अज्ञान दूर करण्याची गरज आहे.

मार्च ०६, २०१२
मी जे काही बोलायचे ठरवले होते ते मुख्यमंत्री श्री. शिवराजजी यांनी बोलून  दाखवले आहे.  जेंव्हा मने जुळली असतात तर इतर काहीच  बोलून दाखवायची गरज नसते. इंग्रजी मध्ये Indoor आणि  Indore मध्ये अगदी थोडासा फरक आहे. Indoor म्हणजे आत जाणे आणि Indore म्हणजे अंतर्मुखी सदासुखी. जेंव्हा मन काहीवेळापुरते का होईना अंतर्मुख होते, तेंव्हा अशी शक्ती जागृत होते.

माननीय मुख्यमंत्री श्री शिवराजजी यांनी “मुलगी वाचवा चळवळी” बद्दल सांगितले आहे. मी ह्याच्या बद्दल ह्याआधी पण  अनेकवेळा बोललो आहे आणि मी नेहमी ह्याबद्दल सांगत राहीन. जसे  गो हत्या म्हणजे सर्वात मोठे पाप आहे. आपल्या पुराणात पण सांगितले आहे कि १०० गाईंना मारणे म्हणजे एका विद्वानाला मारणे. १००  विद्वान माणसांना मारणे म्हणजे एका संत  माणसाला मारणे. आणि १०० संताना मारणे म्हणजे एका मुलीचा जीव घेणे.
एका मुलीचा जीव घेणे म्हणजे जवळ जवळ १००,००० गाई किंवा १००० संताना मारणे. आईच्या पोटातच मुलीचा जीव घेणे हेच बरोबर नाही. तुम्ही सर्व सुशिक्षित आहात, आज सर्वानी मिळून शपथ घ्या कि हे कृत्य आम्ही पुन्हा करणार नाही. ( जमलेल्या लोकांनी तशी शपथ घेतल्यावर) छान!
इथे येण्याआधी मी जेंव्हा विद्यापीठात भाषण देत होतो, तेंव्हा मला असे कळले कि इथे रोज एक आत्महत्या होते. मी तुम्हाला सांगतो कि, आपले आयुष्य हे खूप अनमोल आहे  ते असे वाया घालवू नका.
तुम्हाला आत्महत्या का करावाशी वाटते? लोक आत्महत्येकडे का वळत आहेत? केवळ परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून, का  कर्ज खूप वाढले म्हणून, का एखाद्या मुलीने किंवामुलाने नकार दिला  आणि  म्हणून प्रेमात अपयश आले म्हणून? हे सर्व सोडून द्या!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही रस राहिला नाही म्हणून तुम्ही आत्महत्येचा विचार करता काय?
मी तुम्हाला सांगतो कि तुम्ही माझ्याकडे या आणि   तुमच्या सर्व चिंता, , भय,  अडचणी माझ्याकडे  सोपवा.
आपल्याकडे आपण माता, पिता, गुरु आणि देव  ह्यांचा खूप आदर करतो. आपण लहानपणी काय करायचो? जेव्हा आपण दुखी व्हायचो तेंव्हा आपण “आई” म्हणून आईच्या कुशीत जायचो. होय कि नाही?
जेव्हा लहान मुलांना काही तक्रार असेल तर ते आईकडे जातात, पण आई जर त्याच्यावर नाराज असेल तर ते कोणाकडे जाणार? वडिलांकडे.
आपण शाळेत असताना शाळेतील तक्रार आपण आपल्या वर्ग शिक्षकास सांगायचो.
प्रत्येक  कुटुंबाचा एक संत, एक गुरु हा असतोच. आपण आपल्या सर्व अडचणी, तक्रारी  त्यांच्याकडे घेवून जायचो आणि त्यांच्या चरणी समर्पण करून मन मोकळे करायचो.
जर कुणाच्या  कुटुंबात गुरु नसेल तर ते आपले दुख तक्रारी आपल्या  कुलदैवत असलेल्या देवाला सांगतात. प्रत्येक  कुटुंबाचे एक  कुलदैवत  असते. ते आपले सर्व तक्रारी त्या देवाला समर्पण  करून मन मोकळे करतात.
