1
2012............................... Norway, Europe
May
ओजस –
आयुष्याचे द्रव्य
तुम्ही लहान असताना सगळेजण तुमच्यावर प्रेम
करतात, पण जसे तुम्ही मोठे होता तसे ते कुठेतरी हरवत जाते आणि मग तुम्ही ते
मिळवण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
ह्या प्रयत्नामध्येच प्रेम दडलेले असते. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व इच्छा आणि
तिरस्कार सोडून प्रेम मिळवता त्यावेळेस निर्सगाला पण आनंद होतो. आणि हेच निर्सगाला
पण आवडते. तो तुमच्या पुढे काहीतरी ठेवतो आणि ते मिळण्यासाठी तुम्हाला उत्तेजित
करतो आणि ते तुम्ही मिळवल्यानंतर त्याला हि खूप आनंद होतो.
ह्याच सार ह्या उदाहरणावरून सांगता येईल. जरा
विचार करा ह्या जगात इतक्या प्रकारचे व्यवसाय असताना, तुम्ही फक्त एकच का निवडता?
तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर का व्हावयाचे वाटते? तुम्ही काय निवडता हे नगण्य आहे.
तुम्ही जर या जगात एकच व्यवसायाचे ध्येय ठेवले तर तो तुमच्या पासून दुरावत जाईल.
पण जर का तुम्ही कोणताही एक व्यवसाय निवडला आणि मेहनत घेतली तर तुम्ही यशस्वी होत
जाताल. कळले का?
आपण जर आनंद आणि सुख ह्यांच्या पाठीमागे धावलो
तर आपल्याला तो छोट्या गोष्टींमध्ये मिळत नाही. ते आपल्यासाठी चांगलेच आहे, कारण
तो आनंद, सुख जर आपल्याला मिळाला असता तर आपण तिथेच संपलो असतो. आपले आयुष्य एकदम
उदास झाले असते. म्हणून आपण परत दुसरी कडे प्रयत्न करतो आणि तो मिळवतो. हे चक्र किती सुरेख
आहे ना !!!!
प्रश्न: ओजस हे आनंदा प्रमाणे आहे का?
प्रश्न: ओजस हे आनंदा प्रमाणे आहे का?
श्री श्री रविशंकर: आनंद, ओजस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे.
ओजस ही तुमच्या शरीरामध्ये असणारी एक प्रकारची उर्जा, कंपन आहे. जसे तुमच्या मध्ये
सकाळच्या वेळेस खूप उर्जा, स्फूर्ती असते आणि तुम्ही कामावर जाता आणि मग तुम्हाला
कंटाळा येतो. संध्याकाळी तुमच्या मध्ये सकाळी असलेली स्फूर्ती, उत्साह नसतो, बरोबर
आहे कि नाही?
त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमच्या पाचही ज्ञानेंद्रियातून
आनंद घेता, तुम्ही तीन तास टीव्ही पाहता किंवा एखादा चित्रपट पाहून येता त्यावेळेस
तुमचा ओजस खर्ची पडतो. जर तुम्ही खूप वेळ संगीत एकले, खूप अन्न ग्रहण केले तरी
तुमचा ओजस खर्ची पडतो. खूप कामवासनेने तर तुमचा ओजस संपून जातो. तुम्ही जर पाच
ज्ञानेंद्रिया पैकी कोणत्याही ज्ञानेंद्रियाकडे आकर्षक झालात तर तुमचा ओजस खर्ची
पडतो.
ओजस आपल्या शरीरामध्ये पुन:निर्माण करू शकतो. त्यासाठी
सात्विक जेवण घेतले पाहिजे, चांगला आराम केला पाहिजे, चांगली प्रवृत्ती असली
पाहिजे. पण हे सर्व वृद्धापकाळी नाही. वयाच्या ६० व्या वर्षी तुम्ही तुमचे ओजस
वाढवू शकत नाही. ज्याप्रमाणे आपले शरीर हे काही वयापर्यंतच लवचिक असते.
ओजस हे तुमच्या शरीरामध्ये असणारे कंपन आहे, एक प्रकारची
उर्जा आहे. आपल्या शरीरामध्ये सात स्तर आहेत आणि ओजस हा त्यापैकीच एक. तुम्ही हे
नाडी परीक्षण करताना अनुभवू शकता. काही वयाच्या काळानंतर शरीरातील टेसटोसटेरोन
हार्मोन संपतात. ते तुम्ही पुन्हा निर्माण करू शकत नाही. ओजसच पण तसच आहे.
किशोर अवस्था मध्ये शरीरामध्ये ओजसचे प्रमाण खूप असते. या
अवस्थेत जर एखाद्याने आपले नित्यक्रम चांगले ठेवले, जेवण सात्विक ठेवले तर
गृह्स्थाश्रमा पर्यंत ओजसचे प्रमाण चांगले राहते. ह्या वयात तुम्ही ओजसचे प्रमाण वाढवू शकता. ते
शक्य आहे. पण वयाच्या ६० व्या किंवा ७० व्या वर्षी तुम्ही म्हणू शकत नाही कि, आता
मला माझ्या शरीरामध्ये ओजस चे प्रमाण वाढवायचे आहे. ते शक्य असू शकेल पण फार फार कठीण
आहे.
मग तुम्हाला कायाकल्प हे उपचार करून घेण्यास सांगण्यात येते. कायाकल्प हा विशिष्ट प्रकारचा आयुर्वेदिक उपचार आहे. तिथे तुम्हाला ४० दिवस एका छोट्या बंद खोलीत ठेवले जाते, सूर्यप्रकाश पण तिथे नसतो. तिथे एका विशिष्ट प्रकारचा आहार घ्यावा लागतो आणि तुम्हाला सूर्यप्रकाशात आजिबात जाऊ दिले जात नाही. ह्या उपचारानंतर लोकांना आपण परत तरुण टवटवीत झाल्या सारखे वाटते. आपण जणू गर्भाशयात असल्यासारखे वाटते. ज्याप्रमाणे छोटे बाळ ९ महिने गर्भाशयात असते. ४० दिवस तुमच्यावर कठोर उपचार केले जातात. त्या खोली मध्ये फक्त डॉक्टरच येतो जो तुमच्यावर उपचार, मसाज करतो.
मग तुम्हाला कायाकल्प हे उपचार करून घेण्यास सांगण्यात येते. कायाकल्प हा विशिष्ट प्रकारचा आयुर्वेदिक उपचार आहे. तिथे तुम्हाला ४० दिवस एका छोट्या बंद खोलीत ठेवले जाते, सूर्यप्रकाश पण तिथे नसतो. तिथे एका विशिष्ट प्रकारचा आहार घ्यावा लागतो आणि तुम्हाला सूर्यप्रकाशात आजिबात जाऊ दिले जात नाही. ह्या उपचारानंतर लोकांना आपण परत तरुण टवटवीत झाल्या सारखे वाटते. आपण जणू गर्भाशयात असल्यासारखे वाटते. ज्याप्रमाणे छोटे बाळ ९ महिने गर्भाशयात असते. ४० दिवस तुमच्यावर कठोर उपचार केले जातात. त्या खोली मध्ये फक्त डॉक्टरच येतो जो तुमच्यावर उपचार, मसाज करतो.