तीन प्रकारचे भ्रम

30
2012
Jul
बंगलोर
प्रश्न: प्रिय गुरुदेव, नेहमी ध्यान करताना आनंदाची विशेष अनुभूती मिळत असते. अशी अनुभूती ध्यान करून किंवा ध्यान न करिता सतत कशी मिळविता येईल?

श्री श्री : ज्ञान आणि वैराग्याने. जेंव्हा तुम्ही सर्व जगाकडे एक स्वप्न म्हणून बघता, तुमची ध्यान-मग्न अवस्था जागृत राहते. पण त्या अवस्थेचा तुम्ही मनोदशा म्हणून उपयोग करता कामा नये. नैसर्गिकपणे इतरांसारखे, साधे, सरळ आयुष्य जगा.

ध्यानातून मिळणारी शांती धरून ठेवायचा प्रत्यत्न करू नका, कारण त्यातून अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. ते सोडून देऊन रिकामे व्हा. त्यात काही वेळा अडथळे निर्माण होऊ शकतात, पण म्हणून काय झाले. त्यातून नाउमेद होऊ नका. कारण जग असेच असते. कन्नडभाषेमध्ये काही दोहे असे आहेत कि
“जो समुद्र किनाऱ्यावर घर बांधतो आणि लाटांना घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगणार,” “जो जंगलात घर बांधतो आणि जंगली प्राण्यांना घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगणार,” “जो शहराच्या मध्यभागी घर बांधतो आणि आवाजाला घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगणार.”

त्याचप्रमाणे, जेंव्हा आपण या ग्रहावर, या जगात राहतोय, तेंव्हा काही सुखद घटना घडतात तर काही दुखद घटना घडतात. लोक तुमची स्तुती करतात आणि काही कारण नसतांना तुम्हांला दोषपण देतात. तुम्ही त्या दोन्हीचा स्वीकार करून पुढे जायला पाहिजे. 

काय छान सल्ला दिला कि नाही?

आज काही लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले कि एक अमुक अमुक व्यक्ती खूप असभ्य आहे, ती चांगली नाही, आणि त्यांच्यामध्ये काही दोष आहेत. ती व्यक्ती नेहमीच चिडलेली असतात. तुम्ही असे लोक आश्रमात का ठेवता? मी त्यांना सांगितले नाही, मी त्यांना आधारासाठी एक मोठी दोरी दिली आहे.समजा मी त्यांना बाहेरच्या जगात सोडले, तरीही ते तसेच वागतील. ते आता तुम्हांला त्रास देत आहेत, आणि तुम्ही जरी त्यांना आश्रमाच्या बाहेर जायला सांगितले तरी ते तुम्हांला त्रास देत राहतील. येथे त्यांना सुधारण्याची संधी तरी आहे.

होय कि नाही?

म्हणून मोठ्या धैर्याने मी त्यांना येथे राहायची, आणि स्वतःमध्ये सुधारणा करायची संधी दिली आहे.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, बायबल असे सांगते कि एक वेळ सुईच्या भोकातून उंट जाणे शक्य आहे पण श्रीमंत माणसाला देवाच्या दरबारात जाणे शक्य नाही. याचा अर्थ असा काय कि त्यांना फक्त श्रीमंत आहे म्हणून नरकवासच मिळतो? 

श्री श्री : नाही, ते तसे नाहीये!

अशी वचने संत आणि प्रेषित लोकांनी वेगवेगळ्या वेळी लोकांना वेगवेगळ्या कारणांसाठी सांगितली आहेत. येशूने असे म्हटले आहें कि मी काही येथे शांतता निर्माण करण्यासाठी आलेलो नाहीये तर मी मुलीला आईविरुद्ध आणि मुलाला पित्याविरुद्ध उभे करावयास आलो आहे. त्याचा अर्थ असा नव्हे कि त्याला कुटुंब आवडत नाही किंवा तो कुटुंबात दुफळी निर्माण करण्यासाठी आला आहे.

