30 April 2012


30
2012............................... Norway, Europe
April


मनुष्य प्राणी सर्वात जास्त बुद्धिवान आहे.

नॉर्वे, ३० एप्रिल २०१२ 

तुम्हाला माहित आहे की आपण दोन्ही, पदार्थ आणि द्रव्यापासून तयार झालेलो आहोत. आपले शरीर कार्बोहायड्रेट, खनिज पदार्थ आणि प्रोटीन पासून तयार झाले आहे व आत्मा हा केवळ उर्जा पासून तयार झाला आहे. प्रेम, करुणा व आकर्षण हे उर्जेचे स्वभावधर्म आहेत. पूर्वी त्याला प्रकृती म्हणजेच स्वभाव आणि पुरुषा म्हणजे उर्जा असे म्हणायचे. दोनच गोष्टी सतर्कता आणि पदार्थ. एक पाउल पुढे जाऊन आपण जर विचार केला तर कळेल कि ह्या दोन वेगवेळ्या गोष्टी नसून हे सर्व एकच आहे. पदार्थ आणि उर्जा वेगवेगळ्या नाहीत. जसे मन आणि शरीर दोन नसून एकच आहे.
पण सतर्कता हि वेगवेगळी असते. उदा: एक मनुष्य ऑफिस मध्ये ऑफिसर म्हणून काम पाहतो, बाजारात जाताच तो विक्रेता किंवा ग्राहक असतो, आणि तोच जर का वर्गात असेल तर तो विद्यार्थी असतो. बरोबर कि नाही!! आणि घरी असेल तर तो वडील असू शकतो किंवा पती, कुणाचा मुलगा असू शकतो. तो विविध रूपे साकारतो. हीच सतर्कता आहे जी चार वेगवेगळी महत्वाची भूमिका साकारते.
एक भूमिका मनाची पण आहे. तुम्ही सर्वजण इथेच आहात का? ऐकत आहात काय? तुमचे शरीर इथे असेल पण मन जर दुसरीकडे असेल तर तुम्हाला ऐकता येणार नाही. तुमचे कान उघडे असतील पण मन दुसरीकडे असेल तर तुम्हाला एकू येणार नाही. तुम्ही माझ्या कडे पहात आहात काय? तुम्ही जर इथे आहात पण मन जर दुसरीकडे असेल तर तुम्ही माझ्याकडे पहात असाल तरी माझ्याकडे पहात नाहीत. आपले मन म्हणजे त्या चेतनाचे स्वरूप आहे ज्यामधून आपली ज्ञानेंद्रिये अनुभव घेतात. हे सर्व जीवजंतू मध्ये असते. झुरळामध्ये त्यांच्या डोक्यावर जे अन्टेना असतात ते त्याचे ज्ञानेंद्रिये आहेत ज्यामधून ते सर्व काही जाणून घेवू शकतात.
मी आधी सांगितल्या प्रमाणे मन हे शरीरां मध्ये नाही तर शरीर हे मनामध्ये आहे. ज्या प्रमाणे दिव्याची ज्योत वाती भोवती असते, हो कि नाही? त्याच प्रमाणे आपले शरीर मेणबत्तीच्या वाती प्रमाणे आहे आणि मन हे ज्योती प्रमाणे आहे. मन हे सर्वांगी आहे आपल्या शरीरात मन आहे. जे कानाने, डोळ्याने, स्पर्शाने, वासाने अनुभ येतात त्याला आपण मन म्हणतो. आणि ह्याच अनुभवाला आपण चांगले, वाईट, सुंदर, कुरूप, बरोबर, चुकीचे असे निरनिराळे नावे देतो. ह्यलाच विचारशक्ती म्हणतात जे चेतनेचे सर्वात मोठे कार्य करते.
एक आहे जाणीव आणि दुसरे आहे समजूतदारपणा. ही विचार शक्ती आहे. तुम्ही जर हो म्हणत असाल तर हि विचारशक्ती आहे आणि जर नाही म्हणत असाल तर मला ते मान्य नाही. तसं काही नाही तुम्ही नाही म्हणू शकता पण तुम्हाला जर त्याच्या मागचे कारण माहीत असेल कि तुम्ही नाही का म्हणता तर ती पण एक विचारशक्ती आहे.



मनुष्याला सर्वात जास्त विचार करण्याची शक्ती आहे. एक पूर्वकालीन शुद्ध पवित्र मंत्र आहे तो म्हणजे गायत्री मंत्र. ह्या मंत्राचा अर्थ म्हणजे हि विचार शक्ती एका अशा शक्तीने प्रेरित होवू दे कि जी हे विचारशक्तीच्या पलीकडे आहे ती म्हणजे दैवीशक्ती. हि प्रार्थना आहे ,”माझी विचारशक्ती हि दैविश्क्तीने प्रेरित होवू देत”. म्हणजेच शुद्ध विचार येवू देत, माझ्यातील अंतर्ज्ञान चा विकास होवू देत, मी जे काही करेन ते अचूक होईल. आपले विचारशक्ती मुळे मनात संशय निर्माण होतात, चुकीच्या कल्पना येतात, आणि आपले अंतर्ज्ञान झाकले जाते.
