आपल्या पूर्वजांचा आदर करा

03
2012
Aug
बंगलोर
(बरेच भक्त गुरुजींना मोरपिसे अर्पण करतात)

गुरुदेव: मला जाणून घ्यायचे आहे की ही पिसे तुम्ही मोराच्या पिसातून खुडली आहेत की नैसर्गिक रित्या पडली आहेत? जर ती खुडली असतील तर ती इथे आणू नका. आपण लोकांना मोरपिसे खुडण्याला अजिबात प्रोत्साहन देता कामा नये. मला माहित नाही की ही नैसर्गिकरित्या पडली आहेत की लोकांनी खुडली आहेत.

(श्रोत्यातून: त्यांनी खुडली आहेत गुरुजी)

मग तुम्ही ती अजिबात इथे आणता कामा नये. आपण ती खरेदी करता कामा नये, कारण जर आपण ती खरेदी केली तर ते अजून मोरांना मारतील. कोणीही ती खरेदी करू नयेत. 

आपण सगळीकडे या सूचना लावू की कोणीही मोरपिसे खरेदी करू नयेत. त्यामुळे जबरदस्तीने मोरपिसे खुडण्यापासून लोक परावृत्त होतील.

तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे !!

ही एक नवीन प्रथा सुरु करू, आपण ही मोरपिसे खरेदी करणे बंद करू. आपण आज चांगला निर्णय केला आहे.

प्रश्न: गुरुदेव, मला तुमच्या बरोबर नाचायचे आहे.

श्री श्री: माझी चेतना कायम नाचत असते.

प्रश्न: गुरुदेव, गुरु माणसाचे कर्म बदलू शकतो काय, आणि ते कधी होऊ शकते?

श्री श्री: जर गुरु एकटा कोणाचे कर्म बदलू शकत असेल तर त्याने एका फटक्यात सगळ्यांचे कर्म बदलले असते. तुम्हाला स्वत:ला सुद्धा प्रयत्न करावा लागतो.

गुरु तुमची प्रमादापासून नक्कीच मुक्तता करू शकतो. जेंव्हा तुमच्याकडून काही प्रमाद घडतो, आणि त्याची तुम्हाला जाणीव होते की तुमची चूक झाली आहे आहे तुमची त्यातून मुक्तता होत नाही पण गुरु तुमच्यासाठी हे नक्कीच करू शकतो, त्यामुळे त्या अर्थाने होय!!

तुम्हाला याबरोबरच पुरुषार्थ (स्वप्रयत्न) करावेच लागतील. तुम्हाला सत्कर्म करावे लागेल. प्रेम आणि भक्तीची योग्य मात्रा कर्मापासून मुक्तता करायला मदत करते.

प्रश्न: माझ्या भेकड स्वभावामुळे मी आयुष्यातील प्रत्येक आव्हानापासून दूर पळतो. मी यातून कसा बाहेर पडू?

श्री श्री: प्रथम हे जाणून घ्या की तुमच्या पुढे जे आव्हान आहे ते पेलायची शक्ती तुमच्यात आहे. तुम्ही याची जाण ठेवा, की ती शक्ती आणि चैतन्य तुमच्यात आहे. तुम्ही या निष्ठेने पुढे चला मी तुमच्या बरोबर आहे.

प्रश्न: गुरुदेव, आपण मृत व्यक्तीसाठी विधी करतो. याला काही आधार आहे का?

श्री श्री: हे विधी म्हणजे मृत व्यक्तीप्रति तुम्ही दाखवलेला आदर होय. पण आजकाल पंडित आणि पुरोहितांनी हे इतके किचकट केले आहे की ते काय म्हणतात ते तुम्हाला कळत सुद्धा नाही. संस्कृत मधे ते जे म्हणत आहेत त्याचे भाषांतर केले तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल.

तिळ घेऊन तुम्ही ‘तर्पनामी तर्पनामी तर्पनामी’ असे का म्हणता ठाऊक आहे? याला तर्पनम असे म्हणतात. तुम्ही मृत व्यक्तीचे नाव घेता, तीळ आणि पाणी तबकात सोडता. असे का करायचे? असे करून तुम्ही गेलेल्या जीवाला सांगता ‘तुमच्या मनात ज्या काही इच्छा राहून गेल्या आहेत त्या तीळासारख्या छोट्या आहेत. छोट्या इच्छा समर्पित करा. देवाघरी अपार आनंद, परमानंद आहे त्याचा उपभोग घ्या. तुमच्या अपूर्ण इच्छाची आम्ही पूर्तता करू. तुम्ही समाधानी, आनंदी रहा’. तर्पणमधे गेलेल्या जीवाला आपण हेच सांगतो.

त्यांना इच्छा असतात; त्यांना त्यांच्या नातवंडांचे लग्न बघायचे असते, पतवंडाना अजून एक मुलगी झालेली पाहायची असते. मरणापूर्वी अश्या इच्छा राहतात, त्यामुळे आपण त्यांना सांगतो ‘या इच्छा छोट्या आहेत, त्या सोडा. प्रेम आयुष्याचे सार आहे आणि दैवत्व म्हणजे प्रेम होय. तुम्ही प्रेमाच्या प्रकाशाकडे जा.’ मृत व्यक्तीला हे निर्देश देणे म्हणजेच श्राद्ध होय.

तुम्ही त्यांच्याकडे नंतर आशीर्वाद मागता, ‘मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन, माझे मन चांगल्या मार्गावर राहण्यासाठी, योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या. आम्हाला चांगले भाग्य आणि भरभराटी साठी आशीर्वाद द्या.’