सध्या आपण ह्या सर्व परंपरागत रुढी सोडून दिल्या आहेत. म्हणूनच ह्या आत्महत्या, गर्भपात  सुरु झाले आहे.
ह्याच मूळ कारण म्हणजे  अज्ञान.  आपण हे अज्ञान दूर केले पाहिजे. आपण सगळ्यांना साक्षर केले पाहिजे. साक्षरता म्हणजे फक्त  शालेय शिक्षण नव्हे तर अध्यात्मिक  ज्ञान सुद्धा, थोडक्यात म्हणजे मानवतावादी मूल्यांचे शिक्षण दिले पाहिजे.. मानवतावादी मूल्यांचे शिक्षण म्हणजे प्रेम, आत्मीयता, सभ्यता. जिथे आत्मीयता नसते तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. जर एकमेका विषयी आत्मीयता   असती तर भ्रष्टाचार कधीच सुरु झाला नसता.
अध्यात्म म्हणजे काय?  आपलेपणाच्या जाणीवेची पुढची पायरी म्हणजे अध्यात्म होय.. जेंव्हा सर्व लोकांमध्ये आपलेपणाची जाणीव होते तेच अध्यात्म. आपण अज्ञान दूर करून अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अन्याय सहन न करता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
तुम्ही कुठे भ्रष्टाचार बघितला तर ८-१० लोकांना घेऊन तेथे जा आणि मग   त्यांना सांगा कि आम्ही हे चालू देणार नाही.  भ्रष्टाचार तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून द्या, जसे आपण  कुटुंब प्रमुखापाशी हक्काने तक्रार करतो तसे न्यायासाठी आग्रह धरा.. आपल्याला टंचाई दूर करून पर्यावरणावर पण खूप काम करायचे आहे.
आपल्याला अज्ञान, अन्याय, अभाव, अस्वच्छता विरुध्द लढायचे आहे. जर आपण आठवड्यातील दोन तास सेवेसाठी दिले तर आपण हे शहर दोन आठवड्यात स्वच्छ करू शकू. हातात झाडू घेवून बाहेर पडा आणि स्वच्छता करा. शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्या. जर आपण सर्वानी हातभार लावला तर आपण खूप काही काम करू शकतो, खूप सेवा करता येईल.
याआधी मी इन्दोरला सात वर्षा पूर्वी आलो होतो. एवढ्या वर्षांत इथे इतकी सुधारणा झाली आहे कि मी   आताचे इंदोर ओळखलेच नाही. खूप सुधारणा झाल्या आहेत पण  सुधारणेबरोबर अस्वच्छता पण येते, प्लास्टिकचा कचरा सगळीकडे फेकणे, झाडे  तोडणे, हे न होता आपण पर्यावरणाची  काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. जर लोकांनी सहभाग घेतला नाही तर एकटी महानगरपालिका काय करेल? आपल्या सर्वाच्या सहकाराने आपण समाजातून अज्ञान, अन्याय काढून टाकू आणि जातपाती सारख्या गोष्टीचा फरक करणाऱ्या संकुचित  मनोवृत्तीचा नाश करूयात.
जेव्हा  आपला देश अध्यात्मात खूप वरच्या पातळीवर होता तो काळ खूप भरभराटीचा होता. कुठल्याही गोष्टीची  कमतरता नव्हती.  नारायणापाठोपाठ लक्ष्मी येतेच. त्याकाळी जेंव्हा आपण अध्यात्मात पुढे होतो तेंव्हा जगातील उत्पादनापैकी ३३% उत्पादन भारतात होत होते. जसे अध्यात्म कमी होत गेले तसे आपली आर्थिकस्थिती पण कमकुवत होत गेली. आपल्याला जागे व्हायची गरज आहे. हि कमरता दूर करण्यासाठी आपल्याला ह्यासाठी काही तरी केले पाहिजे.