समजा तुमची एक चांगली इच्छा आहे कि तुम्हाला एका व्यक्तीला स्वीडन मध्ये भेटायचे आहे आणि तुम्ही विचार करता कि ठीक आहे मी त्याला भेटणारच. तुम्ही इच्छा हेतू चांगला आहे पण तुमची विचारशक्ती म्हणते कि हे शक्य नाही, मी हे करु शकणार नाही. तुमच्या विचारशक्ती ने तुमची इच्छा मनातच दाबून ठेवली. इथूनच आपण चुका करायला सुरुवात करतो.
आपण विचार करतो कि हा मनुष्य चांगला आहे, हा वाईट आहे. आपण जर आपल्या विचारशक्तीला आपल्या इच्छाशक्ती किंवा चेतना पासून विलग केले तर आपण हे अनुमान करूच शकत नाही. ह्यालाच चित्त म्हणजेच चेतना म्हणतात.
मन, विचारशक्ती आणि त्यानंतर येते स्मृती. आपले मन बऱ्याच वेळा जुन्या आठवणी मध्ये अडकलेले असते. आपण जर काही चांगले पाहिले तर आपण लगेच पूर्वी काही चांगले पाहिले आहे त्याचा विचार करतो. तसेच काही वाईट पाहिले कि पूर्वी काही वाईट पाहिले त्याचा विचार करतो. आपले मन हे आपल्या जुन्या आठवणी मध्ये अडकलेले असते. स्मृती फार महत्वाची आहे. हि तिसरी कार्य पद्धती आहे.
नंतर येतो अहंकार, चौथी कार्य पद्धती.
ह्या चार वेगवेगळ्या चेतनेच्या कार्य पद्धती आहेत. तुम्ही तुमच्या अंहकाराला जर मागे टाकले तर तुमच्यामध्ये जी चेतना आहे जी बदलत नाही जी सर्वत्र आहे असा अनुभव येईल तेव्हा तुम्ही महत् होतात, म्हणजेच महात्मा.
महात्मा गांधी बद्दल ऐकलंय का? महात्मा ही पदवी त्यांना जनतेने दिली आहे. प्रत्येक संत महात्मा असतात ह्याचा अर्थ म्हणजे त्यांनी त्यांचा अहंकाराला मागे टाकले आहे. ते सर्व मन, विचारशक्ती, स्मृती, अहंकार, ह्या पासून विरक्त आहेत म्हणूनच हे महत् आहेत, त्यांना कोणी परके नाहीत. ह्यालाच ब्रम्हज्ञान म्हणतात – जेव्हा तुम्ही सर्वाबरोबर एकरूप होता. तुम्हाला तुमचे लहानपण परत येते, वर्तमान क्षणात तुम्ही राहता. तुम्हाला कशाचे दु:ख होत नाही, सर्व सृष्टी तुमचाच भाग आहे असे वाटते, तुम्ही उदार होता म्हणजे मन मोठेपणा दाखवता आणि शांती प्रिय असता. हे शरीर माझे आहे असे तुम्ही नुसते म्हणत नाही तर त्यातला “मी” पणा हा सर्वत्र असतो.
समझा तुम्ही टीवी वर एखादे चॅनेल पहात आहात, उदा. बीबीसी. तुम्ही जरी बीबीसी चॅनेल पहात असलात तर त्या छोट्या टीवीमध्ये तवढे एकच चॅनेल आहे का? नाही तर त्या बीबीसी चॅनेल च्या कंप, तरंग त्या रूम मध्ये सगळीकडे असते. जरी तुम्ही टीवी बंद केला तरी बीबीसी च्या तरंग सगळीकडे असतात. पण टीवीच चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त करू शकतो.

त्याचप्रमाणे आपले शरीर टीवी सारखेच आहे. ऐकताय का सगळे? तुमचे शरीर जणू एक टीवी आहे. तुमची चेतना हि तरंग आहे. असे समजा कि तू बीबीसी आहेस, ती महिला CNN  आहे, तो मनुष्य FOX  चॅनेल आहे आणि बाकीचे मनोरंजनात्मक चॅनेल आहेत. इथे सर्वाची स्व:ताची एक अशी आवृत्ती आहे, पण ह्याचा असा अर्थ नाही कि तुम्ही इथेच अडकून रहावे. हे फक्त ग्रहण केंद्र किंवा पारेषण केंद्र आहे. पण तरंग तर सगळीकडे आहेत. कळतयं का मी काय सांगतोय ते? आपली चेतना सगळीकडे आहे.
मी काल सांगितले होते कि शास्त्र हे दोन पद्धतीचे आहे, शुद्ध शास्त्र आणि व्यवहारिक शास्त्र. आपल्याला दोन्हीची  गरज आहे. ते दोन्ही एकमेकास पूरक आहेत. शुद्ध शास्त्र हे चेतना बद्दल सांगते – म्हणजे मी चेतना आहे हे जाणून आपण शिथिल होतो आपल्याला आराम वाटतो हेच ध्यान आहे आणि हेच योगा आहे. योगा म्हणजे स्व:ताच्या चेतने बरोबर एकरूप होणे.
