टीका ही अनुकंपा आणि काळजीयुक्त असावी


10
2012............................... Montereal,Canada
May

माँटरिअल,कॅनडा-१०,मे २०१२

प्रेमापासून कधीही सुटकारा घेऊ नका. तो तुमचा स्वभाव आहे. एक तर ते त्याच्या निखळ स्वरूपात उपस्थित असते किंवा मग विकृत रूपामध्ये. एक तर निखळ प्रेम असते किंवा मग निखळ प्रेम विकृत रूपामध्ये व्यक्त होते.
विकृत प्रेम कोणकोणते आहे? राग, मत्सर, तिरस्कार, लोभ आणि अधिकारवृत्ती. हा सगळा लवाजमा, नकारात्मक भावना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शीर्षासन केलेले प्रेम होय. दोषारोप करणे हे देखील प्रेम आहे. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?
जर तुम्हाला कोणी पसंत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर राहाल. परंतु जर तुम्ही तिला दूषण देत असाल तर तुम्हाला ती व्यक्ती खरोखर आवडते. जर तुम्ही तिच्यापासून दूर राहू शकत नाही, दूर होऊ शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही तिला दूषण देत बसता.
दोषारोप करण्याचा काय उपयोग? आता बघा जर तुम्ही कोणावर ठपका ठेवला आणि जर तो माणूस खरोखर दोषी असेल,तर पहिल्यांदा तो प्रक्षुब्ध होईल,परंतु जर तुम्ही सतत त्याच्यावर आळ घेत राहिलात तर तो संवेदनाशून्य होईल; तो फिकीर करणे बंद करून टाकेल. समजा एखादा चोर आहे आणि तुम्ही त्याला सांगत राहिलात, 'तू चोर आहेस',तर त्याला दुषणे देण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवीत आहात, कारण दर वेळेस तुम्ही त्याला तसे म्हणाल, पण त्याला त्याची पर्वा नाही. ते त्याच्या हृदयाला भिडत नाही.
संपूर्ण दिवस तुम्ही उंच मनोऱ्यावर उभे राहून ओरडत बसा, 'तो चोर आहे,तो चोर आहे', त्याने काय होणार?त्या चोराला त्याने काहीही फरक पडत नाही.
तुमच्या दोष देण्याने खऱ्या गुन्हेगारावर काहीही परिणाम होत नाही. जर तो खरा गुन्हेगार नसेल, तो एक इमानदार माणूस असेल,एक सच्चा माणूस आणि तुम्ही त्याला दुषणे दिलीत तर त्याचे हृदय तुटते, ते त्याच्या आत्म्यात शिरते, त्याच्या अंतरात्म्याला आतपासून ढवळून टाकते. जर तो माणूस योगी असेल तर हे तो स्वतःच्या फायद्याकरिता वापरेल.
जर तो माणूस योगी असेल, म्हणजे असा ज्याच्याकडे ज्ञान आहे, तर तो म्हणेल कि लोक पूजा करो वा निंदा, पण मला माझी स्तितप्रज्ञता ठेवली पाहिजे. तर योगी पुरुष याचा स्तिथप्रज्ञता कायम ठेवण्याकरिता उपयोग करतो आणि सगळ्याकरिता सद्इच्छा करतो. जर तो माणूस ज्ञानी नसेल, आणि जर त्याचे हृदय तुटले असेल आणि त्याला त्याच्या वेदना होत असतील तर ते उलटून तुमच्याकडे परतेल. दोन्ही प्रकारांमध्ये टीका करण्याने आणि त्यांच्याबद्दल वाईट लिखाण करण्याने काहीच साध्य होत नाही.
माझ्या ऐकण्यात आले आहे की असे काही लोक आहेत जे दी आर्ट ऑफ लिविंग बद्दल दिवस अन् रात्र केवळ नकारात्मक लिखाण करीत आहेत. असे करण्याने ते जे लिहीत आहेत त्याचा निदान पाठपुरावा तरी करीत आहेत! त्यांचे लिखाण केवळ निरर्थक आहे. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. त्याचा उदेश्य काय, ते आपल्याला माहित नाही. असे करून त्यांना लोकांना दी आर्ट ऑफ लिविंगमध्ये येणे थांबवायचे आहे का? मी अशा लोकांना सांगतो की असे केल्याने ते साध्य होणार नाही. तरीसुद्धा लोकांचा लोंढ इथे येतच राहणार. जर त्यांनी टीकात्मक लिखाण केले तर हे काय आहे अशी लोकांची उत्सुकता वाढेल आणि काहीही असो लोक येणार. तर अशा प्रकारे ते आपली शक्ती आणि वेळ वाया घालावीत आहेत.