लोकांना एकमेकांविषयी अनुकंपा निर्माण व्हावी म्हणून असे म्हटले आहे. जेंव्हा सर्वत्र गरिबी असतांना, जेंव्हा एखादा जण इतरांची पर्वा न करिता फक्त एकटा आपली श्रीमंती भोगत असेल तर तो पाषण-हृदयी एखाद्या दगडा सारखा आहे. ते जर फक्त दगडासारखे असून त्यांच्यात मृदुता जर नसेल त्यांना स्वर्गापर्यंत पोहोचणे मुश्कील आहे.

आता माझ्या मनात असा विचार आला कि आपण सर्वजण मिळून सुमारे पन्नास लक्ष रुपयांची औषधे आसामला पाठवायला पाहिजेत. आपण सर्वजण मिळून पन्नास लक्ष रुपयांची आयुर्वेदिक औषधे विकत घ्यायला पाहिजेत. म्हणून प्रत्येकाने थोडी थोडी मदत करून, ती सर्व आपण तिथल्या लोकांना देऊ शकतो.

मी लवकरच आसामला भेट देणार आहे तेंव्हा बघुयात.

सर्वप्रथम त्यांना काही औषधांची गरज भासणार आहे. आपण काहीतरी करूयात.

आपण येथे इतके जण आहोत कि प्रत्येकाने पाचशे रुपये दिले तर मोठी रक्कम उभी राहील. आपण त्यांना औषधे पाठवू शकतो. आणि काही आयुर्वेदिक वैद्य आसामला जाण्याची गरज आहे, आपण त्यांना आसामला पाठ्वूयात.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, शहाणी माणसे अशे सांगतात कि जर कोणी तुम्हांला एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. या भानगडीत मी दोन वेळा मार खाल्ला आहें. याला काय म्हणावे, माझा अडाणीपणा तर नव्हे?

श्री श्री : तुम्ही एकच व्यक्तीकडून दोन वेळा थप्पड खाल्ली कि दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून? यावर ते अवलंबून आहे.

असे पहा कि, तुम्ही वेगवेगळ्या लोकांपुढे तुमचा गाल पुढे केलात आणि त्यांनी तुम्हांला एकदाच थप्पड मारली तर त्यात तुमचा काहीच शहाणपणा नाही, आले लक्षात?

तुम्हांला पहिली थप्पड मारणारा माणूस जर का सुज्ञ आणि संवेदनाशील असेल तरच तुम्ही दुसरा गाल पुढे करणे योग्य ठरते. पण तो जर तसा नसेल तर तिसर्यांदा गाल पुढे करू नका कारण तुम्हांला फक्त दोनच गाल आहेत. समजले का?

प्रश्न: गुरुदेव, तपस्या म्हणजे काय? तपस्वी कसे व्हावे?

श्री श्री : जगण्यासाठी कमीत कमी गरजा असणे, आपल्या गरजा कमी करणे.

मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला तेसुद्धा पाहिजे, असे नाही. जे काही आहें त्यात समाधानी असणे.

तुमच्याकडे गाडी आहे तर ते चांगले आहे. तुम्ही असे म्हणायची गरज नाही कि ती गाडी पन्नास लाखाची आहे, का पंधरा लाखाची आहे कि वीस लाखाची आहें, ...नाही. एक साधी गाडी पुरेशी आहे. घालायला चांगले कपडे आहेत,खायला चांगले अन्न आहें हे पुरेसे आहे. 

तपस्या म्हणजे तुम्ही स्वतःला त्रास किंवा यातना द्यायला पाहिजेत असे नाही. फक्त अर्धेच जेवण जेवले पाहिजे असे काही नाही. तपस्या म्हणजे साधेपणा, कमीत कमी गरजा ठेवणे होय. जे कमीत कमी आवश्यक आहे , त्यावर आनंदी असणे .

प्रश्न: गुरुदेव, भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान असे म्हणतात कि “ योग क्षेम्यम वहम्यहं “. मला जे मिळत आहें हे त्या परमेश्वराकडून, पण मला हे समजत नाहीये कि तो परमेश्वर ते माझ्याकडून काढून का घेत आहे.