तुम्ही लहानपणी सर्व योगी होता. सर्व लहान बालके योगी असतात. आपण लहानपणी सर्व योगासने केलेली आहेत, वर्तमान क्षणात राहिलेलो आहोत, आपले मन शरीर एकदम ताजे आणि बालिश होते. आपण घरी सर्वाशी संलग्न आणि प्रेमळ होतो. आणि जसे आपण मोठे होत गेलो तसे त्यातून बाहेर पडत गेलो.
एका उपनिषदा मध्ये ऋषी म्हणतात की, ” देवाने मानवाला ज्ञानेंद्रिये देवून मोठी घोडचूक केली आहे.” आपली ज्ञानेंद्रिये आपल्या स्व: पासून दूर घेवून जातात. पण काही धाडसी महात्मे असे येतात कि ते ज्ञानेंद्रियांना मागे टाकून सत्य शोधतात. त्यालाच योग म्हणतात. हे खरच सत्य आहे. आपले मन आपल्याला स्व: पासून दूर घेवून जाते. पण संपूर्ण आयुष्यात आपल्याला कधीतरी स्व: कडे वळून यावेच लागते. अलीकडे जास्तीत जास्त लोकं हे जाणून बुद्धिमान होतायत. त्यांना माहीत आहे कि शांती हि बाहेरच्या भौतिक जगात नसून स्व: कडे येवूनच मिळू शकते.
प्रत्येक बालक हा योगी आहे आणि आपण जन्मजात योगी आहोत. आपण कुठेतरी हा बालीशपणा हरवून बसलो आहोत. तो परत मिळवण्यासाठी आपण व्यायाम करतो, ध्यान करतो, तोच बालीशपणा, साधेपणा मिळवण्यासाठी आपण धडपडतो.
आताच्या युगात ते मिळवण्यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत. मी काही त्याच्या बद्दल सविस्तर आता सांगत नाही. एखादा नवशिका असेल तर त्याच्यावर सर्वात जास्त सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होतो, शांत चांगल्या वातावरणात असणे हे केव्हाही चांगले. आपण काय अन्न ग्रहण करतो ते पण फार महत्वाचे आहे. कारण आपण काय खातो ह्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. आयुर्वेद हे एक अस शास्त्र आहे जे सांगते कि कुठल्या मनुष्याने काय खावे. तुमचे वात्, पित्त, कफ काय आहे आणि तुम्हाला कोणता आहार योग्य आहे. जैन धर्माने तर खाण्यावर खूप संशोधन केले आहे. पण ते कधीही न संपणारे आहे.
काही लोक असे आहेत कि ते सारखे खातच राहतात आणि मग आजारांना आमंत्रण देतात. काहीजण फारच निवडक खातात. यामध्ये साखर आहे मी हे खाऊ शकत नाही. रात्रंदिवस हाच विचार करतात आणि काळजीत राहतात. हे पण बरोबर नाही कारण आपल्या शरीरा मध्ये अपार अनुकूलता आणि लवचिकपणा आहे. जर आपण असा विचार केला कि हे खाद्य माझ्यासाठी अपायकारक आहे व आपण कधीही खाल्ले नाही तर आपले शरीर त्यासाठीचा लवचिकपणा हरवते. त्याचप्रमाणे तुम्ही जर सारखे शक्ती वर्धक खाद्य किंवा औषधे घेत असाल तर ते पण चांगले नाही. तुम्हाला माहीत आहे भक्तजण माझ्यासाठी काय काय आणतात. माझ्याकडे एवढी सप्लिमेंट आहेत पण त्याचा वापर जास्त करत नाही.
लोक म्हणतात कि खनिज पदार्थ, इंझ्य्मेस शरीराला चांगले आहेत. हो चांगले आहेत पण मला वाटते कि आपण त्याचे जास्त ग्रहण करू नये. सप्लिमेंट आवश्यक आहेत कारण आजच्या युगात अन्न पिकविण्याची पद्धत एकदम बदललेली आहे. पूर्वी अशा पद्धतीने अन्न पिकविले जात नव्हते..
मी कुठेतरी वाचले आहे की आजच्या घडीला केळ्यामध्ये जी पौष्टिकता आहे ती १९ व्या शतकातील केळ्याच्या पौष्टिकते च्या तुलनेत फक्त १/१२ एवढीच राहिली आहे. म्हणून तुम्ही बघा कि जे फळे भाज्या दिसायला मोठी दिसतात पण त्यामध्ये पौष्टिकता खुपच कमी असते. ते जैविक नसतात. कारण जैविक माती संपत चाललेली आहे.
पूर्वीच्या तुलनेत आज आपण जे गहू खातो त्यामध्ये फोलिक अॅसीड खुपच कमी आहे. भारतामधील पंजाब मधल्या डॉक्टरने यावर संशोधन केले आहे. आणि त्यांचा निष्कर्ष असा होता कि पूर्वीच्या तुलनेत आताच्या गव्हामध्ये फोलिक एसिड खुपच कमी आहे, त्यामुळेच आजकाल हृदयाचे आजार जास्त होतात. त्यासाठी सप्लिमेंट आवश्यक आहे. पण त्याची काळजी करायची गरज नाही कारण आपली शरीर प्रणाली, बुद्धी पण हे उत्पन्न करू शकते.
लक्षात ठेवा आहाराचा प्रभाव होतो पण तुमची चेतना ही अन्ना पेक्षाही जास्त शक्तीदाय्क आहे.
