सभोवतीच्या लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा

३० मार्च २०१२, क्वालालंपूर

आयुष्यात मोठा दृष्टीकोन ठेवा. तुम्ही इथे कायमचे राहणार आहात असे किती जणांना वाटते? किती लोकांना आपण पुढची तीस वर्षे इथे असणार आहोत असे वाटते त्यांनी हात वर करा. ज्यांना वाटत कि ते पुढचे पन्नास वर्षे इथे असणार आहेत त्यांनी हात वर करा. आणि तुमच्यापैकी किती जण पुढचे शंभर वर्षे असणार आहेत?
आपण आयुष्य अधिक मोठ्या दृष्टीकोनातून बघत नाही. तुम्ही इथे कायमचे असणार नाही आहात हे लक्षात ठेवा. परंतु हे बाकी सर्व इथे असेल....मलेशिया इथे असेल, क्वालालंपूर इथे असेल...केवळ तुम्ही इथे नसाल. हे सर्व तर तुमच्या आधी देखील इथे होते.
तुम्ही तीस ते चाळीस वर्षे अजून असाल आणि मग तुम्ही कुठे असाल? जीवन म्हणजे काय? तुम्ही कोण आहात? असे प्रश्न तुमच्या मनात उठायला पाहिजे आणि जेंव्हा ते उठतात तेव्हा त्याचा अर्थ असा कि तुमची बुद्धी प्रौढ व्हायला लागली आहे. तुम्हाला समजते आहे ना? तुम्ही सगळे माझ्याबरोबर सहमत आहात ना?
तर मग जेव्हा तुम्ही मोठ्या दृष्टीकोनाने जीवनाकडे बघता तेव्हा छोट्या ,शुल्लक गोष्टी नाहीशा होतात...छोटी भांडणे, काळज्या, अमका काय म्हणाला, तमका काय म्हणाला, हे सगळे अदृश्य होते.
जर तुमचा कोणी अपमान केला तर मग काय झाले! ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला ती कायमची इथे असणार नाही. सगळे आपापला  गाशा गुंडाळतील; ते गाशा पण गुंडाळणार नाही ते नुसतेच निघून जातील. इथून घेऊन जाण्यासारखे काहीच नाही.
प्रवासाला निघताना सामानाचे डाग बांधून न्यावे लागतात परंतु इथे तर तुम्ही एक दिवशी गायब होऊन जाल. जीवनाची ही क्षणभंगुरता मोठ्या दृष्टीकोनातून बघा. जेव्हा तुम्ही जीवन मोठ्या दृष्टीकोनातून बघाल तेव्हा तुमच्यामध्ये काही तरी फरक येईल, तुम्ही जागे व्हाल आणि बघाल,"अरेच्या, मी कशाला उगीच काळजी करतो आहे."
जरा मागे वळून बघा, दहा वर्ष आधी तुम्ही काळजी करत होतात आणि तुम्ही अजून देखील इथे आहात. पाच वर्षाआधी तुम्ही क्षुल्लक बाबींची नाहक काळजी करत होतात, तुम्ही अजून देखील आहात...जिवंत!आयुष्याचा किती वेळ तुम्ही पारख करण्यात, चिंता करण्यात आणि निष्फळ विचार करण्यात घालवला, हो की नाही?
होय, आपण अनुभवातूनच शिकतो. आपला केवढा तरी वेळ तक्रारी करण्यात व्यर्थ जातो आणि त्यात आपली केवढी तरी शक्ती वाया जाते आणि मग आजारपण येते. रक्तदाब, मधुमेह, इत्यादी, हे सर्व निष्फळ आणि नकारात्मक विचारांच्या  परिणामामुळे होते. आपल्याला या दुष्ट चक्रातून बाहेर पडायला पाहिजे. जर आपण नकारात्मकता बघत असू तर आपण सगळीकडे नकारात्मकच बघतो आणि मग आपण उदास होतो आणि एकदा का आपल्यामध्ये उदासीनता आली की मग आपल्याला काहीच सकारात्मक वाटत नाही आणि मग अशा प्रकारे तुम्ही या दुष्टचाक्रमध्ये फसता. तुम्हाला यातून बाहेर येणे गरजेचे आहे आणि ध्यान,योग आणि प्राणायाम तर हेच आहे- तुमच्या मनाचे व्यवस्थापन कसे करायचे आणि आत्म्याला उभारी कशी द्यायची आणि हे खरोखर एक वरदान आहे.