श्री श्री : चांगले आहे तर मग तुम्ही आश्चर्य करीत रहा. हे सर्व जग तुम्हांला दिले जात आहे आणि एक दिवस ते तुमच्याकडून काढून घेतले जाईल. हा या अस्तित्वाचाच एक भाग आहे. एक लक्षात घ्या कि वरती कोणीतरी ईश्वर बसून हे सर्व करीत आहें असे नाहीये. हे सर्व जग, हे विश्व हि एक प्रक्रिया आहें. सदासर्व काळ हि क्रिया चालू राहते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, कधी कधी स्वतःबद्धल, स्वताच्या क्षमता, कार्यक्षमता त्याचप्रमाणे गुरूवरील श्रद्धा याविषयी शंका उत्पन्न होतात. हे कसे टाळावे?

श्री श्री : प्राणशक्ती वाढवा म्हणजे झाले. जेंव्हा प्राण-शक्ती कमी होते तेंव्हा स्वतःविषयी शंका यायला लागतात. जेंव्हा स्वतःविषयी शंका यायला सुरवात होते तेंव्हा साहजिकच त्या शंका शिक्षकांविषयी, गुरुविषयी, आणि मग सर्वांविषयी मग ते कुटुंबीय किंवा मित्र असोत, त्यांच्याविषयीपण शंका यायला लागतात. आणि मग सर्व जगच या शंकांचा विषय होऊ पाहते. म्हणूनच जास्त प्राण-शक्ती म्हणजे जास्त स्पंदने, आतून जास्त उर्जा शक्ती आणि मग त्याप्रमाणात जास्त श्रद्धा !

प्रश्न: प्रिय गुरुदेव, माया म्हणजे काय याविषयी काही सांगा. मायेचे वेगवेगळे प्रकार पण सांगा.

श्री श्री : मायेचे तीन प्रकार आहेत.

पहिली म्हणजे मोह माया. जेंव्हा कोणी आपली मुले किंवा पैसा यात जास्त गुंतत चालला तर मग त्याला बाकीचे काही दिसत नाही, यालाच मोह माया म्हणतात.

अनेक लोक असे आहेत कि जे फक्त पैशाच्या मागे लागलेले असतात. मग ते इतर नातेसंबध जसे कि बायको, मुले, आई, वडील, मित्र वगैरे सर्व विसरुन जातात. त्यांना फक्त पैसा महत्वाचा वाटत असतो. आणि ते पैशासाठी कोणावरही खटला भरायला तयार असतात. ते आईवर, वडिलांवर खटला भरतील आणि सांगतील कि ते मानसिकरित्या सक्षम नाहीयेत, आणि पैशासाठी सर्वांशी भांडतील.कदाचित ते त्यासाठी कोणाला मारायला पण मागे-पुढे बघणार नाहीत...हि झाली मोह माया.

तर मोह माया म्हणजे काय, ज्यामुळे तुम्हांला फारसा आनंद मिळत नाही पण तिचा अभाव तुम्हांला दुख देऊ शकतो.

नंतरची ती महामाया. हि निसर्गातून उदयाला पावते किंवा जन्म घेते. ती असा काही पडदा तयार करते कि तुम्ही मग नीटसे पाहू शकत नाही. मग आपण त्यात अडकून जाऊन आळस वाटायला लागतो. आणि मग आपल्या सर्व भावना या दगडासारख्या होऊन जातात. 

त्यानंतरची ती योगमाया. योगामध्ये पण माया आहे. हि फारच आकर्षक आहे.

तुम्हाला सध्याची “निर्मल बाबा” यांची गोष्ट माहित असेलच (भारतातील एक आध्यात्मिक माणूस जो अलीकडे अध्यात्मात काही बेकायदेशीर घटनाबाबत चर्चेत होता)

ते एकीकडे लोकांना आशीर्वाद देत होते, पण लोक मात्र त्यांना लफंगा आणि भामटा म्हणत होते. पण ते मात्र तसे नाहीयेत. ते एक चांगले आणि निष्पाप गृहस्थ आहेत पण ते योगमायेत अडकले आहेत.