अश्या प्रकारचे श्राद्ध जगात सगळीकडे असते. दक्षिण अमेरीकेत सुद्धा असे करतात. एका विशिष्ट दिवशी संपूर्ण शहर एका ठिकाणी जमून त्यांच्या पूर्वांजांसाठी काही चित्र आणि बऱ्याच गोष्टी रस्त्यावर जाळून टाकतात. हे असेच ते चीन आणि सिंगापूर मधेही करतात.

तुम्हाला माहीत आहे का ते सिंगापूर मधे काय करतात? पूर्वांजांसाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. त्यांच्या पूर्वांजांना ज्या गोष्टी आवडत असत त्यांच्या कागदाच्या प्रतिकृती बनवून जाळून टाकतात. जर त्यांच्या वडिलांना गाड्यांची आवड असेल तर ते छान बेनझ गाडी बनवून रस्त्यावर जाळतात. सिंगापूर हे खूप स्वछच शहर आहे. पण या एका दिवशी तिथे जळलेल्या कागदांचा खूप कचरा पडलेला असतो.

चीन मधे असे मानले जाते की जर का खोट्या नोटा जाळल्या तर ते पूर्वांजांपर्यंत पोचते आणि ते तुम्हाला चांगले दैव प्रदान करतात. कधी कधी मला वाटते की हि फसवणूक आहे. पण त्याच वेळेला जाणवते की हा विश्वास आहे. म्हणून ते रस्त्याच्या रस्त्याच्या मधोमध घर बनवतात आणि जाळून टाकतात. कारण त्यांचा विश्वास आहे यामुळे त्यांना आशीर्वाद मिळतील.

अशा प्रकारे जीवनाच्या पार पोचलेल्या लोकांबरोबर जोडून राहणे, त्यांचा आदर करणे हीच श्रद्धा आहे.

युरोपातही अशा प्रकारे ‘सर्व संतांचा दिवस’आहे. त्या दिवशी लोक दफन भूमी मधे जाऊन फुले वाहतात. श्रद्धा हि जवळपास सर्व धर्मांमध्ये, सर्व संस्कृतींमध्ये आहे. इथे संस्कृतमधे त्याला खूप महत्त्व आहे. पण हे लोकांना समजत नाही.

जसे की पिंड दान, आपले शरीर हे अन्नाच्या गोळयापासूनच बनले आहे न? म्हणून अशी प्रथा आहे की आपण अन्नाचा गोळा ठेवतो, ते पितरांच्या आवडीचे काहीही असू शकते. म्हणून तुम्ही पितरांच्या आवडीचे काहीही बनवा आणि गरीब लोकांमध्ये ते वाटून द्या.

हि श्रद्धा आहे, हे कृतज्ञता आणि उत्सवाच्या जाणीवेने करायचे असते.

तुम्ही हे एवढे करू शकता. त्यांच्या आवडीचे अन्न बनवून थोड्या लोकांमध्ये वाटून खायचे. त्यांचे आभार माना आणि ते ज्या जगात असतील तिथे त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा आणि त्यांचे आशीर्वाद मागा, की तुमच्या इथल्या प्रवासात तुमची प्रगती होईल.

प्रश्न: लोक आपले आयुष्य का संपवतात?

श्री श्री: बुद्धी न वापरल्यामुळे असे होते. लोकांना आरामाची खूप सवय झालेली असते. जेंव्हा त्यांना थोडे कष्ट होतात तेंव्हा त्यापासून दूर पळायला ते स्वतःला मारून टाकतात. हा मुर्खपणा आहे. हे म्हणजे थंडीत कुडकुडत असताना आपला सदरा आणि जाकेट काढून टाकण्यासारखे आहे, असे करण्याने थंडी कमी होणार नाही. पण त्यांच्यात ही समज नसल्याने ते असे करतात. म्हणूनच सुरुवातीपासून अध्यात्मीक ज्ञान जरुरीचे आहे.

ज्या लोकांमध्ये टीका आणि दुःख सहन करायची सहनशक्ती असते, जे संकटाना सामोरे जातात त्यांना आत्मबल मिळते, आणि ते कधीही आत्महत्या करत नाहीत.

जेंव्हा आत्मबल नसते, आणि लोकांना आरामाची सवय झालेली असते तेंव्हाच ते आत्महत्या करतात. त्यामुळे आरामाची सवय सुरुवातीपासूनच मोडायला हवी. जेंव्हा लोकांना कठीण परिस्थितीत राहून टीकेला सामोरे कसे जायचे हे कळेल तेंव्हा ते आत्महत्या करणार नाहीत.

प्रश्न: गुरुदेव, कृपया मोक्षा बद्दल सांगाल का?

श्री श्री: तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या मरणापूर्वी संपवून टाका. असा एक तरी क्षण असावा जेंव्हा तुम्हाला वाटेल ‘मला आता काहीही नको’ – त्यालाच मोक्ष असे म्हणतात. मोक्ष मिळवण्यासाठी मरणाची गरज नाही. मरणापूर्वी तुम्हाला समाधानी वाटायला हवे. जेंव्हा आयुष्यात ही तृप्त भावना वाटेल तेंव्हा मुक्ती, अधिक मुक्ती मिळेल.

प्रश्न: तुम्हाला गुरु पौर्णिमेला रडताना पाहून मला फार वाईट वाटले.

श्री श्री: नाही, अश्रू फक्त अडचणीतच येत नाहीत; अश्रू प्रेमाचे सुद्धा असतात. मी तिथे असलेल्यांचे प्रतिबिंब होतो, सगळ्याचे डोळे पाणावलेले होते त्यामुळे या शरीरातून सुद्धा ते आले. गुरु पौर्णिमेला सगळे कृतज्ञ होते, कृतज्ञतेने भरलेले! कोणतेही डोळे कोरडे नव्हते, त्यामुळे जेंव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले तेंव्हा माझेही डोळे पाणावले.