योग्य वेळी योग्य त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील.

01
2012
Jul
बून, नॉर्थ कॅरोलिना
 प्रश्न: अपूर्ण राहिलेल्या इच्छांचे काय करायचे? मला चांगल्या नातेसंबंधांची आस आयुष्यभर राहिली आहे.जसजसा वेळ जातो आहे, तसा मी जास्त निराश होतो आहे. मला पश्चाताप होत आहे आणि त्यामूळे माझी उर्जा कमी होते आहे. माझ्या आयुष्यात हे कसे घडून येईल आणि मी ते कसे सोडून देऊ शकेन?
श्री श्री : तुम्ही म्हणता आहात कि हि आयुष्यभराची आस आहे. पण ही खरोक्रच आयुष्यभराची आस आहे का? तुम्हाला लहानपणीही हीच इच्छा होती का का तुम्ही जेंव्हा तरुण वयात होतात तेंव्हा हि इच्छा उत्पन्न झाली?
ह्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही इतके प्रयत्न करावे आणि इतका वेळ त्यामध्ये घालवावा, एवढी हि इच्छा महत्त्वाची आहे का? का दुसर्या कुठल्या मार्गानेही आयुष्य सत्कारणी लागू शकते? ह्या दिशेने तुम्ही विचार करा. जशी तुमच्यामधील उर्जा वाढत जाईल, तसे तुम्ही हे सहज सोडून द्याल आणि तुमच्या लक्षात येईल कि तीव्र इच्छा येतात आणि जातात. तुम्ही जेवढे त्याकडे जास्त लक्ष द्याल तेवढ्या त्या राहतात आणि तुमच्यामध्ये आस निर्माण करत. हि सत्य परिस्थिती आहे.
 Category: Desire

 प्रश्न: प्रिय गुरुजी, मला माहिती आहे कि तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण मी स्वत: वर प्रेम करत नाही. मी जर स्वत:ला आणि आजूबाजूच्या लोकांना सहज पणे स्वीकार शकलो, तर फार चांगले होईल. मी काय करू?
श्री श्री: तुम्ही योग्य तेच करत आहात, पार्ट २, ध्यान शिबीर. या कोर्स मध्ये आपण पहिल्यांदा तेच करतो, स्वत:ची आणि तुमच्या साथीदाराची प्रशंसा करतो.हेच करतो ना आपण, मग ते प्रामाणिकपणे करा. औपचारीकपणे करू नका. मनापासून करा. ह्या काही प्रक्रिया एका स्तरावर वेड्यासारख्या वाटतील, पण दुसऱ्या स्तरावर त्या आपल्या सुप्त चेतनेवर परिणाम करतात.
स्वत:ला दिशा देणे थांबवा- हा अध्यात्मातला पहिला नियम आहे. तुम्ही जेवढा जास्त दोष द्याल, तेवढे तुम्ही स्वत:पासून दूर जाल. तुम्ही स्वत:ला दोष देणे थांबवून तुमच्यातील चांगल्या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे.तुम्ही हे करत रहा आणि ते तसे घडून हि येईल.
कधी कधी आपल्या जुन्या सवयी, विचारांच्या पद्धती पुसून टाकायला वेळ लागतो. जसजसे तुम्ही जास्त जागरूक व्हाल, कि मी मला दोष देणे थांबवले पाहीजे, तसे एकदम तुमची उर्जा वाढू लागेल. आणि प्राणायाम करा, त्यांनी नक्की मदत होते. आणि जेंव्हा तुमची उर्जा जास्त असेल, तेंव्हा असे होऊच शकत नाही कि तुम्ही स्वत:ला दोष देत राहाल.
Category: Praise, Blame, Spirituality, Advanced Course

