यज्ञाने मन, शरीर आणि वातावरणाची शुद्धी होते.

४ मार्च २०१२

प्रश्न: वेग वेगळ्याप्रकारचे यज्ञ कोणते आहेत आणि आपल्या आयुष्यात यज्ञाचे काय महत्व आहे? कोणता यज्ञ सर्वात उत्तम आहे?
श्री श्री रविशंकर: ध्यान यज्ञ, जप यज्ञ, द्रव्य यज्ञ हे सगळे यज्ञ आहेत. या सर्वांमध्ये ध्यान यज्ञ सर्वोत्तम आहे. ध्यान, सामुहिक ध्यान.
नंतर ज्ञान यज्ञ-बसून ज्ञान ऐकावे, नंतर आहे जप यज्ञ-"यज्ञांनाम जपयाग्योस्मी"-श्रीकृष्णानेदेखील सांगितले आहे की जप यज्ञ(देवाचे नामस्मरण करणे) हे फार चांगले आहे.
आणि यज्ञाने काय होते? त्याने मन, शरीर आणि वातावरणाचे शुद्धी होते.

प्रश्न: गुरुजी माझे बाकीचे आध्यत्मिक मित्र म्हणतात की मला दीक्षा मिळाली नाही आणि जोपर्यंत मला दीक्षा मिळत नाही माझा प्रवास पूर्ण होणार नाही.
श्री श्री रविशंकर: जेव्हा तुम्ही सर्वात प्रथम सुदर्शन क्रिया केली तेव्हाच तुम्हाला दीक्षा मिळाली हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही सहज समाधी केले आहे तर तुम्हाला मंत्र दीक्षासुद्धा मिळालेली आहे.


प्रश्न: गुरुजी ध्यान करताना तुम्हाला काय होते आणि मी ध्यान करताना मला काय व्हायला पाहिजे?
श्री श्री रविशंकर: हीच मोठी अडचण आहे. कोणालातरी ध्यान करताना काय झाले हे तुम्ही वाचता आणि स्वतः ध्यान करताना ते घडावे ही अपेक्षा ठेवता आणि मग तुम्ही कधीच ध्यान करू शकणार नाही. केवळ बसा आणि काहीही करू नका.


प्रश्न: लग्न करताना जन्म पत्रिका जुळवणे गरजेचे आहे का? केवळ हृदयाचे मिळणे बस्स नाही का?
श्री श्री रविशंकर: हो,पुरेसे आहे. पण मनात काही शंका असतील तर पत्रिका जुळवून पहा. जर पत्रिका जुळत नसतील आणि जर तुमचा पत्रिकेवर विश्वास असेल तर काय होईल की प्रत्येक छोट्या छोट्या चुकांचे खापर तुम्ही पत्रिका न जुळण्यावर फोडाल. चाळीस वर्षे एकत्र राहून देखील लोक म्हणतात की ते एकमेकांना अनुरूप नाहीत. मी विचारतो,"मग एव्हढी चाळीस वर्षे तुम्ही एकत्र कसे काय राहिलात?"
ते म्हणतात की त्यांचे विचार एक दिवस देखील जुळले नाहीत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही बाबतीत सुसंगतता नव्हती. तर आयुष्य हे असे आहे. आयुष्य म्हणजे तडजोड, समझोता. कुठे ना कुठे तुम्हाला देवाण घेवाण ही करावी लागते. पत्रिकेत देखील उपाय असतात असे म्हणतात. समजा काही जुळत नसेल तर तुम्ही त्यावर उपाय करू शकता जसे काही जप किंवा काही दान आणि मग त्यातून तोडगा निघतो. तर उपाय आहे.


प्रश्न:  गुरुजी कृपा करून मला साधू किंवा स्वामी बनण्याविषयी काही मार्गदर्शन करा. मला काही करण्याची आवश्यकता आहे की ते आपोआपच घडून येते?
श्री श्री रविशंकर: जर तुम्हाला स्वामी बनायचे असेल तर आश्रमात या, थोडे दिवस राहा आणि शिका, वाचा, ध्यान करा. देशाच्या सेवेकरिता आपले जीवन वाहून टाका आणि मग ते घडून येईल.
आश्रम आहेत आणि तुम्हाला विजेच्या बिलाची किंवा कर देण्याची काळजी करण्याची गरज नाही. या सगळ्याची काळजी आश्रम घेईल. स्वामींनी फक्त यायचे आणि त्यांची साधना करायची.


