लोक म्हणतात कि त्यांना देव दिसत नाही. मी म्हणतो कि मला देवाशिवाय दुसरे काही दिसत नाही.
१८ जानेवारी २०१२ 
साळीचा तांदूळ आणि पोहे यामध्ये काय फरक आहे? तांदूळ कडक आणि कोरडा असतो तर पोहे पांढरेशुभ्र, हलके आणि खाण्यायोग्य असतात. तांदूळ आणि चुरमुरे यामध्ये काय फरक असतो? तांदूळ कडक असतो. तो तसाच खाता येत नाही.त्याला पाण्यात भिजवून शिजवावे लागते. तो जेंव्हा मऊ होतो, तेंव्हा तो खाता येतो. पण चुरमुरे आतून पोकळ असतात.ते खाण्यायोग्य असतात. ते शिजवलेले असतात. त्याचप्रमाणे मानवी जीवन सत्संग, सेवा, आपुलकी यामुळे कडक तांदूळ ते चुरमुरे, यासारखे बदलून जाते. हि दैवी कृपा आहे. आपण आतून उमलून येतो, आनंदी होतो आणि मगच आयुष्य सार्थकी लागते.
नाहीतर, आपण आपल्याकडे जे आहे त्यामूळे रडत असतो, आणि आपल्याकडे जे नाही त्यासाठीही रडत असतो.काही लोक विवाह न झाल्याने रडत असतात, तर काही त्यांच्या वैवाहिक आयुष्यातल्या अडचणींमुळे रडत असतात.खुश रहा ! काहीही करा पण आनंदी रहा.हाच धर्माचा संदेश आहे.
आज सर्व धर्माचे नेते या मंचावर आहेत.ते तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. वारकरी परिवारातील ज्येष्ट नेते, गुरुद्वाराचे ग्रंथजी  आणि मशिदीचे इमामाही आलेले आहेत.
हा भारत देश आहे, सर्व धर्मांचा गुलदस्ता.आपण सर्वजण एक आहोत. एकच मार्गदर्शक प्रकाश आहे.गायींचा रंग वेगवेगळा असू शकतो पण त्यांच्या दुधाचा रंग एकाच असतो.संत वेगवेगळया मार्गाचे असू शकतील पण त्या सर्वांचे एकच तत्व आहे; परमेश्वराशी जोडले जाणे. आणि परमेश्वर कुठे आहे? उंच आकाशात नाही; आपल्या हृदयात आहे,आपल्यामध्ये आहे. जर तुमच्या तुमच्यामधील परमेश्वराची जाणीव झाली, तर बाहेरची तुम्हाला फक्त तोच दिसेल, सर्वकाही परमेश्वरच होऊन जाते.
मी नेहमी म्हणतो, ‘ लोक म्हणतात, भगवान दृष्टीस पडत नाही, मी म्हणतो कि ईश्वराशिवाय दुसरे काहीच नजरेस पडत नाही’. जाऊन लहान मुलाच्या नजरेत पहा, प्रत्येक वृद्ध माणसाच्या नजरेत पहा, प्रत्येक तरुणाचा नजरेत पहा, त्यांच्या अस्वस्थतेमधेही ईश्वरच दिसतो, सगळ्यांच्या मध्ये परमेश्वरच दिसतो.
भगवान कृष्णाने भगवद गीतेमध्ये हेच सांगितले आहे, जो माणूस मला सगळीकडे पाहतो आणि सगळे काही माझ्यात एकवटले आहे असे पाहतो, त्याचा कधीच नाश होणार नाही. मी कायम त्याच्याबरोबर असेन आणि तो कायम माझ्याजवळ असेल.
परमेश्वर आहे ह्याची तुम्हाला आठवण करून देणे हा माझा इथे येण्यामागचा एकमेव उद्देश  ईश्वर दुसरीकडे कुठे नाहीये किंवा तो कधीतरी अस्तित्वात होता असेही नाहीये.परमेश्वर आत्ता याक्षणी इथेच आहे. परमेश्ववर हे एक तत्त्व आहे जे सगळ्यात आहे, सर्वत्र आहे. ईश्वर सगळ्यांमध्ये आहे आणि कायम आहे. असे नाही कि परमात्मा ५००० वर्षांपूर्वी किंवा २००० वर्षांपूर्वी होता आणि आता नाहीये. तो आत्ता इथे आहे, आपल्या सर्वांमध्ये. आपल्याला हेच लक्षात ठेवायला हवे.
