सत्य विसंगत असते

02
2012
Jul
बून, नॉर्थ कॅरोलिना
प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्ही ‘गुरु’ असणं तुम्हाला खरंच आवडतं कां ? आम्ही लिहून पाठवलेल्या चिंता आपण खरोखरंच वाचता की तुमचे मदतनीस त्या वाचतात ?
श्री श्री : होय, मदतनीस तर आहेतच. (खोडकरपणे हसतात). तुम्हांला चिंता मुक्त झाल्याचे जाणवते नां ? तुमच्यापैकी कितीजणांना चिंता मुक्त झाल्याचे जाणवते ? ( बरेच जण हात वर करतात ) हे बघा.

प्रश्न : राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटते ? लोकांनी राजकारणात पडावे असे तुम्हांला वाटते का?
श्री श्री : राजकारण म्हणजे काय ? समाजाची काळजी घेणे. होय की नाही ? राजकारणी म्हणजे जो लोकांच्या बाजूने उभा राहतो, लोकांची काळजी घेतो. जे लोक काळजी घेणारे असतात त्यांनी राजकारणात असायला हवे. जे स्वार्थी आहेत त्यांनी नाही तर जे काळजी घेतात त्यांनी. होय नक्कीच! दुर्दैवाने बऱ्याच राजकारण्यांच्या बाबतीत असे नाहिये. लोक राजकारणात येतात ते फक्त सत्तेचा आनंद लुटण्यासाठी. लोकांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी किंवा लोकांची सेवा करण्यासाठी नाही. समाजाची सेवा करण्याचा जर तुमचा मानस असेल चांगलेच आहे आणि तुम्हाला तसे करायचे असेल तर तुम्ही ते जरूर करावे. पण जे तुम्ही एक व्यावसायिक असाल आणि व्यवसाय करण्याकडे तुमचा कल असेल तर तुम्ही राजकारणात पडू नये. तत्वाज्ञानीं आणि डॉकटर यांच्या बाबतीतही असेच आहे. तुमचा कल कसा आहे ते बघा.
समाज, देश किंवा जगाबद्दल तुमचा सर्वसमावेशक असा दृष्टीकोन असेल तर मी तुम्हाला राजकारणात जायला प्रोत्साहन देईन. विशेषत: युवा पिढीने राजकारणात जायला हवे.

प्रश्न : गुरुजी, माझ्या गत आयुष्यात एक चूक झाली होती आणि मला त्याबद्दल पश्चाताप होतो. पण मला त्या चुकीची इतरांकडून दर वेळी आठवण करून दिली जाते. अगदी ज्यांच्या काही संबंध नाही त्यांच्या कडून सुद्धा. कधी कधी मला अगदी जीव नकोसा होतो आणि मी हे जग सोडून जाणे हा एकमेव मार्ग आहे कां असे वाटते? कृपया मदत करा.
श्री श्री : मुळीच नाही! हे जग सोडून जायचा विचार कधीच करू नका. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. मी तुमच्या बरोबर आहे आणि इथे असलेले सगळे तुमच्या बरोबर आहेत. पूर्वी जे काही तुमच्या हातून घडले त्याबद्दल काही वाटून घेऊ नका. तुमच्या निरागस वर्तमानावर विश्वास ठेवा. अजाणतेपणामुळे, अज्ञानामुळे, सगतेच्या अभावामुळे, एखाद्या मोहापायी किंवा नावडीपायी तुमच्याकडून चूक झाली. ते होऊन गेले, झाले, संपले. ज्या क्षणी चूक तुमच्या लक्षात आली त्या क्षणी तुम्ही त्यातून बाहेर पडता. त्यामुळे स्वत: बरोबर आणखी जास्त कठोर होऊ नका. आणि जीवन संपवण्याचा कधी विचारही करू नका.
समजले ?
आणि दुसरे कुणी असे करताना दिसले तर फक्त त्यांना पार्ट १ शिबिरात घेऊन या. त्यांना प्राणायाम, ध्यान करू द्या. आणि तुम्हाला असे लक्षात येईल की तेही याप्रवृत्तीतून बाहेर येतील.

प्रश्न : प्रिय गुरुजी, मला कुणी तरी त्रास देतं आणि त्यांनी जाणून बुजून दिला नसेल तरीही प्रयत्न करूनही मी बेचैन झाल्याशिवाय रहात नाही, खूप दिवस माझा राग जात नाही,मी काय करावे ?
श्री श्री : भस्त्रिका करा. त्यामुळे तुम्ही त्या मनस्थितीतून बाहेर याल. सुदर्शन क्रिया, भस्त्रिका यानेच तुम्ही त्यातून बाहेर याल.

