श्री श्री यांचा गुरु पौर्णिमेचा संदेश

03
2012
Jul
बून, नॉर्थ कॅरोलिना
“ईश्वरो गुरुरात्मेती मूर्ती भेद विभागीने, व्योमावाद व्याप्त देह्या दक्षिणामुर्ताये नमः||”

(गुरु,स्वयं आणि देव यांच्यामध्ये काहीही फरक नाही. समस्त अवकाश व्यापणाऱ्या परमात्म्याचे देह रूप असलेल्या भगवान दक्षिणमूर्तीला माझा नमस्कार असो)

गुरु,स्वयं आणि देव यांच्यामध्ये काहीही फरक नाही. तुमचा आत्मा,गुरुतत्व आणि देव हे तिन्ही एकच आहेत. आणि हे तिन्ही (भौतिक) शरीर नाहीत. त्यांचे शरीर कसे आहे? तर ते आकाशाप्रमाणे आहे. 'व्योमावाद व्याप्त देह्या' (व्योम = अवकाश, देह = शरीर, व्याप्त = व्यापणारे)

तुम्ही देह नाही,तुम्ही आत्मा आहात आणि आत्म्याचा आकार हा अवकाशाप्रमाणे आहे. हेच प्रमाण गुरूला देखील लागू पडते. गुरुला भौतिक शरीरात बंदिस्त मानू नका. गुरु क्षेत्र आहे,सकल व्यापणारी उर्जा , चैतन्य आहे आणि तेच स्वयंसुद्धा आहे. आणि गुरुचा सन्मान करणे म्हणजेच आपला स्वतःचा सन्मान करणे होय.
भारतीय पुराणामध्ये एक अतिशय सुंदर कथा आहे.

भगवान शिव हे समस्त निर्मितेचे गुरु आहेत.ते सगळ्या देवांचे गुरु आहेत. त्यांना आदिगुरु संबोधितात-समयाच्या प्रारंभापासूनचे गुरु आणि ते समयातीत आहेत. तर जेव्हा भगवान शंकर यांना पुत्र कार्तिकेय झाला,तो शिकण्यास आणि ज्ञान मिळवण्यास भगवान ब्रह्मदेव यांच्या शाळेत गेला. नारायणं पद्माभावं-भगवान ब्रह्मदेव हे पद्माभावं (कमळावर आसनस्थ) आहेत.भगवान ब्रह्मदेव हे देखील गुरु आहेत आणि त्यांचे गुरु आहेत भगवान नारायण (भगवान विष्णू),आणि भगवान शिव हे भगवान नारायण यांचे गुरु आहेत.

तर ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलांना शाळेत किंवा गुरुकुलमध्ये पाठवतात,भगवान शिव यांनीसुद्धा आपल्या पुत्राला भगवान ब्रह्मदेवाकडे अभ्यास आणि ज्ञानार्जन करिता धाडले.

तर कार्तिकेय भगवान ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने म्हटले,'कृपा करून मला ॐ चा अर्थ सांगा.' भगवान ब्रह्मदेव म्हणाले,'अरे पहिले मुळाक्षरे तर शिक! तू तर थेट ॐ चा अर्थ विचारतो आहेस.' कार्तिकेय म्हणाला,'नाही. मला सर्वोच्च ज्ञान ॐ माहित करून घ्यायचे आहे.'

आता भगवान ब्रह्मदेव यांना सगळी मुळाक्षरे माहिती होती,परंतु त्यांना ॐ(अनादी ध्वनी) चा अर्थ माहित नव्हता. याचे कारण असे की त्यांचे ज्ञान ॐ च्या "अ" च्या अर्थापर्यंत मर्यादित होते. "ओ"ध्वनी भगवान विष्णू यांचा होता आणि "म" भगवान शिव यांचा. म्हणून भगवान ब्रह्मदेव यांना ॐ बद्दल पूर्णपणे माहित नव्हते.

तर कार्तिकेय भगवान ब्रह्मदेव यांना म्हणाला,'जर तुम्हाला ॐ चा अर्थ माहित नाही तर तुम्ही मला कसे शिकवणार? मी तुमच्याकडे शिकणार नाही.' आणि कार्तिकेय त्याचे पिता भगवान शिव यांच्याकडे परत गेला.

भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांना म्हणाले,'तुम्हीच तुमच्या पुत्राला सांभाळा.मी काही सांभाळू शकत नाही. मी जे काही म्हणतो,तो त्याच्या अगदी विरुद्ध म्हणतो. मी काही त्याला शिकवू शकणार नाही. आता उत्तम काय ते तुम्हीच ठरवा आणि त्याला सांभाळा.'

हे ऐकून भगवान शिव यांनी कार्तिकेयाला विचारले,'काय झाले,बेटा? भगवान ब्रह्मदेव हे समस्त सृष्टीचे निर्माता आहेत. तुला त्यांच्याकडून शिकले पाहिजे.'

यावर कार्तिकेय उत्तरला,'मग तुम्ही मला सांगा कि ॐ चा अर्थ काय आहे?'

हे ऐकून भगवान शिव यांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, 'मलासुद्धा माहित नाही.' 

कार्तिकेय म्हणाला,'मग मी तुम्हाला सांगेन कारण मला ॐ चा अर्थ माहित आहे.'

'जर तुला अर्थ माहित आहे तर मग तू मला सांग,' भगवान शिव म्हणाले. '

असे मी सांगू शकत नाही. तुम्ही मला गुरुचे स्थान दिले पाहिजे.जर मला तुम्ही गुरूच्या आसनावर बसवले तरच मी तुम्हाला सांगू शकतो', कार्तिकेय म्हणाला.

गुरु म्हणजे तो वरिष्ठ जागी अथवा वरिष्ठ आसनावर असला पाहिजे. शिक्षक नेहमी वर बसतो आणि जो शिष्य आहे तो खाली बसून शिक्षकाचे ऐकतो.

आता हा गुंता कसा सोडवायचा? कार्तिकेयाला कुठे बसवायचे? कारण भगवान शिव यांच्यापेक्षा वरचढ काही नाही! शिव हे सर्वश्रेष्ठ आहेत. ते तर कैलाश पर्वता (भगवान शिव यांचे स्वर्गीय निवासा)पेक्षा उंच आहेत. भगवान शिव यांनादेखील काय करावे हे कळत नव्हते. मग देवी पार्वती ( शिव यांची भार्या )भगवान शिव यांना म्हणाली,'तुम्ही त्याला आपल्या खांद्यांवर उचलून घ्या'.

म्हणून मग भगवान शिव यांनी त्याला खांद्यांवर उचलून घेतले आणि अशाप्रकारे त्याला स्वतःपेक्षा उंच आसन दिले. आणि मग भगवान शिव यांच्या कानात कार्तिकेयाने सांगितला परम सत्याचा अर्थ-ॐ काय आहे?! ॐ चा अर्थ!

इथे जे प्रतिक आहे ते म्हणजे की गुरु तत्व हे बालकासारखे आहे. गुरु तत्वामध्ये गोडपणा आणि निष्पापपणा आहे. अशा या गुरु तत्वाला भगवान शिव यांना उचलून घ्यावे लागले. खुद्द भगवान शिव यांना देखील गुरु तत्वाला ती जागा द्यावी लागली; स्वतःच्या वर कारण कार्तिकेय म्हणाला की केवळ याच रूपरेषेमध्ये तो ज्ञान शिकवू शकतो. हे म्हणजे असे झाले की विहिरीत पाणी आहे पण जर पाण्याचा वर्षाव अनुभवायचा असेल तर ते पाणी पहिले पंपाने वरच्या टाकीत चढवावे लागते आणि नंतरच तुम्ही त्याचा वर्षाव घेऊ शकता. त्याचप्रमाणे ही जागा द्यावीच लागते.

गुरु तत्वाचा सन्मान करणे हे जीवनात अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही त्याचा सन्मान करता तेव्हा तो सन्मान हा स्वयंचा असतो.