तुम्ही विचारले कि, ‘गुरुजी, याचा काय फायदा?’ मी म्हणतो, ‘ यामुळे तुम्हाला काय मिळणार नाही? सगळे काही मिळेल. आपल्याला जे पाहिजे ते काम आपोआप होऊन जाईल. समाधानी राहाल, उत्तम आरोग्य राहील, समाजात सुसंवाद राहील, शांती आणि प्रेम राहील, परिवारामध्ये शांतता नांदेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
तुमच्यापैकी किती जणांनी अनुभवले आहे कि तुमची कामे होत आहेत.हे सिद्ध झालेले ज्ञान आहे. कैक काळापासूनच पूर्वजांनी सांगितले आहे, कि ध्यान आणि प्राणायामामुळे तुमच्या आतील शक्ती जागृत होते. एकदा हि शक्ती आली कि देवाबरोबर नाते प्रस्थापित होते.
सेल फोन चा वापर होण्यासाठी ३ गोष्टींची गरज असते, सिम कार्ड, चार्जड बॅटरी आणि नेटवर्क. फोन मध्ये सिम कार्ड आहे, पण चार्जड बॅटरी नसेल तर काय उपयोग? आजकाल सगळे जण सेल फोन वापरतात, म्हणून त्यांना हि भाषा नीट समजेल. याच प्रमाणे, विश्वास हा नेटवर्क सारखा आहे, साधना म्हणजे चार्जड बॅटरी आणि सेवा म्हणजे सिम कार्ड. आपल्या आयुष्यात ह्या तीन्हीची गरज असते.
‘कोणीही बाहेरचे नाही. सगळे माझे आहेत, माझे आपले. अशी वृत्ती म्हणजेच ‘सत्संग’.
सत्संग म्हणजे फक्त भजन म्हणणे आणि नंतर निघून जाणे नाही. सत्याच्या बरोबर राहणे म्हणजे सत्संग. सत्य काय आहे? कोणी बाहेरचे नाही. कोणी शीख असेल, ख्रिस्ती, हिंदू किंवा मुस्लीम, सगळे जीव एकाच परमेश्वराचे आहेत. वेदांमध्ये सांगितले आहे कि ‘माझ्यामध्ये परमेश्वर आहे’. ती शक्ती ओळखा. मग तुमच्या चेहऱ्यावर कधीही न विरणारे हास्य असेल. आपल्याला आयुष्यात हेच हवे असते ना, कधीही न विरणारे हास्य, कधीही न संपणारे प्रेम, कधीही न तुटणारे आयुष्य. तसेही आयुष्य कधीच तुटत नसते, फक्त तसे वाटते.
आयुष्य हा कधीही न आटणारा झरा आहे. आपण कित्येक युगांपासून येथे येत आहोत.तुम्ही येथे खुपदा आला आहात आणि मी सुद्धा. आपण या पृथ्वीवर कैक वेळेला आलो आहे. तुम्ही हेच विसरता आहात. म्हणून तुम्ही एवढे त्रासलेले राहता. जसजसे तुम्ही साधना, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया सुरु करता, तसा तुम्हाला एक नवीन प्रकाश दिसू लागतो आणि मग तुम्ही विचार करता, ‘ओह, मी उगाचच नाराज आहे, असे असायचे काहीच कारण नाही.’ हे ज्ञान जागृत झाले पाहिजे. तुम्हालाही असे वाटते का? तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते कि तुमची आयुष्य बदलून गेले आहे. आणि जेंव्हा आपले आयुष्य बदलून जाते, तेंव्हा आपण दुसऱ्यांसाठी एक प्रेरणा बनतो.
धुळ्यामध्ये खूप फुलं आहेत असे दिसतेय. इतके मोठ्ठे हार आणलेत सगळ्यांसाठी.मला तुमच्यासारखी फुललेली फुले पाहिजेत, जि कधीच सुकणार नाहीत.