प्रश्न : आम्हाला असे सांगण्यात आले आहे की ध्यान म्हणजे विश्रांत होणे, लक्ष केंद्रित करणे नव्हे. तर मग ध्यानाच्या वेळी जेव्हा मनात विचार येतात तर तेही विश्रांत होणे असते कां ? श्री श्री : होय, जेव्हा तुमच्या मनात विचार येतात याची तुम्हांला जाणीव होईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही विचारांच्या पलिकडे गेला आहात. ध्यान म्हणजे लक्ष केंद्रित करणे नव्हे. एखाद्या विचाराला तुम्ही जितके जास्त घालवायला बघाल तितका तो पुन्हा पुन्हा येईल. उत्तम उपाय म्हणजे त्या विचाराला कवेत घ्या आणि बघा तो विचार बुडबुड्याप्रमाणे विरून जाईल.
विचार असे येतात, बरोबर ? ( श्री श्री साबणाचे बुद्बुडे काढण्याची बंदुक प्रेक्षकांकडे वळवून बुद्बुडे काढतात.) बघा किती वेळ रहाताहेत ते ( हवेतल्या बुद्बुद्यांनां उद्देशून ) ते येतात आणि विरुन जातात.आपल्या सगळ्या काळज्या हि अशाच असतात.भूतकाळात जरा डोकावून बघा. दहा वर्षांपूर्वी तुम्ही काळजी करीत होतात कि नाही ? आणि बघा तुम्ही अजूनही जिवंत आहात. तुम्ही काळजी करत होतात की तुम्ही २०१२ बघाल की नाही आणि तुम्ही अजून २०१२ मध्ये आहात . जेव्हा तुम्ही चित्रपटात बघता की २०१२ मध्ये जगबुडी होणार आहे, तेव्हा तुम्हाला वाटते की, “अरे बापरे !” तुम्ही एकदम घाबरून जाता.पण मी तुम्हाला सांगतो सगळे व्यवहार असेच सुरळीत चालू रहाणार आहेत.
कधी कधी तुम्ही गदागदा हलवून, जागृत होऊन पुन्हा एकदा उत्साहि व्हावे लागतं.

प्रश्न : प्रिय गुरुजी, धर्म कशासाठी असतात ? मला माहित आहे की ते लोकांचा समंजसपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि श्रद्धा ठेवण्यासाठी काहीतरी असावे म्हणून असतात.पण लोकाना असे कां वाटते की त्यांचीच श्रद्धा बरोबर आहे आणि दुसऱ्यांची चूक आहे ? त्यांच्यापैकी बरोबर कोण हे कसे समजावे ?
श्री श्री : लोकांना एक ओळख हवी असते आणि ते धर्माला एक ओळख म्हणून आपलेसे करतात. एकदा एका धर्माचे म्हणून तुमची ओळख असली की मग, जे त्या धर्माचे नसतील ते तुम्हाला आपलेसे वाटत नाहीत. ते अलग, निराळे वाटतात. आणि अशा प्रकारे कलहाला सुरवात झाली. आणि त्यावरून पूर्वीच्या काळी युद्धेही झाली आहेत. माणसाला एक ओळख हवी असते आणि ही फक्त स्वत:ची ओळख टिकवण्याचाच प्रश्न आहे मग ती भाषा असो,धर्म असो की देश असो, हा सगळा अहंकाराचा खेळ आहे.एखादा धर्म चांगला आहे म्हणून ते त्याला चांगला म्हणत नाहीत तर ते त्या धर्माचे असतात म्हणून तो चांगला. हा ‘माझा’ धर्म आहे म्हणून तो जास्त चांगला आहे. यावरून तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल की धर्मापेक्षाही स्वत:ची ओळख टिकवण्याचा प्रश्न जास्त मोठा आहे.सर्व धर्म एकच गोष्ट सांगतात – प्रेम, बंधुभाव, एका महान सार्वभौम सामर्थ्याचे अस्तित्व आणि त्या सामर्थ्याची प्रार्थना करणे, मानवतेवर विश्वास आणि माणसातील चांगुलपणावर विश्वास.पण लोकांनी मात्र धर्माचा मूळ अध्यात्मिक गाभा सोडून बाहेरच्या दिखाव्यालाच धरून भांडत बसले आहेत. येशू एकच आहे पण ख्रिश्चन धर्माच्या आज बहात्तर शाखा झाल्या आहेत.महंमद एकच होता पण आज इस्लामच्या सहा शाखा आहेत. गौतम बुद्ध एकच होता पण आज बौद्ध धर्माचे बत्तीस प्रकार आहेत. आणि हिंदू धर्मात तर असंख्य शाखा, उपशाखा आहेत, अगणित विचारधारा आहेत. मी म्हणेन की आपल्याला या धर्माच्या ओळखीच्या पलीकडे जायला हवे आणि आणि आध्यात्म जाणून घ्यायला हवे.आध्यात्म हि एक अनुभूती आहे. एकदा कां तुम्हाला मन:शांतीचा मनाच्या स्थिरतेचा, तुमच्यातील खोलवर असलेल्या शांततेचा अनुभव आला की तुमच्या लक्षात येईल की सर्व धार्मिक ग्रंथांची शिकवण एकच आहे.
तर मी म्हणेन की तुम्ही मुंगी सारखे व्हायला हवे. जर साखर आणि वाळू मिसळली असेल तर मुंगी काय करते माहित आहे ? ती साखर आणि वाळू वेगळी करते, वाळूचे वारूळ बनवते आणि साखर खाऊन टाकते. आपण असेच करायला हवे. हेच तारतम्य आहे हाच तर्कवाद आहे.
तुम्हाला माहित आहे, बहुतेकदा धार्मिक स्थळे तर्कवाद टाळतात.आणि ज्यांना त्यांचे विचार संयुक्तिक असल्याचा खूप अभिमान असतो त्याना श्रद्धेचे मोल नसते. या दोन्हीपैकी एक जरी नसले तरी जीवन अपूर्ण होईल. आणि आध्यात्म म्हणजे तेच आहे. आध्यात्मात श्रद्धा आणि तर्कवाद दोन्ही आहे जे हृद्य आणि मन दोन्हीचे सामर्थ्य वाढवते.
जगाच्या इतिहासात तुम्हाला हेच दिसेल. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. पाश्चिमात्य विचारात नेहमी असे म्हटले गेले की, ‘ आधी श्रद्धा ठेवा मगच तुम्हाला अनुभव येईल.’
पौर्वात्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्या नुसार, ‘ आधी अनुभव घ्या, मग तुम्हाला हवे तर विश्वास ठेवा.’ आणि कदाचित त्यामुळेच पौर्वात्य ठिकाणी विज्ञानाची जास्त भरभराट झाली कारण विज्ञानाचीही तशीच पद्धत आहे.
विज्ञान काय म्हणते ? ‘ प्रथम तुम्ही अनुभव घ्या आणि मग त्यावर विश्वास ठेवा. आणि पूर्वेकडे शास्त्रज्ञांवर प्राच्य तत्त्वज्ञानानुसार कधीही कार्यवाही झाली नाही याचे हे एक कारण होते. कारण श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हीसाठी एकाच परिमाण होते. त्यांच्यात कधी संघर्ष नव्हता. त्याउलट पाश्चिमात्यांमध्ये त्यांच्यात नेहमीच संघर्ष होता.