मध्य प्रदेश हा आपल्या  देशाचे हृदय आहे. मला इथे बेरोजगारी अजिबात नकोय. सर्व युवकांना रोजगार  मिळाला पाहिजे.. आपल्या देशात नोकऱ्यांची काही कमी नाही.काहीजण तर म्हणतात आमच्याकडे काम भरपूर आहे पण काम करायला कामगार नाहीत. इकडे येताना एक सद्गृहस्थ म्हणाले कि आमच्याकडे काम भरपूर आहे पण आम्हाला कामगार मिळतच नाहीत. देशातील सर्व उद्योजक हेच म्हणतात कि आम्ही नोकऱ्या निर्माण करू शकतो, युवकांनी त्या स्वीकारल्या पाहिजेत. युवकांनी व्यवसाय क्षेत्रात उतरून व्यवसाय सुरु केले पाहिजेत.

ह्या सर्वाचे मूळ कारण म्हणजे आपण ऐकलंय कि देव आपल्यातच आहे पण त्याचा अनुभव आपण घेतला नाही. आपल्याला तो अनुभव घेतला पाहिजे. एकदा जर का हा अनुभव घेतला कि आपल्याला जाणवेल कि आपण जे शोधतोय ते आपल्या मध्येच समाविष्ट आहे आणि हे जाणल्यावर आपले स्मितहास्य कोणीही हिरावून नेवू शकणार नाही. आपल्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. त्यासाठी आपल्याला काही वेळ काढून स्वतः मध्ये डोकावून पाहिले पाहिजे..
काही वेळ तुम्ही एका जागी बसून मन शांत ठेवून साधना  केली तर, तुमच्या इच्छा पूर्ण होतीलच, पण तुम्हाला दुसऱ्याच्या इच्छा सुद्धा पूर्ण करता येतील कारण तुमच्यात  परमात्मा वास्तव्य करत  आहे.जर  परमेश्वर , जो कि या विश्वाचा मालक आहे आणि तोआपल्यात वास्तव्य करत  असताना आपल्याला कशाची  कमतरता भासणार नाही. . हि एक संकल्पना नाही, तर हे एक सत्य आहे. जे सर्व गोष्टींचा त्याग करून हिमालयात किंवा जंगलात जातात देव फक्त त्यांनाच भेटतो असा गैर समज करून घेवू नका. देव हा प्रत्येकामध्ये  असतो हा विश्वास म्हणजेच ध्यान होय.
मी हेच सांगायला इथे आलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी हेच सांगत असतो.देव तुमच्यातच आहे याची आठवण करून देण्यासाठी मी सगळीकडे जात असतो.जर तुम्ही रोज ध्यान केले तर ज्या गोष्टी साध्य करता येत नाही त्या आपण साध्य करू शकतो ह्यालाच अध्यात्म म्हणतात. आपण जर नुसता त्याचा विचार केला तरी आपले स्मितहास्य वाढेल. दु:ख नाहिसे होते.
हल्ली  असा एक विचार माझ्या मनात येतो कि आपल्या युवक वर्गाने जर थोडावेळ काढून देशसेवा केली तर आपला देश अजून जास्त  बलशाली होइल. प्रत्येक युवकांनी जर सहा महिने देशसेवा केली तर आपण  या चार समस्या (अज्ञान, अन्याय, अभाव, अस्वच्छता) घालवून टाकू. आपण गावोगावी जावून दारूची दुकाने बंद करून टाकू. कारण गरीब जनता ६०%  उत्पन्न दारूवर खर्च करते.
आपण लोकांना जैविक शेती बद्दल  शिकवले पाहिजे. मला कळलं कि मध्य प्रदेशात  बऱ्याच लोकांनी ह्याच्या वर काम केले आहे..
हल्ली कॅन्सर  सारखे अनेक दुर्धर रोग आपल्या देशात वाढत आहे, कारण कि आपण कीटकनाशके वापरून उगवलेले अन्न खातो. पूर्वीच्या काळी अन्नधान्यात किडामुंगी असायच्या, पण आताच्या काळात ते सापडत नाही कारण त्यांना पण हे अन्न आवडत नाही. मग काय होईल? तुम्हीच सांगा. अंगदुखी !!