मी हे सुरु केल्याला ३० वर्ष झालीत. १५२ देशांमध्ये लोक भक्तीने सत्संग आणि साधना करतात.पण हे पुरेसे नाही. अजून खूप दूर जायचे आहे. आपल्याला या देशात खूप सुधारणा करायच्या आहेत.
१२ व्यस शतकात प्रत्येक भागामध्ये इतके संत महात्मे होते जे रस्तोरस्ती फिरून भजन कीर्तन करायचे. १८ व्या शतकात एका इंग्लिश माणसाने लिहिले आहे, ‘ मी संपूर्ण भारतभर फिरलो. पण मला एकाही भिकारी, गरीब आणि अशिक्षित माणूस दिसला नाही’. इतका समृद्ध होता आपला देश. पण मागच्या २००-३०० वर्षात आपले किती अध:पतन झाले आहे याचा विचार करा. असे म्हणतात कि इंग्रज लोक आपल्या इथून ९ जहाजे भरून सोने घेऊन गेले. ते लुटता लुटता थकून गेले. जेंव्हा आपल्या देशात अध्यात्म सर्वोच्च उंचीवर होते, तेंव्हा इतकी संपत्ती होती येथे, आपला देश इतका समृद्ध होता.
कोणीतरी अशातच मला विचारले ,’ गुरुजी, इतकी अध्यात्मिक शक्ती असूनही आपल्या देशात इतकी गरिबी का आहे?’ जेंव्हा इथे खूप जास्त अध्यात्मिक जागृती होती त्यावेळेस गरिबी नव्हती. भ्रष्टाचार नव्हता. १२ व्या शतकात, १६ व्या शतकात जेंव्हा येथे खूप सारे संत महात्मे होते आणि अशीच अध्यात्मिक लहर उठली होतु, तेव्हा असे नव्हते.
कर्नाटक मध्ये पुरंधर दास, रामानुजाचार्य, माद्वाचार्य, कनकदास यांनी पंदुरण विठ्ठलाची खूप गाणी गायली. इथे महाराष्ट्रात, नामदेव, संत तुकाराम, ज्ञानदेव हे सर्व संत होते. उत्तर भारतात कबीर, मीर्बाई, गुरु नानक आणि बरेच सारे सुफी संत होते. शिशुनला शरीफ नावाचे अफगाणिस्तानातील काबुल येथून आलेले एक संत होते आणि ते गोविन्दाचार्यांचे शिष्य बनले. त्यांची गाणी खूप प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पंजाबात, बुले शाह होते, ज्यांनी खूप काव्य आणि सुफी गाणी रचली.
या देशात जेंव्हा अध्यात्मिक उन्नती झाली तेंव्हा तिथे गरिबी, रोगराई किंवा भ्रष्टाचार यापैकी काही नव्हते.आज आपण सर्व काही गमावून बसलो आहोत.भ्रष्टाचार एवढा वाढला आहे कि लोक त्रासले आहेत. यामध्ये आपण अध्यात्मिक ज्ञानही घालवून बसलो आहोत. धर्माच्या नावाखाली लोक काही कर्मकांड करतात, काहीतरी करावे म्हणून. असे नसले पाहिजे. मानवता जागृत केली पाहिजे आणि माणुसकीला जागवणे यालाच मी अध्यात्म म्हणतो.
आपण आज शपथ घेऊयात कि आम्ही लाच देणार नाही आणि घेणारही नाही. हे फार महत्त्वाचे आहे. आपण १०० % मतदानासाठी प्रयत्न करू. जेंव्हा निवडणुका असतील, आपण मतदान करू. सगळ्यांनी मत द्यायलाच पाहिजे. तिसरे म्हणजे आपण आपले लक्ष स्वच्छतेकडे वळविले पाहिजे; आपल्या आतमध्ये आणि समाजामध्ये सुस्षा.
जर आयुष्य हे तांदूळ असेल, तर कीर्तन, भजन आणि प्रेमाच्या पाण्यात शिजवल्यावारच ते खाण्यायोग्य बनतात किंवा सत्संग आणि ज्ञानाच्या भट्टीमध्ये टाकले तर काही तांदूळ चुरमुरे बनतात आणि खाण्यायोग्य होतात. याच प्रकारे, सत्संग, ज्ञान आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण सर्वजण उन्नत होऊयात. आणि फक्त आपणच उन्नत होऊ हे पुरेसे नाही. ते बाकीच्यान्पार्यान्तही पोचले पाहिजे. आपल्याला हि सेवा केली पाहिजे.