प्रश्न: गुरुजी मी माझ्या दिवसभरात जेव्हा खूप लोकांना भेटतो तेव्हा पूर्णपणे थकून जातो,पण जेव्हा मी तुम्हाला दिवसाचे चोवीस तास हजारो लोकांना रोज रोज भेटताना पाहतो, तेव्हा तुम्ही अजिबात थकलेले दिसत नाही. तुमचे गुपित काय आहे?
श्री श्री रविशंकर: दी आर्ट ऑफ लिविंगचे शिबीर भाग १, शिबीर भाग २ ,अष्टावक्र गीता आणि बाकी सगळीकडे  माझे गुपित उघड केलेले आहे.


प्रश्न: प्रिय गुरुजी, यशस्वी होण्यात वेळ हा अतिशय महत्वाचा घटक आहे. केलेल्या कामाचे फळ मिळायला योग्य वेळी कृती घडायला पाहिजे. ती योग्य वेळ ओळखण्याची आपल्यामध्ये काही आंतरिक क्षमता आहे का? जर हो तर कशी?
श्री श्री रविशंकर: हो. जर तुम्हाला नवीन काही काम चालू करायचे असेल तर प्रथम निश्चल बसा आणि शांत व्हा आणि तुमच्या आतील अंतःप्रेरणेला ऐका.  मगच कामाला लागा.


प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणालात की आपल्यामध्ये शक्ती,कौशल्य,निष्ठा आणि स्वातंत्र्य पाहिजे. कृपा करून प्रत्येकाचे महत्व सांगा.
श्री श्री रविशंकर: सर्वप्रथम मुक्तता अनुभवा. मुक्ततेमुळे प्रेमभाव येतो.
जर तुम्हाला सीमित आणि बांधील वाटत असेल तर तुमच्यात प्रेम किंवा निष्ठा जागृत होणार नाही. म्हणून सर्वात अगोदर तुम्हाला आतून स्वातंत्र्याचा अनुभव व्हायला पाहिजे.
आंतरिक स्वातंत्र्यामुळे प्रेम आणि निष्ठा जागी होते. त्यामुळे शक्ती प्राप्त होते आणि शक्तीबरोबर युक्तीदेखील येते.


प्रश्न: माया काय आहे? या मायेचा स्वीकार करावा की तिच्या विषयी प्रश्न करावे? हे पूर्णपणे समजणे इतके कठीण का आहे?
श्री श्री रविशंकर: जे दिसते पण तुम्ही जेव्हा पकडण्याचा प्रयत्न करता तेव्हा हातून निसटते ते माया आहे. हीच तर माया आहे.
काहीतरी दिसते आणि तुम्ही जाऊन पकडता पण पकडू शकत नाही. असेच तर हे सगळे जग आहे. तुम्ही काहीतरी सुंदर पाहता आणि ते धारण करायला पाहता. ज्याक्षणी तुम्ही ते धारण करता त्याचे सौंदर्य गायब होते. तुम्ही त्याबद्दल जो विचार करत होतात तिथे ते अजिबात नसते.
आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही आनंदाच्या मागे धावता आणि तो तिथे नसतो जेव्हा तुम्ही तिथे पोहचता.
एकदा एका भूतपूर्व पंतप्रधानांचे शेत घर दिल्लीपासून ३५ किलोमीटरवर होते. त्यांनी मला एका रविवारी आमंत्रित केले म्हणून मी तिथे गेलो होतो. त्या  घरात ते मला म्हणाले,"गुरुजी,गेली २६ वर्षे पंतप्रधान बनण्याचे माझे ध्येय होते. आता पंतप्रधान झाल्यावर मला वाटते की मी काय अविवेकी गोष्ट मागितली! आधी मी अंगणात पलंग टाकून निसर्गाचा आनंद घेऊ शकायचो, पण आता पहा ना माझ्याभोवती किती रक्षक बसले आहेत. मी माझे स्वातंत्र्य गमावून बसलोय. जेव्हा पाहिजे तेव्हा मी बाहेर जाऊ शकत नाही. आता माझ्याच घरात मीच कैदी होऊन बसलो आहे."
ते म्हणाले,"मी आता बाहेर जाऊ,बसू किंवा झोपू शकत नाही. सभोवती कायम रक्षक असतात. आणि आता मला सगळे काही व्यर्थ वाटते. ही खुर्ची मिळवण्यासाठी मी काय नाही केले. आणि आता मला सगळे व्यर्थ वाटते."
मी म्हणालो, "तुम्हाला हे लक्षात आले ,तुम्ही फार भाग्यवान आहात. कित्येक लोकांना हे कधीच समजत नाही आणि हे  न समजताच त्यांची ईहलोकाची यात्रा संपते."
असो...ते फार काळ काही पंतप्रधान राहिले नाही.
म्हणूनच याला माया म्हणतात.


