सुंदर भारत

05
2012
Aug
बंगलोर
(श्री श्री आकाशाकडे पाहत आहेत)

आकाशात बघा ढग जमू लागले आहेत. या महिनाअखेरीला चांगला पाऊस होणार आहे. देशामध्ये जर गैर वर्तणूक आणि नैतिक अधःपतन होत असेल तर निसर्गदेखील आपला संताप व्यक्त करतो. जेव्हा भ्रष्ट लोक ज्यांना आपण उच्चासनावर बसवले आहे, असे लोक जेव्हा देशावर स्वतःच्या फायद्यासाठी अन्याय करतात तेव्हासुद्धा निसर्ग आपला क्रोध दाखवतो.

आपल्या देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्याचा परिणाम निसर्ग आपला संताप दर्शविण्यात होतो. म्हणून लोकांमध्ये सदाचरण वाढायलाच हवे. देश चालवणारे लोक जर सज्जन नसतील, तर देशाची राखरांगोळी होऊन, देशातील लोक उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.

हे काही नवीन नाहीये, हे तर फार पुरातन काळापासून चालू आहे. प्राचीन काळी राजगुरू असायचे जे राजाने जर काही चुकीचे केले तर त्याचा कान पकडायचे आणि त्याने केलेल्या चुकीमुळे त्याचे आणि त्याच्या रयतेचे काय नुकसान होऊ शकते याबाबत त्याला सूचित करायचे. आजकाल तर कोणीच ऐकत नाही.

शेतकऱ्यांवर इतका अन्याय होतो कामा नये.

आजपासून तुम्ही जेवायच्या आधी ,”अन्नदाता सुखी भव”' असे म्हणायला सुरवात करा. आपल्यासाठी अन्न निर्माण शेतकऱ्याला आनंदी होऊ द्या. आपले अन्न गाड्यांमधून परिवहन करून पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना आनंदी होऊ द्या. आणि तिसरी व्यक्ति म्हणजे आपल्या कुटुंबातील त्या स्त्रिया ज्या अन्न शिजवून वाढतात त्यांना आनंदी होऊ द्या, जर हे तिघे आनंदी झाले तर जग आनंदी होईल.

जर परिवारातील स्त्रिया आनंदी असतील तर घरात आनंद नांदेल. जर घरातील स्त्रिया दुःखी ,निराश.हताश आणि क्रुद्ध होऊन स्वयंपाक करतील,तर ते अन्न व्यवस्थित पचन होणार नाही आणि याचा परिणाम मनावर देखील होतो.

जर व्यापारी आनंदी असतील तर ते फसवणूक किंवा भेसळ करणार नाही. आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ अन्न मिळेल. ते व्यापारी आपल्याला लुटणार नाहीत आणि अवाजवी दरवाढ करणार नाहीत.

जुन्या कालावधीपासून, व्यापारी वर्ग तलाव ,मंदिर आणि धर्मशाळा (सदाचरणाच्या शाळा) बांधणे अशाप्रकारचे अनेक सामाजिक कार्य करीत असत. जर व्यापारी आनंदी नसतील आणि ते जर लोभी बनले तर याचा लोकांवर बराच परिणाम होतो.

त्याचप्रमाणे, शेतकरीसुद्धा आनंदी असायला पाहिजे.हे फार महत्वाचे आहे.

तर मग या तिघांना लक्षात ठेवा,चला तर 'अन्नदाता सुखी भव' या मंत्राचे दररोज उच्चारण करू या.

प्रश्न : गुरुदेव, मागच्या काही दिवसात वीज पुरवठ्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हा प्रश्न कसा सोडवावा ?

श्री श्री : एकदा आमच्याकडे कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवायला एक माणूस आला होता. मी त्याला तसे कर्नाटकातसुद्धा तो प्रयोग करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा एक हजार किलो कचरा पाहिजे, ज्याचे परिवर्तन तो विजेत करतो. आता ते कसे काय होते ते बघुयात.

प्रश्न : अनेक थोर संत जसे कि येशू ख्रिस्त यांचा हिंसक मृत्यू झाला. असे का?

श्री श्री : भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत,

'क्लेशोधिकातरस तेशाम अव्यक्तासक्त-चेतसाम अव्यक्ता हि गर्ति दुःखं देहावद्भिर अवाप्यते' 
(अध्याय १२ श्लोक ५) 

कोणी जर परमेश्वराच्या केवळ अव्यक्त स्वरूपालाच पुजले तर त्याने अमाप दुःख मिळते.  

