तुम्हाला जे काही मिळाले आहे त्यामध्ये समाधानी रहा.

३ मार्च २०१२

प्रश्न: गुरुजी कृपया कृतद्यते बद्दल सांगाल का? तुम्ही सांगता की जितके तुम्ही कृतज्ञ असाल तितकी कृपा तुमच्या आयुष्यात असते. मी रोज अधिक कृतज्ञ कसा होऊ?
श्री श्री: प्रथम हे अधिक हवे असणे सोडा. अधिक भक्ती, अधिक कृतज्ञ, अधिक आनंद, अधिक खुशी, आपल्याला हे ‘मला अधिकाधिक हवे’ सोडावे लागेल.
पहिल्यांदा तुम्ही विचार करता ‘मला अधिक पैसा हवा, अधिक आनंद, अधिक खुशी आणि अधिक मजा’ नंतर तुम्ही आपली प्रवृत्ती अधिक शांतता, अधिक ज्ञान, अधिक हे आणि अधिक ते या कडे वळवलीत.
जो पर्यंत तुम्ही या अधिकतेच्या मागे धावाल तो पर्यंत तुम्ही स्थिरावू शकणार नाही. आणि जो पर्यंत तुम्ही स्थिर होणार नाही तो पर्यंत ना शांतता, ना कृपा. समजले ? !!
तुम्हाला कुठेतरी ‘मला अधिक पाहिजे’ याचा त्याग करून ‘ठीक आहे बस !’ असे म्हणावे लागेल.
भगवतगीतेत म्हटले आहे, ‘याद्र्च्चा लाभ संतुष्ट द्वान्द्वातितो विमत्सरः’, तुमच्या समोर जे काही येईन त्यात एक प्रकारची संतुष्टी असावी, तिच्या बरोबर कृतज्ञता येते. जर तुम्ही संतुष्ट नसाल तर कृतज्ञ कसे असू शकाल?
जर तुम्ही कुरकुर करत असाल तर कृतज्ञ असणार नाही, आणि कृतज्ञ नसाल तर कृपादृष्टी कशी असेल? तुमच्या लक्षात येतय मी काय म्हणतोय ते? हे सगळे एकमेकात गुंतलेले आहे.
त्यामुळे आता मला विचारू नका की तुम्ही अधिक कृतज्ञ कसे व्हाल? तक्रार करणे सोडून द्या !
हे आयुष्य एक स्वप्नवत आहे हे जाणा. हे सगळ एक दिवस संपणार आहे, ही जाण तुमच्यात बदल घडवेल. ‘ही कहाणी एक दिवस संपणार आहे आणि यावर पडदा पडणार आहे आहे’ ही जाण अचानक बदल घडवेल आणि तुम्ही धावाण्याकडून संतुष्टी कडे याल आणि हे होईल.
प्रश्न: प्रिय, गुरुजी गीतेमध्ये म्हणतात ‘अव्यक्तही गतिर दुखं’, जेंव्हा आपण अव्यक्ताची ( जे दिसत नाही त्याची) पूजा करतो तेंव्हा दुर्दशा होते. पूजेसाठी मूर्तीची (आकार) गरज आहे का? की आपण त्याच्या शिवाय ध्यान करू शकतो?
श्री श्री: ध्यान हे रूपाशिवाय होऊ शकते, पण त्यापूर्वी ध्यानात जाण्या अगोदर आकाराची गरज आहे. ते कुठलेही रूप असेल.
म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने सांगितले, कि तुम्हाला मार्गदर्शक, शिक्षक, गुरु यांची गरज आहे. येशू ने सुद्धा हेच सांगितले, जर तुम्हाला माझ्या वडिलांपर्यंत पोहोचायचे असेल तर माझ्या मार्गेच जावे लागेल.
भगवान श्रीकृष्णाने तेच सांगितले ‘अव्यक्तही गतिर दुखं देह्वाद्वीर वाप्यते’. शरीर धारण केलेल्या लोकांसाठी एकदम निराकाराची उपासना त्यांच्या आयुष्यात दुख, कष्ट आणू शकते. हे सत्य आहे आणि आपण हे बघितले आहे.
जर आपण ज्यू धर्माचा विचार केला तर ते खूप त्रासातून, दुखातून गेले. इथे श्रीकृष्ण असे म्हणत नाही कि तो मार्ग चुकीचा किंवा वाईट आहे. निराकाराच्या उपासनेचा मार्ग आहे पण तो खडतर आहे, आणि या मार्गावर चालणाऱ्यांना खूप दु:ख्खातून जावे लागते.
जगात ज्यू लोकांच्या बाबतीत हे होताना आपण बघतो. मुस्लिमांच्या बाबतीत सुरुवातीपासून हे होताना आपण पाहिले आहे. पण दुसरीकडे ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत त्यांना तितकेसे कठीण नाही गेले.