तर टीका करण्याने आपली प्रगती होत नाही आणि त्यातुन काहीच निष्पन्न होत नाही. असे समजा कि तुमच्या टीका करण्याने तुम्ही कोणामध्ये सुधार आणू शकत असाल तर अतिउत्तम,पण गोमेची बाब अशी कि निंदा करण्याने तुम्ही कोणत्याही अपराध्याला सुधारू शकत नाही. तुम्ही त्याच्यात सुधार आणू शकता ते केवळ प्रेम, अनुकंपा आणि संवाद साधून. टीकेचा अर्थ आहे संवादाची अनुपास्तिथी.
जर खरा अपराधी असेल आणि तुम्हाला त्याला सुधारायचे असेल, तर तुम्ही ते केवळ संवादाद्वारा करू शकता. आणि जर तो खरा अपराधी नसेल तर ही सगळी कसरत व्यर्थ. तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणतो आहे ते? तुमची ही सगळी कसरत व्यर्थ आहे कारण तुम्ही टीका करताय, करताय आणि त्याने काहीच मदत होत नाही.
असे बघा तुमच्या घरी कोणी अतिशय निगरगट्ट आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला वैताग आणते आहे. तुमची आई, वडील, बायको, मुले किंवा आणि कोणी तुम्हाला चिडवत आहे, तुम्ही काय करता? तुम्ही निंदा करता. तुम्ही तुमच्या सासूबाईंची टीका केली तर त्यातून तुम्हाला सकारात्मक मिळणार नाही. त्याने तुमच्या समस्या वाढणार आहेत! त्यांची निंदा, टीका करण्यापेक्षा, या संधीचा उपयोग तुमची स्तिथप्रज्ञता, तुमचा आंतरिक समतोल ठेवण्याकरिता करा. जर सगळे काही ठीक आहे, जर सगळे तुमचे कौतुक करीत आहे आणि तुम्ही म्हणालात कि मी स्तिथप्रज्ञ आहे,तर याला काही अर्थ नाही. यात काही समंजसपण नाही.
जर तुम्ही केलेल्या गोष्टीकरिता थोडे लोक किंवा एखादा माणूस तुमची टीका करीत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही तुमचा समतोल राखालात तर मग तुम्ही काही कमावले,तुम्ही काही मजल गाठली आणि तुम्ही एक पायरी वर चढलात. समजतंय मी काय म्हणतो आहे?  तुम्हाला अशा संधीची आवशक्यता आहे. जर कोणी तुमच्यावर टीका करीत असेल आणि तुम्ही ते जे करीत आहेत ते निरर्थक आणि खोटे आहे हे जाणून तुमची स्तिथप्रज्ञता ठेवू शकला तर चांगले.
निष्पाप माणसाला दोष देण्याने काहीच चांगले होत नाही, दोष देणाऱ्याला निष्पाप माणसाने आशीर्वाद दिले तरीसुद्धा. जे निष्पापांना दोष देतात, हि चांगली गोष्ट नाही. परंतु रचनात्मक टीका ही जरुरी आहे.
याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही बरोबर वाटत नसतानादेखील तुम्ही चांगले आणि कौतुकच करावे. मनातून संताप असताना तुम्ही चेहऱ्यावर हसू ठेवा. याने काम होणार नाही. आपण सच्चे असले पाहिजे. तुम्ही इमानदार असले पाहिजे. क्रोधाला आत दाबून टाकण्याने इतर समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे कधीही स्फोट होणारा बॉम्ब  किंवा टायम बॉम्ब  बनून फिरणे धोकादायक आहे, म्हणून आपल्याला काही समतोल असणे, काही ज्ञान असणे जरुरी आहे. मौन, ध्यान आणि अशा प्रकारच्या सरावांमुळे तुम्ही त्या दिशेने प्रयाण करता.
आता मला असे सांगू नका, 'मी किती काळापासून ध्यान करतो आहे तरीसुद्धा मी संतप्त होतो.' हरकत नाही. जर आधी तुम्ही शंभर वेळा रागवत होता तर आता डझनभर वेळा रागावता. जर तुम्हाला डझनभर वेळा संताप येत होता तर आता एकदा-दोनदा येतो. अशाप्रकारे नेहमीच कमी कमी होत जातो.