प्रश्न: गुरुजी सर्व ग्रंथांनी जाहीर केले आहे की बाह्य जग हे माया आहे. परंतु वेदांताप्रमाणे हे अज्ञान आहे. या दोन वाक्यांचा मेळ कसा करायचा?
श्री श्री रविशंकर: मायेचे दोन अर्थ आहेत.
सर्वप्रथम म्हणजे जे आपण पकडू शकत नाही ती माया.
मायेचा दुसरा अर्थ आहे जे मोजता येत नाही ते.
"मिय" म्हणजे मोजणे. ही संपूर्ण सृष्टी  मोजता येते म्हणून हिला माया म्हणतात.
सत्य, प्रेम, सौंदर्य हे मोजता येत नाही. तुम्ही असे नाही म्हणू शकत की माझ्याकडे तीन किलो प्रेम किंवा दोन लिटर सौंदर्य किंवा दहा किलो सत्य आहे. तुम्ही ते मोजू शकत नाही. हे अपरिमित आहे म्हणजेच माया नाही.
दिव्यत्व मोजता येत नाही. स्वत्वाचे मोजमाप होऊ शकत नाही. चेतनेची गणना करता येत नाही. पदार्थ मोजता येतात आणि म्हणून ते माया आहेत.
अज्ञान हे संवेदनेत असते. सूर्य अस्त होतो आहे आणि तुम्ही विचार करता की सुर्यचा अस्त झाला तर ते अज्ञान आहे कारण सूर्याचा अस्त होत नाही. पृथ्वी भ्रमण करते आहे. तर मग सूर्याचा अस्त होतो आहे असे तुमचे विचार करणे हे अज्ञान आहे.
पृथ्वी भ्रमण करते आहे-हे ज्ञान आहे. सूर्याचा अस्त होतो आहे आणि पृथ्वी भ्रमण करत नाही याची संवेदना हे अज्ञान आहे.
असे दिसते की वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात आणि असे वाटते की ते सगळे वेगवेगळे माणसे आहेत. ही समजुतीची एक पातळी आहे. परंतु अंतिम सत्य तर हे आहे की सगळ्यांमध्ये एकच चेतना आहे. हे ज्ञान आहे.
जर तुम्ही मागे वळून तुमचे निर्णय  पाहिलेत तर असे दिसून येईल की ते सगळेच्या सगळे चुकीचे होते. तुमच्यापैकी किती जणांनी हे अनुभवले आहे?
तुम्ही तुमचे मत बनवता आणि थोड्या वेळानंतर तुम्ही विचार करता," अरे नाही हे असे नाही"
जे होते त्यापेक्षा तुम्हाला काही भलतेच वाटले. हे अज्ञान आहे. बहुतेक वेळा तुम्हाला वाटते तसे अजिबात होत नाही.
निवडणुकीच्या आधी सर्वेक्षण अनुमानाच्या टेप बघाल तर त्यात सगळे लोक बरेच काही  बोलतात. त्याच्या दोन दिवसांनी,मत मोजणी नंतर, जर या टेप पुन्हा पाहाल तर तुम्हाला वाटेल,"अर् देवा! कित्येक तास या माणसांचे अज्ञानात व्यर्थ गेले."
अंतःस्फुर्ती असलेला कोणी असेल तर हा माणूस जिंकेल असे सांगू शकेल. टीव्हीच्या असंख्य वाहिन्यांमध्ये येव्हढे अनुमान बांधणें सुरु असते--इतक्या तासनतासाच्या चर्चा, हे सर्व तुम्हाला अज्ञान वाटेल.
कारण तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही अनुमान लावता, अंदाज करता आणि स्वतःच काही सिद्धांतावर पोहचता. हे सर्व मजेशीर आहे!