तुमच्या पैकी कितीजणांना अंगदुखी आहे? हात वरती करा. आणि किती जणांना अंगदुखी नाही त्यांनी हात वरती करा. कदाचित तुम्ही प्राणायम, योगा, ध्यान, रोज करत असाल. काहीजणांना संकोच असल्यामुळे हात वरती करत नाहीत.
रोज थोडावेळ सत्संग करत जा. सत्संग म्हणजे कोणतीही कृत्रिमता नसलेली अध्यात्मिकता.  कुणी जर आपल्या घरी आले तर आपण त्यांचे स्वागत स्मितहास्याने “या या “ म्हणून करतो पण मनात म्हणतो हे आता कशाला आलेत? अशा रीतीने आपण कृत्रिम रीत्या स्वागत केल्यास आपल्या मनात उदासीनता येते. अशाने काही मानसिक रोग होवू शकतो. ह्या गोष्टीना दूर ठेवण्यासाठी आपण जसे आहोत तसे रहावे, अगदी नैसर्गिक साधे सरळ , आत्मविश्वासपूर्ण, आणि आध्यात्मिक राहिले तर,  त्याने आपले आयुष्य बदलून जाईल. जग या बदलासाठी तयार झाले आहे कारण आम्हाला उदासीनता आणि कमकुवतपणा याचा कंटाळा आला आहे.

उदासीनता सध्याचा सर्वात मोठा  शत्रू आहे. आपण जेव्हा लहान होतो तेंव्हा आपल्याला उदासीनता, मानसिक रोग काहीही माहित नव्हते. आता कुणाला पण विचारा एकच उत्तर आहे मी खूप उदास आहे. उदास कशासाठी? जर कोणी खुपच स्वार्थी असेल तरच उदास होतो आणि दुसरे काही कारण नाही. आपल्याजवळ जर आपले जवळचे असते तेंव्हा आपण खूप आनंदी असतो. आपल्याला कशाची हि काळजी नसते. ग्रंथात  “रसोमसा:” असे लिहिले आहे. परमात्मा म्हणजे काय? तो म्हणजे “रस रूपी” आहे. जेवढे तुम्ही परमात्मा जवळ जाल तेवढे तुमचे आयुष्य आनंदी होईल. तुम्हाला जीवनाचा जास्त आनंद घेता येईल. तुम्ही सगळे एकताय ना? मी जास्त बोलत नाही, नाहीतर लोकांना अजीर्ण होईल. जास्त जर एकले तर ते डोक्यावरून जाईल, थोडकेच एका आणि त्या गोष्टीवर नीट विचार करा,  मनन करा आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करा. सर्वात महत्वाचे काय? तर स्वत: साठी वेळ काढा. हे सर्व जग  हे एक स्वप्न आहे. ५,१०,१५ मिनिटे शांत बसा आणि विचार करा कि हे सर्व एकेदिवशी नष्ट होणार आहे. एक वेळ असा आहे कि आपल्या सर्वांनाच हि मायानगरी सोडून जायची आहे. काहीही न घेता, अगदी तुमचे कोठलेही गाठोडे न घेता. दुसरा कोणीतरी त्याची व्यवस्था करेल. जर आपण सकाळी किंवा संध्याकाळी ५ ते १० मिनिटे मन शांत ठेवून ध्यान केले तर  शरीर तंदुरुस्त राहील,  वागणूक चांगली होईल, मन शांत  राहील, बुद्धी तीक्ष्ण  होईल आणि मग,  ज्या काही इच्छा आहेत त्या आपोआप पूर्ण होतील. तुम्हाला जर एक छोटासा अनुभव आला तर तुम्ही ह्याला कधीच सोडणार नाही. हे एका नशे सारखे आहे. ध्यान, ज्ञान हे पण नशे सारखेच आहेत. आपल्या सभोवतालीचे वातावरण आनंददायी आणि सजीव होते. हे खूप महत्वाचे आहे. अशाचवेळी तुम्ही समाजासाठी काही करण्याची शपथ घेतली पाहिजे. तुम्ही जाणता कि आपल्या देशात निवडणूक पद्धती किती सडलेली आहे. ह्याला आपणच सुधारू शकतो. जर एखाद्या मंत्र्याने निवडणुकीसाठी ५ ते ६ करोड रुपये खर्च केले तर त्याला ते पैसे परत मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करावा लागतो.  अशी भ्रष्टाच्राराची व्यवस्था चालते.. हे अस  होवू नये.. ह्याच्या विरुद्ध तुम्ही ठामपणे उभे रहायला पाहिजे.. तुमच्यापैकी किती जणांना हे बरोबर वाटतय? हात वरती करा.