तुम्ही असे नाही म्हणू शकत कि याचा अजिबात उपयोग नाही. जेव्हा तुम्ही कोणाची टीका करता तेव्हा तुम्ही टीकेच्या कारणाचा पडताळा करता. तुम्हाला त्या व्यक्तीला सुधारायचे आहे म्हणून तर तुम्ही टीका करीत नाही आहात ना? किंवा तुम्हाला तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची आहे म्हणून तर तुम्ही दुषणे नाही देत आहात? तुमच्या मनाचा कल कुठे आहे? तुम्हाला असे का करायचे आहे? भावनांना वाट करून देणे किंवा कोणाची टीका करण्याने तुम्ही किती अपरिपक्व आहात ते दिसते, तुम्हाला किती मत्सर वाटतो आहे, तुम्ही तुमच्या मनाला आवर घालू शकत नाही आणि तुम्हाला ध्यानाची किती आवश्यकता आहे हे दिसून येते. हो कि नाही?
मी शाळेत शिकत असताना एक अतिशय सुंदर कन्नड स्तोत्र शिकलो. ते असे होते,'जर तुम्ही रानात घर बांधले आणि म्हणालात की मी रानटी प्राण्यांना घाबरतो तर मी तुम्हाला काय सांगू? जर तुम्ही सागरकिनारी घर बांधले आणि म्हणालात कि तुम्ही समुद्राच्या लाटांना घाबरता तर मी तुम्हाला काय सल्ला देऊ? आणि तुम्ही शहराच्या मधोमध घर बांधले आणि आवाजाचा त्रास होतो तर तुम्हाला मी काय सल्ला देऊ? त्याचप्रमाणे तुम्ही डोंगरमाथ्यावर घर बांधले आणि तुम्ही म्हणता कि तुम्हाला वारा आवडत नाही, तुम्हाला हवा आवडत नाही आणि तुम्हाला वाऱ्याची भीती वाटते, तर मी तुम्हाला काय सांगू? त्याचप्रमाणे या जगात, या समाजात राहून, जर तुम्हाला कौतुक आणि टीकेची भीती वाटत असेल की मला कौतुक किंवा कोणतीही टीका नको तर मी तुम्हाला काय सांगू?मी माझ्या प्रभूंच्या पायाशी शरण आलो आणि मला सगळीकडे आरामच आराम आहे. प्रभु चरणी शरण जाणे हाच केवळ आराम आहे.' किती सुंदर आहे हे!
अशी कोणती जागा आहे जिथे भीती नाही? ती आहे देवाच्या पायापाशी. शाळेत असताना पाठ्यपुस्तकातील या छोट्या छोट्या कवितांना आम्ही हसायचो. मला वाटते आता या कविता काढून टाकल्या आहेत.
आम्हाला असे धडेदेखील होते कि जर कोणी निंदा केली किंवा कोणी कौतुक केले तरी त्यांना समान वागणूकच द्यायची, तुम्ही त्याच्याबाबतीत काळजी करायची नाही. टीकेला तोंड द्या. आणि अनुकंपेने रचनात्मक टीका करा. टीका अनुकंपा आणि काळजीयुक्त असावी. त्याने काम होते. रागाने, मत्सराने आणि तिरस्काराने केलेल्या टीकेने काम होत नाही. त्याने काहीच निष्पन्न होत नाही.
प्रश्न : प्रिय गुरुदेव, मला वाटते की आजची शिक्षणपद्धती ही मुलांकरिता अपायकारक आहे. आपल्याला सहकाराऐवजी स्पर्धा शिकवली जाते आणि गुणांकरीता चांगल्या नोकरी करिता अभ्यास करण्यासाठी उद्युक्त केले जाते जेव्हा विषय समजण्यामध्ये गोडी निर्माण केली जायला पाहिजे. विषय आपल्या गतीने समजण्याच्या जागी माहिती पाठांतर करण्याची जबरदस्ती केली जाते. तुमचे यावर काय मार्गदर्शन आहे, गुरुजी? परीक्षा आणि अवघड अभ्यासक्रम नसलेल्या शाळा शोधल्या पाहिजे का?
