माँन्टरिअल


१३ मे २०१२
तुमच्यापैकी प्रत्येक जण हा नेता आहे हा आजचा संदेश आहे. तुम्ही कोणाला स्वतःच्या नेतृत्वाने कुठेतरी नेता. तुमच्या नेतृत्वाने एक तर  व्यक्ति चांगल्या मार्गी लागते किंवा मग वाया जाऊ शकते. परंतु एवढे तर निश्चित आहे की तुम्ही प्रत्येक जण नेते आहात. आणि जर तुम्हाला सगळ्यांना योग्य मार्गावर घेऊन जायचे असेल तर तुमचे जीवन हे शुद्ध, सोज्वळ आणि निष्कलंक असले पाहिजे.आणि तेच तर इथे आहे. इथे आपण डागविरहित स्वच्छ आहोत. एकदम निर्मळ, एकदम शुद्ध. आणि हे काही आपण मिळवलेले नाही ,हि तर आपल्याला मिळालेली भेट आहे.
तुम्हाला माहिती आहे,  मी गेल्या ५६ वर्षात कोणाला काहीही अपशब्द बोललेलो नाही, बिलकुल नाही. फार फार तर मी "विवेकशून्य" म्हणालो असेन, तेवढंच माझ्या तोंडातून निघते. पण मी त्याचे श्रेय नाही घेत, कारण दुसरे अपशब्द मला येत नाहीत.
तर मला असे म्हणायचे आहे की, जेव्हा तुमच्या लक्षात येते की अशा प्रकारची शुद्धता तुमच्या करण्याने नाही आलेली तर तुम्हाला आहेर म्हणून मिळाली आहे तेव्हा तुमच्या जीवनात नम्रता येतेजर तुम्ही नम्र असाल तर तुम्ही पुढे जात राहाल. मग काही खाचखळगे राहत नाहीत. जेव्हा नम्रपणा नाहीसा होतो तेव्हा त्या माणसाचा ऱ्हास होतो.
तर प्रत्येक जण हा नेता आहे. ज्ञानाच्या, योग्य मार्गावर चालण्याकरिता, आपण शुद्ध असले पाहिजे, आतून बाहेरून पूर्णपणे शुद्ध.
आणि तुम्ही शुद्ध कसे होता? जेव्हा तुम्ही शुद्धते सोबत जोडलेले असता तेव्हा तुम्ही शुद्ध होता. आणि शुद्धता हि ज्ञान, विवेक,  प्राणायाम आणि या सर्वानी येते.
ज्ञान आपल्याला काय करते? ज्ञान तुमचे सहजपणे शुद्धीकरण करते. ते साबणासारखे असते.
 'नाही द्नानेना सदृशं पवित्रं इह विद्यते'
तुम्हाला शुद्ध करण्याकरिता ज्ञानापेक्षा दुसरे उत्कृष्ट काही नाही.
वर्तमान क्षणात असलेली प्रत्येक व्यक्ति शुद्ध आहे. तुमचा भूतकाळ कसाही असला तरी त्याने काही फरक पडत नाही. त्या गोष्टी सोडून द्या आणि शरण जा. जर शरण अथवा अर्पण असा काही शब्द असेल तर तो केवळ भुतकाळाबरोबर निगडीत आहे. तुमचा भूतकाळ कसाही असला तरी तुम्ही शरण जा. वर्तमान क्षणात तुम्ही पवित्र आहात आणि तुम्ही निष्पाप आहात, यावर विश्वास ठेवा. तुमच्या पवित्रतेवर विश्वास ठेवा आणि तेच तर आहे.
सिद्धी किंवा परिपूर्णता हि आताच आहे.
तर ज्ञान तुम्हाला शुद्ध करते, पण तुम्ही विचार करू लागलात, 'अरे मी सर्वात शुद्ध व्यक्ति आहे. मी चांगल्या काळजाचा आणि चांगल्या मनाचा आहे', वगैरे वगैरे तर मग तो अहं आहे आणि तो धोकादायक होऊ शकतो.तो तुम्हाला त्वरित अशुद्ध करतो.
तर शुद्धतेचा मान ठेवणे आणि त्याची खातरजमा करणे हे महत्वाचे आहे. नम्र असावे पण या ग्रहावरील मी सर्वात नम्र व्यक्ति आहे असा दावा करावा.