प्रश्न : प्रिय गुरुजी, मला फक्त इतकेच जाणून घ्यायचे आहे की आयुष्य योग्य पद्धतीने जगण्याचे अनेक मार्ग आहेत कां ? तुम्ही नेहमी बरोबरच वागणे अपेक्षीत आहे कां, की कधी कधी चुकीचे वागले तरी चालेल कां ? अनेक योग्य मार्ग आहेत कां ?
श्री श्री : तुमच्या स्वत:च्या सद्सदविवेकबुद्धीचे ऐका. तुमची सद्सदविवेकबुद्धी तुम्हांला सांगेल की , “ नाही, हे बरोबर नाही.” बरोबर काय नाही ? जो व्यवहार दुसऱ्यांनी तुमच्याबरोबर केलेला तुम्हाला आवडणार नाही, तसे वागणे बरोबर नाही. जेंव्हा एखादी गोष्ट तुम्हांला आंतमध्ये बोचते ती करू नका.

प्रश्न : प्रिय गुरुजी, अष्टावक्र गीतेत ऋषी अष्टावक्र म्हणतात की आपण कर्ते नाही. योग वसिष्ठ मध्ये म्हटले आहे की आत्मज्ञान होण्यासाठी आत्म नियंत्रण गरजेचे आहे. हे विरोधाभासी आहे. तुम्ही यावर जास्त प्रकाश टाकू शकाल कां ?
श्री श्री : सत्य हे नेहमी विरोधाभासी असते. सत्याच्या बहुमिती आहेत. ते संघर्षात्मक आणि विरोधाभासी वाटते पण प्रत्यक्षात तसे नाहिये. या ठिकाणी येण्यासाठी एक दिशा असू शकते, “ सरळ जा आणि मग डावीकडे वळा.” पण तुम्ही दुसऱ्या दिशेने आलात तर सुचना असेल की, “ सरळ जा आणि उजवीकडे वळा.” दोन्हीही बरोबर आहे.
मी तुम्हाला एक घटना सांगतो. तुम्हाला अयातुल्ला खोमेनी माहित आहेत कां ? ते इराणी होते. अयातुल्ला खोमेनीचे एक जवळचे सहकारी एकदा बंगलोरला आले. ते जवळ जवळ ७८ वर्षांचे वृद्ध गृहस्थ होते. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जवळ जवळ दहा पंधरा वर्षांपूर्वीची. त्यांनी मला विचारले, “ गुरुदेव मला एक गंभीर प्रश्न, एक गंभीर शंका विचारायची आहे. मी माझ्या आयुष्यभर हा प्रश्न विचारतो आहे आणि मला अजून उत्तर मिळालेले नाही. तुम्ही मला उत्तर द्याल अशी आशा आहे.”
मी म्हटले, “हं विचारा.”
ते म्हणाले, “ एका प्रश्नाची अनेक बरोबर उत्तरे कशी असू शकतील ? जर सत्य एक आहे तर उत्तरही एकच हवे. दोन बरोबर उत्तरे असू शकत नाहीत. आणि बरोबर उत्तर जर एकच असेल तर वेगवेगळ्या धर्मांना काही अर्थ नाही. एकच धर्म योग्य असू शकतो. जगात इतके सगळे धर्म आहेत.सगळे मार्ग कसे बरोबर असू शकतील ? जर सत्य एकच असेल आणि एकच गोष्ट बरोबर असेल तर प्रश्नाचे बरोबर उत्तर एकच असू शकते. मग इतर सारे धर्म ग्रंथ, सगळे प्रश्नाचे बरोबर उत्तर असू शकत नाही. एकच उत्तर योग्य असू शकते.’ हे अगदी पटण्यासारखे विधान होते.
मी त्यांना म्हटले, “ हे बघा, या ठिकाणी येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आणि सर्व मार्ग बरोबरच आहेत. एक सूचना अशी आहे की सरळ या. कुठेही वळू नका. तुम्ही इच्छित जागी पोहोचाल. दुसरी सूचना असेल की सरळ जा आणि उजवीकडे वळा आणखी एक सूचना असेल की सरळ जा आणि डावीकडे वळा. इथे येण्यासाठी असलेल्या सर्व सूचना बरोबरच आहेत. तर आपल्याला सर्व बाजूनी विचार करायला हवा.”
अचानक त्यांच्या लक्षात आले की तुम्ही कुठे आहात यावर ते अवलंबून असेल.
मी म्हटले, “ भारतात एक प्राचीन विचारधारा अशी आहे की, सर्व बाजूने ज्ञान माझ्याकडे येऊ दे. त्यांनी कट्टरवादाला कधीही प्रोत्साहन दिले नाही.सत्य एकच आहे पण ते अनेक प्रकारे जाणवते.
‘एकं सत् विप्र बहुधा वदन्ति ‘.
सत्य एक आहे पण बुद्धिवंत ते अनेक प्रकाराने व्यक्त करतो.
ते खूपच खुश झाले.ते जेव्हा खाली वाकले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होते.
ते म्हणाले, “शतश: धन्यवाद.”

