भौतिकशास्त्रात सगळ काही एकचं तरंग आहे असं म्हटलं जातं.
म्हणून दोन्ही खरे आहेत आणि दोन्ही आणि आवश्यक आहेत. कळल का?
हे द्वैत आणि ते अद्वैत आहे आणि
भगवत गीता दोघांना जोडते. ती तुम्हाला द्वैताशी जोडते आणि अद्वैताला कडे
नेते. हि दुहेरी रचना आहे तुम्हाला ज्ञान
मिळवून देते.
प्रश्न: उश्मागातिक सिद्धांताच्या प्रमाणे, जेव्हा एक वस्तू वरच्या
पासून खालच्या उर्जे कडे येते तेव्हा मुक्त उर्जभाग कमी होऊन स्थैर्य वाढते. पण
जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा शरीर आणि मनाची शक्ती वाढते आणि तरी स्थैर्य वाढते.
हे कसे होते? ह्याच्या मागे कोणता सिद्धांत आहे?
श्री श्री: खूप जास्त
वैज्ञानिक, एका नंतर एक ह्या वर शोध कार्य केले जाऊ शकते. चेतने बद्दल किती तरी
गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जेव्हा ध्यान कराल, तेव्हा केवळ ध्यान करा.

© The Art of Living Foundation