तामिळनाडू मध्ये निवडणुकीच्या वेळी लाल गांधी आणि हिरवा गांधी असे म्हणायचे. हिरवा गांधी म्हणजे ५०० रुपये आणि लाल गांधी म्हणजे ५००० रुपये. एका खेडेगावात  प्रत्येक  असे पैसे वाटले गेले.  कोणाला ५०० रुपये मिळाले तर कुणाला  ५०००  रुपये मिळाले.. आम्ही आमच्या भाषणातून आणि दूरदर्शन वरून सगळ्यांना सांगितले कि तुम्ही त्यांच्या कडून पैसे घ्या पण त्यांना आपले बहुमुल्य मत देवू नका. ते काही त्यांनी कमवलेला पैसा नाही, हा सगळा तुमचाच पैसा आहे. नाहीतर लोक म्हणतील कि गुरुजी आमच्यासाठी ५००० मोठी रक्कम आहे.हे राजकारणी लोक पैसे देवून मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावतात कि मत तुम्ह्लाच देवू. मी सांगतो तुम्हाला कि तुम्ही शपथ घ्या पण त्यांना मत देवू नका, शपथ तुटून पाप झाल्यास ते सांभाळायला मी समर्थ आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. सर्व जग आश्चर्यचकित झाले होते. हे राजकारणी लोक एवढा पैसा खर्च करून राजकारणात येतात त्यांना मुळासगट उपटून बाहेर टाकून द्यावे. मी परत एकदा सांगतोय कि ह्यासाठी आपल्याला गावोगावी जावून सर्वांना याबाबतीत जागरूक केले पाहिजे. कोणी जर राजकारणात पैसा आणि शारीरिक ताकद वापरून सत्तेवर येऊ पाहत असेल तर सर्व शक्ती निशी आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे.
मी इथल्या युवकांना आवाहन करतो कि तुम्ही नुसते बघत राहू नका. हा देश हा समाज तुमचा आहे. तुम्ही ह्याला सावरल पाहिजे. सगळ्यांना वाटते कि राजकारण खूप घाणेरडे क्षेत्र आहे. मला पण लोक म्हणतात कि गुरुजी तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका तुम्ही फक्त अध्यात्मा बद्दलच बोला. तुम्हाला काय वाटते? मी भ्रष्टाचाराविषयी बोलू नये, ते त्यांच्यावर सोडून द्यावे? कितीजणांना अस वाटत? मी सांगतो ते काही माझ्या हातात नाही, माझे अंर्तमन जे सांगते ते मी करतो. मी भ्रष्टाचाराविषयी बोलणार . हा अध्यात्माला सर्वात मोठा धोका  असून तो अध्यात्माचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्याला ह्या समाजातून भ्रष्टाचार, हिंसाचार, अंधश्रद्धा या सर्व शत्रूंचा नयनात केला पाहिजे.. हे सर्व एकाच ब्राह्मस्त्राने घालवू शकू आणि ते म्हणजे अध्यात्म. हे काय कायद्याच काम नाही. मी जाणतो कायदा महत्वाचा आहे पण ह्यासाठी  एक लोक चळवळ उभी करायला पाहिजे. आपण सगळे मिळून ह्याच्या विरुद्ध क्रांती करुया ज्यामुळे भविष्यात परत ह्या गोष्टी घडणार नाहीत. तुम्हाला काय वाटते? तुमच्यातील काही लोक हात वरती करीत नाहीयेत, तुम्ही जरा आजूबाजूला नजर टाका आणि पहा कि कोण हात वरती करीत नाहीये, त्यांना त्याचे कारण विचारा.