प्रश्न : प्रिय गुरुजी, तुम्ही सुदर्शन क्रिया कशी शोधून काढली त्याबद्दल सांगा.
श्री श्री : माझी यातून सुटका नाही असे दिसते. असेच बसलो होतो आणि कवितेसारखी ती झाली. तुम्ही कविता लिहिली आहे कां ? तुमच्यापैकी किती जणांनी कधीतरी कविता लिहिली आहे ? तुम्ही बसलेले असता आणि ती आपोआप प्रवाही होते, होय की नाही ?
सुदर्शन क्रियेच्या आधीपासून मी योग आणि ध्यान शिकवीत होतो. पण ते पुरेसे नव्हते. काही तरी वेगळे हवे होते. मला वाटले की अजून काही तरी बाहेर यायला हवे. सर्वांना एकमेकाशी इतके जुळलेले वाटत नव्हते. मी विचार केला की सर्वजण तितकेसे आनंदी आणि प्रेमळ कां दिसत नाहीयेत ? काही तरी असले, पाहिजे कुठलेतरी तंत्र कुठलातरी मार्ग असला पाहिजे जेणे करून लोकाना तसे वाटेल. आणि मग मी दहा दिवसांचे मौन पाळले. आणि ते सुचायला लागले.
पहिल्या शिबिरात तीस लोक होते. पहिल्या शिबिरात आपले काही लोक होते. आणि शहरातले डॉकटर्स आणि वकील होते. सर्वांना खूपच आवडले. पुढच्या आठवड्यात त्यांनी आणखी काही लोकांना आणले. दहा वर्षे आम्ही फक्त सांगोवांगीच हे केले.
आणि त्यानंतर भारतात अमेरिकन दूतावास आणि युनायटेड नेशन्स एजन्सी यांनी मला शिबीर घेण्यासाठी आमंत्रण दिले. जे शिबीर आम्ही दिल्लीमध्ये घेतले. त्यात ब्रिटीश आणि अमेरिकन दुतावासातील लोक सहभागी झाले. अशाप्रकारे सांगोवांगी ते वाढतच गेले. आणि आज ते सगळीकडे आहे. सुरवातीच्या दिवसांमध्ये हे शिबीर खूप् मोठे होते आणि सगळी शिबिरे मला स्वत:लाच शिकवावी लागत होती. मग मी विचार केला की या गतीने गेल्यास लोकांपर्यंत पोहोचायला लाखो वर्षे लागतील आणि ते शक्यही होणार नाही. म्हणून मी लोकांना प्रशिक्षक होण्याबद्दल विचारायला सुरवात केली. मला स्वत:ची संख्या खूप वाढवायची होती.आम्ही बरेच प्रशिक्षक तयार केले आणि शिबिरही जरा लहान केले आणि आता सर्व जण त्याचा आनंद घेत आहेत. मग काही लोक आले आणि म्हणाले की तरुणांसाठी शिबीर हवे आहे. आणि मग YES+ , Art EXCEL शिबिरे सुरु झाली.
आपल्याला लहान मुलांमधील क्रियाशीलता वर आणायला हवी. क्रियाशीलता दैवी आहे. मुले क्रियाशील तरी बनतात किंवा विध्वंसक तरी बनतात. ते मधला रस्ता घेत नाहीत. आपल्याला मुलामधील क्रियाशीलतेला प्रोत्साहन द्यायला हवे.हे फार गरजेचे आहे. तुम्हाला असे वाटत नाही कां ? क्रियाशीलतेला प्रोत्साहन द्या.