प्रश्न: मी माझ्या भयापासून कसा मुक्त होऊ? मला सगळ्याची भीती वाटते. सगळेच मला भयप्रद वाटते. अपयशाचे भय, भविष्याचे भय, मृत्यूचे भय, विमानाचे भय, सगळेच ! कृपया मला मदत करा.
श्री श्री: भीती हि फक्त एक शरीरातील भावना किंवा संवेदना आहे. तिचा इतर कोणत्याही गोष्टींशी संबंध जोडायची अवश्यकता नाही.
जेंव्हा तुम्ही तुमच्या या घटना तपासून पाहाल, तेंव्हा तुमच्या लक्षात येईल कि भीती, प्रेम आणि तिरस्कार हे सर्व काही शरीराच्या एकाच भागात घडते. ती एकाच उर्जा आहे जि प्रेम, तिरस्कार किंवा भीती अशा वेगवेगळ्या स्वरूपात समोर येते.
तुम्हाला जेंव्हा एखादी गोष्ट खूप आवडते, तेंव्हा भीती नाहीशी होते. जेंव्हा तुम्हाला काहीहि उत्कटतेने आवडत नसते, तेंव्हा भीती त्याची जागा घेते. हे असे तुम्ही अनुभवले असेल. जेंव्हा तुम्हाला काहीतरी उत्कटतेने आवडते किंवा तुम्ही तुम्ही खूप तिरस्कार करता, तेंव्हा भीती नाहीशी होते. हे दोन्हीजार नसेल, तर थोडीशी भीती उत्पन्न होते. पण अजून रिकामे आणि पोकळ ध्यान, प्राणायाम, सेवा...या सगळ्यामुळे ती भीती नाहीशी होईल.
Category: Fear

प्रश्न: जर चुकीमुळे तुम्हाला मूल झाले आणि तुमचे लग्न झाले नसेल, तर तुमच्या आयुष्यातली प्रेम करणारी व्यक्ती सोडून देऊन, त्या मुलाला आणि आईला स्वीकार करणे, त्याला वाढवणे (जरी तुम्ही त्या आईवर प्रेम करत नसलात तरी) हे जरूरी आहे का ? अशा परिस्थितीत काय करावे?
श्री श्री : ऐका,पुढे जात रहा. एवढेच मी सांगू शकेन. एकाच गोष्टीला धरून ठेवून त्याचे दु:ख्ख करत बसू नका. आयुष्य खूप मोठे आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप काही भूमिका कराव्या लागतात. प्रथम, तुम्ही या ग्रहावरचे एक सुंदर रहिवासी आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही वैश्विक तेजाचे भाग आहात हे लक्षात घ्या आणि मग तुम्हाला जि भूमिका पार पडायची आहे, ती पूर्ण करा, आई, मुलगा, मुलगी इत्यादी. तुम्ही असा निश्चय करा, कि मी कशानेही निराश होणार नाही. मला जि भूमिका करायची आहे ती मी १००% मनापासून पार पाडीन. एवढेच करा आणि बाकीचे आपोआप घडू लागेल.
Category: Guilt, Relationships

प्रश्न: माझी आई एक वर्षापूर्वी कॅन्सर णी मृत्यू पावली. मी खूप प्रयत्न करते आहे पण यातून मी कशी वर येऊ?
श्री श्री : काळ हे सगळ्याचे औषध आहे. तुमची दृष्टी विस्तीर्ण करा.
Category: Death, Sorrow