आता मला सांगा तुमच्यापैकी किती जणांचे काही न काही दुखते आहे; पाय किंवा पाठ? का माहितीये? कारण आपण शेतीमध्ये युरिया आणि बाकीची रसायने टाकतो ज्यामुळे जमीन आणि भूजल प्रदुषित होते. जेंव्हा आपण अशा ठिकाणी उगवलेले धान्य खातो, तेंव्हा पाठदुखी, डोकेदुखी  होते, डोक्यापासून पायापर्यंत दुखते आणि हृदय कठीण होते. म्हणूनच आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे, म्हणजेच रसायनरहित पिक. आपल्याला पाणी आणि जमीनीला अशा विषारी द्रव्यांपासून वाचवले पाहिजे.
आपण आयुर्वेदाचा वापर केला पाहिजे. ति आपली परंपरा आहे आणि आपण ति विसरलो आहे. आपण आयुर्वेदिक औषधांचा वापर केला पाहिजे. आयुर्वेदामध्ये उपचारपद्धती आहेत ज्या असे रोग बऱ्या करू शकतात जे अलोपथी ने होत नाहीत. जसे कि संधी वात वाटी आहे जि संधीवात बरी करते. जर आपण आठवड्यातून २ किंवा ३ दा त्रिफळा चूर्ण घेतले तर पोट साफ राहते. जेंव्हा पोट साफ असते तेंव्हा रोग आपोआप बरे होतात.
आपण वेळी अवेळी जेवण जेवतो. आपण जे दिसेल ते पोटात भरतो आणि नंतर आजारी पडतो. आयुर्वेद आणि योगासनांनी शरीरशुद्धी होते. प्राणायामाने चित्त आणि प्राण शुद्ध होतात; स्थिर होतात. आणि मनातील अवास्तव, भ्रम आणि गोंधळ दूर होतात. कीर्तन आणि भजनाने मन आणि भावना शुद्ध होतात.ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते. सगळ्यांनी बसून ज्ञानग्रहण केले पाहिजे. ‘हे आयुष्य काय आहे? मी कोण आहे? मला काय हवे आहे? असा आपण जेंव्हा विचार करतो, तेंव्हा बुद्धी शुद्ध होते. यासाठी प्राणायाम आहे. आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी ध्यान केले पाहिजे.
ज्याप्रमाणे देहाला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे आत्म्याला ध्यानाचे पोषण लागते. थोडावेळ शांत बसा आणि तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास येईल.
दानामुळे धनाची शुद्धी होते. आपण कमावतो ते सर्व आपण आपल्यावरच खर्च केले तर ते योग्य नाही. आपण आपल्या कमाईतील २ ते १०% समाजासाठी आणि इतरांसाठी खर्च केले पाहिजेत.
थोडेसे साजूक तूप अन्नाला शुद्ध करते. असे म्हणतात कि तुम्ही नुसता भात किंवा पोळी खाल्लीत तर त्यांचे लवकर साखरेत रुपांतर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. अर्धा चमचा किंवा ठ्मेब्भर तूप जरी त्यावर घातले तर त्यामूळे पचन सावकाश होते आणि मधुमेह किंवा हृदयरोग होत नाही. काही प्रसिद्ध हृदयरोग तज्ञांचे असे मत आहे कि फार नाही पण थोडेसे तूप किंवा स्निग्ध पदार्थ जेवणात घेतले पाहिजेत.
आपल्या समाजात अशी परंपरा आहे कि पंडित आणि पुरोहित सांगतात कि अन्नशुद्धीसाठी थोडेसे तूप जेवणावर घालावे. जे अन्न शिजवतात ते स्वैपाक करतानाच अर्धा चमचा तूप त्यामध्ये घालू शकतात.