जसे कामगार संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत राहतात. पण त्याने त्यांचे काम होत नाही. जर आपल्या अंतर्मनात शांती नसेल तर त्यासाठी घोषणा देवून ती मिळणार आहे काय? ते अशक्य आहे. त्यासाठी आपल्या  बोलण्यात आणि कृती मध्ये  साधर्म्यअसले पाहिजे. आणि हे साधर्म्य फक्त अध्यात्मा मुळेच  येवू शकेल. दोन गोष्टीचा विचार करा एक म्हणजे स्वत:ला सशक्त बनवा, स्वत:वर विश्वास ठेवा आणि शपथ घ्या कि आम्ही सुंदर आध्यत्मिक समाज निर्माण करू.
प्रश्न: गुरुजी, अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचे संतुलन कसे करावे?
श्री श्री रविशंकर: अगदी  जस तुम्ही सायकल चालवता तसेच. आपण ज्यावेळेस अध्यात्म सोडतो त्यावेळेस आपल्या मनात कुठेतरी खंत जाणवते, एक टोचणी जाणवते,  मग परत अध्यात्म्याकडे वळण्याची गरज असते. जर तुम्ही  तुमच्या कामाकडे कानाडोळा करत असाल तर  तर त्याकडे नीट लक्ष द्या..  काम आणि अध्यात्म याकडे लक्ष देऊन पुढे चालत रहा..
प्रश्नं: बऱ्याचवेळा  अध्यात्मिक गुरु हे धीर गंभीर असतात, पण तुम्ही हसतमुख कसे? ह्याच रहस्य काय आहे?
श्री श्री रविशंकर: काय करू, मी असाच आहे!!!
प्रश्न: गुरुजी,अहंकारी लोकांना कसे हाताळावे?
श्री श्री रविशंकर: काळजी करू नका. त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना कोणत्या तरी गोष्टीमुळे दु:ख झालेले असते आणि हे लपविण्यासाठी ते अहंकार दाखवतात.

प्रश्न:  असे  म्हणतात कि आपण एकाच देवाला मानलं पाहिजे. अनेक देवांना मानलं ते काय होते?
श्री श्री रविशंकर: मागच्या वेळेस मी इन्दोरला भेट दिल्यानंतर थेट पाकिस्तानला गेलो होतो आणि तिथे पण हाच प्रश्न विचारला गेला होता कि आम्ही एकाच देवाला मानतो आणि तुमच्या देशात अनेक  देव आहेत असे का? ह्यावेळेस पण मी इथून पाकिस्तानला जाणार आहे. मार्च ११,१२ व १३ तारखेला माझा पाकिस्तान दौरा आहे. तिथे पण हजारो लोकांनी कोर्स केला आहे, सुदर्शन क्रिया केलीय. मुस्लीम समाजातील लोक पण मला भेटायला येतात. त्यावेळेस मी त्यांना ह्या प्रश्नाच उत्तर दिले. तुम्ही सामोसा, पराठा, कचोरी कशापासून बनविता? गव्हापासून ना !! तुम्ही फुलका, रोटी, पराठा पण गव्हापासूनच बनविता ना?
एकाच प्रकारच्या गव्हापासून  असे अनेक पदार्थ बनविता येतात. त्याचप्रमाणे देवाला  विविधता आवडते. ज्याप्रमाणे देवाने एकाच प्रकारची फळे भाजी न करता त्यामध्ये विविध प्रकार दिले आहेत, नाहीतर आयुष्यभर तुम्ही फक्त वांगीच खात बसला असता..त्याने कितीतरी विविध प्रकारच्या भाज्या बनविल्या आहेत नाही? त्याप्रमाणे देवाला पण स्वत:च्या बाबतीत विविधता आवडते, त्याला स्वतःला अनेक रूपातून रंगातून प्रगट व्हायला आवडते..   अनेक रूपे, अनेक नावे असतील- अनंत गुणमयी, अनंत नामे.. हजारो नावात, हजारो गुणात एकच परमात्मा आहे.मानव जातीला हे माहित आहे. हे समजून मानव जात आनंदी झाली आहे.तांदूळ एका प्रकारचा असतो पण त्याचं पासून डोसा, इडली आणि बरेच पदार्थ बनू शकतात.  जर तुम्ही केरळात गेलात तर भाताचे १० प्रकारचे पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील त्याप्रमाणे देव एकच आहे पण  त्याची नावे अनेक आहेत, गुण अनेक आहेत, रूपे अनेक आहेत. समजून घ्यायची हि योग्य पद्धत आहे.