प्रश्न: मला शुद्ध कसे होता येईल ? मी साधना, सेवा आणि सत्संग करत आहे पण तरीही मला अशुद्ध वाटते. उद्धट आणि गर्विष्ठ लोकांना आर्ट ऑफ लीवींग मध्ये बघून खप दु:ख्ख होते. मी काय करू?
श्री श्री : तुम्ही दोन गोष्टी बोलत आहात. एक तर तुम्ही म्हणता कि दुसरे लोक उद्धट आहेत, ते बरोबर नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हालाही बरे वाटत नाही. हे म्हणजे स्वत:च आरश्यात पाहिल्यासारखे आहे. आरश्यात दोन्ही बाजूला तुम्हीच आहात. मी तर म्हणतो कि तुम्हाला जर अशुध्द वाटत असेल तर प्राणायम, पौष्टिक आहार यांची तुम्हाला फार मदत होईल. तरी पण तुम्हाला बरे वाटत नसेल तर मग काही दिवस फळे भाज्या खा, गाणी म्हणा किंवा मंत्रोच्चार करा. तुम्ही जर सत्संग मध्ये बसून भजन म्हणत असताल तर तुम्ही स्वत:ला अशुध्द का मानता? तसे होणे शक्य नाही. तुम्हाला असे वाटत नाही का, की आपण सत्संग मध्ये बसून भजन म्हटल्याने आपल्या मनातील सर्व अशुध्द विचारांचे लगेच उत्थान होते? किती जणांना असे वाटते.? (श्रोत्यातून खुपजण हात उंचावतात) पहा!!
‘नही ज्ञानेन सदृशं पवित्रं इहा विद्यते. त्त् स्वयम् योगा समसिध्द: कलेन आत्मानी विंधती.’ – (श्रीमदभगवत गीता अध्याय ४, श्लोक क्र ३८) एक जुनी म्हण आहे : ज्ञानानेच तुमचे मन, तुमचा आत्मा आणि तुमची चेतना शुद्ध होते.
एका ठिकाणी शांत बसून २०-३० मिनिटे अष्टवक्र गीता ऐका आणि पहा मग तुमच्या भावनांचे, मनाचे कसे उत्थान होते.
दुसरे लोक उद्धट आहेत या तुमच्या विचाराबद्दल बोलायचे झाले तर मी म्हणेन कि बरे झाले कि हे लोक माझ्याकडे, आर्ट ऑफ लिविंग मध्ये आलेत. मला याचा आनंद होतो कारण माझ्याकडे सहनशीलता आहे. तुम्ही पण सहनशीलता बाळगा. बाहेरच्या जगात या लोकांनी किती समस्या निर्माण केल्या असत्या, कितीजणांना त्रास दिला असता. या इथेतरी ते कमी त्रास देतील आणि तुम्हाला पण आपल्या पहिल्या तत्वाचा अभ्यास होईल – सर्व लोकांचा आहे तसा स्वीकार करा.
आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो कि आर्ट ऑफ लिविंग वाले काही दुसऱ्या ग्रहावरून आले नाहीत, ते पण तुमच्याच सारखे आहेत आणि त्यांच्याकडे जगातील सर्व लोकांची विशेषता आहे. ते काही वेगळे नाहीत.
आर्ट ऑफ लिविंग वाल्यांकडून तुमच्या अपेक्षा जास्त आहेत कारण तुम्ही विचार करता कि हे लोकं ज्ञानी असतात, प्रेमळ असतात, ते सेवा करतात. म्हणून तुमच्या अपेक्षा नेहमी जास्त असते कारण तुम्ही पाहता कि हे लोक असामान्य आहेत. हेच खरे आहे!! पण सुरुवात हि स्वत:पासून करावी, तुम्ही पण असामान्य आहात, तुमच्याकडे पण सर्वाना स्वीकारण्याची सहनशीलता आहे.
लोक मला विचारतात कि, ‘गुरुदेव तुम्ही उद्धट, राग येणाऱ्या लोकांना टीचर का केले? मग मी सांगतो कि मला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे. मी सर्वाना बरोबर घेवून चालतो आणि सर्व जण माझ्या बरोबर सुखी, आनंदी आहेत आणि मी सर्वाबरोबर मी सुखी आनंदी आहे. ते मोठे होताना पाहण्याचा संयम माझ्याकडे आहे. आणि ह्या मुळेच आर्ट ऑफ लिविंग संस्था एवढी मोठी झाली आहे. मी जर परिपूर्णता पाहिली असती तर मी सांगतो कि मी इथे असलोच नसतो. आपण असे एकत्र बसलोच नसतो. मी कुठेतरी असलो असतो आणि तुम्ही कुठेतरी असला असता. आपल्या कडे सहनशीलता असली पाहिजे.
हे असे आहे कि, शाळेतील सर्व मुलांनी एकाच वर्गात बसावे अशी तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. आणि असे हि नाही कि एक वर्ग दुसऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहे. नर्सरीची मुले हि प्रायमरी मुलांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे समजू नका, इथे श्रेष्ठता नाही. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जायला त्यांना फक्त काळ आणि गतीची गरज असते, एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जायला. माणसं हि मोठी होतच असतात, आपल्याकडे सहनशीलता हवी. आणि मी सांगतो कि ती तुमची परीक्षा घेते, आणि ते चांगल आहे.
Category: Patience, Guru, Acceptance, Arrogance

प्रश्न: मी जर मन:पूर्वक काही लालसा न ठेवता प्रार्थना केली तर ती तुम्ही एकू शकाल का? आणि त्याचे उत्तर देवू शकाल का? मी जरी तुमच्या पासून हजारो मैल दूर असलो तरी?
श्री श्री: तुम्हाला माहीत आहे सेल फोन वापरायला काही अंतर लागत नाही. सेल फोन नावाच्या छोट्या प्लास्टिक बॉक्स वरून काही नंबर फिरवताच तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकता, तर तुम्ही तुमची बुद्धी, हृदय, भावना यांना कमी लेखू नका, कारण त्या प्लास्टिक बॉक्स पेक्षा कितीतरी पटीने प्रबल आहेत.
मी सांगतो कि हे असे घडते, हो कि नाही? तुमचा जवळचा मित्र कुठेतरी, समजा जपान किंवा वेस्ट कोस्टला आहे, त्याला ज्या भावना उमगतात त्याच भावना तुम्हाला पण उमगतात, तो आनंदी असेल तर तुम्ही पण आनंदी होतात, तो उदास असेल तर तुम्ही पण उदास होतात. असे कधी झाले नाही तुम्हाला?
इथे कितीजणांना असे वाटते कि हे माझ्या बाबतीत घडते, शाब्दिक संपर्क न करता? (श्रोत्यातून खुपजण हात उंचावतात) अशा प्रकारच्या पातळीवर संपर्क होवू शकतो. या संपर्काची पातळी खुपच सुक्ष्म आणि आकस्मिक आहे. हो हे असेच आहे. काही जणांना सेल फोन सारखे सहज समजण्यासारखे नाही, पण निरिक्षण केल्यास तुम्हाला दिसून येईल. Category: Prayer