प्रश्न: गुरुजी,मी कामवृत्तीने आणि तश्याच क्रीडांनी खूप काळापासून अतिशय झपाटलेलो आहे. मी कशावरही लक्ष्य केंद्रित करू शकत नाही. मला यातून बाहेर यायचे आहे परंतु मी येऊ शकत नाही. मी जर स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला तर मला गुदमरल्यासारखे आणि दाबून ठेवल्यासारखे वाटते.
श्री श्री रविशंकर: जर तुम्ही स्वतःला सृजनशील कामात गुंतवले तर या वासना तुम्हाला त्रास देणार नाहीत. जर तुमच्याकडे करायला काही नसेल, काही मिळवण्यावर लक्ष केंद्रित नसेल,किंवा काही सृजनात्मक कार्य नसेल,किंवा काही लक्ष्य किंवा वृत्ती समर्पित नसेल तर मग तुमच्या उर्जेला बाहेर पडण्याचा मार्ग कामभावना असणे साहजिक आहे. याचा तुम्हाला दिवस न रात्र त्रास होईल.  तुम्ही मग अश्लील संकेतस्थळावर जाल आणि झोपेचे खोबरे करून बसल.
एक तरुण मला सांगत होता की तो असे सगळे बघतो आणि मग त्याला अजिबात झोप येत नाही. तो झोपायचे विसरून गेला आहे. हेच होणार.
स्वतःला गुंतवून घेणे हे तुमच्यातील उर्जेला योग्य वाट देण्याचा उत्तम उपाय आहे.
तुमचे शाळा कॉलेजातील परीक्षेचे दिवस आठवा,तुमची काम वासना किमान होती कारण तुम्हाला काही मिळवायचे होते. दिवस न रात्र तुम्ही पाठांतर करायचात किंवा पाठ्यपुस्तक वाचायाचात. तूच्याकडे कशासाठीही वेळ नव्हता. परीक्षेच्याकाळात तर काम वासना कधीच डोकवायची नाही. पण जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा काय होईल? तुम्ही तुमच्या तारुण्यात आहात.
तुमच्याकडे पर्याय आहेत:
प्रथम म्हणजे स्वतःला सृजनात्मक कार्यात गुंतवणे.
दुसरे म्हणजे तुमच्या जेवणाकडे लक्ष्य द्या. जर तुम्ही जास्त जेवलात आणि त्या सगळ्या अन्नाचे उर्जेत रुपांतर झाले तर त्या उर्जेला बाहेर निघण्याचा मार्ग लागेल आणि जर तुम्ही व्यायाम किंवा योग किंवा प्राणायाम करत नसाल तर नक्कीच काम वासना उसळेल.
तिसरे म्हणजे संप्रेरकांचे(हार्मोन्सचे) असंतुलन असेल तर जास्तीच्या संप्रेराकांमुळे भावातीरेक होऊ शकतो. चौथे म्हणजे हे वयानुसार होते. थोडे वर्षे थांबा आणि ही समस्या गायब होऊन जाईल. वय वर्षे १५ ते ४०-४५ च्या दरम्यान कामुक भावना त्रास देतात. पण जर तुम्ही वयाची ६० ओलांडली आहे आणि तरीदेखील तुम्हाला हा त्रास असेल तर मग तुम्ही म्हणू शकता ,"मी काम वासनेने झपाटलेलो आहे" आणि मग तुम्हाला खरोखरच गंभीर समस्या आहे. तुम्हाला वैद्यकीय  मदतीची गरज आहे.
तर मग या सगळ्याची काळजी घ्या.जर तुम्ही सोळाव्या वर्षात,विशीत किंवा तिशीत असाल तर ही क्षणिक अवस्था आहे आणि वयाचा परिणाम.


प्रश्न: गुरुजी, माझे कुटुंब बोलताना अर्वाच्य शब्द वापरते. शुद्ध भाषा बोलणे किती महत्वाचे आहे? याचा काही चांगला अगर वाईट परिणाम होतो की हे फक्त ऐकणाऱ्याला सुसंस्कृत वाटावे म्हणून?
श्री श्री रविशंकर: तुमच्या लक्षात आले आहे आणि तुम्ही ते अंमलात आणत नाही. जर तुमचे पालक अर्वाच्य शब्द वापरत असतील तर काय करायचे? तुम्ही त्यांना एका रात्रीतून बदलू शकत नाही.
तर मग तुम्ही अशी भाषा वापरणे बंद करा आणि याची खात्री करून घ्या की तुमच्या मुलांच्या कानावर असे शब्द पडणार नाहीत.
व्यक्तीमधील सात्विकता जशी वाढत जाते तस तशी भाषादेखील अपोआपच सुसंस्कृत होत जाते. हे तुमच्या शरीरातील सत्विक्तेवर अवलंबून आहे. याला तुम्ही सवय म्हणा अगर संस्कृती पण सत्य हेच आहे.