'या ग्रहावरील मी सर्वात नम्र व्यक्ति आहे ', असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. जर आपण शुद्ध असू तर मग आपण सर्वांचे नेतृत्व करू शकतो, आपण संपूर्ण जगाला योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करू शकतो.
विचार,शब्द आणि कृती.
तुम्ही म्हणाल, 'माझी कृती एकदम योग्य आणि निर्मळ आहेत, पण माझे विचार,त्यांचे मी काय करू? मी काही करत नाही, पण एखाद्या माणसाचा गळा दाबावा असे विचार माझ्या मनात येतात,मी काय करू?'
हा काय प्रश्न झाला? तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न होता सांगा बर?
मागे बसलेल्यांना देखील हा प्रश्न होता. ज्यांना कोणाला हा प्रश्न होता त्यांनी हात वर करा बघू, लाजू नका. बघा,केवढ्या जणांना हा प्रश्न होता.
'गुरुजी,कृतीने आम्ही काही करीत नाही,शब्ददेखील आम्ही आवरून धरतो, पण विचारांचे आम्ही काय करावे?'
मी तुम्हाला सांगतो,ते आपोआप घडायला लागेल. म्हणूनच शरीर शुद्ध केले की मन देखील शुद्ध होते आणि चांगली सांगत असणे जरुरी आहे.
जर तुम्ही सात्विक माणसांच्या संगतीत असाल किंवा योग्य वातावरणात असाल तर असे विचार येत नाहीत. ते कधी येतात? अस्वस्थ,क्षुब्द आणि अशांत माणसांच्या सहवासात ते उद्भवतात. तुम्ही त्यांची कंपने उचलता.
आता प्रत्येक वेळी तुमचे नकारात्मक विचाराकरिता तुम्ही दुसर्याना दोषी मानू नका. 'तो माणूस माझ्या मनात हे सर्व विचार भरवीत आहे,' असे म्हणू नका. हे मन असे काही फसवे आहे की कोणत्याही परिस्थितीत ते तुम्हाला अडकवेल.
म्हणूनच संस्कृतमध्ये म्हण आहे,'वाच्यारांभे विकारो नाम देयास्या', याचा अर्थ आहे की ज्या क्षणी तुम्ही काही बोलता त्याक्षणी गोष्टींचा विपर्यास होतो. प्राणायाम.ध्यान, या सर्वानी विचारांचे शुद्धीकरण होते.
आता शब्द; तुम्ही अप्रिय शब्द उच्चारणार नाही आणि ते तुमच्या तोडून बाहेर पडणार नाही, तुम्ही ते उच्चारता कामा नये असा तुमचा निश्चय, अशी तुमची इच्छाशक्ती असावी. तुम्ही ते तुमच्या तोंडातून बाहेर काढता कामा नये. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतो आहे ते?
'मी असे अप्रिय शब्द तोंडातून काढणार नाही,' असा संकल्प घ्या.
'अरे माझ्या देवा',असे बोलणे ठीक आहे,पण दुसरे तिसरे काही येत कामा नये,मग चूक तुमची असू दे किंवा दुसऱ्या कोणाची.
लोक म्हणतात,' जिजस,' ते ठीक आहे.'हे राम,' ठीक आहे, पण अजून बाकीचे काही शब्द नाही.
आपल्या बोलण्यात आपण सुसंस्कृतपणा आणायला पाहिजे. जर तुम्ही अपशब्द वापरले तर मुले देखील ते शब्द उचलतील.
अर्थातच शब्दानंतर येते कृती. कृती ही फार छोटी बाब आहे. सर्वात महत्वाचे आहे तुमचे मन.
तर तुमच्यापैकी प्रत्येक जण हा नेता आहे. तुम्ही नेतृत्व करून लोकांना उजेडाकडे घेऊन जा अथवा अंधाराकडे. एक तर तुम्ही त्यांना अशा गोष्टी सांगू शकता ज्याने ते संभ्रमित होतील, समाजाकरिता असलेला त्यांच्या हृदयातील आणि मनातील चांगुलपणा आटून जाईल आणि त्यांना चीत्तभ्रम होऊन ते मार्गभ्रष्ट होतील किंवा तुम्ही तुमच्या नेतृत्वाने त्यांना विवेक आणि आनंदाकडे घेऊन जा.