प्रश्न : गुरुजी मला सेवेचे महत्व माहित आहे. पण आत्ता या क्षणाला दुसऱ्या कशापेक्षाही, मला स्वत:ला जाणून घेणे जास्त महत्वाचे वाटते आणि सेवा म्हणजे मला व्यत्यय वाटतो. काय करावे ?
श्री श्री : बाळाला आपल्या आईला माहित करून घ्यायचे असते कां ? बाळाला, आई म्हणजे जाणून घेण्याची एक वस्तू बनवायची असते कां ? कोणत्याही बाळाने कधी आईला विचारले आहे कां की, “ आई तु कुठे शिक्षण घेतलेस ? आधी मला सांग. मला तुझी ओळख करून दे. मला तुझा बायो देटा दाखव. मगच मी तुझ्यावर प्रेम करीन.”
मूल फक्त आईवर प्रेमच करत असते. प्रत्येक प्राणीमात्राचे निसर्गावर प्रेम असते. इतक्या मोठ्या मनाचे असते की ते जाणण्याची वस्तू बनू शकत नाही. वैदिक तत्त्वज्ञानात एक उदाहरण दिले आहे. चमच्यात समुद्र मावत नाही पण चमचा समुद्रात असू शकतो.
आपली बुद्धी इतकी लहान आहे पण बुद्धीपेक्षा आत्मा खूपच मोठा आहे. मग छोटीशी बुद्धी आत्म्याची खोली गाठू शकेल कां ? नाही ! मग कसं काय ? तुम्ही त्यात राहू शकता आणि ते म्हणजे मौन.तुम्ही मौनात राहू शकता,तुम्हाला मौन कळू शकते. पण तुम्ही मौनाला हिसकावून घेता येणार नाही. बरोबर ? तर, स्वतःला जाणणे म्हणजे बसून त्याचे फक्त विश्लेषण करणे नव्हे. तुम्हाला जर हे कळले की तुम्ही म्हणजे तुमचे विचार नव्हे , तुम्ही म्हणजे तुमच्या भावना नव्हे, ते सगळे येतात आणि जातात . आपले शरीरही सतत बदलते आहे. हे शरीर म्हणजे मी नव्हे, पण दुसरे काही तरी आहे . ते काय आहे ? मी कोण आहे ? तुम्हाला स्थिर मनस्थिती कडे नेण्यासाठी ही जिज्ञासा पुरेशी आहे. एकदा तुम्ही स्थिर झालात की की तुम्ही स्वत:ला जाणून घेण्याची एक वस्तू बनवू नका. ते शक्य नाही. तुम्ही जाणून घेणारे ( ज्ञाता ) आहात जाणून घेण्याची वस्तू (ज्ञेय)नव्हे.
मी काय म्हणतोय , समजतयं कां ? ते थोडं डोक्यावरून गेलं तरी हरकत नाही. आपण पुन्हा एकदा कधीतरी हे सगळे परत बोलू. पण तुम्ही विचार करू शकता.” मी स्वत:ला जाणून घेण्याची वस्तू (ज्ञेय) बनवणार नाही पण मी आहे.आनंदी किंवा दु:खी, चांगला किंवा वाईट, पण मी आहे” आणि जेव्हा प्राण शक्तीचा स्तर उच्च असेल तेव्हा ही मी आहे ची जाणीव हे चैतन्य जास्त स्वच्छ,स्पष्ट होते. जेव्हा उर्जा कमी असते, तुम्ही थकलेले असता तेव्हा काहीच कळत नाही. तुमचे मन स्वच्छ नसते. तुमच्या मनाची सुस्पष्टता कधी असते ? जेव्हा तुम्हाला उर्जा खूप असते.जेव्हा उर्जा खूप जास्त असते तेव्हा ती दिसून येते.’ मी म्हणजे शरीर नाही, मी आत्मा आहे. मी लखलखीत आत्मा आहे. मी उर्जा आहे.मी उत्साह आहे. मी प्रेम आहे. हा अनुभव सहजच येतो. आणि आता अनुभवात अडकू नका.
समजलं ?
तर फक्त सेवा करत रहा. तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तेवढे जास्त श्रेय तुम्ही कमावता. जास्त श्रेय मिळते आणि आतून तुम्ही शांत आणि प्रसन्न होता. हे असेच करायला हवे. नुसते एका कोपऱ्यात बसून , ‘ मी कोण आहे, ते मला जाणून घ्यायचे आहे’ असा विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. त्याला काही तरी कार्य करण्याची आणि विश्रांतीची जोड द्यायला हवी. तुम्ही जर नुसतेच खूप कार्य करीत राहिलात आणि अजिबात विश्रांती घेतली नाही तरी समतोल बिघडतो. ते योग्य नाही. तुमच्यात कार्य आणि विश्रांती यांचे संतुलन हवे. कधी कधी तातडीच्या वेळी खूप काम करण्याची वेळ येते किंवा अगदी घाईने पूर्ण करण्याचे काही तरी काम असते, ते तुम्ही करता. पण नंतर मात्र शांत होऊन विश्रांती घ्या. विश्राम करण्यासाठी वेळ काढा.
हे चांगले आहे की तुम्हाला स्वत:ला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. तुम्ही स्वत:चे अभिनंदन करायला हवे.पण घाई करू नका. लागेल तेवढा वेळ घ्या.

प्रश्न : आम्ही इथे असण्याची तुम्ही निवड केली होती की तो निव्वळ एक योगायोग होता. आमच्या सारखे आणखी इतर लोक याचा फायदा घेण्यासाठी इथे कां नाहीयेत ?
श्री श्री : तुम्ही बघताय की हे सभागृह पूर्ण भरलेले आहे. इथे आणखी लोकांना जागा नाहिये. मी तुम्हाला निवडले की तुम्ही मला याने काही फरक पडत नाही. आपण सगळे छान मजा करतोय आणि छान वेळ घालवतोय. हा आनंद, हा प्राण शक्तीचा उच्च स्तर टिकवून ठेवण्याचा मार्ग म्हणजे तो सगळ्यांमध्ये पसरवा. तुम्हाला माहिती आहे , आपण आपला आनंद स्वत:पुरता ठेवू शकत नाही. आपल्याला सगळ्या जगाला तो वाटायचा असतो. आनंद असाच वाढतो.