प्रश्न: गुरुजी, तुम्ही आम्हाला वर्तमान क्षणात राहण्यास सांगता, तर मग साधकाच्या साधनेत भूतकाळाचे आणि भविष्याचे काय महत्व आहे?
श्री श्री रविशंकर: हो,वर्तमान क्षणात राहा. भूत आणि भविष्य हे वर्तमानात अंगीभूत आहे. वर्तमानात सर्व उपलब्ध आहे. भूतकाळातील धडे विनासायास तुम्हाला उपलब्ध असतील आणि भविष्यात तुम्हाला काय करायची गरज आहे, ही अंतःस्फुर्ती स्वभाविकपणे घडून येईल.


प्रश्न: गुरुजी, कृपा करून योग वसिष्टांच्या ज्ञानाबद्दल काही बोला. मी जे काही वाचले त्यात माझा गोंधळ उडाला आहे. कृपया हा गोंधळ दूर करा.
श्री श्री रविशंकर: तुम्ही मला असा काही सांगता आहात जे माझे काम नाहीये. माझे काम आहे अजून गोंधळ वाढवणे. दरवेळेस तुम्ही गोंधळात पडता तेव्हा एक पायरी वर च ढता. तर मग गोंधळात पडणे माझे काम आहे आणि त्यातून बाहेर येणे ही तुमची कसरत.जर योग वसिष्ट तेच काम करीत असतील तर उत्तम!


प्रश्न: गुरुजी,युद्धाच्या आधी अर्जुनाला वाटले की कौरवांना मारल्यानंतर तो खुश होईल. पण ही मनःस्थिती समरांगणात पोहोचल्यावर बदलली. त्याचप्रमाणे,सत्संगामध्ये आम्ही होकारार्थी माना डोलावतो आणि जेव्हा ज्ञानाचा वापर करण्याचा प्रसंग येतो तेव्हा फार कठीण वाटते.
श्री श्री रविशंकर: "जे काही माझ्यासाठी सोपे आणि बिनासायास आहे मी फक्त तेच करणार" हे सूत्र घ्या.
या जीवनात ज्ञानाच्या सूत्रां इतके सोपे काही नाही.
जे दिसायला कठीण दिसते ते खरे तर फार सोपे असते आणि जे दिसायला सोपे दिसते तेच खरे तर फार अवघड असते. फक्त हे लक्षात ठेवा!


प्रश्न: गुरुजी, कृपा करून आम्हाला हिंदू देवता आणि त्यांच्या वाहनांबद्दल सांगा. या वाहनांमागे खरा अर्थ काय आहे?
श्री श्री रविशंकर: त्या मागे खरच अर्थ दडलेला आहे.
जेव्हा विशालाक्षी मंटप बांधत होतो तेव्हा आम्ही समोर नंदी ठेवणार असा विचार देखील केला नव्हता. एक सज्जन गृहस्थ आले आणि म्हणाले,"गुरुजी,अमेरिकेतील माझ्या एका नातेवाईकाला तिथे देऊळ बांधायचे होते पण ते आता या जगात राहिले नाहीत.आम्ही नंदी आणि नटराज यांच्या मुर्त्या मागवल्या,पण आम्ही त्या आमच्या घरी ठेऊ शकत नाही कारण त्या खूप मोठ्या आहेत.तुम्ही कृपा करून त्या इथे ठेऊन घ्याल का?"
आणि त्याने नंदी आणि नटराज यांची इथे रंगमंचावर स्थापना केली.
त्यानंतर मुंबईला सत्संग होता तेव्हा तिथे राजहंस होते. कोणीतरी ते हंस मुंबईहून इथे आणून ठेवले.
पुढे कोणीतरी गरुड घेऊन आले. हा गरुड इंडोनेशिया येथून जहाजातून आणला गेला.
मी हे काहीच योजले नव्हते,ही वहाने आपणहून आली.
गुरु पीठामध्ये,ब्रह्माचे वाहन हंस,विष्णूचे गरुड आणि शंकराचा नंदी ही तीनही वाहने आली आणि स्वतः योग्य क्रमाने स्थानापन्न झाली.
ही वाहने प्रतिक आहेत. हा प्रत्येक प्राणी किंवा पक्षी आपल्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचे वैश्विक किरण किंवा जैविक  उर्जा पृथ्वीवर घेऊन येतात हाच वेगवेगळ्या वाहनांमागचा खरा अर्थ आहे. उदाहरणार्थ एक सिंह विशिष्ट उर्जा घेऊन येतो, कावळ्याची स्वतःची विलक्षण उर्जा असते. त्याचप्रमाणे गाय,हंस इत्यादी. स्वतःची  जैविक  उर्जा आणतात. म्हणूनच असे म्हणतात की प्राणी किंवा पक्ष्यांची एक जात देखील नष्ट झाली तर ही पृथ्वी कार्य करू शकणार नाही. वैज्ञानिक असे म्हणतात आणि हे खरे आहे.