महम्मदांच्या च्या वेळी लोकांन जेवढे कष्ट पडले त्या मानाने बौद्ध, जैन, टाओ, शिंतो या सगळ्यांचा मार्ग सरळ होता.
प्रेषित महम्मदांच्या वेळी त्यांना स्वत:ला कितीतरी अडचणीना सामोरे जावे लागले. ज्यू च्या प्रेषित च्या बाबतीतही तसेच आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य दुखः,कष्ट आणि संघर्षने भरलेले होते. काही प्रमाणात शिखांना पण यातून जावे लागले. शिखांनी पण ‘अव्यक्त’ – निराकाराची पूजा केली.
प्रश्न: प्रिय गुरुजी, इच्छा करणे, त्याकडे लक्ष देणे आणि ती साकार होणे, यामागचे शास्त्र काय आहे? ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत?

श्री श्री: ते सर्व जोडलेले आहेत. जेंव्हा एखादी इच्छ्चा, संकल्प मनात येतो आणि त्यावर तुम्ही थोडे
 लक्ष घातल्यावर तो साकार होतो.तश्या तर खूप इच्छ्चा येतात आणि जातात पण तुम्ही सगळ्यावर काम करत नाही. बरोबर? पण जेंव्हा तुमच्या संकल्पाकडे थोडे लक्ष दिलेत, म्हणजेच तुम्ही त्या दिशेनी योग्य ती पावले उचललीत, तर ती इच्छ्चा साकार होते.
प्रश्न: गुरुजी, या जगात यशाचे एकच रहस्य सांगायचे झाले तर तुम्ही कोणते सांगाल?
श्री श्री: जेंव्हा तुम्ही कशाचीतरी तीव्र इच्छ्चा करता, फक्त विश्वास ठेवा कि नक्कीच तसे घडून येणार आहे. हे ध्यानात ठेवा कि देणारा(दाता) खूप कनवाळू आहे आणि तुम्ही ज्याची इच्छा केली आहे ते जर तुमच्यासाठी चांगले असेल तर ते तुम्हाला मिळेल. ‘माझ्यासाठी जे चांगले आहे ते दाता मला देईलच’, हा विश्वासच सर्व कामे मार्गी लावेल.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणता कि सर्व काही बदलते आहे. जर आपया आयुष्यात स्थैर्य असेल तर तेही बदलेल का?
श्री श्री : जरी सर्व काही बदलत असेल तरी तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या आतमध्ये काहीतरी आहे जे कधीच बदलत नाही. सर्व बदलांचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला त्या ‘बदलत नसणाऱ्या’ गोष्टीची जाणीव करून देणे.
प्रश्न: गुरुजी, साधकाने भांडण तंटा यापासून दूर राहण्यासाठी काय करावे?
श्री श्री : साधना, सेवा, ध्यान आणि प्राणायाम करा. हे सर्व त्यासाठीच आहे. तुम्ही हे जवढे जास्त कराल तेवढे तुम्ही तंट्यामधेही समतोल राहाल.
प्रश्न: गुरुजी, पंचमहाभूतातील सर्व महाभूते बरोबरीची आहेत का अवकाश हे सर्वात श्रेष्ठ आहे?
श्री श्री: हो बाकीच्या सर्वांपेक्षा अवकाश हे वेगळे आहे. अवकाश हे साक्षी आहे; आत्म्याप्रमाणे. बाकीची चारही महाभूते ही यामध्ये वसलेली आहेत. अवकाश शिवाय पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी यांचे अस्तित्व असू शकत नाही.या चारही महाभूतांचे मूळ हे अवकाश आहे आणि अवकाश या चारींनाही विरोधी नाही.
जर तुम्ही पाहिलेत तर पाणी आणि अग्नी यामध्ये खोल नाते आहे आणि ते एकमेकांच्या विरोधीही आहेत. पाणी अग्नीला विझविते आणि अग्नी पाण्याची वाफ करते; अग्नीमुळे सर्व पाणी वाळून जाते.
त्याचप्रमाणे हवेमुळे आग पेटते आणि हवेमुळे ती विझुनही जाते.
जर तुम्ही या दृष्टीकोनातून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल कि पाचही तत्व हि एकमेकांच्या विरोधी आहेत आणि पूरकही. ते एकमेकांशिवाय आस्तित्वात येऊ शकत नाहीत.
म्हणूनच हा पाचही तत्वांना एकत्र नाव दिले आहे, ‘प्रपंच’.
अवकाश तत्त्व जे बाकीच्या ४ तत्वांचे साक्षी आहे, ते अस्पर्श (स्पर्श न झालेले) आणि काहीही फरक न पडणारे आहे. ते साक्षी आहे. म्हणूनच अवकाश तत्व हे आत्म्यासारखे आहे.
त्याचप्रमाणे मानवामध्ये चित्त, बुद्धी, स्मरणशक्ती आणि अहंकार, हे चारही असतात आणि आत्मा या सगळ्यांचा साक्षी असतो.  