सेवेमुळे कर्माची शुद्धी होते. म्हणून सगळ्यांनी सेवा करणे गरजेचे आहे. तुमच्या घरात आणि शहरात स्वच्छता ठेवा. धुळ्यामध्ये जिथे जिथे कचरा पडलेला आहे, तेथील सर्व लोकांनी एकत्र येऊन रविवारी सकाळी २ तास , ९ ते ११ ते साफ करावे. सगळ्यांनी रस्ते साफ केले पाहिजेत. जिथे जिथे ड्रेनेज मध्ये कचरा आहे तो एकत्र येऊन साफ करा. तुम्ही बघा शहर कसे चमकेल ते.
झाडे लावा. माझ्या रस्त्यामध्ये खूप कोरडेपणा होता. जर हे असेच चालू राहिले, तर जमिनीतील पाण्याची पटली खालावत जाईल. इथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे का? आपल्याला इथे जास्त पाणी आणण्यासाठी काम केले पाहिजे. प्रार्थना करा. त्याचा पाण्यावर परिणाम होईल. तुमच्या हृदयाची हाक ऐकली जाईल. प्रार्थनेबरोबरच तुम्हाला तुमचे कर्तव्य करावे लागेल. झाले लावा आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठीची सोय करा. आपण प्रत्येक घरात काहीतरी केले म्हणजे त्याचा खूप मोठ्ठा फायदा होईल.
तुमच्या चित्तात असुरक्षितता असेल किंवा काही काळजी असेल तर ति मला द्या. तुम्ही सगळेजण ती मला द्या. मला हेच हवे आहे कि तुम्ही सर्वजण तुमचे आयुष्य देवावर एकाग्र करून हसत आणि आनंदी रहा. प्रत्येक माणसाची अध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे; ‘भारत’ याचा अर्थ म्हणजे जिथे असे असामान्य सुंदर लोक राहतात.
आत्ता मकर संक्रांति साजरी करण्यात आली होती. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मकर संक्रांतीचा हाच संदेश आहे कि स्वताला तिळसारखे छोटे समजा. स्वत:ला फार महत्त्वाची व्यक्ती मानू नका. तिळ कडे बघा, ते बाहेरून काळे असतात आणि आतून पांढरे. आता त्याच्या उलट आहे. लोक आतून काळे पण बाहेरून गोरे आहेत. असे नाही. आपल्या अंतरान्गामधेही शुद्धता आली पाहिजे. आपण तिळसारखे छोटे आहोत आणि गूळासारखे मधुर आहोत. हा संदेश विसरू नका. आपण कोण आहोत. आपण तिळ आहोत आणि गुळ हि आहोत.
मला देशाच्या प्रत्येक खेड्यात अध्यात्मिक लहर उठायला हवी आहे. प्रत्येक खेड्यामध्ये सत्संग व्हायला हवा, लोकांनी कीर्तन, भजन आणि ध्यान केले पाहिजे. एक अतिसुंदर वातावरण निर्माण होईल. तुम्ही सर्वांनी शपथ घ्या; १० च्या समूहामध्ये लोकांनी खेडोपाडी जाऊन कीर्तन केले पाहिजे, त्यांना ध्यान करायला लावा आणि तेथील वातावरण बदलून टाका.
किती तरुण सहा महिने ते एक वर्ष आदर्श, दिव्य समाजाच्या निर्मितीसाठी द्यायला तयार आहेत. मला फक्त तरुण हवे आहेत, मनानी किंवा शरीराने. माननी तरुण म्हणजे वय झाले असले तरी ज्यामध्ये उत्साह आहे. मनानी जे तरुण आहेत तेही चालतील. आपण अशी योजना करूयात जिथे आपण खेडोपाडी जाऊन, दारू आणि नशाबंदी करू आणि त्यांना सुसंवादी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करू.
आज एक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी लाच द्यावी लागते. आपल्या आतमध्ये सत्य आणि प्रामाणीकपणा असेल आणि जर आपण लाच न देण्याचा निश्चय केला, तर सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आणि इतरांना आपल्याला आपले काम करावे लागेल.  शेवटी त्यांच्यामध्येही काही माणुसकी आहेच. असा विचार करू नका ते जनावर आहेत. प्रत्येकामध्ये चांगुलपणा दडलेला आहे. आपल्या फक्त त्याच्यावरचे आवरण काढून टाकायचे आहे.