प्रश्न: क्षमाशिलता याचा नेमका अर्थ काय? मी एका व्यक्तीला क्षमा करण्याचा प्रयत्न करत आहे पण मला वाटते कि मी त्याला पूर्णपणे करू शकत नाही. माझा बराच वेळ आणि उर्जा या कारणासाठी खर्ची पडत आहे, माझ्या मनात हेच विचार मनात सारखे असतात. मी त्याला पूर्णपणे क्षमा करण्यासाठी काय करू?
श्री श्री: क्षमा करणे, हा विचारच डोक्यातून काढून टाका. मला वाटते तुमच्यापाशी बराच रिकामा वेळ असतो. स्वयंपाक घरात या थोडे भांडी धुवा. हि सेवा खूप हलकी वाटत असेल तर, जिन्यात १० वेळा चढ उतार करा. जेव्हा तुमचे शरीर थकून जाईल त्या वेळेस तुमच्या मनात त्या व्यक्तीचा विचार येणार नाही.
तुम्ही मनात तिरस्कार, राग, सूड अशा भावना ठेवून कुणाचा विचार करत असाल तर ते तुमचे त्या गोष्टी बद्दलची तीव्र इच्छा किंवा तीव्र तिरस्कार असतो. तुम्ही अशा वेळेस काही सेवा करायला हवी. मी सांगतो कि हे फार मदत करते.
क्षमा करण्याचा विचार मनातून काढून टाका. स्वयंपाक घरात जा, असे भांडे धुवायला घ्या ज्याला जास्त घासायला लागेल, ब्रश घ्या आणि सर्व ताकत एकटवून ते भांडे घासा. फरशीवर कुठे घाण असेल तर तिथे साबण टाका आणि त्या व्यक्तीचा विचार करून सर्व ताकदीने ती फरशी घासा. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्ती विषयीचा तुमचा राग निघून जाईल.
मला वाटत नाही कि इथे खूप नारळ आहेत, नाहीतर तुम्हाला मी एका पाठोपाठ एक नारळ फोडायला सांगितले असते. अशा पद्धतीने सुध्दा मुक्त होवू शकतो. मी विचारून ठेवतो कि स्वयंपाक घरात काही अन्न करपलेली भांडी आहेत कां. अशा प्रकारची भांडी घासणे हि योग्य कल्पना आहे. इथे अशा प्रकारची व्यक्ती जास्त असतील तर प्रत्येकाला अशी भांडी मिळतील अशी व्यवस्था करून ठेवतो.
Category: Forgiveness, anger, overcoming negative emotions

 प्रश्न: मी माझ्या पती बरोबर गेली सात वर्षे रहात आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या परिवारापासून मला त्रास होत आहे. मी त्याच्या वडिलांचा तिरस्कार करते. मला त्रास होवू नये म्हणून मी त्याच्या परिवारापासून दूर रहाते, पण त्याच्या वडिलांना माहीत आहे मला कोणत्या कारणाने त्रास होतो. कधी कधी मला वाटते कि मी त्यांना मारून टाकावे. अशा परिस्थितीत मी काय करू?
श्री श्री: तुम्ही दोन दिवस सुट्टी घेवून मनोरुग्णालयात सेवा करा. मनोरुग्णालयातील मनोरुग्ण व्यक्ती बरोबर दोन दिवस राहून बघा. जेव्हा तुम्ही स्वयंसेवक बनून मनोरुग्णालयात सेवा करताल तेव्हा तुम्हाला कळेल कि ह्या मनोरुग्णांना कसे हाताळायचे. ते जर मनोरुग्ण असतील तर तुम्ही काय करू शकाल? तुम्हाला त्यांना सहनशीलतेने सांभाळावे लागेल. तुम्ही त्यांना सरळ जावून थोबाडीत मारू शकत नाही, हो कि नाही?