जीवनात तीन प्रकारचे विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे; सर्वात प्रथम म्हणजे या विश्वाला चालवणाऱ्या त्या अनंत शक्तीवर गाढ विश्वास असणे.
दुसरे म्हणजे सभोवतीच्या लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. जगात चांगले लोक आहेत, आणि जर तुम्हाला वाटत असेल कि सगळेच वाईट आहेत तर मग तुम्ही देखील वाईट व्हाल. जर तुम्हाला वाटते की सगळे ठीकच आहेत तेव्हा तुम्ही इतके छोटे होता,आक्रसता आणि मग तुम्ही देखील त्यांचाच भाग होऊन जाता. या ग्रहावर चांगले लोक आहेत, लोकांच्या चांगलेपणावर विश्वास ठेवा.
तिसरे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा लोक स्वतःवर विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे समस्या उद्भवतात. तर मग स्वतःवर,लोकांच्या चांगुलपणावर आणि त्या अनंत शक्तीवर विश्वास ठेवा. हे तीन विश्वास जीवनात अतिशय महत्वाच्या आहेत. मगच तुम्ही निरोगी असाल, नाहीतर मग तुम्ही भ्रमिष्ट व्हाल. भ्रम झालेल्या लोकांना तुम्ही पहिले आहे? ते कसे वागतात ते बघितले आहे? त्यांना सगळ्याची भीती वाटते आणि ते स्वतःला एका खोलीत कोंडून घेतात. हा एक मानसिक आजार आहे, जर तुम्हाला या मानसिक आजारापासून सुटका करून निरोगी राहायचे असेल तर मग हे तीन विश्वास माहित करून घ्या.
आता विश्वास काय हे समजून घेण्याकरिता अविश्वास काय हे समजून घ्यायला पाहिजे. कोणत्याही सकारात्मक बाबींवर नेहमी अविश्वास दाखविला जातो यावर तुमचे कधी लक्ष गेले आहे का? माणसाच्या प्रामाणिकवर तुम्ही अविश्वास दाखवता पण त्याच्या अप्रामाणिकपणावर नाही. जर कोणी म्हणाले की हा माणूस अप्रामाणिक आहे तर तुमचा त्यावर विश्वास बसतो,बरोबर! आपण दुसऱ्याच्या खरेपणावर नेहमी संशय घेतो.
जर कोणी तुम्हाला येऊन म्हणाले,"माझे तुझ्यावर प्रेम आहे",तर तुम्ही विचारता,"खरं!"जर तुम्हाला कोणी येऊन म्हणाले,"मी तुझा तिरस्कार करतो",तेव्हा तुम्ही त्याला "खरं?" असे विचारात नाही. तो तुमचा तिरस्कार करतो हे तुम्ही स्वीकारता. संशय केवळ प्रेमाबद्दल असतो.
जर कोणी विचारले की तुम्ही आनंदी आहात का, तर तुम्ही म्हणता,"मला नक्की माहित नाही",परंतु जर कोणी म्हणाले,"तुम्ही उदास दिसता", तेव्हा तुम्हाला तुमच्या उदासीबद्दल मनात शंका नसते, पण आनंदी असण्याबाद्दल मात्र असते.
जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्हाला नक्की माहित असते की तुम्ही उदास आहात, परंतु जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुम्हाला खात्री का नसते? सकारात्मक बाबींबद्दलच नेहमी आपल्याला शंका असते, परंतु आपल्या कमजोरीबाबत आपल्याला खात्री असते. इथे बदल घडवणे अतिशय गरजेचे आहे. कितीजण हे मान्य करता त्यांनी हात वर करा.