हे चारही आत्म्यामध्ये असतात आणि ते त्यांच्या गुणधर्मानुसार कार्यरत असतात. कधी कधी चित्तामध्ये संघर्ष असतो तर कधी चित्त आणि बुद्धी यामध्ये.कधी स्मरणशक्ती आणि अहंकार आपला खेळ दाखवतात; पण आत्मा मात्र या सगळ्यांचा साक्षी असतो.
प्रश्न: गुरुजी, मी आज जागतिक ग्रंथ जत्रेत गेलो होतो आणि मी भगवद गीता खरेदी केली आहे.मी पूर्वी फक्त प्रेमकथा आणि युद्धकथा वाचायचो. आता माझ्या आईला काळजी आहे कि मी ठीक आहे न. मी तिला काय सांगू?
श्री श्री : तिला सांगा कि तुम्ही एकदम ठीक आहात. गाडी आत्ता रुळावर आली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे कि चुकिचे वागणार्यांच्या मध्ये एक कोणी जर योग्य ते करीत असेल तर तो वेगळा पडतो.
हे म्हणजे ‘उघ्ड्यांच्या गावात जर कोणी कपडे घालत असेल तर तो विचित्र दिसतो’ असे झाले. काळजी करू नका. तुम्ही ठीक आहात.
प्रश्न: गुरुजी, जेंव्हा कुठे भांडण होते तेंव्हा देव कोणाची बाजू घेतो का तो अपक्ष राहतो?
श्री श्री : नाही, देव कोणाचीही बाजू घेत नाही. तो संपूर्णपणे अपक्ष आणि निराळा असतो.पण जो देवाला शरण जातो, तो मात्र देवाच्या बाजूने होतो.
महाभारतामध्ये जेंव्हा श्री कृष्ण आराम करत होते, तेंव्हा अर्जुन आणि दुर्योधन, दोघेहीजण त्यांच्याकडे गेले. आणि ते याच विश्वासाने कि श्री कृष्ण नि:पक्षपाती असेल आणि त्यांची विनंती मान्य करेल.
जर दुर्योधनाला असे वाटले नसते तर तो त्यांच्याकडे गेला नसता. आणि अर्जुनही गेला कारण त्याला वाटले कि कृष्ण नि:पक्षपाती राहील.
जेंव्हा दोघे कृष्णाकडे गेले तेंव्हा कृष्णाने त्यांना अट घातली.’ एका बाजूला माझे सैन्य आहे आणि दुसरीकडे मी, नि:शस्त्र. मी युद्ध करणार नाही. आता मला सांगा तुम्हाला कोण पाहिजे. तुम्हाला नक्की करावे लागेल कि मी पाहिजे का माझे सैन्य?
दुर्योधनाने त्याची बुद्ध वापरली. कोणीही बुद्धिचा वापर करणारा माणूस असाच विचार करेल, कि जो युद्ध लढणार नाही त्याचा काय उपयोग त्यापेक्षा त्याचे सैन्यच निवडावे.आणि म्हणून त्याने सैन्याची निवड केली. म्हणून दुर्योधान ने कृष्णाकडे त्याचे सैन्य मागितले आणि तो खुश झाला.
लोक आजही असाच विचार करतात. त्यांना गुरुजी नको आहेत, पण त्यांना त्यांच्या आंदोलनासाठी संघटनेची माणसे हवी आहेत.जर लोक त्यांच्याबरोबर गेले तर ते त्यांचे आंदोलन करू शकतील.
एका बाजूला,अर्जुन होता, त्याला कृष्णाचे खरे सामर्थ्य माहीत नव्हते. पण त्याला माहीत होते कि कृष्ण खूप हुशार आहे आणि त्याने म्हटल्याप्रमाणेच गोष्टी घडून येतात. म्हणून त्याने कृष्णाला रथाचे सारथ्य करायची विनंती केली. सारथी हा तेवढंच महत्त्वाच असतो जेवढा कि योद्धा. म्हणून अर्जुनाने कृष्णाला त्याच्या युद्धभूमीवर असण्याची विनंती केली, कारण अर्जुनाने बुद्धीने नाही तर त्याच्या हृदयाचे ऐकून निर्णय घेतला.किंवा त्याने उच्च ज्ञानातून तसा निर्णय घेतला.
तो कृष्णाला शरण गेला आणि त्याच्या हृदयापासून त्याने साहाय्य मागितले.
म्हणून श्री कृष्णाने ते मान्य केले. आणि त्यालाही तेच हवे होते. कृष्णाला माहिती होते कि तो ज्या बाजूला असेल त्या बाजूल विजय निश्चित आहे.
म्हणून ज्याचे देवाकडे शरण घेतले आहे तो देवाच्या पक्षात जातो; आणि जो अहंकारी आहे तो देवापासून दूर जातो. दुर्योधन हा खूप अहंकारी होता आणि म्हणून तो देवापासून दूर गेला.



The Art of living
© The Art of Living Foundation