म्हणून इथे असे म्हटले आहे की गुरु तत्व हे बालकाप्रमाणे आहे--निष्पाप,बुद्धिवान,प्रतिष्ठित तरीदेखील नम्र--हे सगळे बाळामध्ये उपस्थित असणारे सद्गुण हे गुरु तत्वाची संकेत चिन्हे आहेत. आणि गुरु तत्वाचा सन्मान करणे म्हणजे स्वयं'चा सन्मान करणे,जीवनाचा सन्मान करणे होय. आणि हीच आहे गुरु पौर्णिमा --गुरु तत्व साजरे करणे आणि त्याचा सन्मान करणे.

गुरूचा सन्मान करणे म्हणजे बुद्धी,ज्ञान,निष्पापपणा आणि प्रेम यांचा सन्मान करणे.

तर मग भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकेय याने शिव यांना काय सांगितले?

तो म्हणाला,'ॐ म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेम आहात,मी प्रेम आहे. इथे उपस्थित असलेले सर्व प्रेम आहे आणि प्रेमाने ओतप्रोत आहे. सर्वाचे अमृत सार केवळ प्रेमच आहे. प्रत्येक विद्यावान हे प्रेम आहे.'

हे कार्तिकेयाने सांगितले. अशा प्रकारे ॐ चा अर्थ त्या आसनावरून आला.

तर मग आज आपण येथून काय घेऊन जात आहोत?

प्रेम हे जीवनाचे सार आहे आणि ते अतिशय नाजूक आहे. प्रेम आणि श्रद्धा हे काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. आणि गुरुचे शरीर हे प्रेम आणि श्रद्धेने बनलेले आहे. हे सार आहे.

गुरुपौर्णिमा हा असा आनंदोत्सव आहे ज्यात तुम्ही प्रेम आणि श्रद्धेचे महत्व ओळखता आणि ते काळजीपूर्वक कसे हाताळावे ते माहिती करता. तुम्हाला समजते आहे का? सांभाळून हाताळा. म्हणून ही कथा फार सुंदर आहे. गुरु तत्व हे बालकासारखे आहे.

मी हे आधीसुद्धा सांगितले आहे; आपले जगभरात हजारो शिक्षक आहेत. मला त्यांनी हे लक्षात ठेवून हवे की -- तुम्ही तुमचे आयुष्य शुद्ध,निर्भेळ, प्रामाणिक बनवा आणि तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही.

मी एक उदाहरण घालून दिले आहे. इतक्या वर्षात मी कधीही कोणालाही मनाने,शब्दाने किंवा कृतीने दुखावलेले नाही. एवढ्या वर्षात मी एकसुद्धा अपशब्द उच्चारलेला नाही.मी स्वतःची वाहवा करत नाही पण मी असाच आहे. आणि मला तुम्हीसुद्धा तुमचे जीवन असेच नाजूकपणे आणि जपून सांभाळून पाहिजे. आणि हे काही अशक्य नाही तर मी तुम्हाला सांगतो की हे शक्य आहे. या जगात शुद्ध निर्भेळ जीवन जगून यशस्वी होता येणे हे शक्य आहे. जेव्हा आपण ज्ञानाच्या मार्गावर चालतो तेव्हाच खरे यश हाती येते.

म्हणून सगळ्या हजारो शिक्षकांनो विनम्रपणा लक्षात ठेवा;नम्र राहा. विनम्रपणा आणि मोठेपणा! शाही मोठेपणा असू द्या. नम्रपणाचा अर्थ कमकुवतपणा असा नाही होत. ते तर कोणीही होऊ शकते,इतके नम्र आणि घाबरट. शाही मोठेपणाचा अर्थ असा नाही की तुम्ही ताठरपणाने वागावे--नम्रपणे मोठेपणा. तुम्हाला समजते आहे का? 

अनुकंपायुक्त सामर्थ्य

निष्पापपणा आणि बुद्धिमंत

खेळकरपणायुक्त ज्ञान

चारित्र्यात पवित्रता

भक्कमपणा सोबत तरलता-- नेहमी जे तरल असते ते मजबूत नसते. पण हे कोमलपणापेक्षा निराळे आहे, नाही का?

गुरु म्हणजे जपून हाताळा (हशा). जसे तुम्ही प्रत्येक नाजूक सामनावर 'जपून हाताळा' असे चिन्ह घालता तसे. ठिसूळ किंवा तकलादू नाही पण जपून हाताळा.