प्रश्न : तुमच्यासारखे शांत आणि थंड होण्यासाठी मला काय करायला हवे ?
श्री श्री : तुम्ही आहातच. आरश्यात बघा. तुम्ही शांत आणि थंड आहात.

प्रश्न : माझ्या भडक डोक्याच्या आणि कोपिष्ठ अशा पौगंडावस्थेतील मुलाला कसे हाताळावे ? आर्ट एक्सेल आणि यस शिबीर करूनही त्याचा देवावर विश्वास नाही. तो बदलेल असे वाटत नाही.
श्री श्री : मला माहित आहे तुम्हाला त्याला बदलण्याची खूप घाई झाली आहे. धीर धरा. तुम्हाला माहित आहे कां ? एक जुनां वाक्प्रचार आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी पौगंडावस्थेत पोहोचली की त्यांच्याशी मित्रासारखे वागा, अधिकारी पालाकांसारखे नव्हे. त्यांचे मित्र व्हा,त्यांच्यावर तुमचा प्रभाव पाडा आणि धीर धारा. हे शक्यच नाही की यस शिबीर केल्या नंतर ते बदले नाहीत. आर्ट एक्सेल बऱ्याच कालापुर्वी झाला असेल. तो पौगंडावस्थेतील मुलांसाठी नाही. जर तुमची मुळे पौगंडावस्थेत असतील तर त्यांना यस शिबीर करू द्या.ते सुदर्शन क्रिया आणि इतर प्रक्रिया करतील आणि त्याची त्यांना मदत होईल.

प्रश्न : डेटिंग करणाऱ्या वेब साईटस् बद्दल तुम्हाला काय वाटते ? कुणीतरी खास व्यक्ती भेटण्यासाठी हा चागला मार्ग आहे कां ?
श्री श्री : त्याचे काय आहे की मी फक्त अनुभवावर आधारित असेच बोलतो. मला याच्या बद्दल माहिती नाही. या क्षेत्रात मी परका आहे. तुम्ही तुमच्या आसपासच्या कुणाला तरी विचारा. हे म्हणजे वाण्याच्या दुकानात जायचे आणि पेट्रोल मागायचे तसे झाले. तुम्ही कपड्यांच्या दुकानात जाऊन सूटकेस मागायची याला काही अर्थ नाही. असे लोक आहेत जे या डेटिंग वेब साईटवर गेले आहेत , त्याना विचारा. आणि जे यशस्वी झाले आहेत त्यांना विचारू नका. अशा लोकांकडे जा जे अयशस्वी झाले आहेत. कारण त्यांनी ते अनेकदा वापरले आहे. ते तुम्हाला काय करू नये ते सांगतील. तर अशा लोकांचा सल्ला घ्या की जे बरेच दिवस शोधात आहेत. तुम्हाला माहित आहे ,
मी एका बाईंची गोष्ट ऐकली. ‘प्रेमात यश कसे मिळवावे’ या विषयावर त्या एक संमेलन भरवीत असत. आणि त्यांचा सात वेळा घटस्फोट झाला होता ! काही जणांना वाटले की जिला सात वेळा आपले लग्न यशस्वी करता आले नाही तिने असे संमेलन भरवणे म्हणजे विचित्रच आहे. मी म्हटले , ‘नाही , ती स्त्री सर्वात जास्त लायक आहे कारण तिळा त्यातल्या सगळ्या खाचा खोचा आणि कितीवेळा ती अयशस्वी झाली ते माहित आहे. त्यामुळे काय करू नये ते ती तुम्हाला सांगू शकेल.’ हो की नाही माईकी ? (मायकेल फिशमन ला उद्देशून ) माईकी ला ते खुपच मजेशीर वाटले होते पण त्या बाईला पाठिंबा देण्यामागे माझा तर्क वेगळाच होता. बघा तर्क काय करू शकतो ? तो कोणालाही योग्य ठरवू शकतो. आणि तुम्हाला कुठूनही कुठेही नेऊ शकतो. ही खूप पूर्वीची , ८० च्या दशकातली गोष्ट आहे. जेव्हा मी पहिल्यांदा कॅलीफोर्निया मध्ये आलो आणि माझा कोर्स होता. त्यात जवळ जवळ १५ लोक होते. त्यातले अर्धे माझ्या बरोबरच प्रवास करत होते. आणि बरचसे नवीन होते. काही लोकांनी मला सांगितलं, “ गुरुजी इथे कॅलिफोर्निया मध्ये खूप तऱ्हेचे सेमिनार होतात. यात काही अर्थ नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सला आणि सुदर्शन क्रिया करायला कोणीही येणार नाही. जिथे लोकाना त्यात रस असेल अशा ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित केले तर जास्त चांगले होईल. इथे अनेक प्रकारच्या गोष्टी होतात, प्रेम कसे करावे या शिबिर आणि असेच सगळे काही. मो फक्त ऐकले. मी त्याचे ऐकून घेतले पण मला जे हवे होते तेच केले. मी पन्हा एकदा तिथे गेलो त्यावेळी तिथे आधीपेक्षा काही जास्त लोक कोर्सला होते. जवळ जवळ पंचवीस लोक होते. या वेळी लोक म्हणाले, “ हे बघा, तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा कां वाया घालवताय ? “त्या काळात प्रवासाची साधने फार कमी होती. लोक म्ह्नाले, “ इथे सगळ्या प्रकारच्या कोर्सेस ची आधीच खूप् गर्दी झाली आहे.” आणि मी पुढच्या वेळी पुन्हा गेलो. आज कॅलिफोर्निया मध्ये अनेक केंद्रे आहेत आणि अनेक लोकांना त्याचा फायदा मिळतोय.