मी पुनःपुन्हा तुम्हाला हात वर करायला लावतो कारण अध्यात्मिक भाषणात नेहमी श्रोते झोपून जातात म्हणून. कारण अध्यात्मिक भाषण म्हणजे फुलांचा बिछाना,तो इतका आरामदायी असतो की झोप येते. आणि सिनेमा बघताना झोप येत नाही कारण तो काट्यांचा असतो, म्हणून तुम्हाला जागे ठेवतो, खास करून जर तो सिनेमा अपराधाबाबतचा असतो तेव्हा तर तुम्हाला अजिताबत झोप लागत नाही.
जर तुम्ही हिंदू देवळात गेलात तर तुम्हाला नारळ ठेवलेला दिसेल.का ते तुम्हाला माहिती आहे? नारळ हे मानवाच्या आयुष्याचे द्योतक आहे. ते आघात सहन करू शकते आणि आपण देखील तसेच असायला पाहिजे, आघात सहन करणारे. इतक्या उंचीवरून पडून देखील नारळ फुटत नाही कारण ते आघात सहन करू शकते. समाजात आपली वागणूक देखील अशी आघात सहन करणारी पाहिजे म्हणजे मग कोणी देखील आपल्या मनाला अगर भावनांना दुखवू शकणार नाही. नारळाच्या करवंटीप्रमाणे आपले शरीर कडक असले पाहिजे आणि नारळाच्या आतल्या खोबऱ्याप्रमाणे आपले मन शुभ्र आणि नरम असले पाहिजे आणि नारळाच्या पाण्याप्रमाणे मधुर भावना निर्माण करणारे. म्हणूनच नारळ फोडला जातो आणि त्याचा अर्थ असा कि,"प्रिय देवा, माझे जीवन नारळाप्रमाणे, शरीर कडक आणि मन नरम,शुद्ध आणि निर्मळ असू दे".
शरीर अशक्त आणि मन दगडाप्रमाणे कडक असे जर का विरुद्ध झाले तर मग तुम्हाला त्रास होईल. आज जगात हीच तर समस्या आहे.
आपले डोके थंड,पायाचे तळवे गरम आणि मृदू पोट असले पाहिजे;हे चांगल्या प्रकृतीचे रहस्य आहे. जर तुमचे पोट कडक असेल तर तुमच्या पचन संस्थेमध्ये काहीतरी बिघाड आहे,तुमचे आतडे नीट कार्य करीत नाहीयेत. तर मग पोट नरम,तळवे गरम असले पाहिजे.जर थंड तळवे,गरम डोके आणि कडक पोट असे जर उलट सुलट असेल तर तुम्ही आजारी आहात. हे तर आजारी माणसांचे लक्षण आहे.
डोके थंड,पायाचे तळवे गरम, मृदू पोट आणि प्रेमळ हृदय ही निरोगीपणाची लक्षणे आहेत.
आपल्या कमाईचा काही भाग आपण दान केला पाहिजे. आपण कमवत असलेल्यापैकी केवळ %. आपण कमावलेले सगळे १००% तर आपण स्वःतावर खर्च नाही करू शकत. थोडेफार आपण समाजाला दान केले पाहिजे; गरीब मुलांना किवा गरजू व्यक्तींना.
दान केल्यामुळे धन शुद्ध होते. सेवा केल्याने आपले कर्म शुद्ध होते. संगीतामुळे भावना आणि ज्ञानामुळे बुद्धी शुद्ध होते. "आयुष्य म्हणजे काय?"-याचे ज्ञान आपल्या बुद्धीला शुद्ध करते. योग, प्राणायाम आणि व्यायम याने शरीर शुद्धी होते.
प्रश्नमाझा पती माझ्याबरोबर एकनिष्ठ नाही,काय करू?