काहीवेळा असे होते कि, योग आणि साधना यांच्या नियमित सरावाने तुमच्यात काही दैवी शक्ती जागृत होतात. असे झाल्याने तुम्ही भविष्यात होणाऱ्या काही घटनाबद्धल ठामपणे सांगू शकता. मग तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागते. आणि अशा वेळी तुमच्यात काही गोष्टींविषयी जर आस किंवा ओढ असेल, आणि तुम्ही जर पूर्णपणे रिकामे , पोकळ नसाल तर ते त्या दैवी शक्तींच्या कामात अडथळा होऊ शकतात. अशावेळी मग भविष्य कथन पूर्णपणे सत्यात उतरत नाही. ते सुमारे पन्नास ते साठ टक्केच प्रत्यक्षात उतरते आणि मग बाकीचे खोटे ठरते.

त्याचप्रमाणे मला अशीच एक स्त्री माहित आहें कि जी योगमायेत अडकली होती. त्यांनी सुमारे २५ ते ३० वर्षे खूप साधना केल्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. मग त्यांना त्या साधनेमुळे देवीचा सहवास मिळू लागला होता आणि मग त्यांना असे वाटत देवी त्यांना काही गोष्टी करायला सांगत आहें. त्या स्त्रीचे यजमान त्यांच्या बरोबर राहत होते आणि त्यांना असे वाटले कि देवी त्यांना त्यांच्या यजमानांना मधुमेहाची औषधे देवू नका असे सांगतेय असे वाटले. “ त्यांना निश्चितच बरे वाटेल, तुम्ही त्यांना फक्त आशीर्वाद देत रहा.” असे त्यांनी ऐकले. म्हणून त्या फक्त त्यांच्या यजमानांना आशीर्वाद देत होत्या.

त्या त्यांच्या यजमानांना असे सांगत होत्या कि” देवी स्वतः मला असे म्हटली आहे कि तुम्हाला मधुमेहाची औषधे देऊ नको.”

पण ती औषधे न घेतल्यामुळे त्यांना मग अंधत्व आले, त्यांनी आपले दोन्ही डोळे गमावले.

त्या जेंव्हा दुसऱ्या लोकांशी बोलायच्या तेंव्हा त्यांना खूप चांगले वाटत असे. त्या जे काही सांगायच्या ते खरे व्हायचे.पण या घटनेनंतर त्या खूप त्रासून जाऊन त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या “ गुरुदेव, हे माझ्या बाबतीत असे का झाले?” माझे पती दृष्टीहीन का झाले?”

मी त्यांना म्हणालो “ तुम्ही योगमायेत अडकला आहात.”

आणि नेमके हेच निर्मल बाबांच्या बाबतीत झाले आहे.

असे पहा कि, काही गोष्टी तुम्ही समजू शकता तर काही नाही. खात्रीने तुम्ही लोकांना आशीर्वाद देऊ शकता. जेंव्हा तुमच्यात किंदालिनी जागृत होते, तेंव्हा तुम्ही लोकांना आशीर्वाद देऊ शकता. मग ते आशीर्वाद लोकांसाठी चांगले आणि फायदेशीर होतात. पण मग हे आशीर्वाद अंतर्गत इच्छांमुळे, जशी कि चांगल्या अन्नाविषयी, त्या अंतर्गत इच्छामुळे त्यामध्ये बाधा निर्माण झाली. आणि मग लोकांना दिलेले संदेश किंवा आशीर्वाद हे पण त्याच स्वरूपाचे होते. हे काही दिवस चालू राहिले आणि मग ते काम करेनासे झाले.  योगमायेत अडकले आणि मग त्यांना ते तसे सांगणारे कोणी नव्हते. त्यांना स्वतःला पण ते समजले नाही.

हे सर्व लक्षात आल्यानंतर, कोणी सिद्धींच्या मोह जालात न अडकता, स्वतःमध्ये आणि ध्यानात मग्न होऊन राहणे हेच योग्य आहे. असे झाले तर मग आशीर्वाद आपोआप फलद्रूप व्हायला लागतात.