प्रश्न: गुरुजी, या जगात सर्वोच शक्ती काय आहे?
श्री श्री रविशंकर: सर्वोच शक्ती हि केवळ साधी शक्ती आहे.
अणु रेणू सगळीकडे आहेत, हो कि नाही? हे सर्व जग अणु रेणू ने व्याप्त आहे. या जगातील सर्व गोष्टी अणुरेणु ने बनल्या आहेत. पण अणु शक्ती केंद्र हा वेगळा विषय आहे. त्याचप्रमाणे सर्वोच शक्ती हि साधीच आहे, सोप्यारीतीने मिळविता येते, खुपच स्वस्त आहे, या सर्व अस्तित्वाचा आधार आहे. ती कुठेतरी एका ठिकाणी नाही.ती सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तुम्ही जर मला विचारले कि चुंबकीय क्षेत्र कुठे आहे? मी सांगतो कि सगळीकडे आहे. सर्वोच शक्ती हि काही एका ठिकाणी नसून ती सर्वत्र उपलब्ध आहे. ती तर चुंबकीयक्षेत्रा पेक्षा सूक्ष्म असून सर्व ठिकाणी आहे, प्रत्येक क्षणी उपलब्ध आहे. त्याला सर्वोच शक्ती म्हणण्यापेक्षा आपण मुलभूत स्तर म्हणजेच अस्तित्व म्हणू शकतो. पूर्वीचे लोक त्याला अस्तित्व – ‘सत्’ म्हणायचे आणि ‘चित्’ म्हणजे सुखदायक चेतना.
सर्वोच शक्तीचा सुखद अनुभव तुम्ही कसे घ्याल? शांतपणे एका ठिकाणी बसून आपल्याचेतनेशी एकरूप होवून. हे रोजच्या सरावाने सुखद क्षण अनुभवता येतील.
प्रश्न: गुरुजी, चंद्र, तारे, अवकाशात फिरणारे आत्मे आपल्या मनावर कशा पद्धतीने प्रभाव करू शकतात?
श्री श्री रविशंकर: हो ह्या सगळ्यांचा प्रभाव होतो. समुद्रावर चंद्राचा काय प्रभाव होतो तुम्हाला माहीत आहे का? पाण्यावर चंद्राचा प्रभाव होतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपले शरीर पाण्यापासून बनले आहे. जवळ जवळ ६०% शरीर हे पाण्यापासून बनले आहे, ते समुद्राप्रमाणे क्षारयुक्त आहे. आपले शरीर हे समुद्र पाण्याची छोटी बीजकोष प्रतिकृती आहे.
तुमच्या शरीरातून पाणी द्रव्य जर काढून टाकले तर तुमचे शरीर आटून जाईल. तुम्ही समुद्री पाण्याची छोटी पिशवी आहात ज्यामध्ये लाल, निळा असे वेगवेगळे रंग भरलेले आहेत. म्हणजे आपले शरीर ६०% पाण्याने भरलेले आहे. म्हणूनच चंद्र आपल्या शरीरावर प्रभाव होवू शकतो. आणि ज्या गोष्टींचा शरीरावर प्रभाव पडतो त्याचा आपल्या मनावर पण प्रभाव पडत असतो. म्हणजेच चंद्राचा मनावर प्रभाव पडत असतो. ह्याच कारणामुळे काही लोक वेडी होतात. त्याचप्रमाणे अवकाशातील आत्म्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो.
उत्साह क्षेत्र हे पण फार मनोरंजक चित्तवेधक आहे.
तुम्ही जर एक रेडिओ पाहिला तर त्यामध्ये काय आहे एका धातू वर आराखडा असतो आणि त्याच्यावर काही वायर असतात पण ते किती मोठा बदल आणतात. हो कि नाही? तुम्ही मोबाईल मधील चीप पाहिली का?  त्याच्यावर एक विशिष्ट आकृती असते. त्यातील छोट्यातील छोटी आकृती विद्युत प्रवाह, तरंग खेचू शकतो. त्याचप्रमाणे आपले शरीर पण विद्युतमंडळ जसे आहे आणि ह्या विश्वात खूप काही करू शकतो. ह्या विश्वात प्रत्येक वस्तू एकमेकाशी निगडीत आणि संबंधित आहे.
पूर्वीच्या लोकांना हे माहीत होते. त्यांनी सूक्ष्म गोष्टी ह्या ब्रम्हांड बरोबर जोडल्या आहेत हे खूप आश्चर्य जनक आहे.
सूर्य हा आपल्या डोळ्याशी निगडीत आहे, मन हे चंद्राशी निगडीत आहे, मंगळ हा पित्ताशयाशी निगडीत आहे. शनी हा आपल्या दातांशी निगडीत आहे.
आपल्या शरीरातील प्रत्येक भाग हा पृथ्वी वरील वेगवेगळ्या सूक्ष्म तरंगाशी संबंधित आहे. आणि ते कुणाशी निगडीत आहेत? ते एका विशिष्ट धान्य, रंग व पक्षी, किंवा प्राणी. उदा: मंगळ ग्रह हा आपल्या पित्ताशयाशी संबंधित आहे, मंगळ हे मेंढी, वाटाणा ह्यांच्या बरोबर पण निगडीत आहे. म्हणजे वाटाणा, मंगळ, मेंढी, शेळी, आणि पित्ताशय हे एकमेकाशी संबंधित आहेत.