प्रत्येक जण श्रद्धा रुजवू शकतो किंवा श्रद्धा नेस्तनाबूत करू शकतो. प्रत्येकामध्ये हि क्षमता आहे. कायमची अर्थातच नसते. तुम्ही कोणाची श्रद्धा कायमची नष्ट करू शकत नाही तर केवळ तात्पुरती. आठ ते दहा वर्षे त्यांचे मन गर गर फिरत राहते. या ग्रहावर चांगले लोक आहे यावरचा त्यांचा विश्वास उडतो आणि सगळे वाईट आहेत, सगळे निराशाजनक आहे असे त्यांना वाटू लागते.
तीन बाबी आहेत :
. कोणत्याही स्पष्टीकरणापलीकडील, कोणत्याही तर्कशास्त्राच्या पलीकडील शक्तीवर श्रद्धा. संपूर्ण विश्वाचे आवरण असलेली शक्ती.
देव म्हणजे कुठेतरी बसून तुम्हाला शिक्षा देणारा असे नाही, हे विसरून जा. एक नियम आहे, दैवी उर्जा आहे.   तुम्ही त्याला निर्मितीची दैवी अथवा पायाभूत उर्जा म्हणू  शकता ज्यामध्ये सर्वोत्कृष्ठ शिस्तबद्धता आहे. ही देवाची सर्वोत्तम व्याख्या आहे. देव हा अशी उर्जा किंवा कार्यक्षेत्र आहे ज्याला सर्वोत्कृष्ट शिस्तबद्धता आहे आणि जो अतिशय कनवाळू आणि प्रेमळ आहे. तर या विश्वाच्या प्रेमळ उर्जेमधील श्रद्धा.
. लोकांच्या चांगुलपणावर श्रद्धा. या ग्रहावर चांगले हृदय असलेले चांगले लोक आहे. निष्पाप लोक आहेत.
. स्वतःवर श्रद्धा.
वाईट संगतीमुळे या तिन्ही श्रद्धा नष्ट होतात.
'तुम्ही काय करू शकता? तुम्ही या जगात काहीही करू शकत नाही. चला,या,बसा,तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही एक आभास आहात.अशा प्रकारे श्रद्धा,स्वतःवरची श्रद्धा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या चांगुलपणावरची श्रद्धा नष्ट होते, आणि हे जग एक फार भयंकर जागा आहे, अतिशय वाईट संगत आहे असे तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते.
त्या दिवशी एक जोडपे माझ्याकडे आले आणि म्हणाले की त्यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आणि त्याने चिट्टीत लिहून ठेवले, 'हे जग भयानक आहे, मला कुठेही अशा दिसत नाही. लोक धर्माच्या नावाने भांडत आहेत आणि सगळीकडे अपराधाचे साम्राज्य आहे.' एक तरुण चैतन्यमय मुलगा म्हणाला की हे जग अंधारमय आहे,आणि त्याला इथे अजून जगावयाचे नाही.
तुम्हाला माहिती आहे, जपानमध्ये दर वर्षी ३०,००० तरुण आत्महत्या करतात. का? गरीबीमुळे नाही तर लोकांच्या आणि समाजातील चांगुलपणावरची श्रद्धा नाहीशी झाल्यामुळे. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतो आहे ते?
सगळ्यांना कपटी,स्वार्थी आणि चांगले नाही बघणे अशा प्रकारची असुरक्षितता समाजात निर्माण होते. मग लोक लग्न झाल्यानंतरदेखील एकाच घरात राहून सगळे वेगळ ठेवतात कारण ते घाबरतात की कोणत्याही क्षणी काहीही होईल. 'मी माझ्या गोष्ठी ठेवतो आणि तू तुझ्या ठेव.असे करणे बरे राहील कारण आपल्याला माहित नाही कि तुझे मन कधी बदलेल.'
याचा अर्थ की तुम्ही तुमच्या जीवन साथीच्या चांगुलपणावरदेखील विश्वास ठेवीत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवीत नाही,शेजाऱ्याबद्दल तर विसरा.
तर वाईट संगत अशी असते. त्यामुळे लोकांच्या आणि समाजाच्या चांगुलपणावरची श्रद्धा नष्ट होते आणि शेवटी आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो.