जर तुम्ही बघाल तर मोझेस,जिजस,आणि मुहम्मद पैगंबर यांचे जीवन अडचणीयुक्त होते. गुरु नानक यांच्या वंशजांना देखील अशाच अडचणीचा सामना करावा लागला.याचे कारण त्यांनी सगुण ब्रह्म(गुणयुक्त परमेश्वर) याकडे दुर्लक्ष केले आणि केवळ निर्गुण ब्रह्म (गुण रहित परम सत्या)ची उपासना केली. 

हे अतिशय रोचक आहे.

म्हणूनच 'अविद्यया म्रीत्यम तीर्थ विद्यया अमृतम स्नुते' असे म्हणतात. सगुण आणि निर्गुण या दोघांना तुमच्याबरोबर घ्या. व्यक्त आणि अव्यक्त या दोहोंची गरज आहे.

|| ईश्वरो गुरुरामती मूर्ती भेदो विभागीने,व्योमवाद व्याप्त देहया दक्षिणमुर्तये नमः ||

गुरु,आत्मसाक्षात्कार आणि देव या सगळ्यांची जरुरत आहे.जर आपण या सगळ्यांना जीवनात घेतले तर आपण या जगात आणि दुसऱ्या जगात या दोन्ही जगात आनंदी राहू. प्रश्न : मी एक शेतकरी आहे. मला एक क्विंटल मक्याकरिता एक हजार दोनशे रुपये मिळतात. परंतु जर आम्ही बंगलोरच्या सुपर मार्केटमध्ये गेलो तर ते आम्हाला मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने विकतात. आम्ही मूल्यनिर्धारण मंडळाची स्थापना करू शकतो का? शेतकरी भरपूर मेहनत करतात परंतु त्यांच्या उत्पादनाला चांगल दर मिळत नाही.आम्ही अशाप्रकारचा काही प्रस्ताव सरकार समोर ठेवू शकतो का? 

श्री श्री : मी जेव्हा काश्मीरला गेलो होतो तेव्हा मला विमानतळावर सोडायला एक शासकीय अधिकारी आला होता. तो आधी अर्थ आणि कृषी मंत्रालयात होता. त्याने शेतकऱ्यांकरिता एक योजना तयार केली होती ज्याच्या अंतर्गत आर्थिक सुट देण्याऐवजी शेतकऱ्यांना जीन्नसाचे दर वाढलेले असतील तर वाढीव दर मिळत आणि जर त्या जीन्नसाचे दर घटले असतील तर कमी दर मिळत. याच्या परिणामस्वरूप भारताचे सतरा हजार करोड रुपये बचत झाली असती. 

परंतु त्याच्या वरच्या जागी असलेल्या मंत्र्याने या योजनेला कचऱ्याची टोपली दाखवली.का? कारण यामुळे त्याचा व्यक्तिगत फायदा झाला नसता. 

मी त्या शासकीय माणसाला त्या योजनेचा तपशील देण्यास सांगितले कारण की या योजनेबाबत लोकांना सांगणे ही माझी जबाबदारी आहे. 

असे अनेक भले शासकीय अधिकारी आहेत पण खूप लोकांना त्यांच्याबद्दल माहित नाही. 

त्या शासकीय अधिकाऱ्याने सांगितले की शेतकरी आत्महत्या करीत आहेत कारण त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाही. वस्तूंचे दर वाढत आहेत पण शेतकऱ्यांना योग्य किंमत दिल्या जात नाही. तसेच आपल्या गोदामांमध्ये अन्न सडून चालले आहे. 

त्याने अतिशय चांगली योजना तयार केली होती ज्यामुळे शेतकरी आणि सरकार दोघांचाही फायदा झाला असता. परंतु त्या मंत्र्याने ही योजना अजिबात पुढे जाऊ दिली नाही. 

जोपर्यंत असे भ्रष्ट मंत्री सत्तेवर आहेत तोपर्यंत देशाची भरभराट कशी होईल? सगळ्यांनी एकत्र येऊन याबाबत काहीतरी केले पाहिजे. 