म्हणून म्हणतात की सर्व सूक्ष्म गोष्टीचा ब्रम्हांडाशी संबंध आहे. हे खूप चित्तवेधक, मनोरंजनात्मक शास्त्र आहे. तुम्हाला ह्यावर खूप खोलवर संशोधन करावे लागेल. शनी ग्रह हा तिळाच्या बिजाशी संबंधित आहे. कावळा आणि तुमचे दात ह्या बरोबर पण तो निगडीत आहे!! मी सांगतो हे खुपच मनोरंजनात्मक आहे!!!
तुम्ही फुलपाखराच्या परिणामां बद्दल एकले असेलच. दक्षिण अमेरिकेच्या जंगलात उडणाऱ्या फुलपाखराचा परिणाम चीनमधील उडणाऱ्या ढगांवर होतो. तुम्हाला वाटत असेल कि हे कसे काय शक्य आहे? पण आहे ना चित्तथरारक!!!!
संस्कृत मधील म्हण तुम्हाला माहित असेलच,’यत् पिंडे तत् ब्रम्हांडे’. याचा अर्थ असा कि या विश्वात जे काही आहे ते सर्व एका कॅप्सूल बंद आहे. तुमचे शरीर पण ह्या ब्रम्हांडाची छोटी प्रतिकृती आहे. कारण ती सर्वाशी निगडीत आहे. तुम्ही एक बेट नाही. तुम्ही ह्या समाजाशी निगडीत आहात, समाजच काय ह्या ब्रम्हांडाशी निगडीत आहात.
तुम्हाला नको असेल तरी तुम्ही सर्वाशी निगडीत आहात. तुम्ही या पृथ्वी वरील एक एक जिवांशी निगडीत आहात, तुम्ही कबुल करा किंवा नका अनुभव करा किंवा नका पण हे सत्य आहे की तुम्ही सर्वाशी निगडीत आहात.

प्रश्न: गुरुजी, अविद्या आणि माया यांची संकल्पना समजून सांगाल का?
श्री श्री रविशंकर: जे काही मोजमाप करता येईल त्याला माया म्हणतात. Measure  हा इंग्रजी शब्द संस्कृत शब्द मायापासून निर्माण झाला आहे. ‘मियते अनया इति माया’. मियते म्हणजे मोजमाप करणे. पाच मूलतत्वे आपण मोजू शकतो : पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश. हे सर्व आपण मोजू शकतो. म्हणून ह्या विश्वाला आपण मायावी  जगत म्हणतो कारण हे विश्व पाच मुलतत्व पासून निर्माण झाले आहे जे आपण मोजू शकतो.
दया, प्रेम आपण मोजू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही कि हा माणूस माझ्यावर १० किलो प्रेम करतो. हा मनुष्य माझ्यावर १०० ग्राम प्रेम करतो.
आपण सत्य, सुंदरता मोजू शकत नाही. तुम्ही म्हणू शकत नाही कि हि महिला एवढ्या मापात सुंदर आहे. प्रेम, सुंदरता, दया, सत्य, प्रामाणीकपणा, खरेपणा हे सर्व चेतनेचे गुण आहे आणि ते अपरिमित आहेत. म्हणूनच ते माया नाहीत. ते महेश्वरः म्हणजे नैसर्गिक स्वभाव आहे.
जे सर्व काही बदलतय आणि जे मोजता येते त्याला माया म्हणतात, आणि तुम्हाला माहीत आहे कि मोजमाप बदलू शकतात. या ब्रम्हांडात सर्व काही बदलणार आहे.
मायाचा एक अर्थ आहे कि या ब्रम्हांडात सर्व काही बदलणार आहे आणि दुसरा अर्थ आहे कि सर्व काही मोजता येते.
आपण ज्याला मोजू शकत नाही आणि जे बदलत नाही ते म्हणजे चेतना, स्व:, जागतिक उर्जा.
या बदलाच्या अभ्यासाला अविद्या म्हणतात.
दोन प्रकार आहेत: विद्या आणि अविद्या विद्या, चेतनेच्या अभ्यासाला विद्या म्हणतात आणि सूक्ष्म वस्तू च्या अभ्यासाला अविद्या म्हणतात.
प्रश्न: गुरुजी, मुक्ती म्हणजे काय? सर्वजण मुक्तीच्या शोधात का आहेत? कशापासून सर्वाना मुक्ती हवी आहे?
श्री श्री रविशंकर: जर तुम्हाला एका खुर्चीवर १० तास बसविले आणि सांगितले कि या खुर्चीवरून अजिबात उतरायचे नाही, तुम्ही थोड्यावेळाने म्हणाल कि माझे पाय बधीर झाले आहेत मी थोड्या वेळ उठू का? हीच मुक्ती आहे. तुम्ही मुलांची परीक्षा झाल्यावर त्यांच्याकडे पहा ते घरी येताच शाळेची बेग कोच वर टाकतात आणि टीवी पहात बसतात त्यावेळी त्यांना विचारा कि आता कसे वाटते? ते म्हणतील अहा!!!! अभ्यासापासून मुक्ती.