आपल्याकडे आता येथे अनेक आशीर्वाद देणारे आहेत, येथे आशीर्वाद देणारे किती लोक आहेत? हात वर करा! तुमचे आशीर्वाद फलद्रूप होतात ना? ( सभेतील आशीर्वाद देणारे होय! म्हणतात)

बघा, तुम्ही सुद्धा आशीर्वाद देऊ शकता.

जेंव्हा तुम्ही भक्तीमध्ये मश्गुल होऊन तुमची योग साधना जर नियमित पणे चालू असेल तर तुम्हाला पण लोकांना आशीर्वाद देण्याची शक्ती प्राप्त होते आणि लोक त्यांच्या आजारपणातून बरे होऊ शकतात, त्यांच्या इच्छा आणि प्रार्थना फलद्रूप होतात. अशी सिद्धी योग आणि आध्यात्मिक अभ्यासातून प्राप्त होऊ शकते.

पण आपण जर त्या सिद्धीला काही अंधश्रद्धांची जोड दिली, म्हणजेच असे म्हटले कि तुम्ही जर दहा लोकांना भुकेल्या लोकांना जेवायला घातले, किंवा कुत्र्याला पोळी घातलीत तरच आशीर्वाद काम करतील तर ते नाहीये.

अनुग्रह हे नेहमी हेतू विरहित असतात (अहेतु कृपा), ते कधीच कोणताही गुणावर किंवा कारणावर अवलंबून नसतात. अनुग्रह मिळविण्यासाठी कधीच अटी नसतात. काही केल्यानंतर मिळणार असेल तर तो अनुग्रह नसून तो तर धंदा झाला. अनुग्रह किंवा कृपा हि नेहमीच असते. तुम्हाला फक्त अनुग्रहाची जाणीव असायला लागते आणि मग खात्री बाळगा कि अनुग्रहाचा वर्षाव हा होणारच.

आपण जेवढे अधिक कृपाळू व्हाल तेवढा अधिक कृपेचा अनुभव मिळवू शकाल. जे सारखे तक्रारी करीत असतात त्यांना कृपेचा अनुभव कधीही येत नाही. कृतज्ञ रहा, आभारी रहा. तुम्ही जेवढे अधिक समाधानी तेवढी अधिक कृपा अनुभवू शकता.

अनुग्रह किंवा कृपा हि कधीही खास अशी नसते. कृपा हि तर नेहमीच असते फक्त जाणीव आवश्यक असते.

अनुग्रह किंवा कृपा मिळविण्यासाठी काही किंमत मोजावी लागत नाही. पाकीट न उघडता, पैसे न देता कृपा मिळत असते.

पण जेंव्हा अशा स्वरूपाचे अयोग्य किंवा दिशा भूल करणारे विचार जेंव्हा मनात येतात तीच योग माया होय. त्याबद्धल कोणाला दोष देता येणार नाही.

कोणी आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे जर असे वागत असतील तर त्यांना तुम्ही दोषी धरू शकत नाही. त्यांच्या मनात काही किंतु नसतो कारण ते सर्वांना आशीर्वाद देत असतात. पण जेंव्हा काही मंडळी यातून पैसे मिळवायला लागली, त्याचा धंदा करू लागली तर त्यांची आशीर्वाद द्यायची शक्ती कमी पण होते.

तुमच्या हे लक्षात येतेय काय? ते योग्य धारणा विसरुन गेले आहेत.

म्हणून, जेंव्हा तुम्ही कोणाला आशीर्वाद देता तेंव्हा त्यात काही तडजोड करू नका. तुम्ही पैसे न घेता मुबलक आशीर्वाद द्यायला पाहिजेत. पण जर आशीर्वाद दिल्यानन्तर त्या लोकांनी काही पैसे देऊ केले तर त्याचा स्वीकार करून ते योग्य कामासाठी वापरा.