श्री श्री रविशंकर : तुम्हाला माहिती आहे, अभ्यासपद्धती आदर्श नसली तरी आपल्याला धारेबरोबर वाहत जावे लागते कारण तसे केले तरच तुमच्या मुलाला नोकरी मिळू शकते. त्यांना शैक्षणिक मान्यता मिळते. वैद्यक शास्त्रातदेखील बरीच पाठ्यपुस्तके आहेत जी खूप आधी लिहिली गेलेली आहेत आणि तरीदेखील ती आज शिकवली जात आहेत. आजच्या आधुनिक वैद्यक शास्त्राने बऱ्याच गोष्टी असंबंधित ठरवल्या आहेत, तरीदेखील तीच जुनी पाठ्यपुस्तके अभ्यासात आहेत.
काल मी ऐकले कि काही ४३ जनुके आहेत ज्यामुळे हृदय विकार होऊ शकतो,पण आपल्या वैद्यक शास्त्राला केवळ पाच किंवा सहाच माहिती आहेत. ते त्याच सीमेरेखेमध्ये विचार करतात. त्यांना बाकीचे निर्देशांक माहित नाही.
तर विज्ञान हे कायम अद्यावत होत राहते. नवीन शोध लागत आहेत आणि जुने नमुने अप्रचलित होत आहेत. दिशा बदलणे ही देखील एक योजना आहे पण शाळा-काँलेजांमधून मुले अजून तोच जुना अभ्यासक्रम अभ्यासत आहेत. अभ्यासक्रम अद्यावत करण्यास त्यांना बराच अवधी लागतो.
उदाहरणार्थ, इतिहासामध्ये आर्यांच्या आक्रमणाविषयी मीमांसा आहे कि आर्य हे मध्य आशियामधून आले आणि भारतावर त्यांनी स्वारी केली. आज ते चुकीचे आणि संपूर्ण खोटे आहे असे त्यांनी सिद्ध केले आहे. पण पाठय्पुस्ताकांमध्ये तिच जुनी कहाणी अजून चालू आहे. ते बदलायला त्यांना अजून एक दशक लागेल. पण काही पर्याय नाही. जर कोणी म्हणाले कि, 'नाही,मी हा अभ्यास करणार नाही, मी स्वतःचा स्वतः करेन,' तर त्यांना पदवी मिळणार नाही. त्यांना नोकरी मिळणार नाही. त्यांना जास्त ज्ञान जरी असले तरी त्यांना शिकले सवरलेले देखील समजले जाणार नाही. जर तुम्ही छंद, आवड, माहिती ज्ञान मिळवण्याकरिता शिकत असाल तर तुम्हाला पुस्तकी शिक्षणाची गरज नाही. पण तुम्ही जर व्यवसाय म्हणून करीत असाल, नोकरी शोधण्याकरिता तर मग तुम्हाला धारेबरोबर वाहणे जरुरी आहे.
भूतकाळामध्ये बऱ्याच हुशार व्यक्तींनी हा प्रयत्न करून पहिला. खूप लोकानी प्रयोग करून बघितले पण या प्रकल्पाच्या यशाबद्दल एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला माहिती नाही कि शिकलेल्या किती मुलांना नोकरी मिळाली आणि त्यांच्या व्यवसायात ते किती यशस्वी झाले. ते झाले असतील पण ते एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.
अमेरिकेतील घरच्या शाळा चांगल्या आहेत; जास्तीत जास्त लोक आज घरच्या शाळा घेत आहेत. मी नाही म्हणत नाही पण तुम्हाला त्याची माहिती काढावी लागेल. जर तुमचा घरचा धंदा असेल तर मग पदवी असण्या नसण्याने काही फरक पडत नाही कारण तुमची मुले तो धंदा पुढे चालवतील. मग ते त्यांना पाहिजे ते करू शकतील.
प्रश्न : मृत्यूच्या वेळी कोणता मंत्र उच्चारावा किंवा कोणती प्रतिमा ठेवावी? शास्त्रानुसार जर तुम्ही योग्य कृती केली तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. तसेच कुटुंबातील सदस्यांनी काय उच्चारावे किंवा कुजबुजावे ज्याच्या मदतीनी मृत्यू पावणाऱ्याला मुक्ती मिळेल?
श्री श्री रविशंकर : मी तर म्हणेन नमः शिवाय किंवा  नमो नारायणाय अथवा हरी ; या पैकी कोणताही.