“मला जे काही करायचे आहे ते मी केले” ह्यालाच मुक्ती म्हणतात. संपूर्ण समाधान, संपूर्ण स्वातंत्र्य, ह्याच्यापुढे काही जास्त करायची गरज नाही. मला जे पाहिजे ते मी मिळविले. मला आतून हलके वाटते.
मुक्ती हि बंधानाशी संलग्न आहे. कारण जिथे बंधन आहेत तिथेच आपण मुक्ती शोधतो.
आपला जन्म हा आपल्या तीव्र इच्छा, मन, घृणा, या पासून झाला आहे. जर यातील घृणा, तीव्र इच्छा संपल्या तर आपल्याला एकदम हलके वाटते.
इथे सर्वजणांनी काही क्षणासाठी का होईना, कुठतरी मुक्ती अनुभवली आहे. पण जर हि रोजची सवय झाली तर तुमचे जीवनच बदलून टाकते. तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही, तुमच्याचेहऱ्यावरील स्मित हास्य कोणीही हिरावून घेवू शकणार नाही. तुमचा उत्साह कोणीही कमी करू शकणार नाही. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते?
प्रश्न: गुरुजी, माझा प्रियकराला माझ्याविषयी मत्सर आहे म्हणून मी त्याला आर्ट ऑफ लिविंग बद्दल सांगितले तर तो जास्त मत्सर करू लागला आहे. एके रात्री तर त्याने मला मारले. गेल्या एक महिन्यापासून मी त्याच्या बरोबर बोलणे बंद केले आता त्याने बेसिक कोर्स करून तो इथे पार्ट २ कोर्स मध्ये आला आहे आणि तो बदलला आहे म्हणे. तो दुसरी संधी देण्यासाठी विनंती करत आहे, मी काय करू?
श्री श्री रविशंकर: हो !! तू त्याला दुसरी संधी अवश्य दिली पाहिजे. आणि त्याने हा पार्ट २ कोर्स केल्यानंतर त्याच्या मध्ये खूप फरक दिसेल. प्रत्येका मध्ये चांगुलपणा हा लपलेला असतोच. पण त्याच्यावर उदासीनता आणि अज्ञानाचा पडदा पडलेला असतो. इथे या कोर्स मध्ये काही प्रक्रिया केल्यानंतर तो पडदा उठेल आणि चांगुलपणा फुलेल, बहरेल. 
प्रश्न: मी माझ्या वडीलांना त्यांच्या नकारात्मक भावनांना तोंड देण्यास कशी मदत करू? त्यांच्या कामातील गोंधळे पणाचा मी कसा स्वीकार करू कारण आम्ही दोघे एकत्र काम करतो?
श्री श्री रविशंकर: हे खुपच अवघड आहे. दोन वेगळ्या पिढीच्या लोकांना एकत्र काम करणे फारच अवघड आहे, कारण दोघांची काम करण्याची पद्धती, विचारसरणी वेगळी असते. त्यासाठी तुमच्याकडे खूप सहनशीलता हवी, त्यांच्या बरोबर बोलण्यासाठी कौशल्य हवे. काही वेळा जुन्या लोकांना कामाचे प्रतिनिधित्व करता येत नाही. ते स्व:ताने केलेल्या उत्कृष्ट कामावरच विश्वास ठेवतात. आजकालच्या तरुणांना हा वादाचा मुद्दा होतो. एक काम करा जेव्हा ते  नकारात्मक वागतील त्या वेळेस तुम्ही काहीही बोलू नका. वाद घालू नका. तुम्ही त्या क्षणी कितीही बरोबर असा पण त्यावेळेस वाद घालून काही उपयोग होत नाही, ते तुमचं बोलण ऐकून घेणार नाहीत. त्यांचा अहंकार त्यांना काही एकू देणार नाही. हे सर्व खूप अवघड आहे पण हे तुम्हाला युक्तीपूर्ण हाताळायला हवे. अशा परिस्थितीत शांत, मौन  राहणे शहाणपणा असतो.
तुम्ही मला विचाराल की गुरुजी मी इथे येवून तीन दिवस मौन मध्ये राहून मला काय मिळणार आहे, त्यात काय तथ्य आहे. मला बोलू द्या. मौन मध्ये तुम्हाला काही युक्ती सुचतील मग त्या युक्ती तुम्ही लढवून बघा.
प्रश्न: अविष्कारा मागे काय रहस्य आहे? ध्यान करताना माझे डोके पुढील बाजूस वाकते आणि कधी कधी पूर्ण शरीर पुढे वाकते, हे बरोबर आहे का? या परिस्थितीत मी काय करावे?
श्री श्री रविशंकर: ध्यानाला बसताना आपण नेहमी सरळ, ताठ बसावे आणि परत त्याचा विचार करू नये. ध्यान करताना तुमचे शरीर अथवा डोके पुढे वाकले तरी चालेल. ठीक आहे!!!