श्री श्री रवी शंकर : मला या बाबतीत काही अनुभव नाही. तरीपण मी तुम्हाला काही तरी सांगतो,पती जरी दुसऱ्याकडे आकर्षित होत असला तरी जर तुम्ही त्याला विशाल दृष्टीकोनातून समजून घेतले तर त्याचे तुमच्यावरच जास्त प्रेम राहील. जर तुमचे मन मोठे असेल आणि तुम्ही त्याला दोन तीन वेळा माफ केले आणि चौथ्या वेळेस जर तुम्ही तडजोड स्वीकारता स्पष्टपणे नाही म्हटले तर मग तो शिकेल. पण पहिल्यांदाच तुम्ही नाही म्हणू नका. तीन वेळा त्याला माफ करा आणि चौथ्यांदा घट्टपणे नाही म्हणा. नात्यांचे काही रहस्य आहे, तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहे का?
महिलांकरिता रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी आपल्या पतीचे कौतुक करावे. त्याचा अवमान करू नका. त्याच्या अहं भावाला अजून फुगवा. सगळे जग म्हणू दे कि तुमच्या नवऱ्याला अजिबात अक्कल नाही पण तुम्ही तसे म्हणू नका. तुम्ही म्हणा,"तुम्हाला डोक आहे पण तुम्ही ते वापरत नाही".
जर पुरुषाचा अहं दुखावला तर त्याचा भाजीपाला होऊन जातो. "तुम्ही तर भाजीपाला आहात, तुमचा काहीच उपयोग नाही", असे त्याला कधीही सांगू नका. तो एक आदर्श पुरुष आहे असे त्याला सांगा आणि त्याला प्रोत्साहन द्या, त्याचे खूप कौतुक करा आणि त्याच्या अहंच्या फुग्याला टम्म फुगवा. समजले?
पुरुषांकरिता रहस्य म्हणजे पत्नीच्या भावना कधीही दुखवू नका. जर ती आपल्या भावाची, वडिलांची किवा आईची तक्रार करत असेल तर त्यात तुम्ही सहभागी होऊ नका आणि शांतपणे ऐकून घ्या. जर तुम्ही तिच्या परिवारावर टीका केली तर ती ते खपवून घेणार नाही. ती तक्रार करेल पण तुम्ही तुमच्या तोंडाला कुलूप घाला आणि असे केले तरच घरात शांतता नांदेल. आणि जर तिला खरेदीला जायचे असेल तर नाही म्हणू नका; तिला तुमचे क्रेडिटकार्ड देऊन टाका. धार्मिक कार्य आणि खरेदीकरिता तुम्ही तिला कधीही रोखू नका.
 आपण आपल्या परिवाराप्रती आपले कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पार पाडण्याकरिता अध्यात्मिक असणे याची फार मदत होते.
तुमच्यापैकी कितीजणांना याचा अनुभव आहे? जर तुमचे मानसिक आरोग्य चांगले असेल आणि जर तुम्हाला सशक्त आणि हुशारी वाटत असेल तर तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेऊ शकता.
प्रश्न: मला झोपेचा त्रास होतो आहे.
श्री श्री रवी शंकर : तुम्हाला आयुर्वेदिक उपचारांची गरज आहे. आयुर्वेदामध्ये शंखपुष्पी सिरप आहे जे तुम्हाला चांगली झोप लागायला मदत करेल. योग आणि प्राणायाम यांचीसुद्धा मदत होईल. तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी प्राणायाम करा. त्याने तुम्हाला झोप लागायला मदत होईल. तसेच चीनी आणि आयुर्वेदिक जडीबुटी आहेत ज्या तुमचे शरीर, आतडे आणि पोट साफ करतात. अधून मधून तुम्ही त्या घ्या. त्रिफळा हि आयुर्वेदिक जडीबुटी आहे जी तुमच्या यकृत आणि आतड्यांना स्वच्छ करते. आठवड्यातून एकदा या आयुर्वेदिक औषधी वापरणे चांगले राहील. आणि योग आणि प्राणायाम यांचा नियमित सराव शरीराला सुदृढ बनवते.



The Art of living
© The Art of Living Foundation