हे (आशीर्वादासाठी पैसे घेण्याची प्रथा) आता सर्व धर्मात सुरु झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तुम्हाला आशीर्वादासाठी काही देणगी द्यायला सांगितले जाईल. हे काही योग्य नाही. अनुग्रह मिळविण्यासाठी कधीच अटी नसतात.

मग तुम्ही आता असे विचारलं कि आर्ट ऑफ लिविंगच्या अभ्यासक्रमासाठी पैसे का द्यावे लागतात. कोणाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो. त्याचे कारण असे कि शिक्षण किंवा ज्ञान हे दक्षिणा दिल्या शिवाय मिळत नाही.

असे पहा कि आशीर्वाद हे मोफत असतात. पण जर दक्षिणा न देता तुम्हाला काही शिकायचे असेल तर त्याला तामसिक यज्ञ म्हणजेच नकारात्मक किंवा आळसातून घडलेली कृती म्हणता येईल.

ज्ञानार्जन हा एक यज्ञ, पवित्र काम आहे.

आपण येथे काही शिकत आहोत. काहीतरी देऊन मगच आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. आपण जर ज्ञानाच्या मोबदल्यात काही दिले तरच ते ज्ञान आपल्यापाशी टिकते.

हा मुद्दा प्राचीन आणि पवित्र ग्रंथातून आला आहे. ते काही का असेना, काही वेळ हा मुद्दा बाजूला ठेउयात. सध्याचा सर्वसाधारण अनुभव काय आहे? जेंव्हा तुम्ही फी भरून वर्गात बसता तेंव्हा इमानदारीने, लक्ष देऊन शिकू शकता. जर आम्ही फुकट शिकवू लागलो तर लोक एक-दोन दिवस येतील आणि तिसऱ्यादिवशी ते गायब होतील. ते पूर्ण लक्ष देवून शिकणार नाहीत.

म्हणून त्या अर्थाने आम्ही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतो. पण जर कोणी तुम्हाला म्हणाले कि पैसे देले तरच आशीर्वाद देतो तर तुम्ही त्यांच्यापासून लांब राहिले पाहिजे. ते योगमायेत गुंतले आहेत. म्हणून प्रसार माध्यमे आणि लोक त्यांना (निर्मल बाबा) ढोंगी आणि फसवे म्हणत आहेत. ते स्वतः आश्चर्य चकित झाले असले पाहिजेत कारण हे काय होतेय हे त्यांना पण माहित नाही. आता पर्यंत काम करणारे आशीर्वाद एकदम गायब कसे झाले?

साधनेच्या मार्गावर असे होत असते.

म्हणून असे म्हटले आहे कि “श्रोत्रियं ब्राह्मनिश्थम” (गुरू हे “श्रोत्रीय” आणि “ब्राह्मनिश्थम” असायला पाहिजेत.श्रोत्रिय म्हणजे ज्यांना शास्त्रांची चांगली जाण आहें आणि जे त्यांचे चांगले विवरण करू शकतात आणि ब्राह्मनिश्थम म्हणजे ज्यांचे सत्य ज्ञानात चांगले अधिष्ठान आहे.)

श्रोत्रिय आणि ब्राम्हनिश्थम असल्याशिवाय या शक्ती आणि हे खेळ फार दिवस टिकत नाहीत, ते फार लवकर संपून जातात.

हे सर्व योगमायेचे खेळ आहेत.

इथे पण काहीसे असेच झाले होते. एक स्त्री येथे आली आणि म्हणाली कि मी प्रत्यक्ष देवीचा अवतार आहे.मी त्यांना फक्त आदरपूर्वक आसन ग्रहण करण्यास सांगितले.

होय, हे पाहून कधी कधी खूप राग येतो. या गोष्टींचा राग येणे अगदी साहजिक आहे. पण रागाच्या भरता काही बोलणे किंवा काही करणे यात तुमची शक्ती उगीचच वाया जाते. 

तुम्हाला माहित आहे का, कि अशा शक्ती जेंव्हा एखदयाला प्राप्त होतात तेंव्हा त्या त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. आणि नेमक्या त्याच वेळी मनाचे खेळ सुरु होतात.