मनोरुग्णालयात जावून १-२ दिवस सेवा करणे हा एक चांगला अभ्यास आहे. जर १-२ दिवस कमी वाटत असेल तर पूर्ण १ आठवडा सेवा करा. ते चांगले आहे. मग तुम्हाला कळेल कि घरात आणि बाहेर सर्व ठिकाणी एकाच प्रकारची व्यक्ती आहेत. हे विश्वच मनोरुग्णाने भरलेले आहे., काही मनोरुग्णालयात आहेत, काही बाहेर फिरत आहेत. मग तुम्हाला अशा प्रकारच्या लोकांना हाताळण्यासाठी प्रचंड सहनशीलता येईल.
तुम्ही स्वत: असे काही करू नका कि ज्यामुळे तुम्हाला जेल मध्ये जावे लागेल. ठीक आहे!! तुमचे माता पिता तुम्हाला काही बोलतात ते तुम्हीं कधी मनावर घेत नाही. असे बरेच कठोर भाष्य तुमच्या आई वडिलांनी केले आहेत पण ते तुमच्या मनात एक दिवस राहते आणि लगेच तुम्ही ते विसरून जाता. पण तेच जर का तुमच्या सासू सासऱ्यांनी काही बोलले कि ते तुमच्या मनात राहते आणि तुम्ही उदास होतात. हो कि नाही? आत तुम्ही याच्या उलट करून पहा, तुमच्या सासू सासऱ्यांना आई वडील माना, आणि पहा तुम्ही त्यांना कसे हाताळल? तुम्ही पहाल तुम्हाला खूप फरक जाणवेल.
मी नेहमी आश्रम मध्ये सर्वाना सांगत असतो कि तुमच्या जे काही अडचणी आहेत, तुम्हाला जो काही त्रास आहे ते सर्व तुम्ही इथे माझ्या कडे द्या आणि तुम्ही आनंदाने घरी जा. एका महिलेने मला विचारले कि, ‘मी माझ्या सासू ला इथे ठेवून मी घरी आनंदाने जावू का?’. मी म्हणालो, ‘ जर तुमच्या सासूने देखील हेच विचारले तर? मला इथे दोन खोल्या बांधाव्या लागतील, एका सासू साठी आणि दुसरी सुने साठी’.
मी तिला विचारले कि, ‘तुझ्या आईने तुला, सासू रागावते त्याच्या पेक्षा जास्त कधी रागावले नाही का?’. मग तिने क्षण भर विचार करून म्हणाली, ‘तुम्ही बरोबर आहात, माझी आई मला छोट्या छोट्या कारणावरून सारखी रागवायची‘.
मग मी म्हणालो कि, ‘तुमची आई रागावली तर तुम्ही मनावर घेत नाही पण तेच जर का तुमची सासू तुम्हाला रागावली कि तुम्ही का उदास होता? हे असा वेगळा दृष्टीकोन तुम्ही का ठेवता?’ आपण जर अशा वस्तुस्थिती वर थोडासा प्रकाश टाकला कि आपली मनोवृत्ती बदलते आणि परिस्थिती पण बदलते.
Category: Relationships, Acceptance, Patience

प्रश्न: आपण एकाच वेळी इच्छाहीन राहून उत्साही कसे राहता येईल?
श्री श्री: ती तर खरी युक्ती आहे.
जर स्व रुची नसेल तर ते आणखी सोपे होते. उदा: तुम्ही ज्यावेळेस सेवा करता, तेव्हा तुम्ही इच्छा हीन असता पण उत्साही पण असता. हो कि नाही? कितीजण तुम्ही किचन मध्ये सेवा करत आहात, उत्कटतेने करता ना? (प्रतिसाद: हो!)
त्यावेळी तुम्हाला कशाचीच काही फिकीर नसते, बरोबर आहे ना! उत्साह आहे आणि निरपेक्षता पण आहे. इथे सर्वात काय चांगले आहे तर ती म्हणजे सेवा, ट्रान्सपोर्ट सेवा, हौसिंग सेवा, रात्री बारा बारा वाजे पर्यंत बिछाने टाकणे.
मी रात्री फेर फटका मारताना पाहिलं कि काही मुले आणि महिला बिछाने टाकत होते, सर्वाना आराम मिळेल याची ते काळजी घेत होते. लोकांनी त्यांना ओळखावे म्हणून ते हे सर्व करत नव्हते. त्यांना त्याच्यातून काही मिळणार हि नव्हते. हि सेवा केल्याने आपल्याला पुण्य मिळेल असे त्यांच्या मनात सुध्दा नव्हते. ते काम कुणीतरी करणारच होते तर मग आपणच करू असे त्यांनी ठरविले आणि त्यांनी ते केले.
मी त्यांना म्हणालो, ‘ तुम्ही सर्वजण जा आणि झोपा आता, हे काम उद्या होवून जाईल’. ते सर्व आनंदाने झोपी गेले आणि सुखद आराम केला. हे सर्वांच्या बाबतीत घडते. मी फक्त एक उदाहरण दिले. सर्व सेवक असेच आहेत. उत्साह आहे आणि सर्व इच्छा हीन आहेत. ह्या दोन्ही गोष्टी असणार ‘सेवा’ हे सर्वात चांगले उदाहरण आहे.
Category: Dispassion, Enthusiasm