खरोखरच तुम्ही सगळे दुधानी धुतलेले आहात. (दुध के धुले).म्हणजेच तुम्ही शुद्ध आहात. हि इतकी सुंदर म्हण आहे, पण ति कोणालातरी टोमणा मारायला वापरली जाते. जेंव्हा काळे तिळ धुतले जातात तेंव्हा ते सफेद होतात. त्याचप्रमाणे आपल्या चुका, आपली पापे हि वरवरची आहेत, त्यांना प्राणायाम, ध्यान, सेवा आणि चांगल्या विचारांनी धुवून टाका. त्यांना नीट धुवून टाका.
प्रश्न: मला सेवा करायची आहे पण कशी सुरुवात करू?
श्री श्री : तुमचे नाव द्या आणि आम्ही तुम्हाला सामावून घेऊ. युवाचार्य तुम्हाला सामील करून घेईल. तुम्ही कोणत्यातरी प्रशिक्षकांबरोबर काम करा.
प्रश्न: गुरुजी, माझे आधीचे गुरु आहेत. मी तुमच्याकडून मंत्र घेऊ शकतो का?
श्री श्री : तुम्ही दुसऱ्या गुरूंना मनात असाल तरी काही हरकत नाही. असा विचार करा या सत्संग मध्ये तुम्ही त्यांच्याच कृपेने आले आहात. सगळ्यांना एकात बघा आणि एकाला सगळ्यात.
प्रश्न: गुरुजी, लोकपाल विधेयकामुळे भ्रष्टाचार नाहीसा होईल का त्यासाठी आपल्याला दुसरे काही करावे लागेल?
श्री श्री : लोकपाल विधेयक हे अमलात आल्यावर रोगावरच्या उपचारासारखे आहे. फक्त कायद्याने भ्रष्टाचार थांबतो यावर माझा विश्वास नाही. पण तरीही अशा कायद्याची गरज आहे, नक्कीच गरज आहे. जर (कायद्याची) भीती असेल, तर भ्रष्टाचार थांबेल. पण फक्त भीतीने काम होणार नाही. लोकांना त्याचीही सवय होऊन जाते. अध्यात्मिक जागृती झाली पाहिजे. जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. जर आपण मैत्रीपूर्ण वातावरण तयार केले तर ते पूरक ठरेल. त्याचप्रमाणे, चांगले लोक निवडून आले पाहिजेत. चांगले लोक राजकारणात पडले पाहिजेत. हे आवश्यक आहे.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही सोनगढ ला कधी येणार? इथे खूप धर्मांतर होत आहेत. आपण काय करायला पाहिजे?
श्री श्री : बघा, धार्मिक मतांतर व्हायला नको. हे देशासाठी चांगले नाही. कोणीही आपला धर्म सोडायला नको. आपला प्राचीन धर्म आहे. तो खूप सहनशील आहे, तो सर्वांना स्वीकारतो. सर्व ज्ञान आत्मसात करा. पण त्यासाठी आपला धर्म का सोडता? बाकीच्या देव दूतांनी जे सांगितले आहे ते आपल्या धर्मात आधीच सांगून ठेवले आहे. कृष्णाने सुद्धा सांगितले आहे कि ‘ मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन’. म्हणून सर्वांवर श्रद्धा ठेवा पण एक धर्म सोडून दुसरा धर्म अवलंबिणे योग्य नाही. हा तुमच्या पूर्वजांचा अपमान आहे. तुमचे आजोबा, पणजोबा, पालक हे सगळे काय मूर्ख होते? या देशाची जनता योग्य नव्हती? आपण जेंव्हा आपली तत्व सोडून दुसरी स्वीकारतो, तेंव्हा आपण असे मानतो कि आपली तत्त्व योग्य नाहीत. एखादी तत्त्व अमान्य केल्याशिवाय तुम्ही ती अस्वीकार करू शकत नाही. म्हणून हे योग्य नाही. तुमच्या ध्रामावर टीका करू नका किंवा सोदुही नका. जे सोडून गेले आहेत त्यांना परत धर्मात घ्या. सगळ्या धर्मांचा गाभा हा प्रेम आहे. प्रेमाच्या रस्त्यावर चला, कोणाचाही अपमान करू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. असे कोणीही म्हणू नये कि, ‘ फक्त माझाच धर्म श्रेष्ठ आहे आणि दुसरा चुकीचा.’ असे कोणी म्हंटले तर हसून पुढे निघून जा. ऐकू नका.
