6 May 2012


 6
2012............................... Montereal, Canada
May


बौद्ध पौर्णिमेविषयी श्री श्री
मॉन्टरिअल,कॅनडा-६ मे २०१२

आज बौद्ध पौर्णिमा, भगवान बुद्धांचा जन्मदिवस आहे. त्यांचा ज्ञानोदय, निर्वाण आणि मृत्यू हे देखील याच दिवशी झाले.
आजचा चंद्र नेहमीच्या पौर्णिमेंपेक्षा वीस टक्के जास्तच मोठा वाटतो आहे. हा तर केव्हढा मोठा चंद्र आहे. तुम्ही चंद्रोदय बघायला पाहिजे.
आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटासा बुद्ध आहे आणि तो बुद्ध सिद्धार्थाच्या रूपामध्ये आहे. सिद्धार्थ कोण आहे ते माहिती आहेबुद्ध हे बुद्ध होण्याच्या आधी सिद्धार्थ होते. तो भटकलेला आणि हरवलेला होता. त्याने सगळे सगळे प्रयत्न केले परंतु त्याला काही सापडले नाही; पण त्याची चौकस वृत्ती होती.
तो म्हणाला,'हे जग म्हणजे दुःख आणि मला या दुःखांपासून सुटका हवी.' सगळेच दुःख आहे हे सिद्धार्थला समजले होते, पण त्याला मार्ग माहित नव्हता.
तर आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटासा बुद्ध आहे आणि त्याला केवळ जागृत व्हायला पाहिजे.
बुद्धाने याची, त्याची, अमक्याची आणि तमक्याची चाचणी करून बघितली. ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेले, त्यांनी एका मागून एक, एका मागून एक तंत्रे वापरून पहिली पण कशाचाच उपयोग झाला नाही. कारण हे सर्व करताना त्यांचे मन बाहेर धाव घेत होते आणि या सगळ्यांमुळे जेव्हा ते थकून भागून गेले आणि शेवटी त्यांनी सगळ्याचा त्याग केला आणि त्याच क्षणी त्यांना ज्ञानोदय झाला. तर अशी हि कथा आहे. अशा प्रकारे जेव्हा ते प्रयत्न करून करून थकून गेले तेव्हा ते म्हणाले, 'चला,आता मी आराम करतो. मी सोडून देतो.' असा त्यांनी त्याग केला आणि त्यांचे मन अंतर्मुखी झाले आणि सिद्धार्थचा भगवान बुद्ध झाले.
तर मनाला आत वळवा.
दुर्दैवाने बुद्धांना गुरु मिळाले नाही, त्यांना त्या वेळेला गुरु मिळू शकला नाही. पण आदिशांकाराचार्य यांना गुरु होते. त्यांना गुरु मिळाले आणि त्यांचा मार्ग सोपा आणि सुकर झाला. ते केवळ बसल्या बसल्या समाधिस्थ व्हायचे. परंतु बुद्धांना समाधिस्थ आणि ध्यानस्थ होणे शक्य नव्हते. त्यांच्याकरिता ते कठीण होते. म्हणून त्यांनी उपास केले. कोणीतरी त्यांना उपास करण्यास सांगितले आणि त्यांनी उपास केले. भगवान बुद्ध हे राजघराण्यातील राजे होते आणि त्यांना शरण जाणे, भक्तीभाव किंवा त्याग अशा भावना माहिती नव्हत्या. त्यांनी केवळ रणांगणावर पराक्रम करणे, आणि रणांगणातील कर्तृत्व हेच ऐकले होते आणि तसेच प्रशिक्षण त्यांना मिळाले होते. असा मोठा अहं आणि भले मोठे कर्तृत्व याने त्यांना खूप वर्षे पळविले. शेवटी त्यांनी सगळे त्यागले आणि मग त्यांना ज्ञानोदय झाला; अशी ही कथा आहे.
तर तुमच्यातील त्या छोट्या मनाला काहीही सोडायचे नाही आणि कोणताही त्याग करायचा नाही. 'मला करायचे आहे, मला करायचे आहे आणि मला करायचे आहे. मी हे कमावणार आणि मी ते कमावणार.' असे त्या मनाचे भ्रमण चालू असते. जेव्हा तुम्ही बघता, कमावण्यासारखे काय आहे? तेव्हा सगळे सुटते,तुम्ही शरणागत होता, तुम्ही सोडून देता आणि ध्यान घडते. हे आयुर्वेदाच्या मालीशच्या टेबलवर पडण्यासारखे आहे. तुम्ही टेबलवर चढून बसता, बस्स, तुम्ही अजून काहीही करीत नाही. तुमच्याकरिता सगळे केले जाते; अश्या प्रकारे ध्यानदेखील तुमच्याकरिता केले जाईल. तुम्ही केवळ बसा आणि ध्यान घडून येईल.