मी अविष्कार कसा करतो? तुमच्या उद्देशावर तुम्ही थोडे लक्ष केंद्रित केले तर अविष्कार हा होणारच. ह्यालाच ‘संकल्प’ असेही म्हणतात.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवे आहे? ते नक्की करून मनात ठेवा. त्याच्याबद्दल तीव्र इच्छा ठेवू नका आणि समर्पण करा आणि मस्त रहा. आणि मग पहा अविष्कार कसा होतो. उद्दिष्ट आणि इच्छा या मध्ये खूप फरक आहे.  समजा तुम्हाला इथून गोथनबर्ग ला जायचे आहे आणि तुम्ही सारखे म्हणत राहिलात कि, “मला गोथनबर्गला जायचे आहे, मला गोथनबर्गला जायचे आहे” तर तुम्ही तिथे कधीच पोहचणारच नाही, कुठेतरी दुसरीकडे पोह्चताल पण तुमचे उद्दिष्ट जर तुम्हाला माहीत आहे कि मला गोथनबर्गला जायचे आहे तर तुम्ही गाडी चालविताना थांबत थांबत आरामात तिथे पोहचता. हे उद्दिष्ट आहे. इच्छा म्हणजे एकाच गोष्टीवर वारंवार विचार करणे आणि मग त्याच्यामुळे आपण निराश होतो.
प्रश्न: तुम्ही जवळ असताना वेगळ्या भावना कशा काय येतात? मी एकाच वेळी शांत आणि अस्वस्थ होतो, एकाच वेळी प्रेम आणि मत्सर असतो?
श्री श्री रविशंकर: मनुष्याच्या आयुष्य म्हणजे भावनांचा खेळ आहे. ह्या सर्व भावना येतात आणि जातात. आपल्या भावना जेव्हा जास्त असतात तेव्हा त्या सकारात्मक असतात, पण त्या जसे कमी होऊ लागतात तशा त्या नकारात्मक होवू लागतात. पण हे छान आहे कि तुम्हाला या गोष्टींची जाणीव आहे, तुम्ही फक्त साक्षी बना.

प्रश्न: फक्त आराखडे, कल्पना करून त्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा त्या गोष्टींवर क्रियात्मक काम कसे जास्त करता येईल?
श्री श्री रविशंकर: तुम्ही पुढारी, नेता होवू शकता. नेत्याला बोलण्यापेक्षा काम केलेले जास्त आवडते. तुम्ही पुढाकार घेवून सर्वाना सहभाग घ्यायला सांगा. त्यांनी जर सहभाग घेतला नाही तर तुम्ही एकटे पुढे चालत रहा. आपले धोरण असे हवे कि आपण सर्वाना सहभाग घेवून सर्वजण एकत्र लढा दिला पाहिजे, पण जर का कुणी बरोबर आले नाही तर तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही एकटे चालत रहा. आणि तुम्ही मागे वळून पाहिले तर तुम्हाला दिसेल कि तुमच्या मागे अनेक साथीदार असतील.
प्रश्न: कर्म या मागची संकल्पना काय आहे? या बाबत सखोल अभ्यास कुठे करावयास मिळेल?
श्री श्री रविशंकर: तुम्ही कर्म या बाबत खूप काही एकले आहे. पण कर्म म्हणजे काय? कर्म ह्याचा खरा अर्थ म्हणजे कृती, क्रिया, कार्य.  कर्म हे तीन प्रकारचे असते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ किंवा भविष्यकाळातील कर्म म्हणजे मनावर पडलेले किंवा पडणारे ठसे आहेत. पण वर्तमानकाळातील कर्म म्हणजे तुम्हाला ताबडतोब फळ / परिणाम देणारे आहेत. कळतय मी काय सांगतोय ते? कर्म म्हणजे भूतकाळात केलेल्या कृतीचे मनावर पडलेले ठसे, ज्यांना भविष्यकाळात पण तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. आणि वर्तमानकाळात तुम्ही करत असलेल्या कृतीचे पण ठसे तुमच्या मनावर पडत असतात त्याला पण तुम्ही कर्म म्हणू शकता. तुम्ही जर ‘Intimate Note to a Sincere Seeker’ हे पुस्तक वाचले तर त्यामध्ये मी सुरुवातीलाच कर्म या विषयावर लिहिले आहे. काही कर्म आपण बदलू शकतो पण कर्मामुळे मनावर पडलेले ठसे, ज्यांना आपण बदलू शकत नाही त्यांना आपल्याला अनुभवावेच लागतात.
उदाहरणार्थ इथे किती जणांना सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी पिण्याची सवय आहे? आणि किती जणाचे ते घेतले नाही म्हणून डोके  दुखते? (खूप हात उंचावतात) हे चहा कॉफी कर्म आहे. तुम्ही रोज चहा कॉफी पिण्याने तुमच्या मनावर त्याचे ठसे उमटलेले आहेत आणि जर का एक दिवस तुम्हाला चहा कॉफी मिळाली नाही तर तुमचे डोके लगेच दुखते. हेच म्हणजे चहा कॉफी कर्म. या मधून बाहेर पडायचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही कॉफी चहा घेवून डोके दुखी थांबवू शकता किंवा त्याचा मोह आवरा. तुम्ही म्हणू शकता की डोके दुखले तरी चालेल पण मी चहा घेणार नाही. किती दिवस दुखेल, जास्तीत जास्त २ ते ३ दिवस, नंतर ते दुखायचे थांबून जाईल, कारण कर्म ही नेहमी मर्यादित असतात.