प्रश्न : आत्मा एक आहे का अनेक? जर तो एकाच आहे तर मग एका देहापासून दुसऱ्या देहाकडे नेणाऱ्या व्यक्तिगत कर्मांचा वाहक कोण आहे? ज्ञानोदय झाल्यानंतर आपले व्यक्तिवैशिष्ट्य कसे टिकून राहते? ज्ञानोदय झालेली एकच व्यक्ति आहे का अनेक?
श्री श्री रविशंकर : तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर तर एक अख्खे पुस्तक लिहिले जाऊ शकते! कधीतरी आपण सगळे प्रश्न एक एक करून घेऊया.आता या क्षणी तुम्ही अचंबित होणे चालू ठेवा.
प्रश्न : माझ्याबरोबर असे काय होते कि माझे तुमच्याबरोबरचे अनुबंध हरवते आणि नंतर पुन्हा सापडते? यावर तुम्ही काही मत प्रदर्शन करू शकता का? एके दिवशी हे बदलेल का?
श्री श्री रविशंकर : अनुबंध हरवणे  हा भ्रम आहे आणि अनुबंध असणे हे सत्य आहे हे समजून घ्या.
कधी कधी काळे ढग जमा झाले कि आकाश दिसेनासे होते. निळे आकाश कुठेही गेलेले नसते. थोड्या अवधीत ते काळे ढग नाहीसे होतात. आकाश कायम त्याच्या जागीच असते. ते ढग येण्याआधी होते, ढग असताना होते आणि ढग निघून गेल्यावर देखील ते होते, संपूर्ण वेळ आकाश होते. त्याचप्रमाणे आपला अनुबंध आहे, अनुबंध तुटल्याचा केवळ आभास आहे.
प्रश्न : वाचला जाणारा प्रश्न श्रोत्यांपैकी कोणी विचारला हे तुम्हाला माहिती आहे का?
श्री श्री रविशंकर : जोपर्यंत तुम्ही उत्तर घेता आहात तोपर्यंत चांगले आहे. असे समजू नका कि उत्तर भलत्या कोणासाठी आहे. तो प्रश्न तुमचा होता आणि त्याचे उत्तर केवळ तुमच्याकरिता आहे.
प्रश्न : ''चा अर्थ काय? जेव्हा आपण त्याचे तीनदा उच्चारण केल्याने आपल्यामध्ये काय जागृत होते?
श्री श्री रविशंकर : माहित आहे, २०१० मध्ये बॅास्टन शहरात कोण्याएका जागी गुरु पौर्णिमेच्या वेळेस, बॅास्टन-कॅानेक्टीकट भागातील एका महिलेने संशोधन केले ज्यामध्ये  '' चा ध्वनी त्यांनी ध्वनिमुद्रित केला आणि कॉम्पुटरमध्ये घातला आणि असे दिसून आले की '' कंपन संख्या हि पृथ्वीच्या भ्रमण कंपन संख्येएवढीच आहे. म्हणजे एका दृष्टीने बघायाले गेले तर पृथ्वीच '' म्हणते आहे. हे अतिशय रोचक आहे.
'' म्हणजे एक हाताच्या टाळीचा आवाज. '' चिरंतन ध्वनी आहे;'' हा असा ध्वनी आहे जो विश्वामध्ये कायम असतो.
भूतकाळातील समस्त संत जेव्हा गहन ध्यानस्थ झाले, तेव्हा त्यांना केवळ '' ऐकू आला. तर '' चे बरेच अर्थ आहेत. '' म्हणजे प्रेम, चिरंतन, शुद्धता, शांती. '' अनेक धातूंनी बनलेला आहे: आह-उह-. केवळ 'आह' चे १९ अर्थ आहेत.
'' चे तुम्ही हजारो लाखो अर्थ काढू शकता. ते सर्व '' चे गुणविशेष आहेत, तर '' हा सकल निर्मितीचे बीज आहे;'' हा निर्माणाचा ध्वनी आहे.