प्रश्न : असे म्हणतात की मानव जन्म हा अतिशय भाग्याने मिळतो.तरीदेखील काहीजण एकदम ऐशोआरामात जगतात आणि काही अतिशय दुःखात. असा भेदभाव का?

श्री श्री : जे आनंदात आहेत त्यांनी त्यांचा आनंद जे दुःखी आहेत त्यांच्याबरोबर वाटून घ्यावा.जे दुःखी आहेत त्यांनी त्यागाचा भाव ठेवून आंतरिक शक्ती वाढवण्याकडे प्रयत्न करावे.

ज्ञान तुम्हाला आंतरिक शक्ती देते. आंतरिक शक्तीमुळे सहनशक्ती येते आणि सहनशक्तीमुळे इतरांच्याबरोबर चांगले वर्तन घडते. म्हणूनच ज्ञान,गान(गायन) आणि ध्यान हे जीवनात फार महत्वाचे आहेत.

प्रश्न : मी गेले चार वर्षे सुदर्शन क्रिया करीत आहे. मी विद्यापीठपूर्व कॉलेजकरिता मेहनत करून अभ्यास केला. हे सगळ करूनदेखील मला कॉलेजला आणि मला पाहिजे असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही. मी सगळी आशा हरवून बसलो आहे. मला संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला आहे.

श्री श्री : संगणक विज्ञान चांगली शाखा आहे. त्यात प्रवेश घे. काळजी करू नकोस,ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल तिथे पुढे जा. तुझे जीवन चांगले असेल. कळलं?

खुपसे विद्यार्थी चांगले मार्क मिळाले नाही किंवा चांगली कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर उद्विग्न होतात आणि आत्महत्येचा विचार करू लागतात. असे कधीही करू नका. तुमच्या जीवनाला कधीच कमी लेखू नका. तुमचे जीवन अतिशय मौल्यवान आहे. तुमच्यात काय कौशल्य दडलेला आहे ते तुम्हाला माहिती नाही. तुम्ही एक महान मंत्री किंवा मोठे व्यावसायिक होऊ शकता. सगळ्या प्रकारच्या शक्यता घडू शकतात.

मुंबईच्या हातगाडीवर भाजी विकणारा,रामनाथ गोएंका,यांनी भारतातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था सुरु केली. म्हणून तुम्ही कधी उदास होऊ नका. जर तुला संगणक विज्ञान मिळाले आहे तर त्यात पुढे जा. आपल्या देशात आधीच इतकी सुधारणा झालेली आहे आणि संगणक विज्ञान क्षेत्रात अजून सुधारणा होईल.

प्रश्न : तुमच्या स्वप्नातला भारत कसा आहे,खास करून शिक्षण,संरक्षण,अर्थव्यवस्था आणि वित्तव्यवस्था या क्षेत्रांमध्ये?

श्री श्री : स्वच्छ आणि सुंदर समाज जिथे गुन्हेगारी नसेल अशा समजाचे माझे स्वप्न आहे.

भूतान, स्विझर्लंड आणि आयर्लंड यासारख्या छोट्या देशांमध्ये किती शांती आहे. कोणे एके काळी भारतसुद्धा असाच होता.

लॉर्ड मॅकॉले याने म्हटले होते,'मी संपूर्ण भारतभर फिरलो आणि मला अशी एकसुद्धा व्यक्ति दिसली नाही की जी भिकारी किंवा चोर आहे.या देशात मी इतकी समृद्धी,इतके उच्च नैतिक मूल्ये बघितली.'

आपले असे गौरवशाली राष्ट्र होते. आपल्याला पुन्हा आपल्या देशाला तो दर्जा प्राप्त करून देण्याची गरज आहे.

प्रश्न : थोड्या दिवसांआधी तुम्ही म्हणाला होतात की देवाकडून काही हवे असल्यास त्याला लाच देऊ नका. हिंदू धर्मामध्ये आम्ही नवस करतो ज्यात आम्ही देवाला काही गोष्टी करिता प्रार्थना करतो आणि त्याच्या बदल्यात आम्ही देवाला काही देऊ करतो. हे बरोबर आहे का?

श्री श्री : नवस करणे हे केवळ तुमच्या समाधानासाठी आहे. देवाची कृपा ही बिनशर्त (अहेतू कृपा) आहे. या केवळ चालीरीती आहेत. प्राचीन शास्त्रांमध्ये याला काही आधार नाही. जर तुम्ही चांगली सेवा केली तर त्याने तुम्हाला चांगले पुण्य मिळते आणि पुण्य मिळाल्याने आनंद होतो.