प्रश्न: गुरुजी, कृष्णाने अर्जुनाला धर्मासाठी युद्ध करायला सांगणे आणि ओसामा ने जिहादींना धर्मासाठी लढायला सांगणे यात काय फरक आहे?
श्री श्री: दहशतवादी भेकड असतात. ते समोर येऊन लढत नाहीत. भेकड लोक लपून वार करतात. भगवत गीता कधीही दहशती बद्दल बोलत नाही. गीता सांगते ‘तुम्ही तुमचे कर्तव्य करा’. एखाद्या पोलीसाला त्याचे कर्तव्य करावेच लागेल, जर तो म्हणाला कि मी ‘पोलिसी करणार नाही, मी केळी विकेन, भाज्या विकेन, मी बंदूक किंवा काठी हाती धरणार नाही’ तर विवेकी माणूस काय म्हणेल? तू तुझे काम कर. जर तू पोलीस असशील तर पोलिसाचे काम कर. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले. ‘तू तुझे कर्तव्य कर, जनतेचे, तुझ्यावर अवलंबून असलेल्यांचे रक्षण कर’ त्याने असे नाही सांगितले ‘जा आणि निशस्त्र लोकांना मार’ कधीही नाही. हे चूक आहे, असा नुसता विचार करणे सुद्धा चुकीचे आहे. म्हणूनच दहशतवाद भ्याडपण आहे. यात कुठलेही शौर्य नाही.  
एक युद्ध लढणे मात्र शौर्यचे लक्षण आहे. ‘सगळे सैनिक दहशतवादी आहेत’ असे तुम्ही म्हणू शकत नाही.  सैन्यातले लोक, पोलीस हे दहशतवादी नाहीत. ते कायदा आणि सुव्यवस्था राखतात, त्यांना ते करावेच लागते. भगवान कृष्णाने फक्त सांगितले ‘तुम्ही तुमचा धर्म पाळा’ ओसामा बिन लादेन ने असे नाही म्हणले, तो म्हणाला ‘जे माझ्या धर्माचे नाहीत त्यांना मारा’ आणि कसे – तर लपूनछपुन. तो कधी लढायला पुढे आला नाही. तो पाकिस्तानात लपून राहिला.
भ्याड लोकांकडे कधीही शूर सैनिक म्हणून पहिले जात नाही. वास्तविक ते बरोबर उलटे असतात. गीता तुम्हाला शौर्य शिकवते, भ्याडपणा नाही.
प्रश्न: गुरुजी, कधीकधी काही करताना आपल्याला माहीत असते कि हे चुकीचे आहे; पण तरीही आपण ते करत राहतो. आपण कसा संयम करावा?
श्री श्री : महत्त्वाची गोष्ट आशी आहे कि एखाद्याला वाटते कि त्याला त्यापासून आनंद मिळतो आहे. आनंदासाठीचा मोह त्या ठिकाणी असतो; तेंव्हाच चुकीची कृती घडते.
प्रश्न: गुरुजी, आजकाल छोटे कुटुंब असावे असे सुचवतात. हयामुळे आईकडची आणि वडिलांकडची कुटुंबपद्धती नामशेष होईल, जसे कि काका आणि मावशी?
श्री श्री : नाही! कुटुंब एकत्रच राहिले पाहिजे. ते छोटे असण्याची गरज नाही. एक काळ होता जेंव्हा लोकांना लोकसंख्या म्हणजे आपल्या देशाचा शाप वाटायचे. आता ते वेगळ्या प्रकारे विचार करतात. लोकसंख्या हे देशाचे वरदान आहे. त्याला शाप समजू नका.
ब्राझील, चीन आणि भारत आज शक्तिशाली आहेत त्याचे कारण लोकसंख्या हेच आहे. हि जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जर लोकसंख्या कमी असती तर याहून मोठे घोटाळे झाले असते आणि प्रगतीच्या बद्दल बोलणेच नको.
यआच अर्थ असा नाही कि लोकसंख्या अजून वाढावी असे मी सांगतोय, पण त्याला शापही मानू नका. ते आपल्यासाठी वरदान असू शकते.