प्रश्न: एक व्यक्तीचे एकापेक्षा जास्त गुरु असू शकतात का?
श्री श्री: एकालाच हाताळणे फार अवघड आहे.
तुम्ही तुमच्या गुरु मुळे अध्यात्मिक मार्गावर आहात, त्यांच्याच आशीर्वादाने आज तुम्ही इथे आला आहात. त्यासाठी त्यांना धन्यवाद द्या. त्यांच्यामुळेच तुम्ही एक पाउल उचलले आणि तुम्ही इथे आला आहात. आता तुम्ही जर मला वेगवेगळ्या गुरुंची मते, तंत्र बद्दल बोलाल तर मी म्हणेन कि दोन्हीचे मिश्रण करू नका. जसे तुम्ही क्रिया करत असाल आणि अचानकपणे तुम्ही दुसरे काही तरी करू लागलात तर तुमचा गोंधळ उडेल. म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ती आधी पूर्ण करा आणि मगच नवीन गोष्ट करायला घ्या. आणि ती गोष्ट करताना तुम्ही १००% कष्ट करा.
Category: Spiritual Path, Guru

प्रश्न: गुरुदेव, माझ्याकडे सर्व काही आहे तरी पण माझ्या आयुष्यात एकटेपणा वाटतो. मी काय करू?
श्री श्री: ते चांगले आहे, हीच पहिली पायरी आहे. तुम्ही सर्व इच्छा पासून दूर रहा आणि पहा मग तुम्ही कसे सशक्त होतात. तुमचा एकटेपणा सत्संग आणि ज्ञानाने भरून निघेल. Category: Contentment, Knowledge

प्रश्न: गुरुदेव, माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे हे मला कसे कळेल?
श्री श्री: सेवा, सेवा, सेवा. दुसऱ्यासाठी आपण काय करू शकतो हाच आपला धर्म आहे. तुम्ही जर सारखे, ‘माझे काय होईल, माझे काय होईल’, असा विचार करत बसाल तर ह्याच कारणामुळे तुम्ही उदास होताल.
मी काय करू शकतो? मी कोणत्या पद्धतीने हातभार लावू शकतो? मी दुसऱ्यांच्या कसा उपयोगी येईन? असा विचार करा आणि मग पहा कसे अनेक मार्ग तुम्हाला दिसतील आणि तुम्ही समाधानी व्हाल.
Category: Purpose of Life, Service

प्रश्न: योग्य व्यवसाय कसा निवडावा?
श्री श्री: तुम्हाल काय हवे आहे आणि तुमचा कल कशाकडे आहे याचे तुम्ही निरिक्षण करा. Job-Satisfaction असे काही नाही. हा शब्द शब्दकोशातून काढून टाकला पाहिजे. समाधान हे फक्त सेवा केल्यानेच मिळते. तुम्हाला मिळते ना? सेवा हा विषय दुसरा आहे. पण तुमच्या उपजीविकेसाठी तुम्ही काही तरी व्यवसाय केला पाहिजे. तुम्ही असा व्यवसाय निवडा कि जो तुम्हाला योग्य वाटेल, जो तुम्ही करू शकाल, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही सामाजिक, आध्यत्मिक, साहित्यिक उपक्रम करू शकाल आणि तुमचे छंद जोपासू शकाल. बहुधा लोक आपल्या छंदाचा व्यवसाय करतात किंवा आपल्या व्यवसायाकडे छंद म्हणून पाहतात. म्हणून ना आपण छंद जोपासू शकतो ना व्यवसाय. संगीत तुमचा छंद असेल तर तो छंदच राहू देत.
तुम्ही इथे जे काही करत आहात ते एकदम योग्य आहे. म्हणजेच मन एकदम मोकळे करणे, योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात. हे होत आहे असे नाही वाटत तुम्हाला? इथे कितीजणाच्या बाबतीत असे होत आहे.? योग्य गोष्टी योग्य वेळी होतात आणि सर्व काही सुरळीत होते.
Category: Choice, Seva, Profession