प्रश्न: गुरुजी,५००० वर्षापूर्वी तुमचे वाहन रथ होते. आता तुम्ही तुमचे वाहन म्हणून इनोव्हा गाडी निवडलीत.
श्री श्री रविशंकर: मला वाटले की मी तुमच्या हृदयात वसलो आहे, पण तुम्ही मला इनोव्हात बसवता.
मला प्रत्येकाच्या हृदयात बसायला आवडते.


प्रश्न: गुरुजी,आज मी इथे मनःशांतीच्या शोधात आलो आहे परंतु समस्यांपासून पळ काढल्यामुळे मला अपराध्यासारखं वाटते आहे. मनःशांतीचा निश्चित अर्थ काय? समस्यांपासून पळ काढणे की समस्यांना तोंड देणे?
श्री श्री रविशंकर: हे बघा समस्या सोडवण्यासाठी देखील मनःशांतीची गरज आहे. तर मग तुम्ही इथे मनःशांतीकरिता आला आहात तर समस्यांपासून पळ काढाल असे अपराध्यासारखे वाटणे बंद करा.
जर तुम्हाला समस्येला तोंड द्यायची पाळी आली तर तुम्हाला काहीही पर्याय उरणार नाही. तुम्हाला त्याला तोंड द्यावेच लागेल. समजले?
पण जेव्हा तुम्ही येव्हढे थकलेले आहात की तुम्ही समस्येला हाताळू शकत नाही तेव्हा ती समस्या सोडवत बसण्यात काही अर्थ नाही. सर्व प्रथम तुम्ही सज्ज व्हा.
स्वतःला सज्ज करण्याकरिता मनःशांती ही पहिली पायरी आहे. एकदा का तुम्हाला शांतता आणि आंतरिक जोश मिळाला की मग तुम्ही कोणत्याही अडचणीला तोंड देऊ शकता.
असे करताना तुम्हाला काहीच त्रास होणार नाही.


प्रश्न: सत्संगमध्ये जेव्हा लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्याचे उत्तर तुम्ही केवळ त्या प्रश्नकर्त्या माणसापुरते सांगता का ते सगळ्यांसाठी असते?
श्री श्री रविशंकर: दोन्ही!
तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतायेत, बरोबर?
जे काही उत्तर मी देतो, तुमचे शंका समाधान तर होते आहे आणि त्याद्वारे अशाच परिस्थितीत असलेल्याला देखील मार्गदर्शन होते.


प्रश्न:  हे जग अमंगल मुक्त होणे शक्य आहे का?
मी ऐकले आहे की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा राक्षस होते. आज मी बघतो की दुष्ट आणि चांगले,तम आणि प्रकाश अशा विरोधाभासात आपण जगतो आहे.
श्री श्री रविशंकर: बरोबर!
मी तर असे देखील ऐकले आहे की कोण्या अध्यात्मिक संस्थेची महिला म्हणाली,"आत्मा सतयुगात संपूर्ण पवित्र होता आणि कालांतराने त्याचे पावित्र्य कमी होत गेले आणि कलीयुगात तो पूर्णपणे अपवित्र झाला आहे." हे असे काही नाही.
सतयुगात हिरण्याक्ष,हिराण्याकाशिपू असे राक्षस होते आणि देवाला चार वेळा अवतार घेऊन त्यांचा पृथ्वीवरून नाश करावा लागला.
तर हे राक्षस केवळ कलीयुगात किंवा द्वापारयुगात होते असे नाही. या सर्व चुकीच्या संकल्पना आहेत आणि एकदम चुकीच्या समजुती. मला हे कळत नाही की हे लोक अशा गोष्टी कशा काय बोलू शकतात की आत्म्याचा ऱ्हास झाला आणि अस झाल आणि तस झाल.
आत्मा म्हणजे खाली येणारा लाल ठिपका नाही. आत्मा अंतरिक्षाप्रमाणे सदैव पवित्र,सदैव मुक्त,निर्लेप आहे.
या आसुरी शक्ती आणि दैवी शक्ती या नेहमी कायम होत्या.
आसुरी शक्तींना दैवी शक्तीच्या पायाखाली ठेवले की चांगले युग येते. पण जर आसुरी शक्ती दैवी शक्तीच्या वर असेल तर मग दुःख आणि दैन्य येते.
तर समाजात वाईट प्रवृत्ती कायम असणार. पण त्यांची संख्या कमी किंवा जास्त असणे समाजाच्या स्वास्थ्यवर अवलंबून आहे.
घर कितीही मोठे आणि सुंदर असले तरी घरात कचराकुंडी ही असणारच. ही कचराकुंडी घराच्या कोपऱ्यात असणार आणि त्यात सगळा कचरा टाकलेला असेल आणि झाकून ठेवलेला असेल. असे नाही केले तर संपूर्ण घर हे कचराकुंडी दिसेल.
हाच फरक आहे. एक तर तुमच्याकडे कचऱ्याची नीट विल्हेवाट लावलेली कचराकुंडी असेल किंवा मग घर भर कचरा असेल, आणि घरात केवळ एकच जागा स्वच्छ असेल. त्याचप्रमाणे दैवी शक्ती आणि आसुरी शक्ती आपल्या ग्रहावर अस्तित्वात राहतील. कधी एक वरचढ असेल तर कधी दुसरा.