प्रश्न: भ्रष्टाचार घालविण्यासाठी  अध्यात्म काय काम करू शकते?
श्री श्री रविशंकर: मी ह्या बाबतीत ह्या आधीच बोललो आहे.
प्रश्न: आपण जन्म का घेतो, जन्म घेवून  मृतहोवून परत जन्म घेण्यात काय  तथ्यआहे?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला खेळ माहित  आहेत का? तुम्ही खेळ का खेळता हे मला समजत नाही.तुम्ही क्रिकेट का खेळता? कोणीतरी एकजण लांबून पळत येवून चेंडू फेकतो आणि दुसऱ्या बाजूला एकजण फलंदाजीने तो चेंडू मारतो मग  त्या चेंडूच्यामागे सर्व खेळाडू तो पकडण्यासाठी पळतात. ह्याचा अर्थ काय? एकच चेंडू पकडण्यासाठी सर्व का पळतात, सर्वाना एकेक चेंडू देवून टाका प्रश्न सुटेल!! कुठल्यातरी दुसऱ्या ग्रहावरील कोणी आले आणि त्याने जर मैदानात जाऊन फुटबॉल सामना बघितला तर त्याला काहीच समजायचे नाही, कोणीतरी चेंडूला लाथ मारून तो एकीकडून दुसरीकडे टाकतोय, खेळाडू पळतआहेत, कोणीतरी पडतोय, उड्या मारतोय, त्याला काहीच समजणार नाही.. तो विचार करेल कि २२ माणसे एकाच चेंडूच्या मागे का धावतायत? सगळ्यांना एकेक  चेंडू का देत नाहीत.
ह्या प्रश्नाचे उत्तर जगभरात  कोणतीही संस्कृती देऊ शकली नाही. फक्त भारतीय  संस्कृतीने  ह्याचे उत्तर दिले. ते म्हणतात जीवन म्हणजे युद्ध नसून हा एक खेळ आहे. . जीवनाला खेळ म्हणणारी  संस्कृती म्हणजे फक्त भारतीयच आहे. हा खेळ परमात्म्याचा आहे, लोक जन्म घेतात, मृत्यू पावतात, परत जन्म घेतात, कर्म घडतात, ज्ञानाच्या लाटा येत राहतात, मध्येच भक्ती उदयाला येते, कर्मे धुतली जातात, परत कधीतरी अज्ञान दिसू लागते, आणि मग त्याचा निकाल लावायला परमात्मा अनेक क्रिया करतो हा सर्व आपल्या जीवनाचा एक भाग आहे. परमात्मा लांब कोठेतरी बसलेला नाहीये, तो तर आता येथे आपल्या हृदयात वास करीत आहे.


प्रश्न: देव आपली परीक्षा भक्ती, कर्म, शक्तीने पाहतो कि आणि दुसऱ्या काही अध्यात्मिक गोष्टी आहेत?
श्री श्री रविशंकर: देवावर कोणताच डाग नाहीये. जर तुमच्याकडे भक्ती असेल तर ती तुमच्यासाठी चांगली आहे देवाला नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन हलके वाटेल. जर तुम्ही नेहमी  ज्ञानात असाल तर तुम्हाला दु:खापासून स्वातंत्र्य मिळेल.
प्रश्न: जर गुरु भक्ती करताना घरातील जबाबदारी मधे आली  तर काय करावे?
श्री श्री रविशंकर: नाही , तस होवू शकणार नाही. तुमची जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडा हेच तुमचे गुरु तुम्हाला सांगतील. सर्व गुरू हेच सांगतील कि घरातील जबाबदारी व्यवस्थित पार पाडा आणि थोडा स्वत:साठी थोडा वेळ काढून ध्यान करा. जगातील मन विषण्ण करणाऱ्या घटनांचा फारसा विचार न करता, स्वतःसाठी थोडा वेळ काढून ध्यान करा आणि निश्चिंत रहा.