प्रश्न: या प्रश्नावली परडीत अशा काही लोकांची प्रश्ने आहेत जे भावनिक दृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत. काय करावे?
श्री श्री: आयुष्य हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. आपला ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. जेव्हा आपण वयोवृद्ध होवू त्यावेळेस देखील आपण दुसऱ्यांवर अवलंबून असू, स्वावलंबी नसू. याच्या मधील जो काही काळ आहे, आपण विचार करतो कि आपण कुणावर अवलंबून नाही. तो आपला भ्रम आहे. त्या काळात पण आपण बऱ्याच लोकांवर, गोष्टींवर अवलंबून असतो. तसे पाहिले तर आपण संपूर्ण आयुष्यात दुसर्यांवर अवलंबून असतो. तुम्ही जर तुमच्या आत्मा विषयी विचार करा, शरीर नाही, आत्मा, चेतना हे सर्व आयुष्यभर स्वावलंबी असतात. हे सर्ब सुक्ष्म ज्ञान आहे हे तुमच्या डोक्यावरून जाईल. पण फक्त एकत रहा, आणि पुन्हा कधीतरी तुम्ही या गोष्टीवर विचार केलात तर तुम्हाला कळेल कि आपण स्वावलंबी आणि परावलंबी – आत्मा आणि शरीर यांचे संयोग आहोत.
आत्मा हा स्वावलंबी आहे तर शरीर परावलंबी. शरीर हे पर्यावरणीय घटकांवर अवलंबून आहे – कपडा, पाणी, वीज, शिक्षण, तुम्ही सांगा आणि त्यावर शरीर अवलंबून आहे.
तुम्हाला जर एक चांगला शिक्षक लाभला नसता तर तुम्ही आज इथे उभे राहू शकला नसता, हो कि नाही? म्हणून मी म्हणतो कि तुम्ही आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदला. काहि लोक भावनिक दृष्ट्या अबलंबून असतात, आणि काही शारीरिक दृष्ट्या. अवलंबून राहण्याच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. तुलनात्मक आणि बदलते स्वरूप जे परावलंबी आहे, याच्यावर लक्ष केंद्रित करण्या पेक्षा तुम्ही तुमच्या अंर्तमनावर जे स्वावलंबी, चिरंतन आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतय का?
तुमच्या मध्ये असे काही आहे जे अखंड, एकसारखे आहे. तुम्ही तुमचे लक्ष त्याच्यावर केंद्रित करा आणि मग पहा तुमचे आयुष्य कसे सामर्थ्यवान, स्वावलंबी, समाधानी वाटेल. हे सर्व स्वरूप, जे तुमचे मनोरथ आहे ते सदैव अखंडीतपणे उमलत राहील. ते काही परिश्रम न घेता उमलत राहील.
Category: Relationships, Attachment

प्रश्न: पाच वर्षापूर्वी मला अद्वैतचा अनुभव आला होता. तो जवळपास एक दिवस होता.
श्री श्री: तो अनुभव विसरून जा. काळजी करू नका; अनुभव आला असेल, त्यात काय? तो आता भूत काळ झाला. आणि जो भूत काळ असतो तो सत्य नसतो. जे काही सत्य आहे ते तुम्हाला कधीही सोडून जाऊ शकणार नाही आणि तुम्ही त्याचा त्याग करू शकणार नाही, आता या क्षणी पण ते आहे. आपण अनुभवासाठी इच्छा ठेवू नये. अनुभव हा क्षणिक असतो. अनुभव येतो आणि जातो. सुखद किंवा दुखद, वाईट किंवा चांगला, सर्व अनुभव क्षणिक असतात आणि संबंध हे क्षणभंगुर असतात. तुम्ही तसे नाहीत! अनुभव आलेल्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करा, या क्षणी कोण अनुभवतय? आणि कोण नंतर अनुभवणार आहे? तो कोण आहे ज्याला या क्षणी अनुभव हवा आहे? तो व्यक्ती आता आहे, या क्षणी आहे, आणि हेच सत्य आहे!
ज्या व्यक्तीची अनुभव घेण्याची तीव्र इच्छा असते, अनुभवापेक्षा तो व्यक्ती महत्वाचा असतो. तुमचा एक दिवसाचा अनुभव काहीच नाही. तो एका दिवसात संपला ते चांगले झाले. जे असत्य आहे ते एक दिवस येते नि जाते. पण जे सत्य आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि ते अखंडीत असते, तोच म्हणजे अनुभव, कळले का?
Category: Experiences, Self