प्रश्न: एवढ्या मर्यादानिर्बंध आणि अडचणी असलेल्या या सामाजिक जीवनात मी लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुम्ही कृपा करून मला सल्ला द्या की मी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित कसे करू ?
श्री श्री रविशंकर:  तर तुमची इच्छा केंद्रित होण्याची आहे. हे फारच चांगले आहे,तुम्ही आत्तापासूनच केंद्रित व्हायला लागला आहात. तुम्हाला केंद्रित होण्याची जाणीव आहे आणि तुमचे लक्ष विचलित होत आहे हे देखील जाणवते आहे,याचा अर्थ तुम्ही केंद्रित आहात. याबाबत शंका घेऊ नका,ठीक आहे?
लक्ष केंद्रित करणे वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान,प्राणायाम,आणि सत्संग करीत आहात ते एकदम योग्य आहे. लक्ष केंद्रित होणे चालू आहे.
तसेच तुमचे लक्ष्य कशामुळे विचलित होते त्याचे निरीक्षण करा. तुम्ही जास्त चित्रपट पाहता,हो ना?! हेच तुम्ही करता,बरोबर?
(उत्तर-हो)
जेव्हा तुम्ही जास्त चित्रपट बघता तेव्हा तुमच्या मनावर खूप अभिव्याक्तींचा मारा होतो आणि मग मन गोंधळून जाते. याची सवय होते ज्याप्रमाणे चित्रपट पहाण्याची होते तशी. एका आठवड्यासाठी चित्रपट बघणे कमी करा.
जेव्हा तुम्ही कामाहून दमून येत तेव्हा मस्तपैकी ताणून द्या.


प्रश्न: कुठलीही कृती करण्याचा उद्देश्य काय? त्या कृतीसाठी मी शंभर टक्के दिले हे कसे कळणार? मी जेव्हा कधी भूतकाळातील कृतींचा विचार करतो तर मला वाटते की मी अजून चांगल्या प्रकारे करू शकतो.
श्री श्री रविशंकर: हे फार चांगले आहे! याचा अर्थ तुम्ही स्वतःची कुवत ओळखू लागला आहात. तुम्ही चांगल्या परिस्थितीत आहात,तर मग काळजी करू नका.
उद्देशशिवाय कोणती कृती घडत नाही. जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुम्हाला त्याचा उद्देश्य आधीच माहिती असतो.


प्रश्न: गुरुजी, जर तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा आहे आणि जर तुम्हाला कोणी सांगितले की तुमच्या पत्रिकेत याचा योग नाही पण तुमचा स्वतःवर विश्वास आहे तर काय करायचे?
श्री श्री रविशंकर: दुसऱ्या पत्रिका पाहणाऱ्याकडे जा!
जर सगळेजण हेच सांगत असतील तर मग नोकरी पत्करण्यात हुशारी आहे कारण तुमचे मन तुम्हाला खात राहील,"पहा सगळ्यांनी सांगितले होते की व्यवसाय माझ्यासाठी योग्य नाही."