'सुरुवातीला केवळ एक शब्द होता आणि तो शब्द फक्त देवाकडे होता आणि तो शब्दच देव होता,'असे बायबलमध्ये देखील म्हटले आहे आणि तो शब्द होता ''
त्यांनी कोणता शब्द याचा उल्लेख केला नाही परंतु तो शब्द होता ''
तो सगळ्या धर्मांमध्ये कोणत्या ना कोणत्या रुपाने आहे. तोच खरे नाम आहे, 'एक ओमकार सत नाम'. '' म्हणजे सत्य. ते त्या अनंताचे किंवा देवाचे नाम आहे. त्याचा अर्थ आहे प्रेम. तो विश्वाची सुरुवात आहे. गुरु ग्रंथसाहेबमध्ये फार सुंदर श्लोक आहे, जो 'एक ओमकार सत नाम, कर्ता पुरख' याने सुरु होतो-'' पासून सगळे आले आहे,''मध्ये सगळे वस्ती करते, आणि ''मध्ये सगळे भौतिक आणि चेतन विरून जाणार आहे.
तो एक संपूर्ण कंपन आहे ही सर्वोत्तम गोष्ट आहे. 'आह'- आपल्या शरीराच्या खालच्या भागावर परिणाम करते, 'उह'-शरीरमध्यावर परिणाम करते, ''-वरच्या भागावर परिणाम करते. '' हे संपूर्ण प्राणाचे प्रतिनिधित्व करते. जन्मण्याआधी आपण त्याचा भाग होतो आणि मृत्यूनंतर आपण त्या ध्वनीमध्ये, आत्म्याच्या ध्वनिमध्ये विलीन होऊन जाणार आहे. तर तुम्ही ''बद्दल बरेच काही बोलू शकता; संपूर्ण उपनिषद, मांडुक्योपनिषद हे केवळ ''विषयीच आहेत.
आता आपण ''ला मंत्र म्हणून का घेत नाही? ध्यान करताना उच्चारण करण्यास आपल्याला दुसऱ्या मंत्राची गरज का पडते? ध्यान करण्याआधी तुम्ही ''चे उच्चारण करता आणि कंपने निर्माण करता,परंतु ध्यान करण्यास दुसऱ्या मंत्राची आवश्यकता आहे. केवळ '' वापरत नाही, हरी किंवा नमःशिवाय किंवा दुसरे काही असे '' सोबत वापरतात.
केवळ एकांतवासी संन्यासी,ज्यांना आता जगाबरोबर काही देणे घेणे नाही, किंवा जे अतिशय वयस्क आहेत त्यांना ''चे उच्चारण करण्यास हरकत नाही. ज्यांना जगाबरोबर काही देणे घेणे नाही त्यांना केवळ '' चे उच्चारण करण्यास परवानगी आहे. तरीदेखील ते तेवढे इष्ट नाही.
प्रश्न : ज्ञानोदय केवळ ध्यानाद्वाराच होऊ शकतो का?
श्री श्री रविशंकर : केवळ पाण्यानेच तहान भागेल का? केवळ अन्नाद्वाराच भूक शमेल का? किंवा नाचल्याने भूक शांत होईल का? काय म्हणता तुम्ही? सेवा अत्यावश्यक आहे;सेवा,ध्यान, हे सगळे मुलभूत आहे.
प्रश्न : मला आयुष्यात काय पाहिजे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मला तुम्हाला विचारायचे आहे पण मला हे देखील माहित नाही की काय प्रश्न करू आणि मला नक्की काय हवे आहे. काही करताना मी फार थोड्या अवधीत कंटाळून जातो. मला माझा स्वभाव अतिशय लहरी वाटतो. काही करताना मी समाधानी अथवा आनंदी नसतो. अशा मानसिक अवस्थेत मी माझे जीवन कसे जगू?
श्री श्री रविशंकर : तुम्हाला जास्त सुविधा पाहिजे आहेत. तुमच्या या आरामदायी कटिबंधातून बाहेर निघा. तुम्ही केवळ तुमच्या सुविधा आणि आनंदाचा विचार करीत आहात; तेव्हाच तुम्ही या टप्प्यावर येऊन पोचता. तुम्ही इथे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यास आले आहात. तुम्ही दुसऱ्याला मदत होईल असे कार्य करण्यास आलेले आहात. तुम्ही कंटाळू कसे शकता? तुम्हाला कंटाळा जरी आला तरीसुद्धा तुम्हाला ते केले पाहिजे कारण तुम्ही जे करीत आहात ते दुसऱ्याच्या भल्या करिता करीत आहात. जर तुम्ही आत्मकेंद्रित आहात आणि विचार करता,'जर मला पसंत पडले तरच मी ते काम कारण,'तर मग ही सेवा झाली नाही. त्याने तुम्हाला समाधान मिळणार नाही.तुम्हाला कळते आहे मी काय म्हणतो आहे ते?