प्रश्न : स्वामी नित्यानंद यांनी हिंदू संस्कृतीच्या नावाला बट्टा लावला आणि तेव्हापासून लोक आश्रमात प्रवेश करताना साशंक असतात. देवाने त्यांना असे वागण्याची अनुमती कशी काय दिली? हे सगळे बघून अतीव दुःख होत आहे.

श्री श्री : यात नवीन काही नाही. वर्षानुवर्षे हेच सुरु आहे.

रामायणात एका संन्याशाने सीतेला फसवले. रावणाला माहित होते की जर तो संन्याश्याच्या वेशात आला तर सीतेचा त्याच्यावर विश्वास बसेल.

विजयनगर साम्राज्याचा नाश हा संन्याश्याच्या वेशातील शत्रूमुळेच झाला. त्याने राजाला एका दिवसात ठार केले. शेकडो आणि हजारो हत्ती आणि सैन्य असलेले हे साम्राज्य एका दिवसात नष्ट झाले. याचे कारण संन्याश्याना सगळीकडे मुक्त प्रवेश होता.

प्रत्येक क्षेत्रात असे लोक असणारच.

आज तुम्ही या सगळ्या घटना टीव्हीवर बघता. शिक्षक वर्गात विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन करतात. पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायला विश्वास कसा वाटेल?

इस्पितळात डॉक्टरने रुग्णाचा बलात्कार केला. या सगळ्यातून असे दिसते की देशात अध्यात्मिक, मानववंशीय आणि नैतिक जागृतीची नितांत गरज आहे.

आपण सध्या खुपच वाम मार्गाकडे झुकलेले आहोत. धर्मनिरापेक्षतेच्या नावाखाली आपल्या देशात सगळी मूल्ये फेकून दिल्या गेली आहेत. आपल्याला धार्मिक (सत्त्वशील) समाज पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर काय होते ते तर तुम्ही पाहताच आहात. शाळा,कॉलेज आणि इस्पितळे असुरक्षित बनलेली आहेत.

आपल्या देशात शिक्षक आणि डॉक्टर यांना खूप आदर दिला जायचा.

वैद्योनारायणो हरिः -डॉक्टरांना नारायणाचा अवतार समजायचे.

नृपो नारायणा- राजाला देवाचा अवतार मानायचे.

देव सगळीकडे अंतर्व्याप्त असायचा. हा देवाचा समाज होता. परंतु आता सगळीकडे भीतीचा वावर आहे. लोक मुलांना शाळेत पाठवायला घाबरतात. लोकांना डॉक्टरांकडे जायला भीती वाटते. ते तुमच्याकडून पैसे घेतात आणि तुम्हाला कफल्लक करतात. 

कित्येक वेळा ते म्हणतात, 'शस्त्रक्रिया यशस्वी झाली', पण रुग्णाचा मृत्यू होतो.

या सगळ्याचे मूळ कारण आहे अध्यात्मिक ज्ञानाची कमतरता. म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी शिक्षक आणि साधक (अध्यात्मिक पंथावरचा शोधक) व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही साधक बनवायला पाहिजे. आणि मगच आपण बदल नक्कीच आणू शकू.

दोनशे चाळीस अतिरेकी शस्त्र टाकून इथे आश्रमात नवीन जीवन सुरु करण्यास आले आहेत. त्या प्रत्येकाचे आयुष्य अतिशय रोचक आहे. त्या प्रत्येकावर आपण पुस्तक लिहू शकतो.

प्रश्न : आत्मसाक्षात्काराचा सोपा मार्ग कोणता?

श्री श्री : ध्यान,'मी कोण?' याचे आत्मनिरीक्षण आणि तुम्ही काय नाही आहात हे समजणे.

प्रश्न : लोक म्हणतात की आत्महत्या करणे पाप आहे,तर मग गांधीवादानुसार आमरण उपोषण हे पाप नाही का?

श्री श्री : आत्महत्येचा कोणताही प्रकार हा चुकीचाच आहे.मी त्याला पाठींबा देत नाही. एखाद्याने आमरण उपोषण करावे याबरोबर मी सहमत नाही.