म्हणून ते काही वाईट किंवा अप्रामाणिक होत नाहीत.

होय त्यात काही अप्रामाणिक लोक पण आहेत पण तरी सुद्धा त्यात योगमायेच्या गुंत्यात अडकलेल्यांची संख्या जास्त आहे.

म्हणूनच योगसाधनेमध्ये योगमायेला समजून घेऊन त्या पलीकडे जायची गरज असते. तरच त्यात पूर्णता मिळून सिद्धी प्राप्त होतात. आणि मग त्यातून आयुष्याला पूर्णता मिळते.

तुम्ही जर नीट बघितले तर असे लक्षात येईल कि जेंव्हा तुम्ही साधक होता तेंव्हा सुरवातीला लोकांना शाप द्यायची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. म्हणून असे म्हणतात कि कोणाबद्धल वाईट चिंतू नये. जात कोणाविषयी वाईट विचार किंवा राग तुमच्या मनात आला तर त्याचा त्यांच्यावर लगेच परिणाम दिसून येतो. होय कि नाही?

किती लोकांना असा अनुभव आला आहे? तुम्ही जेंव्हा कोणावर रागावलात तेंव्हा त्यांचे नुकसान झाले आहे? असा अनुभव आले आहें कि नाही?( प्रेक्षकातील अनेक हात उंचावतात).

म्हणून कोणाचे वाईट चिंतू नका आणि सर्वांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्यात कंजूसपणा करू नका.

“जर मी कोणाला आशीर्वाद दिले तर माझी शक्ती कमी होईल” असा विचार करू नका. काही लोकांच्या मनात अशी चुकीची समजूत असते. ह्याला पण योगमाया म्हणतात.

योग मायेचे अनेक प्रकार आहेत. काही लोक केवळ स्पर्शाने दुखी आणि व्यथित होतात. त्यांना असे वाटते कि तो दुसरा त्यांची शक्ती काढून घेत आहे. तुम्ही एवढे का घाबरता? आपण सर्वजण चेतनेच्या समुद्रात बुडून गेलो आहोत. होय पण काही नियम पाळणे महत्वाचे असते.

म्हणून, योगमाया म्हणजे छोट्या सिद्धींच्या जाळ्यात अडकण्याची प्रवृत्ती होय. त्याच्या पलीकडे गेल्यावर साहजिकच त्या दैवी शक्तींचा लाभ होतो. आणि मग जेंव्हा तुम्ही आशीर्वाद देता तेंव्हा त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा सहज पूर्ण होतात.

प्रश्न: अहंकार, उद्धटपणा आणि आत्म-सन्मान यात काय फरक आहें?

श्री श्री : अहंकार आणि उद्धटपणा यात काही फरक नाहीये. “मी” हा अहंकार. “फक्त मीच चांगला आहें, इतर कोणीही चांगले नाहीये” हा झाला उद्धटपणा. उद्धटपणाचे अनेक प्रकार आहेत.

आत्मसन्मान हि एक अशी गोष्ट आहें कि जी तुम्ही कधीही घालविता कामा नये. जेंव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेंव्हा स्वतः बद्धल अभिमान वाटायला लागतो, तो आत्म सन्मान.

जर कोणी तुमचा अपमान करीत असेल तर तुम्ही तेथून निघून जायला पाहिजे. जर तुम्ही स्वतः बद्धल वाईट शब्द ऐकून घेतले तर त्याचा आत्य्म्याला त्रास होऊन तुम्ही शक्ती कमी होते. म्हणून जर कोणी तुम्हाला अपशब्द बोलत असेल तर ते ऐकून नका.

आज आपण हि एक नवी गोष्ट शिकलो!

प्रश्न: असे म्हणतात कि अहंकार असल्याशिवाय स्वताचे प्रयत्न होत नाहीत आणि असे पण म्हटले आहे कि अहंकार असू नये. यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होत आहे.

श्री श्री : होय, या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. तुम्ही “निस्सीम साधकासाठी अंतरंगातील गोष्टी” याचे वाचन करा, त्यात मी हे सर्व विस्ताराने सांगितले आहे.