'मला लोकांना भेटायला आवडत नाही', पण तुम्ही लोकांना भेटता आहात ते त्यांच्या भल्यासाठी की स्वतःच्या? जर तुम्ही लोकांना त्यांच्या भल्यासाठी भेटता आहात तर मग तुम्ही जीवनात समाधानी राहाल.
तुम्ही म्हणाल, 'गुरुजी,तुम्ही हे करू शकता, पण माझे काय? मी हे करू शकत नाही.' निदान काहीतरी तर करा! मी जे करतो आहे ते तुम्हाला करण्याची जरुरी नाही; पण त्यातील  निदान दहा टक्के किंवा पाच टक्के थोडा भार तर उचला. असे बघा, मी स्वतंत्र आहे पण तरीदेखील मी मुक्त नाही. प्रत्येक दिवशी माझे मन बंधनात आहे. तुम्हाला कळते आहे मी काय म्हणतो आहे ते?
तुम्ही सगळे इथे माझ्यासोबत सत्संग करण्यास आलेले आहात,मी म्हणालो, 'अरे,मला इथे थांबावेसे वाटत नाही.मला लहरी वाटते आहे. मला शवइनिगन, त्रोईस नदी असे कुठेतरी निघून जावे सारखे वाटते.', आणि मी गाडी घेतो आणि इथून निघून जातो आणि तुम्ही इथे बसून राहता, गुरुजींची वाट बघत, गुरुजी कुठे आहेत?
मला हे करायचे नाही तरीदेखील मी वर्षाचे ३६५ दिवस हे करतो. मी त्याच त्याच प्रश्नांची उत्तरे देतो आहे; लोक म्हणतात,'तुम्ही माझ्यासाठी पती शोधाल का?' 'तुम्ही माझ्याकरिता पत्नी शोधाल का?' किंवा 'मला नोकरी द्या',किंवा हे करा,ते करा,किंवा माझ्याबरोबर फोटो घ्या,'तुम्हाला माझी काळजी नाही','तुम्ही माझी काळजी करता'; अशा सगळ्या गोष्टी. मला कंटाळा येतो का? मी हे आता ३० वर्षे झाले करतो आहे; ३० वर्षांपेक्षा जास्त,दी आर्ट ऑफ लीविन्गच्या आधीपासून, ४० वर्षे!
मला कुठे फिरायला जायचे आहे असे मी म्हणू शकत नाही. तर मग दुसऱ्यांच्या भल्याकरिता काही करा. मला तुमच्या वेळेची आणि तुमच्या कामाची इतकी गरज आहे. तुम्हाला पसंत आहे की नाही याची चिंता करू नका, बस्स काम करा आणि मग बघा. कधी कधी सुरुवातीला तुम्हाला काम करणे आवडणार नाही,पण नंतर तुम्हाला तुमच्या कर्मांची फळे मिळतील. कोणत्याही प्रकारची सेवा ही तुम्हाला वरच्या दिशेने घेऊन जाईल; त्याने तुम्हाला कल्पनेच्यापलीकडे फायदाच होईल. म्हणून कमी उल्लेखू नका.  तुम्हाला कळते आहे मी काय म्हणतो आहे ते?
अन्यथा तुम्ही जर केवळ स्वतःच्या समाधानाकरिता सगळे करीत असाल तर मग तुम्ही कंटाळून जाल कारण जगातील काहीही तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही इतक्या लवकर इतके कंटाळता आहात. तुम्ही किती भाग्यवान आहात,शोधक म्हणून तुम्ही योग्य व्यक्ति आहात, वाढण्याकरिता तुमच्यामध्ये योग्य घटकद्रव्ये आहेत कारण तुम्ही या सगळ्या भौतिक गोष्टीनी कंटाळत आहात. हे फार चांगले आहे. आजकालच्या मुलांमध्ये ही फार चांगली गोष्ट आहे की त्यांना सगळ्याचा फार चटकन कंटाळा येतो, पण वैफल्यग्रस्त होण्यापेक्षा ती सगळी उर्जा  त्यांनी उत्क्रांतीच्या दिशेने वळवावी, श्रेणी उंचावण्याकडे वळवावी.
प्रश्न : विवाहित पुरुष उपनयन (मुंज) करून घेऊ शकतात का?
श्री श्री रविशंकर : हो,बिलकुल