समजा तुमचे अपघाताचे कर्म असेल. ते काही काळ मर्यादित असते. तो काळ जर निघून गेला तर ते कर्म टळून जाते. जसे तुमचे डोके सकाळी चहा न घेतल्याने दुखते, पण ते काही तासापुरातेच दुखते. त्यानंतर तुम्ही जर पाणी प्याले किंवा काही खाऊन कुठलेतरी काम केले तर तुमचे डोके दुखायचे थांबते. कळले का? हे खरे उत्कृष्ट उदाहरण कर्मासाठी देता येईल.
त्याचप्रमाणे जीवनात काही विशिष्ट वेळी आपण अस्वस्थ होतो. आपण जे काही करतो त्यात आपल्याला आनंद वाटत नाही. आणि काही विशिष्ट वेळी आपण जे काही करतो त्यात आपल्याला आनंद वाटतो. तुम्हाला असे जाणवले आहे का? तुम्ही जर बारकाई ने निरीक्षण केले, एका वर्षाच्या कालचक्रात कुठल्याही महिन्यात एका विशिष्ट आठवड्यात किंवा महिना किंवा एक रात्र अशी असते कि ज्यावेळेस तुमची उर्जा हि एकदम कमी असते. आणि त्याच्या उलट काही विशिष्ट कालचक्रात तुमची उर्जा जास्त असते, त्याचे कारण म्हणजे मन, काल, आणि कर्म हे तिन्ही एकमेकांशी संबन्धित आहेत.
तर अशा वेळेस काय करावे? असे म्हणतात कि ह्याची जरी तुम्हाला जाणीव झाली तरी तुमची उर्जा वाढते. आपण असा विचार करतो की अरे हा फेब्रुवारी महिना आहे, दर वर्षी काहीना काही तरी होतेच. आता या वर्षी मी ह्याच्या वर मात करेन. मी ह्या महिन्यात जास्त ध्यान करेन, जास्तीत जास्त सत्संग करेन.
योगा करून, ज्ञान चर्चेत भाग घेवून आपण हि उर्जा बदलू शकतो. म्हणूनच आपण म्हणतो कि साधना हि आपली खरी संपत्ति आहे जी आपल्याला अवकाश, काल आणि कर्म या सर्वाच्या वरती नेते. त्याचमुळे आपले कर्म हे साधना केल्याने कमी होते.
पण असे आहे कि आपल्याला ज्यावेळेस साधनेची खरीच गरज असते त्यावेळेस आपण ती करत नाही. हे फार गुंतागुंतीचे आहे. हे असे आहे कि कुणीतरी आजारी आहे पण त्यांना औषध घ्यावयाचे नाही. कुणाला तरी खूप थंडी वाजतेय आणि तुम्ही त्यांना स्वेटर दिले आहे आणि ते म्हणतात की मला स्वेटर नको, मला बरे नाही वाटत. अशा वेळेस तुम्ही काय म्हणाल?

आपल्याला ज्यावेळेस साधनेची गरज असते त्यावेळेस आपण त्याचा प्रतिकार करतो. आपले मन हे आपला चांगला मित्र आहे आणि सर्वात वाईट शत्रू आहे. तुमचे बाहेरील जगात शत्रू नाहीत, हाच सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्या मनाशी चांगली मैत्री करा, इथे आपण तेच करतोय.

प्रश्न: मी ह्या आध्यत्मिक वाटेवर गेली दहा वर्षे आहे आणि मी आनंदी आहे. पण आपल्या मनात काही गोष्टी बद्दल जे संकोच असतात ते खूप दिवस, वर्षे राहतात का? माझ्या शरीरातील काही चक्रात उर्जा कमी आहे. ती बदलण्याची काही संभावना आहे का?
श्री श्री रविशंकर: हो!!!! नक्की बदलेल, जर तुम्ही आनंदी असाल आणि सर्व काही व्यवस्थित मार्गावर आहे. तुमच्या कमजोरी वर तुम्ही जास्त लक्ष देवू नका. निसर्ग त्याची काळजी घेईल.

प्रश्न: आपण आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जे काही करतो त्याचा उद्देश जागे होवून ब्रह्मज्ञान मिळविणे आहे का फक्त बरे वाटण्यासाठी? व्यक्तिश: मला जागे होण्यास आवडेल.
श्री श्री रविशंकर: इथे, हे सर्व समुद्रासारखे आहे, सर्व काही उपलब्ध आहे. तुम्हाला जर समुद्र काठी नुसते चालायचे असेल तर तुम्ही चालू शकता, नाहीतर समुद्रामध्ये खोलवर जावून तेल पण शोधू शकता.
हा मार्ग सागरासारखा आहे. इथे तुम्ही मीठ घेवू शकता, तेल काढू शकता, मासेमारी करू शकता, तुम्हाला असंख्य गोष्टी करता येतील. निश्चितपणे तुम्हाला ब्रम्हज्ञान मिळू शकेल. मला वाटते की सर्वाना ते मिळावे. आणि तुम्हाला ते हवे आहे हि कल्पना मला खूप आवडली. तुम्ही इथे आराम करायला आला नाहीत. हे छान आहे.
चला, आपल्याला खूप काही करायचे आहे.