प्रश्न: गुरुजी, मला ज्ञानाचा प्रसार करणे आणि बाकीच्या तरुणांना yes+ कार्यक्रमात आणणे अशी सेवा करायला फार आवडते,पण माझ्या पूर्ण दिवस बाहेर असण्यामुळे माझे पालक खुश नाही.कधी कधी मला घरी पोहचायला फार उशीर होतो. ही परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मला मार्गदर्शन करा.
श्री श्री रविशंकर: जर तुम्हाला रोज रोज उशीर होत असेल तर पालकांना तुमच्याबरोबर वेळ मिळावा ही अपेक्षा साहजिक आहे. सेवा आणि घरची कर्तव्य यांच्यात समतोल साधा. घरी काय हवे नको ते पाहणे देखील गरजेचे आहे. समतोल कसा साधावा हे तुम्हाला माहिती आहे,बरोबर? हो! तर मग हे करा.


प्रश्न: देवाचा उगम कसा झाला?
श्री श्री रविशंकर: पहिले तुम्ही मला सांगा की टेनिस बॉलचा आरंभ बिंदू कोणता? कोणता आरंभ बिंदू आहे? नाही!
त्याचप्रमाणे देव हा अनादी (सुरुवात नसलेला) आणि अनंत(शेवट नसलेला) आहे.


प्रश्न: गुरुजी, वेगवेगळया धर्मात निरनिराळ्या रुढी का आहेत?
श्री श्री रविशंकर: का असू नयेत? सगळे काही समान का असावे? देवाला विविधता आवडते. त्याला तुम्ही फक्त बटाटे खाऊन नाही ठेवले पाहिजे. तसे असते तर त्याने जगात केवळ एकच भाजी बनवली असती...बटाटे. विविधता स्वाभाविक आहे.


प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणालात की आपण लाच देऊ आणि घेऊ नये. २००९ साली आगगाडीमध्ये प्रवासात माझ्या पतींचा मृत्यू झाला.चार लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून मंजूर झाले. वकील म्हणाले की जर आपण पंचवीस हजार रुपये लाच दिली तर काम लवकर होईल. नाहीतर केस उच्च न्यायालयात जाईल आणि अजून दोन वर्षे लागतील. आम्ही काय करावे?
श्री श्री रविशंकर: त्यांना सांगून बघा की त्यांनी लाच न घेता काम केले तर बरे होईल. नाहीतर मग तुम्ही लोकायुक्तांकडे अहवाल द्या. हा पक्का निर्णय घ्या की तुम्ही लाच देणार नाही. फार दिवस या लोकांचे हे सगळे चालणार नाही.
तुमच्या सोबत पाच सहा लोक घेऊन जा.
इतक्यातच अहमदनगरमधील आपल्या केंद्रासमोरील रस्त्याचे डांबरीकरण करणे जरुरी आहे. अधिकाऱ्यांनी काम झाले अशी नोंद केली जेव्हा की काहीच काम नव्हते झाले आणि कामाचे पैसे त्यांनी स्वतःला घेतले. आपले जवळ जवळ तीस तरुण महापौरांच्या कार्यालय समोर धरणे धरून बसले आणि म्हणाले की ना आम्ही ही जागा सोडू ना महापौरांना ही जागा सोडू देऊ जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. रस्ता दुसऱ्या दिवशीच दुरुस्त झाला!


प्रश्न:  (त्याच गृहस्थाकडून) काही लोकांनी सल्ला दिला की सुरुवातीला आम्ही लाच देण्याची तयारी दाखवावी एका अटीवर की आम्ही लाच काम झाल्यावर देऊ. एकदा का काम झाले की आपण म्हणू शकतो की आता आम्ही तुम्हाला काहीच देणार नाही. हा सल्ला आम्ही ऐकावा काय?
श्री श्री रविशंकर: हो,तुम्ही असे डावपेच वापरू शकता.


प्रश्न: गेल्या ऑगस्टमध्ये माझ संपूर्ण सोन चोरी झाल. मला ह्या गोष्टीने पछाडले आहे. मी माझे लक्ष्य केंद्रित करू शकत नाही,खास करून सुदर्शन क्रिया करताना.
श्री श्री रविशंकर: जे व्हायचे होते ते होऊन गेले. आपले शरीरदेखील एक दिवस जाणार आहे. हे लक्षात ठेवा आणि शांत व्हा.
जे जायचे होते ते गेले. आता आपण काय करू शकतो?
ब्रिटीशांनी ९०० जहाज भरून सोने आपल्या देशातून नेले. शंभर करोड लोक काही करू शकले नाही. अशा प्रकारे त्यांनी आपला देश लुटून नेला. मोठ्या दृष्टीकोनातून विचार करा. आतासुद्धा आपला देश लुटला जातो आहे.

The Art of living
© The Art of Living Foundation