'तुम्ही काही करू शकत नाही,तुम्ही जगात बदल कसा काय आणू शकता,हे तर अशक्य आहे. जरा व्यवहारवादाने विचार करा.' अशाप्रकाचे एक नेतृत्व आहे. अजाणतेपणाने ते लोकांना त्या दिशेने घेऊन जातात.
आणि चांगले नेतृत्व ते आहे जे उत्साह,आनंद,उर्जा आणते आणि दुसऱ्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहित करते.
'दहा वेळा जर तुम्ही अपयशी झालात तर हरकत नाही,अकराव्यांदा उठा आणि पळा. तुम्ही धावू शकता.' चांगले नेतृत्व असा आत्मविश्वास कोणामध्ये जागा करतो. 'चुका होतात,हरकत नाही,पुढे चालत राहा.'
अपराध्यांमध्येसुद्धा चांगुलपणा आहे. गुन्हेगराच्या आतसुद्धा चांगली व्यक्ति आहे. 'प्रिझन स्मार्ट प्रोग्राम' मध्ये शिकवणाऱ्या आपल्या शिक्षकांकडून आम्हाला हे माहित झाले. त्यांना विचारा की जेव्हा तुम्ही कैद्यांना भेटता आणि त्यांच्याबरोबर बोलता तेव्हा कसे वाटते. जगाद्वारे एखाद्याची निर्भत्सना केली आहे आणि त्याच्या आत एक चांगली व्यक्ति दडलेली आहे,हो ना?
(श्रोत्यांपैकी बरेच जण ,'होय गुरुजी' म्हणतात)
हा एक चांगला नेता आहे जो गुन्हा केलेल्या व्यक्तीमधील चांगुलपणा उचलतात. त्यांच्यातदेखील चांगलेपणा आहे.
वाईट नेता तो आहे जो चांगल्या माणसातदेखील किंवा एखाद्या बालकातदेखील चुका शोधतो आणि ते बालक कसे वाईट आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
न्यायालयसुद्धा अल्पवयीनां सूट देते; ते त्यांना शिक्षा करीत नाही कारण ते बालक आहेत. एका वाईट नेत्याला त्यातसुद्धा चुका सापडतील. एक चांगला नेता तुम्हाला आनंद, आत्मविश्वास आणि ज्ञानाकडे घेऊन जातो.
आता आज तुम्हाला माहितीच आहे, मला विचारू नका,'मी चांगला नेता कसा होऊ शकतो?'  तुम्ही इथे आहात या वस्तुस्थितीचा अर्थ आहे कि तुम्ही चांगले नेते आहात कारण आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत. म्हणून आपण एकाच माळेत जाऊन बसतो. तुम्ही चांगले नेते आहात हे लक्षात ठेवा आणि बस्स एवढच;शंका कुशंका घेणे नाही कि प्रश्न करणे नाही.
आपल्याला मोहोर लावून सौदा पक्का करायचा आहे. 'मी चांगला नेता आहे', झाला सौदा पक्का. यावर काही प्रश्न नाही,कोणती उलट तपासणी नाही. ठीक आहे,सौदा पक्का!
'अरे मी चांगला नेता नाही', असे अजून चालणार नाही.
भूतकाळात तुम्ही कसेही असाल, ती वेगळी गोष्ट आहे, पण आता आज सौदा पक्का झाला आहे. तुम्ही एक चांगले नेते आहात. आणि बस्स तेवढेच.
आणि हो, तुम्ही हे विसरायला पाहिजे की तुम्ही एक नेते आहात. तुम्ही साधे आहात, तुम्ही काही नाही आहात. हे असेच ठीक आहे. जेव्हा तुम्ही एकदम थकलेले आहात आणि तुमच्यात निरुत्साह आहे आणि आळसाने तुमच्यावर संपूर्ण कब्जा केला आहे, तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही एक चांगले नेते आहात. नी जेव्हा तुम्ही कासावीस होता आणि तुमच्यावर अतिशय ताण असतो आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेले असता,तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही कोणी नाही आहात. तुम्ही नेते आहात हे विसरून जा.
जर नेता होण्याचे तुम्हाला ओझे वाटत असेल तर तुम्ही जे करीत आहात ते चालू ठेवा पण तुम्ही नेता आहात हे विसरून जा. म्हणजे काम थांबवू नका,काम हे चालू राहिलेच पाहिजे,हो! उत्तम!