संगीत तुमच्या भावनांना दिशा दाखविते.

२८ मार्च २०१२

(“आर्ट ऑफ लिविंग” आणि “रंजीनी कलाकेंद्र” यांच्या संयुक्त विद्यमाने बंगलोर येथे “सहस्र वीणा झंकार” नावाचा जगामध्ये प्रथमच एक ऐतिहासिक कार्यक्रम करण्यात आला, ज्यात १११० वीणा-वादकांनी भाग घेतला होता. आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते, आध्यात्मिक गुरू आणि थोर मानवतावादी श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिनांक २८ मार्च २०१२ रोजी बेंगलोर येथील प्यालेसग्राउंड येथे झाला.)

सहस्र वीणा झंकार
वीणा हे एक मानवाला माहित असलेले एक खूप प्राचीन वाद्य आहे.आजही जेंव्हा वीणा वादन सुरु होते, तेंव्हा एकात्मता जागृत होऊन ते भावना एकरूप करतात.
आज आपल्याबरोबर १११० वादक एका सुरात वादन करीत आहेत.हे एक फार मोठी अनुभूती आहे.आपल्या शरीरातील २४ मणक्याप्रमाणे त्यात २४ तारा असतात.वीणा आणि आपले शरीर यांच्या रचना एक सारख्या असून, जेंव्हा त्यांच्या तारांतून ध्वनी यायला सुरवात होते तेंव्हा ते हृदयाला स्पर्श करून आत्म्याच्या उन्नतीला मदत करते.

संगीत हा माणसाच्या जीवनाचा भाग आहे. जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा गाणे हे सहजपणे सुरु होते. जेंव्हा तुम्ही दुख्खी असता, तेंव्हा पण संगीत हे तुमच्यासाठी चांगले असते कारण ते तुमच्या हृदयाला शांत करते, तुमच्या भावनांना योग्य दिशा देऊन तुम्हाला एक वेगळी अनुभूती देते.म्हणूनच तुम्ही सुखी असा किंवा दुख्खी असा संगीत तुमच्या जवळच असते.संगीत हे ध्यानाला मदत करते आणि वीणेमधून असे संगीत अगदी साहजिकपणे येते.

आवाजाकडून शांततेकडे असा हा आध्यात्मिक प्रवास आहे.

असे म्हटले आहे कि “ शब्द ब्रह्माणी निशांत परम ब्रम्हांडीगच्छति”.

तुम्हाला जर शब्द ब्रम्हकडून परमब्रम्हकडे जायचे असेल तर नाद-ब्रह्माची पूजा करा.प्रत्येकाने आपल्या जीवनात याचा उपयोग केला पाहिजे.आपण’ जरी अगदी थोडा वेळ संगीत ऐकले तर ते आपल्याला परमेश्वराच्या शुद्ध चेतनेकडे नेते.संगीत आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीतात हि शक्ती आहे.
वीणा हे एक खूप प्राचीन वाद्य असून आजही त्यात तीच जादू आहे.


The Art of living
© The Art of Living Foundation