प्रश्न: आयुष्याच्या प्रत्येकस्वरूपावर माझा संशय वाटतो. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास कमी होतो. हि समस्या दूर करण्यासाठी मी काय करू?
श्री श्री: ते माझे काम नाही. माझे काम संशय निर्माण करणे आहे. संशय हा हिंगा सारखा असतो, तो तुम्हाला पूर्णपणे शिजवितो.
मी एकदा स्वीडनला सत्संग मध्ये होतो आणि तिथे एक पत्रकार माझ्यासमोर येवून उभा राहिला आणि म्हणाला, ‘गुरुदेव, तुम्ही नेहमी उडवा उडवी ची उत्तरे देता, तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सरळ देत नाहीत, मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारणार आहे त्याचे तुम्ही सरळ उत्तर द्या अन्यथा मी तुम्हाला सोडणार नाही.
मी म्हणालो, ‘ठीक आहे’.
त्याने विचारले कि, ‘तुम्ही ब्रम्हज्ञानी आहात काय?’
मी त्याच्या कडे पाहून स्मित हास्य केले आणि म्हणालो, ‘नाही’. सिद्ध करण्याची डोके दुखी कोण घ्या? जेव्हा तुम्ही नाही म्हणता म्हणजे तो विषय तिथेच संपतो. संभाषण तिथेच संपते. पूर्ण विराम!
ब्रम्हज्ञानी असल्याचा भूत काळात पण कुणी कुणाला समजवू शकले नाही ना कोणी कुणाला समजविण्याचा प्रयत्न केला. जर असे कोणी म्हटले तर तो व्यक्ती अडचणीत आलाच म्हणून समजा, त्यांना शाप दिला जायचा. म्हणून मी नाही म्हटले पण तो पत्रकार जागचा हलला नाही.
तो म्हणाला, ‘तुम्ही चेष्टा करताय, मला सत्य सांगा’.
मी म्हणालो, ‘नाही’.
तो म्हणाला, ‘ नाही, मला हे मान्य नाही, मला काय ते सत्य सांगा’.
मी म्हणालो, ‘मी जर हो म्हणालो आणि ते तू जर मान्य केले नाही तर त्याचा काय फायदा, पण मी नाही म्हटले तरी तुला ते मान्य नाही. याचा अर्थ आहे कि तुझ्या मनाला वाटतय कि असे काही तरी आणखीन आहे. तू तुझ्या मनाचे ऐक, मला कशाला विचारतो आहेस?’. एक बौद्धिक पातळी असते आणि दुसरे काहीतरी वेगळे आहे, तुझी sixth sense तुला सांगते कि, ‘ हेच खरे उत्तर आहे, हेच सत्य आहे’.
Category: Doubt, Confidence

प्रश्न: अशा शक्तीने मी दरवाजा कसा आपटू? मी रेनकोट शिवाय आत बाहेर करत आहे आणि मी थरथरतोय. काय TTC पुढची नैसर्गिक पायरी आहे?
श्री श्री: हो, ती तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला माहीत आहे Pre-TTC खूप छान आहे; त्याच्या मुळे तुमच्यामध्ये खूप उर्जा आणि उत्साह येतो. सर्वानी पहिल्यांदा Pre-TTC केले पाहिजे. तुम्हाला टीचर बनायचे असेल किंवा नाही, तो दुसरा विषय आहे. पण हा दोन शनिवार-रविवार चा Pre-TTC कार्यक्रम छान आहे, तुम्हाला त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुमची क्षमता, कौशल्य आणि बरेच काही निदर्शनास येतात.
Pre-TTC झाल्यानंतर तुम्ही TTC करायचे कि नाही हे ठरवू शकता. टीचर पण तुम्हाला सांगू शकतात.
Category: Art of Living Teacher

प्रश्न: आपण कुठून आलो आहोत? आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आणि आपण कुठे जाणार आहोत?
श्री श्री: अरे व्वा! माझे काम झाले. अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही विचार करावा हेच माझे काम होते, ना कि त्याचे उत्तर देण्याचे. आता हि प्रश्ने तुमच्याकडे आहेत, माझे काम झाले. म्हणजे आता तुमच्या गाडीत पेट्रोल आहे तुमची गाडी चालती झाली. या प्रश्नांचा तुम्ही वारंवार विचार करा, इथे येत रहा, advance courses पुन्हा पुन्हा करत रहा.
Category: Purpose of Life