प्रश्न: गुरुजी, असे म्हणतात कि सावकाश पण सातत्य असलेला माणूस शर्यत जिंकतो. पण आजकालच्या जगात हे अयोग्य वाटते. आजचे याचे स्वरूप काय असावे?
श्री श्री : आतमध्ये स्थिर रहा आणि जोरात पळ. पण तुम्ही चालण्यामध्ये हळू आहात आणि आतमध्ये अस्थिर आहात, हे चांगले नाही. तुम्ही आतमध्ये स्थिर रहा आणि बाहेर जोरात पळा. पण लोक याच्या उलट करतात. ते बाहेर हळू हळू चालतात आणि खूप  वेगाने विचार करतात. आतमध्ये ते अस्वस्थ असतात आणि ते पळत असतात आणि ते आजारी पडतात.
प्रश्न: गुरुजी, संपत्ती प्राप्त करण्याचा सोप्पा मार्ग सांगा.
श्री श्री : प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि आत्मविश्वास. आत्मविश्वास, संकल्प आणि चिकाटी, हे सर्व बरोबर चालले पाहिजे.
प्रश्न: गुरुजी, प्रत्यक्षातील जीवन आणि स्वप्न, यामध्ये समतोल कसा साधावा?स्वप्नामध्ये अजून साध्या करण्याची इच्छा असते पण प्रत्यक्षात आयुष्य आपल्याला वास्तवदर्शी बनवते.
श्री श्री : हो, स्वप्न आणि प्रत्यक्षातील आयुष्य यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. तुम्ही सोलापूर मध्ये झालेला ताल निनाद चा कार्यक्रम पाहिला असेल. आधी लोक म्हणायचे कि ३००० लोकांना एकत्र तबला वाजविणे अवघड आहे. ताल जमणार नाही. पण ताल जमला होता. जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे, ३००० लोकांनी एकत्र तबला वाजविण्याचा.आपण अशक्य ते शक्य करून दाखविले पाहिजे. मी तर म्हणेन मला ती सवयच झाली आहे; अशक्य ते शक्य करण्याची. म्हणून मोठ्ठी स्वप्न पहा आणि त्याचबरोबर काम करत रहा, आणि चित्तामध्ये विरक्ती असू द्या. विरक्ती म्हणजे सर्व काही देवाचे आहे, देवाची इच्छा. मला काहीही नको आहे. मग तुम्हाला तुमच्या कर्माची फळे मिळतील.
प्रश्न: मी ऐकले आहे कि पंढरपूर मध्ये आपल्या युवाचार्यांनी अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला आशीर्वाद दिले आणि ति व्यक्ती बरी झाली. आम्हीही असे आशीर्वाद देऊ शकतो का?
श्री श्री : हो तुम्ही ध्यान करा, त्यामध्ये खोल जा, भक्त बना, मग तुमचेही आशीर्वाद फळास येतील.आपण जेवढे समाधानी असू तेवढे आपले आशीर्वाद जास्त परिणामकारक असतील.
आपण येथे सर्वजण थोडावेळ ध्यान करूयात, आणि एक इच्छेच्या पूर्तीचा वर मग.तुम्हाला तो मिळेल. पहात रहा.
तुळशीदास म्हणतात,’ जो इच्छा कारीहो मन माही, प्रभू प्रताप कछु दुर्लभ नाही|’
जेंव्हा आपण भक्त बनतो; आपण बनू शकत नाही, आपण असतोच, आपण भक्त आहोत हा विश्वास ठेवा. देवाचा भक्त असण्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
प्रश्न: गुरुजी, सुंदर मुलीशी लग्न करावे का बुद्धिमान मुलीशी? दोघांपैकी कोणाला निवडू?
श्री श्री: असे का मानून चालता? सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एकत्र असू शकत नाहीत का?
दोन्हीपैकी फक्त एकच असते का? असे असेल तर मी म्हणेन, बुद्धिमान असणे चांगले. सौंदर्य येते आणि जाते; पण बुद्धिमत्ता रहाते. पण दोन्ही एकत्र असू शकत नाही असा विचार करू नका. तुम्हाला दोन्ही एकत्र मिळू शकते.

The Art of living
© The Art of Living Foundation