प्रश्न : गुरुजी, धार्मिक अतिरेक्यांवर तुम्ही बोलाल कां ? या संकुचित आणि कट्टर काम लोक कां करतात ? जर करायचीच झाली तर आम्ही त्यांच्याशी अशी चर्चा करावी ?
श्री श्री : आध्यात्मिकतेचा अभाव आणि अनुभवाचा अभाव. त्यामुळेच आपण विचाराची विशालता आणि युक्तिवाद याला प्रोत्साहन द्यायला हवे.
भगवद्गीतेत संपूर्ण गीता सांगून झाल्यावर श्रीकृष्ण म्हणतात,” मी जे काही सांगितले त्यावर आता तूच तर्कशक्ती वापर आणि तुला पटले तरच घे.”
ते असे कधी म्हणाले नाहीत की, “ मी सांगतो आहे म्हणून तु ऐक आणि तसे कर.” असे नाही जर तुझ्या तर्कशक्तीला पटले तरच ते स्वीकार.”
तर, जेव्हा तर्कशक्तीवर मळभ येते तेव्हा अतिरेकीपणा होतो. जेव्हा तर्क घालवला जातो तेव्हा अतिरेकी जन्माला येतात. त्यामुळे बुद्धीला धार करण्याची गरज आहे. आणि त्याच वेळी अनुभवातून ज्ञान आणि विवेक समजणे गरजेचे आहे. त्यासाठीच मुलाना विविध संस्कृतींचे, विविध धर्मांचे शिक्षण द्यायला हवे. त्याच्या अभावामुळेच ते अतिरेकी बनतील. युद्धग्रस्त देशात रहात असलेल्या सर्व लोकांचे मला फार वाईट वाटते.त्यांच्या लहानशा धर्माच्या पलीकडचे, त्यांच्या स्वत:च्या धार्मिक गोष्टींच्या पलीकडचे दुसरे काही पहाण्याची त्यांना कधी संधीच मिळाली नाही. त्यांच्या विचारांची व्याप्ती ते कधी वाढवू शकले नाहीत कारण त्याना कढ संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांना संधी द्यायला हवी. माहिती आणि तंत्र-ज्ञान ( IT ) धन्यवाद द्यायला हवे. आज जगातील सगळीकडचे लोक गुगल, विकिपीडिया वगैरेच्या माध्यमातून कोणतीही माहिती मिळवू शकतात. दहा वर्षांपूर्वी अगदी आमच्या पिढीला सुद्धा हे उपलब्ध नव्हते. आमच्या पिढीतील बहुतेकांना वाचनालयात जाऊन माहिती शोधावी लागायची. तुम्हाला वाचनालयात जावे लागत नाही. एक बटन दाबले की तुम्हाला माहिती मिळते. त्यामुळे मला वाटते की ही आजची नवी पिढी जास्त नशीबवान आहे.
पण तरीही अनेक ठिकाणी हे उपलब्ध नाहिये. हे बोलत असताना अफगाणिस्थानचे नाव चटकन माझ्या मनात येते. तिथल्या अनेक तरुणांना अनेक मुलाना बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नाहिये. त्यामुळे जगातला अगदी छोटा भाग जरी अज्ञानात राहिला तरी जग हे सुरक्षित ठीकाण राहू शकत नाही. बघा, एक ओसामा बिन लादेन जगाचे काय करू शकला. एअर पोर्टवर प्रत्येकाला त्यांचे बूट काढायला लावू शकला !
दुसऱ्या बाजूला त्याने अनेक लोकांना काम दिले. मला आठवते आम्ही जेव्हा अमेरिकेत यायचो तेव्हा अगदी साध्या सुरक्षा तपासणीतून आम्हाला जावे लागायचे, एवढेच. कधी कधी लहानशा एअर पोर्टवर तेही नसायचे. तुम्ही सरळ जाऊन विमानात बसू शकायचो. आता कितीतरी सुरक्षा तपासण्या असतात. हो की नाही ? ही सगळी जगातल्या त्या कट्टर अतिरेक्याची भेट आहे. आणि आपण किती तरुणांना गमावले ? कितीतरी लहान जीवाना गमावले ? हे खूपच क्लेशकारक आहे. हे सगळे विशाल दृष्टीकोन असलेल्या शिक्षणाच्या, बहुविध संस्कृतीच्या, बहुविध धर्मांच्या शिक्षणाच्या अभावामुळे. कट्टर अतिरेक्यांना वाटते की फक्त तेच स्वर्गात जातात आणि बाकीचे नरकात. आणि तेच सर्वांसाठी नरक तयार करतात. आपल्याला परिवर्तन घडवून आणायला हवे. जर आध्यात्मिक अनुभव नसेल तर कोणत्याही धर्माचे लोक अतिरेकी बनू शकतात.