प्रश्न:  जीवन आणि मृत्यू या चक्रामधून आपल्याला  मुक्ती कशी मिळू शकेल?
श्री श्री रविशंकर: ज्या क्षणी तुमच्या मनात हा विचार येईल त्या क्षणापासून तुम्ही त्या दिशेने वाटचाल  करू लागाल.
प्रश्न: मध्य प्रदेशात दारू बंदी आणता येईल का?
श्री श्री रविशंकर: का नाही हे शक्य आहे. तुम्हा सर्वांना त्यासाठी थोडी सेवा करावी लागेल. जेव्हा सर्वजण सुदर्शन क्रिया आणि ध्यान करायला लागतील तेंव्हा हे शक्य होईल. जे दारू पितात त्यांना आमच्याकडे घेवून या आम्ही त्यांना दुसरी नशा देवू. त्याला पैसे पण काही लागणार नाही आणि त्यांना खूप मजा पण येईल.
प्रश्न: सत्यासाठी कसे झगडावे? मी सत्यासाठी झगडून त्रासलो आहे. या  कलीयुगात सत्याचा जय  आहे कि नाही? कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री रविशंकर: सत्याचा नेहमीच जय असतो, पण त्यसाठी युक्तीची पण गरज असते. . धर्मराज युधिष्टिर नेहमी सत्याबद्दल बोलायचे, पण त्याच्याकडे युक्तिवाद नव्हता. जेव्हा भगवान श्री कृष्ण आले त्यांनी त्यांना युक्तिवाद शिकवला. भगवान श्री कृष्णाच्या मदतीशिवाय ते महाभारतातील युद्ध कधीही जिंकू शकले नसते. जर तुमची भक्ती आणि युक्ती असेल तर सत्याला नेहमी स्थान असेल. तुमच्याकडे चार गोष्टी नेहमी असल्या पाहिजेत: स्वातंत्र्य, पहिल्यांदा तुम्ही स्वतंत्र आहात हे जाणून घ्या. बांधिलकी मध्ये तुम्ही प्रेमाचा कधीही अनुभव घेवू शकणार नाही. तुम्ही स्वत:ला स्वतंत्र आहे हे जाणून घेतल्यानंतर तुमच्यात प्रेमाचा अंकुर फुटेल. स्वातंत्र्य आणि भक्ती. बंधनात तुम्ही प्रेम कधीच अनुभवू शकत नाही. तुम्ही स्वतःला जेंव्हा बंध-मुक्त समजता, तेंव्हा प्रेम उदयाला येते.

प्रश्न: उदासीनता मधून बाहेर येण्यासाठी मी काय करू?
श्री श्री रविशंकर:  माझे काय होईल? हा विचार करत बसू नका. तुम्हाला काय होणार आहे?  विचार केल्यामुळे  तुम्हाला जास्त उदासीनता येईल. तुमचा हा जन्म समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्यासाठी झाला आहे. तुम्ही ह्या जगात देवाचे म्हणजेच माझे काम करण्यासाठी आले आहात. हे समजून घ्या. कुठल्यातरी सेवेत सहभागी व्हा. रोज सुदर्शन क्रिया, ध्यान करा आणि पहा तुमच्यात किती फरक पडेल. तुमच्यापैकी किती जणांच्या जीवनात रोज सुदर्शन क्रिया केल्याने फरक पडला आहे? हात वरती करा. पहा किती जणांना फरक वाटतो ते!!
आता आपण १० मिनिटे ध्यान करूया. जेव्हा हजारो लोक ध्यान करतात त्याला यज्ञ म्हणतात. तुम्ही एकटेच ध्यान कराल तर त्याला तपस्या म्हणतात. यज्ञ केल्याने फलनिष्पत्ती लगेच होते- तुमची  इच्छा पूर्ण होते.
The Art of living
© The Art of Living Foundation