प्रश्न : माझा जोडीदार आपल्या चुका मान्य करायला तयार नसेल आणि त्याच्या कृतींमुळे त्याचे काहीही भले होत नाहिये आणि घरात वारंवार भांडणे होताहेत हे माहत असूनही परत परत त्याचं चुका करत असेल तर मी काय करावे ?
श्री श्री : तुम्हाला महिती आहे, कधी आधी आपण दुसऱ्यांना सांगतो की ते चुका करत आहेत कारण त्या चुकांमुळे आपल्याला त्रास होत असतो. अआपण जेव्हा असे करतो तेव्हा ते चुका आधीच सुधारत नाही आणि आपला सल्ला ते कधीच ऐकत नाहीत. पण जर तुम्ही त्याना असे सांगत असलात की ते जे काही करताहेत त्याचा इतरांपेक्षा त्याना स्वत:ळा सर्वात जास्त त्रास होतोय तर मग ऐकायला सुरवात होईल. करुनेपोटी तुम्हाला ते त्यांच्या चुकांमधून बाहेर यावे असे वाटत असेल तर मग शक्यता बरीच आहे. पण प्रयत्न करत रहा. तुम्ही सांगत रहा आणि धीर धरा. लोक एका रात्रीत बदलत नाहीत. त्याना बदलायला वेळ लागतो.

प्रश्न : चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट कां घडते ?
श्री श्री : दोन कारणांमुळे वाईट घडते. एक तर पूर्वीची कर्मे आणि सध्याचा मूर्खपणा. तुम्ही जर चांगले आणि मूर्ख असाल तर तुमच्या बाबतीत वाईट घडते. तुम्ही असे म्हणू शकत नाही की, “ मी इतका चांगला आहे तरी माझी बोटं कां भाजली ?” तुम्ही जर आगीत हात घातला तर हात भाजणारच.
किंवा आज तुम्ही काही चूक केली नसेल पण दोन दिवसांपूर्वी तुम्हाला अति वेगात गाडी चालवल्यामुळे दंड झाला असेल तर आज तो तुम्हाला भरावाच लागेल. काल तुम्ही खूप वेगात, वेग मर्यादेच्या बाहेर गाडी चालवली तर आज तुम्हाला ते भरावेच लागेल. तुम्हाला परिणाम भोगावेच लागतील.तर एक म्हणजे पूर्वीची कर्मे. चांगल्या लोकांनीही पूर्वी काही वाईट कर्मे केली असतील.हे पहिले कारण. दुसरे कारण म्हणजे, चांगल्या लोकांमध्ये वाईट गोष्टीत न पडण्याच्या किंवा वाईट गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम न होऊ देण्याच्या कौशल्याचा, बुद्धीचा अभाव असू शकेल.
एकाला म्हणतात कर्म आणि दुसऱ्याला म्हणतात युक्तीचा अभाव. तर तुम्हाला दोन्हीची गरज आहे. जीवनात तुम्हाला प्रथम मुक्ती पाहिजे आणि नंतर भक्ती . मुक्ती शिवाय भक्तीही नसते. आपल्याला अंतर्मनातील मुक्ती पाहिजे. आपल्या स्वत:च्या भाव भावनांपासून मुक्ती. दुसऱ्यापासून नाही. मुक्ती, भक्ती, युक्ती आणि शक्ती , समजले ?
तर, जेव्हा चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट घडते तेव्हा असे म्हणू नका की , “ अरेरे, बिच्चारा ! तुझ्या बाबतीत असे घडायला नको होते.” आणि असेही म्हणू नका की , “ बरे झाले, तुला असेच मिळायला हवे होते. म्हणूनच हे तुझ्या बाबतीत घडले.” किंवा , “ तुझ्यात युक्तीचा अभाव आहे, तु किती मुर्खासारखा वागलास .” नाही ! त्याना यातले काहीही सांगू नका. फक्त हसतमुखाने त्यांच्या बरोबर रहा आणि त्याना आधार द्या. त्यांच्या आताच्या परिस्थितीबद्दल विवेचनात्मक भाषण न देता , त्यांच्या आताच्या परिस्थितीतून बाहेर यायला तुम्ही त्याना कशी मदत करू शकता ते बघा.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी बून आश्रमात सेवेसाठी अनेकदा आलो आहे.मी जेव्हा सेवेसाठी यायचो तेव्हा मला किती मन:शांती मिळायची, अगदी सुट्टीवर गेल्यासारखी. स्वच्छतागृह साफ करायला आणि स्वयंपाकघरात मदत करायला मला मजा यायची. पण आता ते ओझे वाटू लागले आहे. माझ्या जोडीदाराला एक शारीरिक व्याधी झाल्याचे निदान झाले आहे , आणि तेंव्हापासून माझी सेवा करण्यातली मन:शांती आणि उत्साह हरवला आहे. सेवा करण्यातली ती मन:शांती आणि उत्साह मला परत हवा आहे. मला माहित आहे की आनंदाच्या काळात आम्ही सेवा करावी आणि वाईट किंवा दु:खाच्या काळात तुम्हाला शरण जावे. पण हे ज्ञानही कामाला येत नाहिये. कृपया मदत करा.
श्री श्री : तुम्हाला माहिती आहे कां ? दु:खाच्या काळात तुम्ही जास्त काम करायची गरज नाही. नुसता विश्राम करा. ध्यान करा. तुम्ही बसून फक्त ध्यान करा. मन:शांती आणि समाधान मिळेल. आणि धीराने तोंड देण्याची आणि सोडून देण्याची शक्तीही येईल , बरं ? मी तुमच्या सोबत आहे आणि इथले सगळेही तुमच्या सोबत आहेत.